पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस

लाल टोपी's picture
लाल टोपी in जनातलं, मनातलं
21 Jun 2015 - 1:11 am

आज पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. मिपावर वावरणारा एक सामान्य योग प्रशिक्षक या नात्याने सर्वांना या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

IDY

२१ जून हा आपल्यासाठी सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असणारा दिवस म्हणुन परिचित आहेच, आता या दिवसाला आणखी नवी ओळख मिळाली आहे. २७ सप्टेंबर, २०१४ ला संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत भाषण करतांना भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी योगाला या प्रकारचा दर्जा देण्याची मागणी केली होती आणि अल्पावधीतच (डिसेंबर, २०१४) संयुक्त राष्ट्र संघाच्या सभासद असणा-या १९२ देशांपैकी १७७ देशांनी या ठरावासाठी सहप्रायोजकत्व स्वीकारले. हा एक विक्रम आहे यापूर्वी अशा प्रकारच्या ठरावाला कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात स्विकृती मिळाली नव्हती. ही सर्वमान्यता परंपरेने चालत आलेल्या योग विद्येला आहे. तुम्हाला मला सर्वांना याचा अभिमान वाटावा असा हा दिवस आहे.

आज भारत सरकारच्या आमंत्रणावरुन जगभरात होत असणा-या योग प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतापासून हजारो कि.मी दूर जगाच्या दुस-या कोप-यात असणा-या आणि फारशा परिचयाच्या नसलेल्या 'हैती' या देशात योगाचे धडे देण्याची आणि भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. क्युबाच्या जवळ असणा-या केरेबियन समुद्राच्या किना-यावरील या देशातील अनुभव फारच रोचक आहेत.

जीवनमानशुभेच्छा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2015 - 4:03 am | श्रीरंग_जोशी

पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा!!

हैती येथील कामगिरीसाठी धागाकर्त्याला शुभेच्छा!! हा देश काही वर्षांपूर्वी भूकंपामुळे झालेल्या मोठ्या विध्वंसाला सामोरा गेला आहे. योगविद्येचा तिथे प्रसार होणे ही उपयुक्त बाब ठरू शकते.

हैतीमधील अनुभवकथनाच्या प्रतीक्षेत.

लाल टोपी's picture

21 Jun 2015 - 4:22 pm | लाल टोपी

प्रलयंकारी भूकंप अजून्ही येथील लोकांच्या मनात ठाण मांडून बसला आहे. सुमारे २,००,००० माणसे त्यात मृत्युमुखी पडली. पण आता हा देश त्यातून सावरत आहे.

पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा!!

जुइ's picture

21 Jun 2015 - 5:48 am | जुइ

तुमच्या हैती येथील कामगीरीसाठी शुभेच्छा!! हैती येथील तुमचे अनुभव कथन अवश्य लिहा. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2015 - 11:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाट पाहतोय.

-दिलीप बिरुटे

वा! अभिनंदन आणि शुभेच्छा!

बबिता बा's picture

21 Jun 2015 - 5:59 am | बबिता बा

.

रेवती's picture

21 Jun 2015 - 6:10 am | रेवती

अभिनंदन लाल टोपीजी!
सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या शुभेच्छा!

फसलो.मला वाटलं योगाचा धागा तोच आहे,लेखिकेने नामांतर केलं रात्री.

तो धागा २१जून-योगा दिवस---बिल्ला नंबर ३१७१५ वेगळा होता.मोदी राजकारणचर्चेत होरपळला बहुतेक

पैसा's picture

21 Jun 2015 - 10:29 am | पैसा

ललित मोदीचा आणि योग दिवसाचा काय संबंध?

कंजूस's picture

21 Jun 2015 - 11:05 am | कंजूस

तो कालचा धागा "access denied"मध्ये का जातो आहे? ललित मोदी नाही ,मोदी -भाजपा इतर पक्ष यांच्या कचाट्यात भांडणात अडकल्याने काढला असेल धागा अशी एक शंका. तो धागा उघडत नाही एवढे खरे.

