✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रिबटेबल प्रिझंप्शन

आ
आदूबाळ यांनी
Mon, 02/09/2015 - 23:35  ·  लेख
लेख
ती हाताच्या तळव्यात हनुवटी ठेवून एकटक पहात होती. काहीही कळलं नव्हतं बहुतेक तिला. "हे बघ, सोपा आहे हा फॉस वर्सेस हारबॉटल रूल." मी परत प्रयत्न केला, "कंपनीच्या बाबतीत काही गैरकृत्य घडलं, तर कंपनीच कोर्टात जाऊ शकते. शेअरहोल्डर नाही." तिची नजर तशीच स्थिर. माझ्याकडे बघणारे दोन टपोरे डोळे. "याला काही एक्सेप्शन्स असतात. म्हणजे मायनॉरिटी शेअरहोल्डर..." मी परत प्रयत्न केला. "तुमचा अटेम्ट कधी आहे सर?" तिने अचानक विचारलं. आयसीएसाय काही मला पास करायला मागत नव्हतं. हा चौथा अटेम्ट जूनमध्ये. इकडे डिग्रीविना क्लास पण चालेनात. ही एकच विद्यार्थिनी. फ्रस्ट्रेशन सालं... ती बाकावरून उठून जवळ आली. "सर, पास झालात की लग्न कराल माझ्याशी?!" बस्स! टचकन डोळ्यांत पाणी आलं माझ्या. ती "पास झालात की" म्हणाली; "पास झालात तर" नाही... मी मिठीत घेतलं तिला. "नक्की. प्रॉमिस." घशात काहीतरी दाटून आलं होतं. कितीतरी वेळ आम्ही तसेच उभे होतो. तिचा उष्ण उ:श्वास माझी छाती उबारून टाकत होता. पण...पण... "लग्नाचं वचन मी देऊ शकणार नाही..." "का?" तिने वर पाहिलं. "दुसरी कुणी..." "नाही, तसं काही नाहीये." मी दुखावलो. "सोशल काँट्रॅक्ट्स आर नॉट एन्फोर्सेबल. बॅल्फोर वर्सेस बॅल्फोर. नाईन्टीन नाईन्टीन. टू के बी फाईव सेवंटीवन." मी छाती काढून म्हणालो. "एवढंच ना?" ती छातीवर डोकं घुसळत म्हणाली. "ते रिबटेबल प्रिझंप्शन असतं. तेवढी रिस्क घ्यायला मी तयार आहे!" -------------------------- तर मंडली, अ‍ॅडव्हान्समध्ये सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नाट्य
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
16985 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

लई भारी!

बहुगुणी
Tue, 02/10/2015 - 00:16 नवीन
आवडली! हा द्विशतशब्द्कथा फॉर्मॅट का :-) हॅपी व्हॅलेंटाईन्स डे!
  • Log in or register to post comments

कस्सच...कसच्च...इतक्या

टवाळ कार्टा
Tue, 02/10/2015 - 08:53 नवीन
कस्सच...कसच्च...इतक्या गोग्गोड गोष्टीत तुम्ही शब्द मोजत बस्लात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

लै भारी!

नगरीनिरंजन
Tue, 02/10/2015 - 05:12 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments

वा!मस्तच!

अजया
Tue, 02/10/2015 - 08:22 नवीन
वा!मस्तच!
  • Log in or register to post comments

कथा आवडली

श्रीरंग_जोशी
Tue, 02/10/2015 - 08:24 नवीन
कथा आवडली. आता जरा या सी ए वाल्यांच्या संज्ञा समजून घेणे आले ;-) .
  • Log in or register to post comments

आता जरा या सी ए वाल्यांच्या

जेपी
Tue, 02/10/2015 - 10:05 नवीन
आता जरा या सी ए वाल्यांच्या संज्ञा समजून घेणे आले हेच म्हणतो.. *wink* प्रेम दिवसाच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सी एस आहे कथेतील पात्र.

