'आपलेपणाला' / आपला माणूस

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
16 Jan 2015 - 5:18 pm
गाभा: 

ऐका वृत्तपत्रातील बातमीनुसार खालील बातमी प्रसिद्ध झाली आहे
"एखाद्या भारतीयवंशाच्या व्यक्तीने यश प्राप्त केल्यानंतर त्या व्यक्तीचं भारतीयांकडून प्रचंड कौतुक केलं जातं आणि त्याचं हे भारताचंच यश असं चित्र आपण रंगवतो. मात्र भारतीयांच्या या 'आपलेपणाला' लुइसियानाचे गर्व्हनर बॉबी जिंदल यांनी चांगलीच चपराक देत, भारतीयांच्या खोट्या अभिमानाला जमिनीवर आणले आहे. दुहेरी ओळख ठेवण्यात माझा बिलकूल विश्वास नाही, मी पूर्ण अमेरिकी आहे, अशा कडक शब्दात आपण भारतीय वंशाचे आहोत ही ओळख बॉबी जिंदल यांनी खोडून काढली आहे. इतकेच नाही तर, माझे आई-वडिल हे चार दशकांपूर्वी भारत सोडून अमेरिकेत आले ते अमेरिकन बनण्यासाठी, भारतीय-अमेरिकन म्हणवून घेण्यासाठी नाही, असे बॉबी जिंदल म्हणाले."

मलाही तसेच काहीसे वाटते उदा. मध्यंतरी सुनिता विलियम्सच्या अंतराळ वारीचं, भलतंच कौतुक. (म्हणजे ती भारतीयच असल्यासारखं कौतुक),नाही-कौतुक करा हो, पण भारतातहि भरपूर कौतुकास्पद गोष्टी आहे. ते कर्तुत्ववान आहेत पण ते अमेरिकेन साधनांचा वापर करून स्वकर्तुत्वावर तिथे फळले/फुलले, हे काही लोक स्वतःकडे क्रेडीट घेताना विसरून जातात कि काय ?
Sunita Williams, Russel Peters, Jimi Mistry, Parminder Nagra, Gurinder , Naveen Andrews, Padma Lakshmi, Jhumpa Lahiri,
M.N.Shyamalan,………etc . लोकांचासारख्या काही गप्पांमध्ये लोकांचां उलेख्ख आला की झालेच हे आपल्याकडचे काही लोक सुरु !

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

16 Jan 2015 - 5:23 pm | अत्रन्गि पाउस

गल्ली चुकलंय का वो ते पी यल

पगला गजोधर's picture

16 Jan 2015 - 6:25 pm | पगला गजोधर

नाय वो …. गल्ली चुकल असती तर, 'माझी अमेरिकावारी' सारखी एखादी पुराणकथाच लिहून-सोडल्ली असती कि वो आमी.

बॅटमॅन's picture

16 Jan 2015 - 5:23 pm | बॅटमॅन

पूर्ण सहमत आहे. त्या लोकांच्या यशात त्यांच्या स्वतःइतकाच अमेरिकेने वा अन्य देशाने पुरवलेल्या पोषक वातावरणाचा वाटा आहे. बेसिकली त्यांना भारताबाहेर जावे लागणे हेच भारताचे मोठे अपयश आहे.

पण हा तिकडे बघण्याचा एक दृष्टिकोन झाला. तत्रस्थ भारतीयांशी नीट काँटॅक्ट ठेवणारा एक फुलटाईम ऑफिसर पायजे खरेतर न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरांत. त्याचे काम फक्त नेटवर्किंग, मांडवली आणि मेक इन इंड्या इतकेच पाहिजे. तसे असेल तर बॉबी जिंदाल इतकी टोकाची प्रतिक्रिया कुणी देणार नाही.

धर्मराजमुटके's picture

16 Jan 2015 - 5:26 pm | धर्मराजमुटके

सहमत.
आम्ही उगाच तिकडे आम्रिकेत कोणा भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव प्रसिद्धिझोतात आले की चार इंच छाती पुढे काढून चालतो. पण काये ना की जागतिकीकरणात देश ही संकल्पना सुसंगत आहे काय अशा प्रकारे विचार करायची वेळ आलीये असे कुठे कुठे वाचल्याचे आठवते.
पण एक लक्षात ठेवा की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा "धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का" असे होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद ! जय अमेरिका !!

पगला गजोधर's picture

16 Jan 2015 - 6:31 pm | पगला गजोधर

तात्यानू, जल्ला आप्ला घर कोन्ता, घाट कोन्ता, य ज्यच त्यन ठरवावं म्हंत म्यि.