पैसा's picture

21 Jun 2015 - 11:17 am | पैसा

चौकशी करते

अहो कंजूसकाका, त्या धाग्यात काही चित्रे घातलेली दिसेनात म्हणून मीच तो तात्पुरता अप्रकाशित केला होता. नंतर चित्रे एडीट केली, तोपर्यंत लाल टोपी यांनी त्याच विषयाचा धागा टाकला होता. द्विरुक्ती होऊ नये म्हणून माझा धागा पुन्हा प्रकाशित केला नाही.

विवेकपटाईत's picture

21 Jun 2015 - 9:49 am | विवेकपटाईत

आज सकाळी उठून कार्यक्रम बघितला. बाकी राजनीतीचे म्हणाल तर जे लोक वोट बँकची राजनीती करतात एक धर्माच्या व्यक्तींना वोट म्हणून बघतात. (अन्ग्रेजांच्या प्रमाणे फूट डालो राज करो ही त्यांची गेल्या ६० वर्षांची राजनीती आहे). त्या लोकांनी योग दिवसाचा विरोध केला. ही बाब वेगळी ते घरात योग करत असतील. आपल्या स्वार्थ एका धर्माच्या लोकांना योग पासून दूर ठेऊन त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यचे नुकसान करणे. (अधिकांश अल्पसंख्यक स्वरोजगार करतात त्यांना औषधांचा खर्च परवडत नाही, त्यांना योगापासून जोडणे अत्यंत गरजेचे असून ही आपल्या स्वार्थासाठी त्यांचे नुकसान करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्नांत. अल्पसंख्यकांना त्यांचे खरे शत्रू कोण आहे, हे ओळखणे गरजेचे. असो.

उगा काहितरीच's picture

21 Jun 2015 - 10:17 am | उगा काहितरीच

आजपासुन योगा करायला सुरुवात करायची असं ठरवलं होत. पण ८ वाजता जाग आली आणि बारगळलं सगळं :'( आता पुढच्या योगा डे च्या प्रतिक्षेत...

पैसा's picture

21 Jun 2015 - 10:27 am | पैसा

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा! लालटोपीकडून एका छान लेखमालेच्या प्रतीक्षेत!

मनोज श्रीनिवास जोशी's picture

21 Jun 2015 - 10:33 am | मनोज श्रीनिवास जोशी

हा दिवस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. स्वगतमोदींना 'शांततेचे नोबेल' देवून जाईल असा हा उपक्रम.

तिमा's picture

21 Jun 2015 - 10:35 am | तिमा

योगाचे फायदे वादातीत आहेत, पण प्रत्येक गोष्टीचे मार्केटिंग करु लागलात तर शेवटी लोकांना त्याला, "हम होंगे कामयाब" चा वास येऊन परिणाम उलटा होईल.
"क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे" या म्हणीचे कोणीतरी गुजराती भाषांतर केले पाहिजे.

सुधीर's picture

21 Jun 2015 - 11:08 am | सुधीर

अभिनंदन! अगोदरचा धागा कुठे सापडत नाही. त्यावर विचारलेला प्रश्न पुन्हा विचारतो. मी योगासनं करतो, पण मला त्यामगची थिअरी फारशी माहीत नाही. त्यावर कुठली चांगली/मान्यवरांची पुस्तकं आहेत? मागे अयंगारांची पुस्तक शोधत होतो. (योगदीपिका बहुतेक) पण ती पुस्तक बाजारात आजकाल उपलब्ध नाहीत.

अवांतर: मागे लेखिका- आंद्रिया जैन यांच्या ''सेलिंग योगा- फ्रॉम काउंटरकल्चर टु पॉप कल्चर' या पुस्तकाचं परिक्षण इथे वाचलं होतं.

लाल टोपी's picture

21 Jun 2015 - 2:02 pm | लाल टोपी

www.kdham.com bhihar school of yoga याखेरीझी बरीच आहे तुम्हाला व्यनि करीत आहे.

