श्री गजानन महारा़ज भव्य प्रगट दिन उत्सव, सनीवेल, कॅलिफोर्नीया अमेरिका
॥ गण गण गणात बोते ॥
॥ गण गण गणात बोते ॥
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन या वर्षी ३ ते ५ जुलैच्या दरम्यान लॉस एंजलिस जवळच्या अॅनाहाईममध्ये भरणार आहे. जगप्रसिद्ध डिस्नीलँडच्या जवळच असलेल्या प्रशस्त कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे अधिवेशन होणार आहे. जगभरातील मराठी मंडळींना लॉस एंजलिस परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी ही एक आगळी वेगळी संधी चालून आली आहे.
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .
नेहमीप्रमाणेच टीपी करण्याकरता भगवान शंकर आणि पार्वती त्यांच्या स्पेशल चार्टर्ड विमानातून चालले होते. पार्वती आपली नेहमीप्रमाणेच निरागसतेने विचारती झाली- "भगवान, या कलियुगात स्त्रियांना चार घटका आनंदी, सुखी ठेवणारं असं काही व्रत आहे का?" भगवान ताबडतोब उत्तरले- "हो देवी. हल्लीच्या संगणक युगात या मिसळपाव नामे संस्थळाला फार महत्त्व आलय. आणि त्यात अनाहिता नामक एक अध्याय फक्त स्त्रियांसाठीच राखून ठेवलाय. तिथं त्या अगदी मनसोक्त गप्पा मारतात, नवीन मैत्रिणी करतात, त्यायोगे स्वतःचं ज्ञान वाढवतात आणि मनोरंजनही करून घेतात."
"मयूरपंथाच्या पुर्नजन्मापर्यंत" हा धागा लेख मी डिसेंबर २०१४च्या आसपास लिहिला गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत इसीस नावाच एक दमनचक्र इराक नावाच्या देशात दाखल झाल आता सावकाश पडद्या आड जाताना दिसते आहे. अग्दीच सिंजारचा पहाड आमेरीकन प्रयत्नांनी सोडवून घेतला नाही तो पर्यंत याझिदींच्या बातम्या मुखमृष्ठावर होत्या त्या आताही आहेत पण तुमच्या समोर मुखपृष्ठावर येत नाहीत एवढेच.
शाळांमध्ये निबंध लेखना प्रमाणेच पत्र लेखन आपल्याकडे विद्यार्थ्यांकंडून करून घेतले जाते तसे ते चीन मध्येही करून घेतले जाते. असेच पत्र लेखन Niu Ziru, नामक Zhengzhou येथील चौथी इयत्तेत शिकणार्या मुलाने चीनचे सध्याचे सर्वेसर्वा "षी चिन्पिंग" (Xi Jinping) यांना उद्देशून केले. सर्वसामान्य शालेय विद्यार्थी लिहिल तसेच ते पत्र आहे. त्यात "षी चिन्पिंग" यांना उद्देशून मंगळावर उतरण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करण्याचे आवाहन आहे. पण हे पत्र वृत्त माध्यमांच्या चर्चेत वेगळ्याच कारणाने आले. बाळ Niu Ziru ने आपल्या उर्वरीत पत्रात चीनी प्रमूखांना तुम्ही जरा चबी दिसता.
महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या तथाकथित पुढार्यांनी हा व्हिडिओ जरुर पहावा. नुसतेच राजकारण करुन सरकारच्या नावाने गळा काढून पॅकेज मागणे सोडून असे काहीतरी करावे म्हणजे शेतीमुळे आत्महत्येची वेळ येणार नाही. यावर कोणी म्हणेल की येथेही शेततळी आहेत पण प्रमाण बघा व ती चळवळ बघा. पण आपल्या पुढार्यांना (जे शेतकरीच आहेत) त्यांना हे नको आहे कारण मग यांच्या पदरात काय पडणार ? उरला प्रष्न अतीवृष्टीचा. जर या व्हिडिओत दाखवलेली शेती असेल तर मला नाही वाटत शेतकरी एकदुसर्या संकटाने डगमगून जाईल. नुसतीच आंदोलने करणार्या संघटनांपासून शेतकर्यांना वाचव ही प्रार्थना करण्याची वेळ आता आली आहे हे निश्चित.
नमस्कार मंडळी.
पुण्याला येण्याचा अचानक योग जुळून आला, आणी त्यातच एक अचानक कट्टापण जमून गेला. वल्लीने सुचवलेलं 'पाताळेश्वर' हे ठिकाण एकदम अद्भुत. प्रशांत वगळता अन्य मिपाकरांशी भेट होण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग. चौकटराजा, इस्पिकएक्का, वल्ली, समीर, सूड, धन्या, यसवायजी, प्रशांत .... सर्वांनी उदंड उत्साहानं गप्पा-गोष्टी केल्या. नंतर 'एक कालसर्प आहे खोल आपल्या पोटात दडून' आणि तो बाहेर कसा काढायचा, आणि काढल्यावर घडून येणारे सुपरिणाम, यावर मी स्वानुभाव-कथन केल्यावर मंडळींपैकी काहींनी ते करून बघण्याचा निश्चय केला, आणि त्याची पहिली पायरी म्हणून लगेचच ताज्या फळांचा रस प्राशन करते झालो.