वेल्लाभट
Wed, 02/11/2015 - 12:06 नवीन
सी एस आहे कथेतील पात्र. म्हणजे कथेत अजून सी एस पूर्ण व्हायचंय त्याचं. पण सी ए नव्हे. तो वेगळा प्रकार असतो. असो. इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

बरोबर

श्रीरंग_जोशी
Wed, 02/11/2015 - 19:10 नवीन
मी हा प्रतिसाद लिहिला तेव्हा त्यांचे संज्ञांबाबतचे स्पष्टीकरण यायचे होते. मागे एकदा आदूबाळ यांचा मिपावरच्या दुसर्‍या सी ए असलेल्या सदस्याशी सी ए बाबत झालेला संवाद वाचला होता. म्हणून आजवर मी आदूबाळ यांनाही सी ए समजत होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

मी सीए (सुद्धा?) आहे.

आदूबाळ
Wed, 02/11/2015 - 19:20 नवीन
मी सीए (सुद्धा?) आहे. खर्‍या अर्थाने सीएस नाहीये. (म्हणजे इन्स्टि. ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ ईंडियाचा सभासद नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

ओह्ह ओके

श्रीरंग_जोशी
Wed, 02/11/2015 - 20:47 नवीन
या क्षेत्राबद्दल मला फारच जुजबी माहिती आहे. मिपावर आमच्यासारख्या याबाबतीत अज्ञानी असणार्‍या लोकांसाठी सीएबाबत एखादा लेख (किंवा मालिका) लिहावा अशी नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

नको हो! नको

वेल्लाभट
Wed, 02/11/2015 - 21:00 नवीन
नको हो! नको काही चुकलं असेल तर क्षमा मागतो.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अरेच्या

श्रीरंग_जोशी
Wed, 02/11/2015 - 21:05 नवीन
मला खरोखरंच जाणुन घ्यायचे आहे या क्षेत्राबाबत. हा धागा व हे प्रतिसाद केवळ एक निमित्त झाले. कृपया गैरसमज करून घेऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

माझ्या बाजूने. आदुबाळांचं मत

वेल्लाभट
Wed, 02/11/2015 - 21:01 नवीन
माझ्या बाजूने. आदुबाळांचं मत माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

वेल्लाभटांनो, खरं तर चांगली

आदूबाळ
Wed, 02/11/2015 - 21:20 नवीन
वेल्लाभटांनो, खरं तर चांगली सुचवणी आहे. एक तर सीए काय करतो याबाबत गैरसमज फार. "तुम्ही साले लोकांना टॅक्स चुकवायला मदत करता" इथपासून "सबप्राईम मॉर्गेज क्रायसिस तुमच्यासारख्यांमुळेच झाला" इथपर्यंत काय काय म्हणून मी ऐकलेलं आहे. दुसरं म्हणजे "अवघड असतं" यापलिकडे माहिती बहुदा नसते. असलेच तर गैरसमज - "गणित फार भारी असावं लागतं किंवा "वीस वीस तास अभ्यास करता का रे..." वगैरे. तिसरं म्हणजे सीए माणूस हा तारूण्याची होळी स्वतःच्या हाताने केलेला, खप्पड अरसिक गोटा असणार असा सर्वसाधारण समज असतो. सीए नायक असलेले बॉलिवुडमधले चित्रपट आठवा - मला दोनच आठवताहेत. अमोल पालेकरचा "गोलमाल" आणि आमिर खानचा "हम है राही प्यार के". आणि मिपावर बरेच सीए आहेत. "ते गेलेले एक" सोडले तरी खाली प्रतिसादांतच बघा किती आहेत. आपण एकमेकां सहाय्य (क्राऊडसोर्सिंग) करू. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

:-)

श्रीरंग_जोशी
Wed, 02/11/2015 - 21:31 नवीन
माझ्याच भावना मांडल्यात. नेमके माझ्या जवळच्या मित्रांत किंवा जवळच्या नातलगांत कुणीच सीए नाही. दूरच्या नातलगांत खूपच प्रथितयश सीए आहेत ज्यांच्याशी माझा व्यक्तिशः कधीच संबंध आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अजुन एक चित्रपट आहे. अफसाना