सुधीर's picture

21 Jun 2015 - 2:27 pm | सुधीर

पिडीएफ साठी धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jun 2015 - 6:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

यादी व्यनीऐवजी इथेच टाकावी. सर्वांसाठी उपयोगी ठरेल.

लाल टोपी's picture

21 Jun 2015 - 8:13 pm | लाल टोपी

डॉक्टरसाहेब, यादी नव्हती, त्यांना उपयुक्त ठरतील अशी पुस्तके पी.डी.एफ. मध्ये माझ्याकडे होती ती त्यांना व्यनि केली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jun 2015 - 11:20 am | डॉ सुहास म्हात्रे

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा ! प्राचिन भारतिय परंपरेने जपलेला एक ठेवा जगमान्यता मिळवित आहे याचा सर्व भारतियांना सार्थ अभिमान वाटावा असा दिवस !!

लाल टोपी यांचे हैतीतले अनुभव वाचण्यास उत्सुक आहे. जरूर लवकरच टाकावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2015 - 11:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जागतिक योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा !

आज महाविद्यालयात आम्हाला एक योग प्रशिक्षकाने चांगलं तासभर प्रशिक्षण दिलं, बरं वाटलं. रविवारी महाविद्यालयात बोलावलं म्हणून वाईट वाटलं.

-दिलीप बिरुटे

लाल टोपी's picture

21 Jun 2015 - 1:58 pm | लाल टोपी

सर, अनेकदा कामाच्या दिवशी आपण सुट्टी घेतो कधीतरी सुट्टीच्या दिवशी कामावर गेलो आणि बरं वाट्लं तर कुठे बिघडले?

लाल टोपी's picture

21 Jun 2015 - 1:55 pm | लाल टोपी

सर्वांना मनापसून धन्यवाद; हैती चे अनुभव , येथे पोहोचे पर्यंतचा प्रवास हे सर्वच रोचक आहे पुढिल आठवड्यात भारतात परतांच लिहिणार आहे.

जीएस's picture

22 Jun 2015 - 4:49 am | जीएस

१५० हून अधिक देशांप्रमाणेच स्वित्झर्लंडमध्येही योग दिवस अतिशय उत्साहात साजरा झाला. मी गेलो त्या कार्यक्रमात दोन स्विस योगशिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विविध देशांच्या आणि धर्माच्या स्त्रीपुरुषांनी तासभर योगासने केली.

योग ही हिन्दू संस्कृतीची जगाला देणगी आहे असे नि:संदिग्धपणे सांगण्यात या शिक्षकांना कुठला संकोच वाटला नाही. आणि ओंकार वा शांतीमंत्र म्हणण्यात उपस्थितांना कुठली अडचण वाटली नाही.

इकडे समाजवादी अजून पोहोचले नसावेत, त्यामुळे मूळ कार्यक्रम बाजूला राहून वाद, विघ्ने आणि तंटे हेही झाले नाही. पण संघ / मोदी विद्वेषाने खदखदणार्‍या, हिंदू या शब्दाच्या नुसत्या उल्लेखानेच अंगाचा भडका उडणार्‍या काही मंडळींनी भारतात सोशल मिडियात जो काही थयाथयाट केला आहे त्याने मनोरंजन तर झाले आहेच पण त्यांचेच पितळही उघडे पडले आहे.

मोदी भारतासाठी अनेक चांगल्या गोष्टी करत आहेत, देशाचे चित्र बदलण्याचा सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत आहेत यात मला तरी शंका नाही. अर्थात सगळीच पावले योग्य दिशेने असतील, वा यशस्वी होतील असेही नाही. पण आंधळ्या नमोद्वेषींनी आणि नमोभक्तांनी सोशल मिडियावर जो हैदोस घातला आहे त्याकडे दुर्लक्ष करून पंतप्रधानांच्या नवा भारत घडवण्याच्या प्रयत्नांना सर्व सुजाण भारतीयांनी ते जगात कुठेही असले तरी हातभर लावला पाहिजे असे मला वाटते. योग दिवस ही अशीच एक गोष्ट आहे.

