सायकलिंग ह्या स्पोर्टमध्ये भारतीयांनी मिळवलेला विजय,
नाशिक मधील डॉ महेन्द्र महाजन वय ३९ आणि डॉ हितेन्द्र महाजन वय ४४ यांनी जगातली एक अत्यंत कठिण सायकल रेस अमेरिकेतील RAAM आज पूर्ण केली. ही रेस त्यांनी team india:vision for tribals ह्या नावाने टीम रेस म्हणून पूर्ण केली. ३००० मैलाची ही रेस दोन जणांच्या ह्या टीमला नऊ दिवसात पूर्ण करायची होती. ती त्यांनी आठ दिवस चौदा तास आणी ५५ मिनिटांमध्ये पूर्ण केली. अमेरिकेच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंचे अंतर ह्यात पार करायचे होते. अनेक घाटांमधून जाणार्या रस्त्यावर ९००० फूट उंचीचा सर्वात मोठा पासदेखील होता. भारतातील अजून दहा सायक्लिस्ट त्यांच्या क्रूमध्ये होते.