प्रतिसाद

स्वामी चेकाळदर्शी उवाच: प्रतिगामीस्य किम् लक्षणं?

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
5 Sep 2014 - 12:01 pm

माझ्या चेकाळपंथी आशारामा, स्वतःच्या सोयीसाठी केलेल्या गोष्टींनासुद्धा धर्मतत्वाचा मुलामा चढवायची, आपली जुनी हौस कायम आहे वाटते. उपजत धार्मिक, निस्वार्थी, निर्मोही अशी स्वतःच बनविलेली, स्वतःची प्रतिमा डागाळू नये म्हणून आपली तत्वशून्य वागणूक लपविण्याचे प्रयत्न आपणाला हातचलाखीने आजही तुरुंगातूनच करावेच लागतात.
माझ्या उच्चनैतिक ओसामा-बाबा, आपल्यासारख्यां विचारसरणीच्या तमाम लोकांच्या मुखकमलातून, उच्च नैतिक अधिष्ठानाचे संरक्षक कवच

छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र.१ मानवनिर्मित स्थापत्य - निकाल

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
4 Sep 2014 - 2:07 pm
हे ठिकाणधोरणमांडणीवावरजीवनमानतंत्रमौजमजाछायाचित्रणस्थिरचित्रप्रकटनप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनआस्वादप्रतिभाविरंगुळा

राम गोपाल वर्माने लावलेली आग!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
30 Aug 2014 - 9:08 pm

अनेक गाजलेले सिनेमे आणि शोलेचा केविलवाणा रिमेक बनवणारा राम गोपाल वर्मा पुन्हा चर्चेत आला आहे.
ऐन गणपतीच्या सणाच्या दिवशी त्याने गणपतीबद्दल अनेक वादग्रस्त ट्वीटे करुन खळबळ माजवली आहे.
काही नमुने इथे आहेत.

http://www.deccanchronicle.com/140829/entertainment-bollywood/article/ra...

पुण्यातला गणेशोत्सव -माहिती हवी आहे

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in काथ्याकूट
27 Aug 2014 - 5:15 pm

विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय. घराघरात आपल्या लाडक्या दैवताच्या तयारीची लगबग आणि धावपळ अगदी मनापासून सुरु आहे. ज्यांचा घरचा गणपती कोकणात आहे त्यांची तर तऱ्हाच वेगळी….गणपती म्हटला की मनात पहिल्यांदा आठवतं ते पुणं …. ह्या शहराची नाळ त्याच्या आराध्य दैवताशी ज्या प्रकारे जोडली गेली आहे ते पाहता ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असूच शकत नाहीत ह्याची खात्री पटते…. खरा पुणेकर आणि इतकंच काय ह्या पुण्यनगरीत आलेला प्रत्येक माणूस त्या दहा दिवसात भक्तिरसात नखशिखांत न्हाऊन निघतो.

अनंतमूर्ती अनंतात विलीन!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
24 Aug 2014 - 6:31 am

प्रसिद्ध कन्नड साहित्यिक अनंतमूर्ती ही नुकतेच मरण पावले. निवडणुकीपूर्वी मोदींना असणारा तीव्र विरोध दर्शविण्याकरता त्यांनी असे वादग्रस्त विधान केले की मोदी पंतप्रधान बनले तर मी हा देश सोडून जाईन. (आता उशीराने का होईना बोले तैसा चाले असे त्यांनी करून दाखवले आहे. नुसता देशच नाही तर जगच सोडून त्यांनी आपले वचन पाळले हा भाग वेगळा) पण त्यांच्या त्या विधानाचे व त्या विधानाने उठलेल्या गदारोळाचे कवित्व अद्याप बाकी आहेच.

धाग्याचे नामकरण

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
23 Jul 2014 - 1:06 pm

आज पाहुण्यांसाठी एक स्पेशल धागा काढला. धाग्याला छोटीशीच पण दाट(घट्ट) प्रस्तावना केली.
अशा धाग्याला आम्ही 'काकू' असे म्हणतो.
पाहुणे म्हणाले आम्ही 'धागा' म्हणतो.मग आणखी कोण काय म्हणतात यावर चर्चा झाली.
तेंव्हा आणखी शब्द मिळाले,
'एकोळी'
'जिलबी'
'पाटी'
एत्यादी
असेच आणखीही शब्द असतील
जाणकारांनी माहिती द्यावी.
आम्ही अशा शब्दांची मज्जा घेऊ.

स्फूर्ती - साभार इथे पहा

ओरल इन्शुलिन

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
23 Jul 2014 - 12:38 am

आज एक धक्कादायक माहिती मिळाली. भारतात मोठ्या प्रमाणावर ओरल इन्शुलिन उपलब्ध आहे. पण ते विकायला बंदी आहे.

सस्तन प्राण्यांच्या दुधात इन्शुलिन असते पण ते जठरात गेल्यावर नष्ट होते. फक्त उंटीणीच्या दुधातील इन्शुलिन पोटात नष्ट न होता रक्तात मिसळते. म्हणू हे दुध पिणाऱ्या लोकांना मधुमेह होत नाही. पण या दुधावर विक्री बंदी आहे हे आज कळले. भारतातील काही डॉक्टर्स हे दुध हवाबंद पिशव्यातून विकण्याच्या प्रयत्नात असून त्या साठी दोन कोटी उंटांची गरज आहे असा त्यांचा अंदाज आहे.

संत ज्ञानेश्वर व आपण

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
22 Jul 2014 - 10:23 am

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला, लॅटिन ही धर्मभाषा होती. ती फारच थोडय़ा विद्वानांना अवगत होती, मार्टनि ल्यूथर या जर्मन पाद्रीने पोपच्या दडपशाहीविरुद्ध आजाव उठवून, बायबल लोकभाषेत असावे, असा आग्रह धरला व बायबलचे प्रचलित जर्मन भाषेत (लोकभाषेत) भाषांतर केले. त्यापाठोपाठ ख्रिश्चन धर्मात अनेक सुधारणा घडवून आणल्या. काहीशे वर्षांपूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील ज्ञान मराठीत (लोकभाषेत) आणले. त्यांना तथाकथित संस्कृत-तज्ञ धर्ममार्तंडांचा त्या काळात विरोध सहन करावा लागला.