मृत्युन्जय
गुरुवार, 02/12/2015 - 10:13 नवीन
अजुन एक चित्रपट आहे. अफसाना प्यार का. आमीर खान - फराह. त्यात कादर खार आमीरखान बद्दल बोलताना वो "चाटता हुआ अकाउंटंट है" असा एक अतिशय पांचट विनोद करतो. सी एस बद्दलचा पहिला उल्लेख मी स्वाभिमान मालिकेत बघितला. त्यातील सी एस चे आडनाव दलाल असते आणि तो नंतर कंपनीत काहितरी गफला करतो वगैरे असे दाखवले आहे. कंपनी सेक्रेटरीला एवढी मोठी भूमिका प्रथमच मिळाली असावी बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

जर मला नीट आठवत असेल तर रेहना

बेकार तरुण
गुरुवार, 02/12/2015 - 10:28 नवीन
जर मला नीट आठवत असेल तर रेहना है तेरे दिल मैं चित्रपटात नायिका सी ए असते (दिया मिर्झा आहे बहुतेक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

नाही; ते सगळं ठीक आहे...पण...

वेल्लाभट
गुरुवार, 02/12/2015 - 11:18 नवीन
नाही; ते सगळं ठीक आहे...पण....जाऊदे. थोडी वेगळी मतं आहेत. एक मात्र आहे. गैरसमज अनेक. टॅक्स वाला संवाद तर अनेकदा ऐकलाय. कीव करावीशी वाटते. अशा समजुती करून घेणा-यांना समजावणार तरी काय? आणि का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेकार तरुण

कथा आवडली

श्रीरंग_जोशी
Tue, 02/10/2015 - 08:24 नवीन
कथा आवडली. आता जरा या सी ए वाल्यांच्या संज्ञा समजून घेणे आले ;-) .
  • Log in or register to post comments

हा हा......

जयंत कुलकर्णी
Tue, 02/10/2015 - 08:57 नवीन
हा हा...... :-)
  • Log in or register to post comments

काही घंटा समजले नाही...

मुक्त विहारि
Tue, 02/10/2015 - 09:26 नवीन
"नाही, तसं काही नाहीये." मी दुखावलो. "सोशल काँट्रॅक्ट्स आर नॉट एन्फोर्सेबल. बॅल्फोर वर्सेस बॅल्फोर. नाईन्टीन नाईन्टीन. टू के बी फाईव सेवंटीवन." मी छाती काढून म्हणालो. "एवढंच ना?" ती छातीवर डोकं घुसळत म्हणाली. "ते रिबटेबल प्रिझंप्शन असतं. तेवढी रिस्क घ्यायला मी तयार आहे!" म्हणजे नक्की काय? हो की नाही?
  • Log in or register to post comments

"एवढंच ना?" ती छातीवर डोकं

टवाळ कार्टा
Tue, 02/10/2015 - 09:28 नवीन
"एवढंच ना?" ती छातीवर डोकं घुसळत म्हणाली. हे आहे की...बस्स ना...बाकी ऐकले नाही ऐकले ...कि फर्क पैंदा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

नायतर काय ? ती छातीवर डोकं

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/10/2015 - 12:17 नवीन
नायतर काय ? ती छातीवर डोकं घुसळत रिस्क घ्यायला तयार आहे आणि मुवि शब्दांचे अर्थ काय या विचारात ? काय चाललंय काय तुमचं मुवि ??? +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

+१००

कपिलमुनी
Tue, 02/10/2015 - 13:45 नवीन
टकाला विचारा ! अणुबवी आहे असा प्रतिसादावरून दिसत आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मस्त हो आदुबाळ . तुम्ही

पिंपातला उंदीर
Tue, 02/10/2015 - 09:45 नवीन
मस्त हो आदुबाळ . तुम्ही एवढ कमी का लिहिता असा प्रश्न पडला आहे
  • Log in or register to post comments

+१

लॉरी टांगटूंगकर
Tue, 02/10/2015 - 20:15 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

मस्त !!!