As we all witnessed today, International Day of Yoga is indeed a great idea, not just for spreading the awareness about Yoga, but also for asserting/boosting the "soft power" of India. Kudos to Modi for making it happen

सस्नेह's picture

22 Jun 2015 - 6:42 am | सस्नेह

प्रतिसाद आवडला. +)

विकास's picture

22 Jun 2015 - 6:53 am | विकास

आज बॉस्टन-केंब्रिज मधीळ मॅसॅच्युसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एम आय टी) च्या प्रांगणात आम्ही International Yoga Day (IVD) साजरा करायचे ठरवले होते. हिंदू स्वयंसेवक संघ अमेरी़का (न्यू इंग्लंड) ने पुढाकार घेतला, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि जवळपास वेगवेगळ्या वीस संघटनांनी त्यात भाग घेतला. एम आय टी विद्यार्थी संघटनांनी पण उत्साहाने मदत केली. जवळपास १००० रजिस्ट्रेशन्स आली. आधी बाहेर ठरलेला कार्यक्रम नंतर मुसळधार पाऊस पडणार म्हणल्यावर रद्द करावा लागतो आहे का काय असे वाटले. पण नंतर एम आय टी ने मदत केली आणि एक हॉल अक्षरशः ऐनवेळेस दिला. त्यामुळे कार्यक्रम मस्त पार पडला. या कार्यक्रमाला "mixed crowd" होते. अर्थात भारतीय, अभारतीय, हिंदू तसेच अन्य धर्मिय. गर्दी बघून "yoga awareness" साठी किमान बॉस्टन मधे गरज नाही असे वाटले.

सूर्यनमस्कार, प्राणायमापासून ते अर्जेंटाईन Facundo Funes नामक संगीतकाराचे संगीत, हार्वर्ड विद्यापिठातील बुद्धीस्ट साधू Lama Migmar Tseten, केंब्रिजचा उपमहापौर आदी बोलायला होते. नाट्य योगाच्या निमित्ताने फ्लॅश मॉब (नृत्य) केले गेले. त्यात असलेली योगासने समजावून सांगण्यात आली. असे अनेक काही होते!

एक वेगळेच आकर्षण सर्व उपस्थितांना वाटले, ते म्हणजे मल्लखांब! खाली त्याचा आजची चित्रफित आहे. मी बाहेर कामात होतो त्यामुळे सगळा पाहीला नाही... त्यामुळे त्यात असलेल्या लहान मुलांची चित्रफित घेऊ शकलो नाही.(हा ग्रूप न्यू जर्सीचा होता)...

बॅटमॅन's picture

22 Jun 2015 - 10:55 am | बॅटमॅन

वा एक नंबर काम!

