छायाचित्रणकला: स्पर्धा क्र.७: निकाल
http://www.misalpav.com/node/30186 या सातव्या स्पर्धेलाही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. अनेक सदस्यांनी आपली उत्तमोत्तम छायाचित्रे सादर केली. सदस्यांनी दिलेल्या गुणांनुसार पुढीलप्रमाणे पहिले ३ विजेते ठरले आहेत.
http://www.misalpav.com/node/30186 या सातव्या स्पर्धेलाही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. अनेक सदस्यांनी आपली उत्तमोत्तम छायाचित्रे सादर केली. सदस्यांनी दिलेल्या गुणांनुसार पुढीलप्रमाणे पहिले ३ विजेते ठरले आहेत.
२७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी बांधवांना अनेकानेक शुभेच्छा !
माझा मराठाचिये काय बोलु कौतुके ! अमृता तेही पैजा जिंके ! ऐसी अक्षरे रसिके ! मेळवीन !!
आज कविवर्य कुसुमाग्रजांचा म्हणजेच वि. वा. शिरवाडकरांचा जन्मदिवस. हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. साजरा म्हणजे कसा? व्हॉट्सॅप फेसबुक ट्विटर वर हे शेकडोच्या शेकडो संदेश. मोठाले मोठाले संदेश. कविता काय, चित्रं काय, सुमार नाही. आजही तसंच चालू आहे. नाही नाही; माझा त्याला आक्षेप नाही. मुळीच नाही. पण शंभर संदेश पाठवल्यावर एकदा तरी आपण विचार करावा असं वाटतं. विचार हा, की संदेश पाठवण्यापलिकडे आपण खरोखर आपल्या भाषेवर प्रेम करतो का? 'अभिमान नव्हे; माज आहे' म्हणणा-या आपल्या वागण्यात तो माज दिसतो का?
ती हाताच्या तळव्यात हनुवटी ठेवून एकटक पहात होती. काहीही कळलं नव्हतं बहुतेक तिला.
"हे बघ, सोपा आहे हा फॉस वर्सेस हारबॉटल रूल." मी परत प्रयत्न केला, "कंपनीच्या बाबतीत काही गैरकृत्य घडलं, तर कंपनीच कोर्टात जाऊ शकते. शेअरहोल्डर नाही."
तिची नजर तशीच स्थिर. माझ्याकडे बघणारे दोन टपोरे डोळे.
"याला काही एक्सेप्शन्स असतात. म्हणजे मायनॉरिटी शेअरहोल्डर..." मी परत प्रयत्न केला.
"तुमचा अटेम्ट कधी आहे सर?" तिने अचानक विचारलं.
आयसीएसाय काही मला पास करायला मागत नव्हतं. हा चौथा अटेम्ट जूनमध्ये. इकडे डिग्रीविना क्लास पण चालेनात. ही एकच विद्यार्थिनी. फ्रस्ट्रेशन सालं...
पोरगीपटाव शास्त्र शिकुन पोरगी पटवली कि पटावपोरगीटिकाव शास्त्राचा अभ्यास सुरु होतो. कितीही कंटाळा आला तरी ओपन मार्केट काँपिटीशन असल्याने या शास्त्राचा अभ्यास करावाच लागतो. पटलेली पोरगी टिकवण्यासाठी आपण तसेही प्रयत्न करतोच; पण जेव्हा पोरगी A किंवा B कॅटेगरीतली असेल तेव्हा पोरगी पटलेली असुनही आउटसाईड काँपिटीशनला तोंड द्यावे लागते. आपण जरी तिला कितीही खुश ठेवत असलो, तिच्यावर विश्वास असला तरीही जेव्हा आपल्या समोरच कोणीतरी तिच्याशी फ्लर्ट करत असेल तर आपल्या अंगाचा तिळ्पापड होतोच.. तर अशा वेळी काय करावे?
(सुचना - सदरिल लेखातील घटना दिं.११/०२/२०१४ रोजी घडलेली आहे. हा लेखही त्याच सुमारास लिहीला होता. प्रकाशित करण्यास विलंब झाला.घडलेली घटना काहिशी गंभीर होती पण मजा आली.)
"मयूरपंथाच्या पुर्नजन्मापर्यंत" हा धागा लेख मी डिसेंबर २०१४च्या आसपास लिहिला गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत इसीस नावाच एक दमनचक्र इराक नावाच्या देशात दाखल झाल आता सावकाश पडद्या आड जाताना दिसते आहे. अग्दीच सिंजारचा पहाड आमेरीकन प्रयत्नांनी सोडवून घेतला नाही तो पर्यंत याझिदींच्या बातम्या मुखमृष्ठावर होत्या त्या आताही आहेत पण तुमच्या समोर मुखपृष्ठावर येत नाहीत एवढेच.
दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी “पडणे” एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे, तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे. आता तुमच्या लक्षात आले असेच की “पडणे” या विषयावर बोलण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त योग्य व्यक्ती या भूतलावर नाही आहे.
कुठल्याही शाळेत जावं. पाचवीच्या पुढील हाताला लागेल त्या पोराला विचारावं, ‘'भीती वाटते असा तुझ्या अभ्यासातला विषय कुठला?'' समोरून ‘गणित’ असं उत्तर आलं नाही तर आपल्याला त्या पोराचीच भीती वाटू लागेल ! गणित-भूमिती सारख्या ‘डेंजर’ विषयांनी आपलं कोवळं बालजीवन किती खडतर केलं होतं, हे प्रत्येकाने आठवून पाहावं ! ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ म्हणतात त्याप्रमाणे आम्ही गणित-भूमिती विषयांना घाबरून त्यापासून दूर पळत राहिलो. गावाकडच्या विद्यार्थ्याना जणू विज्ञान -इंग्रजी व गणित म्हणजे पारंपारिक शत्रूच वाटत. अर्थात सन्माननीय अपवाद बरेच आहेत!
खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता.
पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे.
श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व.
आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा?
किती वाजता करायचा?
खायला-प्यायला काय आणायचे?
इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच.
तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो.
(तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)