राजाभाउ
Tue, 02/10/2015 - 11:07 नवीन
मस्त !!! >>ती "पास झालात की" म्हणाली; "पास झालात तर" नाही... हे फारच आवडले ते फक्त "ते रिबटेबल प्रिझंप्शन असतं. तेवढी रिस्क घ्यायला मी तयार आहे!" समजाउन सांगा म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments

उत्तम

विटेकर
Tue, 02/10/2015 - 12:04 नवीन
आवडले .. ते छातीवर घुसलणे वगैरे ठिक आहे पण पास होणे आवश्यक आहे हे विसरु नये .
  • Log in or register to post comments

मग या सगळ्यात प्रिझंप्शन

असंका
Tue, 02/10/2015 - 12:16 नवीन
मग या सगळ्यात प्रिझंप्शन नक्की कुठलं होतं की जे रीबट केलं जाऊ शकतं? रीबट केल्यावर राहील ते प्रिझंप्शन म्हणजे सोशल कॉण्ट्रॅक्ट इज एन्फोर्सिएबल...हां हां आता अर्थ लागला!! सुंदरच!!
  • Log in or register to post comments

आयमाय स्वारी. आयुष्यात

आदूबाळ
Tue, 02/10/2015 - 12:22 नवीन
आयमाय स्वारी. आयुष्यात पहिल्यांदाच प्रेमकथा लिहायच्या नादात फारच दुर्बोध करून ठेवली बहुतेक. रीबटेबल प्रिझंप्शन म्हणजे एखादी गोष्ट खोटी सिद्ध होईपर्यंत ती खरी मानून चालणे. या कथेच्या संदर्भात - खोटी पाडण्याची धमक बाळगणे. नायक नायिकेला म्हणतो, की लग्नाच्या वचनासारख्या "सोशल कॉन्ट्रॅक्ट्स" ना अर्थ नसतो. पक्षी: आपण पास होऊ का, करियर मार्गी लागेल का याबद्दल त्याच्या मनात अजून साशंकता आहे, त्यामुळे तो हातचा राखायला पहातो आहे. त्यावर त्याची प्रेयसी त्याला म्हणते, की हे रीबटेबल आहे - पक्षी: हे खोटं पाडायची धमक मी बाळगून आहे. तिचं त्याच्यावर प्रेम आहे - त्याच्या डिग्रीवर नव्हे. तिचा त्याच्यावर विश्वासही आहे, ती त्याला आर्थिक आधार वगैरे द्यायलाही तयार आहे. ती त्याला सांगू पहाते आहे, की बाबा रे, हातचा ठेवायची गरजच नाही, माझा इरादा पक्का आहे. अजून एक छिद्रान्वेषः यातला नायक (आणि नायिकाही) सीएस (कंपनी सेक्रेटरी) च्या परीक्षा देत आहेत. सीए प्रमाणे यातही तीन कठीण होत जाणार्‍या पातळ्या, नापास होण्याचं प्रचंड प्रमाण, कंटाळून सोडून देणारे विद्यार्थी वगैरे असतं. एक काहीसा क्रूर विनोद प्रचलित आहे: सीए/सीएस मध्ये रॅगिंग का होत नाही? कारण कधी कोण कुणाचा सीनियर होईल ते सांगता येत नाही! सीए/सीएस करणं हे कष्टाचं, चिकाटीचं काम तर आहेच, पण त्यात नशीबाचा भागही असतो. इतर शिक्षणक्षेत्रात पास होणं तुलनेने सोपं, आणि डिस्टिंक्शन/मेरिट वगैरे गोष्टी असतात. सीए/सीएसमध्ये मुळात पास होणं हाच एक मोठा आडवा दगड असतो. फायनल परीक्षेचा रिझल्ट स्क्रीनवर (हल्ली) किंवा बोर्डावर (पूर्वी) बघितल्याशिवाय आपण या दिव्यातून सहीसलामत बाहेर पडलो आहोत, याबद्दल कधीच खात्री पटत नाही. ज्यांना एकापेक्षा जास्त अटेंप्ट द्यावे लागतात त्यांची परिस्थिती सर्वात बेक्कार - एकीकडे तारूण्य धडका मारत असतं, मित्रबित्र उद्योगधंद्याला लागलेले असतात, आणि आपण मात्र मे-नोव्हेंबर किंवा जून-डिसेंबरची आषाढी कार्तिकी करत असतो. प्रत्येक अयशस्वी प्रयत्नाबरोबर आत्मविश्वास खचत चाललेला असतो. कितीही खंबीर असलात तरी अंधश्रद्धाळूपणा चोरपावलांनी यायला लागतो. अतिशय हळवं व्हायला होतं. अशा वेळी कोणाचा बारीकसा आधारही मोलाचाच असतो. असो - वहावत गेलो जरा. "त्या दिवसांबद्दल" लिहावं तितकं थोडं आहे. कथा आवडल्याचं कळवल्याबद्दल आभार!
  • Log in or register to post comments