अरे त्या बॉब्यालाही त्याची व्होट ब्यांक जिंदा ठेवायची आहे ना!

त्याचे मतदार म्हणजे (अ) नागरिकत्व घेतलेले भारतीय आणि (ब) अभारतीय (काळे, गोरे, पिवळे, लाल वगैरे). हे असं विधान केलं की ब-वाली जन्ता खूश. अ-वाल्या जन्तेत दुहेरी ओळखी ठेवण्यात रस असलेले कमी असावेत (असा आपला माझा अंदाज.) किंवा "मला दुहेरी ओळख ठेवायची नाही" असं म्हणणं कूल-पॉईंट-दायक असावं. त्यामुळे विन विन सिचुएशन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jan 2015 - 7:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

+ १ + अधिक...

जर गव्हर्नरपदाच्या पुढचे पाउल म्हणजे अमेरिकन अध्यक्षिय निवडणूकीत घोडं पुढे दामटायचं असेल तर "इंडियन-अमेरिकन इमेज" गैरसोईची आहे आणि फक्त "अमेरिकन इमेज" आवश्यक आहे.

अर्थात, ज्यांना भारतात पुरेश्या संधी मिळाल्या नाहीत आणि / किंवा ज्यांनी आपले भवितव्य परदेशी घडवले अश्या व्यक्तींच्या यशात भारताचा काही वाटा असला तर तो त्या व्यक्तींनीच स्वतः सांगितला पाहिजे. तो त्यांच्यावर लादायचा हक्क इतरांना नाही.

बर्‍याच वेळेस भारत सोडून इतरत्र गेलेल्या लोकांना तसे केले म्हणून दोष दिला जातो. हे केवळ चूकच नाही तर हास्यास्पद आहे. आपला उत्कर्ष करण्यासाठी वैध मार्ग अवलंबून जगभरच्या संधींचा फायदा घेण्याचा हक्क भारतिय लोकशाही सर्व भारतियांना दिला आहे. तेव्हा अश्या लोकांनी परदेशात जाऊन भारतावर केवढा अन्याय केला असा सूर काढणे योग्य नाही. जर काही करायचे असेल तर भारतातच अशी परिस्थिती निर्माण करायला पाहिजे की कोणाला परदेशात इथल्यापेक्षा जास्त संधी आहेत असे वाटता कामा नाही. किंबहुना, जेव्हा परदेशी लोकांना जेव्हा भारत हा संधींचे माहेरघर वाटू लागेल तेव्हाच भारतियांचा परदेशी जाण्याचा ओघ कमी होईल.

पिवळा डांबिस's picture

16 Jan 2015 - 11:41 pm | पिवळा डांबिस

अमेरिकन अध्यक्षिय निवडणूकीत घोडं पुढे दामटायचं असेल तर "इंडियन-अमेरिकन इमेज" गैरसोईची आहे आणि फक्त "अमेरिकन इमेज" आवश्यक आहे.

करेक्ट! विशेषतः कॉन्झर्व्हेटिव्ह रिपब्लिकन व्होटर्ससाठी!! आणि त्यासाठीच हे सगळं चाललं असावं. नाहीतर आज इतकी वर्षे हा पोपट पब्लिक लाईफमध्ये आहे, आधी का नाही हो तो असं काही बोलला? ;)
बाकी त्यात विशेष काही नाही. जसं मूळ भारतीय असणं त्याला या इलेक्शनसाठी मान्य नाही तसंच जरी त्याने स्वतःच्या भारतीयत्वाचा गजर केला असता तरी केवळ तो भारतीय आहे म्हणून मी त्याला मत देणार नाही.

दुहेरी ओळख ठेवण्यात माझा बिलकूल विश्वास नाही, मी पूर्ण अमेरिकी आहे

एकदम करेक्ट .. कर्मभुमी आणि जन्मभुमी यांच्याशी इमान राखलेच पाहिजे.

नाहीतर फक्त वंश भारतीय म्हणुन पाठ थोपटण्यात काही अर्थ नाही..