prasadnene's picture

22 Jun 2015 - 6:07 pm | prasadnene

एक कूठंतरी वाचलेली गोष्ट आठवली
अकबर बादशहाने बिरबलाला त्याच्या राज्यातील पाच अव्वल महामूर्ख शोधून आणण्याचे फर्मावले,
बिरबलाने तीन चार महिने अखंड मेहनत घेऊन पाच महामूर्ख शोधल्याचा आणि उद्या त्याना दरबारात हजर करण्याचा निरोप बादशहाकडे पाठवला
इकडे जनतेची ते पाच महामूर्ख पहाण्याची उत्सुकता शीगेला पोहोचली होती. 
अखेर दुसरा दिवस उजाडला, ते पाच महामूर्ख पहाण्यासाठी जनता प्रचंड संख्येने दरबारासमोरील मैदानात हजर झाली. कांही वेळाने बिरबलाचे आगमन झाले, पण बिरबला सोबत फक्त दोनच माणसे होती हे पाहून अकबर म्हणाला,
"बिरबल, तुला पाच महामूर्ख दाखवायचेत मग दोनच लोक कसे आणलेस?" बिरबल म्हणाला,"महाराज थोडा वेळ थांबा मी पाचही महामूर्ख आपणास दाखवतो" असे म्हणून बिरबलाने शेवटच्या क्रमाने एकेका महामूर्खाची ओळख करून द्यायला सुरूवात केली,
"महाराज हा महामूर्ख क्रमांक पाच! याचे नाव शेखचिल्ली हा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडत होता" हे ऐकून सारी जनता हसू लागली, नंतर बिरबलाने चौथ्या महामूर्खाची ओळख करून दिली,"महाराज हा महामूर्ख क्रमांक चार! हा बैलांना ज्वारीच्या पोत्याचे ओझे होऊ नये म्हणून पोते आपल्या डोक्यावर घेऊन बैलगाडीत बसला होता" जनता पून्हा हसली.
आता मात्र बादशहा अन जनतेची उत्सुकता वाढली बादशहा म्हणाला, बिरबल, बाकीचे तीन महामूर्ख कूठं आहेत?" बिरबल म्हणाला, "महाराज,तिसरा महामूर्ख मी स्वतः आहे" सारेजण स्तब्ध झाले. बिरबल पुढे म्हणाला," महाराज, राज्यात बेरोजगारी,महागाई, दुष्काळ,
शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा हजारो समस्या असताना मी असल्या (महामूर्ख शोधण्याच्या कामात) वेळ घालवला म्हणजे तिसरा महामूर्ख मी स्वतः आहे"
बादशहा आणि जनता थोडीशी वरमली पण उरलेलेले दोन महामूर्ख पहाण्याची उत्सुकताही वाढली.बादशहा म्हणाला, 
"बिरबल, दुसरा महामूर्ख कोण आहे?"
बिरबल म्हणाला,"महाराज दुसरे महामूर्ख तूम्ही स्वतः आहात" आता मात्र बादशहाची सटकली, रागानेच बादशहाने विचारले," बिरबला, मी कसा रे मूर्ख? बिरबल म्हणाला,"महाराज, सेम आन्सर! राज्यात इतक्या समस्या असताना आपण असल्या फालतू कामात रस घेता म्हणून तूम्ही दुसर्या नंबरचे महामूर्ख!" संतापलेल्या बादशहाला पहिल्या नंबराचा महामूर्खही जाणून घ्यायची इच्छा होतीच! आपला राग कसाबसा आवरत बादशहाने पहिला महामूर्ख कोण अशी विचारणा केली, बिरबल म्हणाला," महाराज याचेही उत्तर वरीलप्रमाणेच आहे, राज्यात एवढ्या समस्या असताना त्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येण्याऐवजी ही जनता या फालतू कार्यक्रमात एकत्र येऊन एन्जाँय करते आहे, म्हणून पहिल्या क्रमांकाची महामूर्ख जनता आहे"
(ताजा कलम : या गोष्टीचा संबंध रु 2000 कोटी खर्च करून योगादिन साजरा करण्याचा आदेश देणारे सरकार आणि ते एन्जाँय करणारी जनता यांचेशी जोडू नये)

होबासराव's picture

22 Jun 2015 - 7:38 pm | होबासराव

खुशामदिद

विनोद१८'s picture

25 Jun 2015 - 3:10 pm | विनोद१८

तो 'हितेस्भॉय' केव्हाच सोपला हा आता एक नवीन आलेला छदमी 'बाटगा'.

ट्रेड मार्क's picture

22 Jun 2015 - 11:03 pm | ट्रेड मार्क

हा आकडा कुठून मिळवला? यात कुठले कुठले खर्च गृहीत धरले आहेत?

बिहाग's picture

23 Jun 2015 - 11:14 am | बिहाग

भारताची साप आणि हत्ती जिथे रस्त्यावरून फिरतात आसा देश अशी ओळख पुसून , जगाला योग शिकवणारा देश अशी ओळख होत असेल तर बिघडला कुठे ? या निमित्ताने भारतात बाहेरचे लोक आले तर विदेशी चलन मिळेल.

