निमंत्रण- पुण्यातल्या एका पुस्तक प्रकाशनाचे

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
10 Dec 2014 - 7:13 pm

कुठल्याही शाळेत जावं. पाचवीच्या पुढील हाताला लागेल त्या पोराला विचारावं, ‘'भीती वाटते असा तुझ्या अभ्यासातला विषय कुठला?'' समोरून ‘गणित’ असं उत्तर आलं नाही तर आपल्याला त्या पोराचीच भीती वाटू लागेल ! गणित-भूमिती सारख्या ‘डेंजर’ विषयांनी आपलं कोवळं बालजीवन किती खडतर केलं होतं, हे प्रत्येकाने आठवून पाहावं ! ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ म्हणतात त्याप्रमाणे आम्ही गणित-भूमिती विषयांना घाबरून त्यापासून दूर पळत राहिलो. गावाकडच्या विद्यार्थ्याना जणू विज्ञान -इंग्रजी व गणित म्हणजे पारंपारिक शत्रूच वाटत. अर्थात सन्माननीय अपवाद बरेच आहेत!

त्यात विज्ञान गमतीदार वाटावे म्हणून प्रयोगाचे माध्यम आहे, बीजगणितासाठी वेदिक गणित किंवा अब्याकस वेग्रे आहे, इंग्रजीसाठी गाणी- सीडीज आहेत…भूमिती मात्र असा बहुधा एकटाच कंटाळवाणा विषय म्हणून राहिला आहे.

विध्यार्थ्यांच्या नजरेतून भूमितीकडे पहिले तर भूमितीचे हे साधारणपणे असे असते-
एक गुंतागुंतीची आकृती असते आणि त्यात काहीतरी सिद्ध करायचे असते…. गणित पाहिल्यावर "नक्की कोणते प्रमेय वापरावे" हेच मुलांना समजत नाही…. आणि एखादे प्रमेय वापरल्यावर नक्की उत्तर येणार आहे का ह्याचीही खात्री देता येत नाही…प्रमेये तर पाठच होत नाहीत… !

हि स्थिती कधी बदलणार? आकृत्यांशी विद्यार्थ्यांची मैत्री कधी होणार? संकल्पना पक्क्या कशा होणार?
तर….ही मैत्री करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाउल म्हणजे "गोष्टीरूप भूमिती प्रयोगशाळा" हे पुस्तक. ह्या पुस्तकाच्या पहिल्या भागात "ओरीगामितून भूमिती" ह्यावर आधारित उपक्रम दिले आहेत.
हे उपक्रम एका कथेत बांधले आहेत, त्यामुळे नकळत "भूमितीचे व्यावहारिक उपयोग" मुलांना कळतातच, त्याचसोबत रोजच्या जीवनातील कथा दिल्यामुळे कोठेतरी "आजूबाजूला भूमिती शोधण्याची" दृष्टी देखील मिळते. त्या कथेच्या अनुषंगाने मग भूमिती उपक्रम येतात. थोडक्यात पुस्तकाचे स्वरूप हे :- "कथा -> ओरिगामी उपक्रम -> त्यामागची भूमिती" असे आहे.

हे पुस्तक इयत्ता : ८ वी ते १०वी साठी,मराठी व सेमी-इंग्लिश मिडीयम साठी आहे.
तसेच महाराष्ट्र बोर्ड, सी. बी. एस. ई. व आय. सी. एस. ई. च्या अभ्यासक्रमानुसार आहे.
ह्या पुस्तकाचे प्रकाशन दैनिक 'सकाळ' चे संपादक श्री. नंदकुमार सुतार ह्यांच्या हस्ते होणार आहे.

लेखकाविषयी :
लेखक राहुल भिवरे हा भूमितीवेडाने झपाटलेला एक अभियंता. दहाबारा वर्षांपूर्वी मी अभियांत्रिकी शिक्षक असताना माझ्या विभागात अभियांत्रिकी पदव्युत्तरचा विद्यार्थी होता - त्यामुळे मित्रही. आणि नंतर माझ्याच कंपनीत काही काळ सोफटवेअर डेव्हलपर होता. काही वर्षे विकांताला शाळांमध्ये जाउन स्वतः भूमिती सोपे करून शिकवत असे. शाळाना भूमितीच्या प्रयोगशाळेची माहिती देई. आपल्याकडे ही कल्पना अभिनव होती - तरीही त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बऱ्याच शाळांत त्याची अशी प्रयोगशाळा सुरु आहे. सुट्टीतले एक आठवड्याचे वर्गही घेतले. नंतर त्याने एका आयआयटीयन मित्राच्या मदतीने त्रिकोण प्रमेये समजण्यासाठी एक मस्त उपकरण बनवलं आहे. यावेळी माझाही थोडाफार सहभाग होता. ते यंत्र बहुधा या कार्यक्रमात पहायला मिळेल. नसेल तर त्याबद्दल पुन्हा कधीतरी !

भूमितीविषयी आवड असणाऱ्या सर्वाना या कार्यक्रमासाठी आग्रहाचे निमंत्रण आहे.

एबीपी माझावर याविषयी मागच्या वर्षी दाखविलेली बातमी.

प्रकाशनाची तारीख व वेळ / स्थळ :
१३ डिसें . २०१४ (शनिवार). संध्याकाळी ४:४५ वाजता.
हॉल क्र. २, शिक्षक भवन, एस. एम. जोशी सभागृहाजवळ, पत्रकार भवन जवळ, पुणे.