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

16 Jan 2015 - 6:08 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ओबामा भारतात याय्ला निघालाय म्हणून असे धागे यायला लागलेत काय रे गजोधरा?अमेरिकेत आम्हाला कोणी म्हणून कोणी मदत करत नाही असे एक युवती आजच म्हणाली होती एका धाग्यात.तिकडे लॉस एंजेलिसात मराठी मंडळचे मोठे अधिवेशनाला यायचा एक निमंत्रणाचा धागा एक हल्लीच येउन गेला.
तू म्हणतोस ते खरे आहे.मध्यंतरी विक्रम पंडीत का कोणी सिटी बॅन्केचा सी.ई.ओ. झाला होता.झाले!!. त्याचे गाव, त्याची शाळा,त्याचे आत्ये,मामे,चुलत भावांच्या मुलाखती,'हालाखीत' काढलेले दिवस.. सगळे काही कव्हर केले आमच्या मिडियाने.मग 'नागपूरचा विक्रम झाला सिटी बॅन्केचा सी.ई.ओ.' ही बातमी झाली.खरे तर तो विक्रम ५२ सालांपैकी ३० साल अमेरिकेत होता.तेव्हा तो संत्रा बर्फीपेक्षा स्निकरची त्याला जास्त ओळख.

त्याले दोन बापाच पोरग व्हायच नसन

प्रमोद देर्देकर's picture

16 Jan 2015 - 7:39 pm | प्रमोद देर्देकर

अहो प.गजो. तुम्ही यादीत एक नाव एड्वले नाहीये - पामेला अँडरसन. :-)))

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 7:44 pm | टवाळ कार्टा

हि या यादीत कशी??? आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या सन्नीबाई लिओनी कश्या राहील्या ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jan 2015 - 7:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

हि या यादीत कशी??? मान ना मान... ऐकलं नाय का ??? +D

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 7:59 pm | टवाळ कार्टा

नाय वो....
आणखी माहिती देता का...व्यनी करा पाहिजेतर :)

चित्रगुप्त's picture

16 Jan 2015 - 7:55 pm | चित्रगुप्त

जे लोक भारतात २०-२५ व्या वर्षांपावेतो राहून मग परदेशात स्थायिक झालेले असतात, त्यांना भारताबद्दल स्वारस्थ्य वाटत असते, मात्र तिकडेच जन्मापासून वाढलेल्या पुढल्या पिढीला ते नसणेही स्वाभाविकच. हा बॉबी जिंदल प्राणी १९७१ मधे लुझियाना, अमेरिकेत जन्मलेला. अमेरिकेत खरेतर रेड इंडियन वगळता जगभरातून आलेले सगळेच इमिग्रंट आहेत आणि ते अमेरिकनच म्हणवले जातात.

श्रीगुरुजी's picture

16 Jan 2015 - 8:32 pm | श्रीगुरुजी

बॉबी जिंदालचा भारताचा काहीही संबंध नाही. त्याचे आईवडील ४०-५० वर्षांपूर्वी भारतातून अमेरिकेत गेले. बॉबीचा जन्म अमेरिकेत झाला. आजवर तो कधीही भारतात आलेला नाही. तरूणपणी त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारून एका गोर्‍या अमेरिकेन महिलेशी लग्न केले. पूर्वी त्याच्या स्वतःच्या वेबसाईटवर येशू ख्रिस्ताचे गोडवे गायले असायचे. हे सर्व करण्याचा त्याला कायदेशीर हक्क आहे. त्यामुळे त्यात आक्षेपार्ह काहीही नाही.

गंमत अशी की ५-६ वर्षांपूर्वी तो पहिल्यांदा गव्हर्नरपदी निवडून आल्यावर हरयानातील त्याच्या मात्यापित्यांच्या मूळ गावी 'आपल्या गावातील माणसाने जबरदस्त कर्तुत्व गाजविले' असा अभिमान बाळगून गावात गावकर्‍यांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली होती. तेव्हा हसावे की रडावे हे कळेना.

बोका-ए-आझम's picture

16 Jan 2015 - 10:19 pm | बोका-ए-आझम

हे सगळं ठीक आहे पण जेव्हा एखादा भारतीय वंशाचा माणूस अमेरिकेत गुन्हा करतो तेव्हा त्याची मूळ भारतीय पार्श्वभूमी अशी चघळली जाते की जसं काही भारतीय असल्यामुळेच तो गुन्हेगार झाला. रजत गुप्ता हे अगदी ढळढळीत उदाहरण आहे.

अत्रन्गि पाउस's picture

17 Jan 2015 - 5:10 pm | अत्रन्गि पाउस

++1

तसं बघायला गेलं तर कोणत्याही पाकीस्तानी नागरीकाने मर्दुमुकी गाजवली की आपली छाती फुगायला हवी. कारण सर्व पाकीस्तानी कधी ना कधी भारतीय होते. :)