लाल टोपी's picture

25 Jun 2015 - 9:14 pm | लाल टोपी

गेले तीन दिवस प्रवासात असल्यामुळे आज प्रतिसाद देत आहे.
गोष्ट सागून झाल्यानंतर जोडलेली टीप वाचून गंमत वाटली, करमणुक झाली म्हणावे की साळसूदपणा म्हणावे या विचारात पडलो आहे.
एखादी परंपरा पांच हजार वर्षे जिवीत रहाते. आपल्याच देशात नव्हे तर जगभरातील लोक या परंपरेचा आदर करतात, अंगीकार करतात या अभ्यास प्रकारला मिळ्त असलेला प्रतिसाद पाहून या दिवसाच्या आयोजनावरील खर्च नक्कीच एक गुंतवणूक ठरायला हरकत नाही. या दिवसाच्या आयोजनावर मोठ्या प्रमाणावर खर्च झालाही असेल (अर्थत वर कोणीतरी म्हंटल्या प्रमाणे आपण लिहीलेला आकडा कुठून मिळाला याचा संदर्भ अजूनही आपण दिला नाही) पण यामुळे वाढणारे योग पर्यटन, योग शिक्षणाला मिळणारे प्रोत्साहन त्यामुळे होणारी रोजगार निर्मिती हा खर्च सहज भरुन काढेल; आज चीन ज्या गतीने योगाचा प्रसार करतो आहे त्यावरुन काही वर्षांनी चीनच मुळचा योग अभ्यास करणारा देश अशी प्रतीमा निर्माण करेल असेच वाटायला लागलं आहे. योग प्रशिक्षक म्हणून भारतात आणि भारताबाहेरही अनेक ठिकाणी वावरतांना हीच गोष्ट जाणवत होती की योगाच्या 'मार्केटिंग'मध्ये आपण कमी पडत आहोत.ही गोष्ट आता केली जात आहे तर बिघडलं कोठे? गरीबी, महागाई या समस्या आहेत म्हणून आपण अशा प्रकारच्या आयोजनांपासून नेहमीच दूर राहिलो तर या चक्रातून आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही योगाच्या क्षेत्रात उपलब्ध संधी पाहता या आयोजवरचा खर्च अनाठायी अजिबात वाटत नाही.
नेहरु जन्मशताब्दीच्या आयोजनासाठी केला प्रचंड खर्च, भारतीयम चे आयोजन यासारखा व्य्क्तीपूजेवर तर हा खर्च निश्चितच केलेला नाही.

राघवेंद्र's picture

25 Jun 2015 - 9:47 pm | राघवेंद्र

प्रतिसाद पटला.

तिमा's picture

22 Jun 2015 - 6:14 pm | तिमा

या गोष्टीचा संबंध रु 2000 कोटी खर्च करून योगादिन साजरा करण्याचा आदेश देणारे सरकार आणि ते एन्जाँय करणारी जनता यांचेशी जोडू नये)

का जोडू नये? आणि जोडायचा नसेल तर ही गोष्ट याच धाग्यावर देण्याचे प्रयोजन काय ?

सव्यसाची's picture

22 Jun 2015 - 7:19 pm | सव्यसाची

+१००

रुस्तम's picture

22 Jun 2015 - 7:59 pm | रुस्तम

+१११

अर्धवटराव's picture

22 Jun 2015 - 8:27 pm | अर्धवटराव

देशाची एखादी चांगली गोष्ट जगमान्य होताना, त्याचा उत्सव सुरु असताना दळभद्री करंटेपणा दाखवणार्यांना कुठला क्रमांक द्यावा याचा निर्णय बिरबल घेऊ शकला नाहि...त्याकाळी शुण्यापासुन गणना सुरु होत नसावी...

