डोंबिवली कट्टा पंचनामा
मी, माम्लेदारचा पंखा, राहणार ठाणे असे नमूद करतो की दि. १८ ऑक्टोबर २०१४ रोजी नंदी पलेस डोंबिवली येथे संध्याकाळी ७. ३० च्या दरम्यान काही व्यक्ती कट्ट्यासंदर्भात एक गुप्त बैठक करणार आहेत अशी खबर मिळाल्यामुळे मी तिथे साध्या वेशात उपस्थित राहायचे ठरवले. गावठी कट्टे निवडणुकीच्या काळात डोंबिवली कल्याण पट्ट्यात खात्रीलायकरीत्या उपलब्ध असल्यामुळे सावधगिरी म्हणून सदर नमूद ठिकाणी काही गडबड झाल्यास परिस्थिती नियंत्रणाखाली आणणे गरजेचे असल्यामुळे आजूबाजूला किती पोलिसबळ उपलब्ध आहे ह्याची माहिती घेण्यासाठी मी ठरलेल्या वेळेआधी अर्धा तास सदर ठिकाणी पोहोचलो आणि पाहणी केली .