आयला वारीच्या आठवणींनी

असंका
Tue, 02/10/2015 - 12:33 नवीन
आयला वारीच्या आठवणींनी डोळ्यात पाणी आलं.... शब्दा शब्दाशी सहमत.... अंधश्रद्धेबद्द्ल तर काय बोलू!! अगदी खरं सांगतो, तुमचा हा शब्द वाचून मला पहिल्यांदा जाणीव झाली की ज्या गोष्टीमुळे आपण शेवटी सुटलो असं मी मानतो, ती तसं बघितलं तर अंध श्रद्धाच असली पाहिजे...(म्हणजे मी यापुढे हे मान्य करणार नाही, पण एका हळव्या क्षणी बोलून गेलेलं सत्य हे आहे की ती अंधश्रद्धा असली पाहिजे!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

वारी

सविता००१
Wed, 02/11/2015 - 12:15 नवीन
आठवली. अरे देवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

सी एस बरेच सोप्पे करुन ठेवले

मृत्युन्जय
Tue, 02/10/2015 - 12:37 नवीन
सी एस बरेच सोप्पे करुन ठेवले आहे आजकाल तरी. बरेच लोक लोंढ्याने पास होता. आपण जून्या काळातले सी एस दिसता त्यामुळे आषाढी कार्तिकीचा अण्भव आहे. आजकाल बर्‍याच जणांना नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आजकाल बरेच सोप्पे करुन ठेवले आहे

कपिलमुनी
Wed, 02/11/2015 - 11:29 नवीन
आजकाल बरेच सोप्पे करुन ठेवले आहे
दहावीपासून ते डॉ, ईं व सर्व अभ्यासक्रमाचे सर्व माजी विद्यार्थ्यांचा पेटंट डायलॉग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अगदी अगदी

सुबोध खरे
Wed, 02/11/2015 - 13:21 नवीन
अगदी अगदी खरं तर वैद्यकीय अभ्यासक्रम आता इतका प्रचंड वाढला आहे कि आमच्या वेळेस सोपे होते असेच म्हणतो( आताच्या परिस्थितीत आम्हाला झेपलेच नसते) अशीच परिस्थिती इतर अभ्यासक्रमांची असावी असे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आदूबाळा अरे प्रेमाच आय मीन

मदनबाण
Wed, 02/11/2015 - 13:26 नवीन
आदूबाळा अरे प्रेमाच आय मीन लेखाची बँलेन्स शीट समजवुन सांगितली नसतीस तर काय घंटा उमगले नसते रे ! हल्ली अलगद डोळा मारायचे दिवस गेलेत काय ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खरे आहे. पण जर पुर्वी रिझल्ट

मृत्युन्जय
Wed, 02/11/2015 - 15:57 नवीन
खरे आहे. पण जर पुर्वी रिझल्ट १०% लागत असेल आणी आता २५% लागत असेल तर माझे म्हणणे अगदीच काही अवास्तव नाही हे तर मान्य करावे लागेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सहज लिहिले रे

कपिलमुनी
Wed, 02/11/2015 - 16:47 नवीन
आजकाल बरेच सोप्पे करुन ठेवले आहे मलाही असेच वाटते ! पूर्वी ईंजिनीयरींग मध्ये फर्स्ट क्लास किंवा डिस्टींग्शन दुर्मिळ असायचे. आता खोर्‍याने सापडतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