अस्वस्थामा's picture

22 Jun 2015 - 8:52 pm | अस्वस्थामा

दळभद्री करंटेपणा

अगदी अगदी..

अकारण प्रत्येक गोष्टीत राजकारण, धर्म, अस्मिता आणल्याच पायजेत असं कशाला काही लोकांना वाटतं कै म्हैत.

चिगो's picture

23 Jun 2015 - 10:25 am | चिगो

अभिनंदन लालटोपीजी.. हा 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' अत्यंत भव्यतेने साजरा केला गेला जगभरात. भारतातपण ठीकठीकाणी अत्यंत भव्य स्तरावर आयोजन करण्यात आले. एनसीसी कडे तर त्यांच्या सगळ्या कॅडेट्सना घेऊन 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद होईल अश्याप्रकारे आयोजन करायला सांगितले होते. मेघालयात, जे की मुख्यत्वे ख्रिश्चन लोकसंख्या असलेले राज्य आहे, तिथेपण रवीवारीसुध्दा ९४% कॅडेट्सनी ह्या आयोजनात भाग घेतला. भारतात काही ठीकाणी जलयोग (नावांवर योगासने), स्केटींग करतांना योगमुद्रा असे वैविध्य आयोजिल्या गेले.

हे सगळ॑ आयोजतांना खर्च झालाच असेल. त्यावर आता आर्टीआय आणि टिकात्मक चर्चापण होतील. पण माझ्यामते, हा खर्च आणि ही भव्यता ग्राह्य आहे. तसेही आपल्या वारस्याबद्दल आपण उदासीन असतो. 'योग'चा 'योगा' होऊन पाश्च्यात्यांनीच आम्हाला तो शिकवावा, इतपत त्याप्रती आमची हेटाळणी आणि उदासीनता पोहचली होती. आपला सांस्कृतिक वारसा आमचाच आहे, हे सांगायची पण लाज वाटणार्‍या देशाने आता आपल्या वैभवाची जाणीव स्वतःला आणि इतरांना करुन द्यायची हींमत दाखवलीय ह्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन. तसेच ह्या आयोजनांत भाग घेणार्‍या लोकांमध्ये योगाभ्यासाबद्दल रुची वाढली आणि त्यांनी योगाभ्यास सुरु ठेवला तर सुदृढता वाढेल हा देखील 'स्पिनऑफ इफ्फेक्ट' फायद्याचाच आहे.

गळेकाढू गळे काढतीलच, पण हे असले आयोजन आणि खर्च करायलाच हवेत देशाची अस्मिता देशवासीयांवर आणि सॉफ्ट पॉवर इतरदेशीयांवर ठसवण्यासाठी.. नाहीतर मग ऑलिम्पिक्स करीतापण कशाला करायचा खर्च? आणि कॉमनवेल्थ गेम्सपण ह्याच देशात झालेत ना, अगदी घोटाळ्यांसकट?

पुनःश्च लालटोपींचे अभिनंदन.. अनुभव वाचण्याच्या प्रतिक्षेत..

सव्यसाची's picture

23 Jun 2015 - 11:33 am | सव्यसाची

सहमत

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2015 - 2:34 pm | श्रीगुरुजी

आन्तरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी कॉन्ग्रेस, डावे पक्ष, लालू इ. निधर्मान्धान्चे जळफळाटासन बघून आन्तरराष्ट्रीय योग दिन अत्यन्त यशस्वी झाला आहे याची खात्री पटली.

यशोधरा's picture

24 Jun 2015 - 11:15 am | यशोधरा

आपले अभिनंदन!

पुण्याचे वटवाघूळ's picture

24 Jun 2015 - 5:00 pm | पुण्याचे वटवाघूळ

छान. हार्दिक अभिनंदन.
तुमचे हैतीतले अनुभव वाचायला आवडेल.

सरकारचा चांगला उपक्रम ! लाटो तुमचे अनुभव जरुर लिहा...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Amazing Girl Drummer Does BIGBANG ;)