सुमारे दीड तास चालणाऱ्या या कार्यक्रमास प्रवेश मोफत आहे. तरीही उपस्थितांच्या संख्येची मर्यादा सांभाळावी लागणार आहे. इच्छुकांनी कृपया व्य. नि. करून शनिवारी सकाळी १० पर्यंत उपस्थिती कळवावी ही विनंती.

मांडणीवाङ्मयसमाजजीवनमानतंत्रप्रकटनशुभेच्छा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Dec 2014 - 7:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

10 Dec 2014 - 7:54 pm | यशोधरा

अभिनंदन आणि शुभेच्छा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Dec 2014 - 7:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम आणि उपयोगी उपक्रम ! अनेकानेक शुभेच्छा !!

शिद's picture

10 Dec 2014 - 8:19 pm | शिद

असेच म्हणतो.

स्तुत्य उपक्रम, अनेक शुभेच्छा!

छान उपक्रम.अभिनंदन आणि शुभेच्छा.

क्लिंटन's picture

10 Dec 2014 - 10:01 pm | क्लिंटन

अरे वा स्तुत्य उपक्रम. शुभेच्छा

जयंत कुलकर्णी's picture

10 Dec 2014 - 10:36 pm | जयंत कुलकर्णी

या अशा माणसांचे आपल्या समाजाला फार आवश्यकता आहे. मुलभूत गोष्टी शिकण्यासाठी या गोष्टी अत्यंत आवश्यक असल्यामुळे मी या माणसाचे अभिनंदन करण्याऐवजी आभार मानतो. त्याचे उपकारच आहेत आपल्यावर.....

मुक्त विहारि's picture

10 Dec 2014 - 10:45 pm | मुक्त विहारि

+ १

श्रीरंग_जोशी's picture

11 Dec 2014 - 8:27 pm | श्रीरंग_जोशी

जयंत कुलकर्णी यांनी व्यक्त केलेल्या विचाराशी सहमत.

विजुभाऊ's picture

11 Dec 2014 - 12:30 pm | विजुभाऊ

पुस्तक विकत घ्यावयाचे आहे . मुम्बैत कोठे मिळेल?

खेडूत's picture

11 Dec 2014 - 1:02 pm | खेडूत

एस एम एस (SMS) नोंदणी
एस एम एस (SMS) द्वारे नोंदणी करता येइल. ग्राहकास स्वतः नोंदणीकृत शाळा/दुकान/कार्यालयात जावून घ्यावा लागेल. नोंदणीकृत दुकाने/कार्यालये/शाळा सध्या फक्त पुणे व सांगली येथे आहेत.
एस एम एस (SMS) द्वारे नोंदणी साठी:
१. "joymetry book registration" असे टाईप करून, त्याखाली आपले नाव, परिसराचे नाव व शहराचे नाव खालील पैकी कोणत्याही क्रमांकावर पाठवावे.
९८८१४ ६८००३, ८४४६२ ७९००५, ८१४९२ २४५०४, ८६० ५०० २४११
२. नोंदणी होताच आपल्याला "ग्राहक क्रमांकाचा" एस एम एस (SMS) येइल. कृपया हा एस एम एस (SMS) जपून ठेवावा, हि विनंती.
३. पुस्तक प्रकाशित होताच आपल्याला एस एम एस (SMS) येइल, ज्यात पुस्तक विक्रीची ठिकाणे असतील .
४. "ग्राहक क्रमांकाचा" एस एम एस (SMS) विकत घेताना दाखवून आपण पुस्तक घेवू शकता.
५. पुस्तक घेतानाच पैसे द्यायचे आहेत .

घरपोच प्रत हवी असल्यास
बुकगंगा येथे पुस्तक विक्रीला आहे. तेथे (रु. १२०/-) पुस्तक घेता येईल.

सतिश गावडे's picture

12 Dec 2014 - 9:40 am | सतिश गावडे

बुकगंगा येथे पुस्तक विक्रीला आहे. तेथे (रु. १२०/-) पुस्तक घेता येईल.

बुकगंगावर हे पुस्तक रु. १४० ला आहे. अर्थात तरीही ऑर्डर केले आहेच. :)

बोका-ए-आझम's picture

11 Dec 2014 - 2:31 pm | बोका-ए-आझम

अप्रतिम!फारच छान आणि स्तुत्य उपक्रम!मन:पूर्वक शुभेच्छा!

भिंगरी's picture

11 Dec 2014 - 2:37 pm | भिंगरी

ठाण्यात लवकर येईल तर बरं होईल.
नातवंडांना नविन वर्षाची भेट देता येईल.

वाह! सहीच उपक्रम. शुभेच्छा! :)

कलंत्री's picture

12 Dec 2014 - 9:20 am | कलंत्री

विनोबांनी एकदा असे सांगितले होते की त्यांना कोठल्यातरी परग्रहावर जावे लागले, तेथे कोणतेही मणूष्य प्राण्याचा सहवास नसलातरी, विनोबा फक्त दोनच पुस्तके घेऊन जातील. एक इसापनितीचे पुस्तक आणि दुसरे म्हणजे भूमितीचे पुस्तक. या दोनच पुस्तकाच्या चिंतनात त्यांना काहीही कमी पडणार नाही.

स्वीत स्वाति's picture

12 Dec 2014 - 10:30 am | स्वीत स्वाति

शुभेच्छा ...