पोरं जास्त हुशार झाली असतील

आदूबाळ
Wed, 02/11/2015 - 16:57 नवीन
पोरं जास्त हुशार झाली असतील ;) शिरियसली - मला असं वाटतं की हल्लीची पोरं (x) जास्त परीक्षाभिमुख आहेत. एकतर त्यांच्याकडे परीक्षेचा अडथळा पार करवतील असे स्रोत आहेत (y), आणि दुसरं म्हणजे त्यांना specialisationचं महत्त्व लहान वयातच कळलेलं असतं. त्यामुळे ते आपल्या आवडीच्या उपविषयात प्राविण्य मिळवून बाकीच्यांचा पास होण्यापुरता अभ्यास करतात. हे मत अर्थात मी ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांच्याकडे पाहून बनवलेलं आहे. _______ (x) भेंडी कसं म्हातारं म्हातारं झाल्यासारखं वाटायला लागलंय! (y) नव्या पद्धतीची पुस्तकं, क्लासेस वगैरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

परीक्षाभिमुख हे बरोबर

कपिलमुनी
Wed, 02/11/2015 - 17:07 नवीन
परीक्षाभिमुख हे बरोबर आहे . सध्या नक्कीच जास्त मार्क पडत आहेत. नक्की काय केल्यावर मार्क पडतात हे माहीत आहे आणि तसाच शिकवतात. पण खोलवर अभ्यास नाही . रेफरन्स बूके वाचायचा प्रमाण प्रचंड घटला आहे . ईं. च्या बाबतीत निराली , टेकमॅक्स , प्रगती यांची पुस्तके वापरतात ज्यात फक्त कामापुरत असता . त्याच्या बाहेरचा प्रश्न यांना येत नाही. बर ! या पुस्तकांचे लेखक हे जुने - जाणते प्रोफेसर असतात जे विद्यापीठामध्ये पेपर सेटर असतात त्यामुळे पेपर त्यातूनच येतो . आपल्याकडे संशोधक आणि ती वृत्ती कमी असण्याचे कारण मार्कांना दिले जाणारे महत्व आणि परीक्षाभिमुख पद्धत हे आहे असे वाटते . ( फारच अवांतर झाले .)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मे नोवेंबरच्या आषाढी कार्तिकी

अनुप ढेरे
Tue, 02/10/2015 - 13:52 नवीन
मे नोवेंबरच्या आषाढी कार्तिकी अगदी जवळून पाहण्यात आल्या आहेत. त्या मानाने विंजिणेर अगदी आरामात बनता येतं. ४० , केट्या, जयकर अगदी दिमतीला उभे असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आभार

मिहिर
Tue, 02/10/2015 - 21:23 नवीन
हे वाचण्याआधी गोष्ट कळली नव्हती. आत कळली आणि आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हीच परिस्थिती कोणत्याही

सुबोध खरे
Wed, 02/11/2015 - 10:59 नवीन
हीच परिस्थिती कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमात असते. डॉक्टर होण्यात असेच कष्ट असतात. त्यातून गेलेल्या माणसाला त्याची किंमत कळते. आयुष्यात स्वतःच्या यशाची खात्री नसताना एखाद्या सुंदर मुलीला कष्टप्रद परिस्थितीत ढकलू न इच्छिणाऱ्या तरुणाची मनोवृत्ती आपण फार छान लिहिली आहे. "प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगी" या गाण्यात अशी मनोवृत्ती फार छान पणे दाखवली आहे. फारुख शेखचा अभिनय पण यात अतिशय उत्कृष्ट झालेला आहे. अगदी काळजाला भिडणाऱे असे गाणे. जमेल तसे(वेळ मिळेल तसे) लिहित राहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अतिशय उत्तम, खूप रिलेट करु शकलो मी

