मिपावर निलंबने वाढत आहेत
आपल्या मिपावरील निलंबनांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने निलंबनांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या चांगल्या प्रतिसादकर्त्यांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारची निलंबने बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके असहिष्णु आहोत का की आज आपल्याला चांगले विरोधी लेखन दुरापास्त होत आहे.