बेकार तरुण
Wed, 02/11/2015 - 16:38 नवीन
आपण ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या मी पण अनुभवल्या आहेत. अतिशय कठिण काळ असतो तो. मी पण एकच ग्रुप चार वेळा दिला :) दर वेळि ४ ८ गुणांमुळे परत वारि करावि लागायचि. खूप निगेटिव विचार मनात सतत डोकावत असायचे. त्यातला एक अत्यंत नेहमिचा म्हंणजे, अरे तो अबक पण पास झाला आणी मी होतच नाहिये. त्याला आजवर माझ्यापेक्षा एकाहि परिक्षेत जास्ति गुण नव्हते !! अशा वेळि योग्य ती साथ मिळालि आणी निराशेच्या गर्तेत न सापडता, पुन्हा लढायचि जिद्द पण मिळालि. अखेर इन्स्टिट्युट नि पुढे ढकलुन दिले :) बाकि सीएस हि परिक्षा अवघड होति आणि आता सोपी ह्यात मला काहिच माहित नाहि, त्यावेळी माझ्या कुवतिला नक्किच अवघड गेलि मला हे नक्कि. आज देखिल हि परिक्षा द्यायला गेलो तर नक्कि पहिल्या वेळेसच पास होईन ह्याचि मला खात्रिपण नाहि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कथा आवडली.

स्वाती२
Tue, 02/10/2015 - 18:15 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

कथा आवडली. सुदैवाने दुसर्‍या

रेवती
Tue, 02/10/2015 - 19:04 नवीन
कथा आवडली. सुदैवाने दुसर्‍या वाचनात समजली. काल प्रतिसाद द्यायचा राहिला. आज तुमचे स्पष्टीकरणही आवडले.
  • Log in or register to post comments

:)

पैसा
Tue, 02/10/2015 - 20:02 नवीन
छान आहे!
  • Log in or register to post comments

आदुबाळ , हा अण्याव आहे ...

प्रसाद गोडबोले
Tue, 02/10/2015 - 21:39 नवीन
आदुबाळ , हा अण्याव आहे ... कथा बेस्टच आहे पण आमच्या सारख्या नान शी.ये वाल्यांना स्पश्टीकरण दिल्याशेवाय कसे कळणार ? तुमचा वरचा प्रतिसाद वाचल्यावर थोडाफार अर्थ उमगला . आता प्रत्येकाने त्याच्या त्यच्या कार्यक्षेत्राशी निवडीत गोष्टींवर प्रेमकथा लिहायला हरकत नसावी ... ही घ्या आमच्या कडुन एक प्रेमकथा : ती : आय लव्ह यु , माझ्याशी लग्न करशील ? मी : ऑप्शन का फ्युचर ? ती : ऑप्शन =) मी : सोल्ड अमेरिकन :D समाप्त
  • Log in or register to post comments

हे

सविता००१
Wed, 02/11/2015 - 16:42 नवीन
फार भारी आहे. आवडलं. हे मार्केट ट्रेडिंग प्रपोझल वाट्टं?????? मस्ताड आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आता प्रत्येकाने त्याच्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/11/2015 - 21:04 नवीन
आता प्रत्येकाने त्याच्या त्यच्या कार्यक्षेत्राशी निवडीत गोष्टींवर प्रेमकथा लिहायला हरकत नसावी ...
ह्म्म...!! द मी: प्रिये, तुला पाहिलं की हृदयाचा पॉसिटीव्ह डिस्प्लेसमेंट पंप धडधडु लागतो. तु हसलीस की डोक्यात w-16 इंजिनाचं स्मुथ हमिंग चालु होतं. तु केसाची बट उडवताना असं वाटतं, अस वाटतं की साक्षात ब्युगाटीचा पहिला गिअर पडलाय. तुझ्या गालावरची खळी पाहिली की मर्सिडिझ्च्या सेक्साड ब्रेक कुलर्स ची आठवण होते. माझी होशील का गाडी....आपलं माझी होशील का राणी? ती: ^&*@^&*^@&#^*@&#^*&@ आता जातो का दादाला बोलाउ. =)) मी: एक लै फेमस गाणं गुणगुणत (ब्रेक अप के बाद) वालं...!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा