अनेक गाजलेले सिनेमे आणि शोलेचा केविलवाणा रिमेक बनवणारा राम गोपाल वर्मा पुन्हा चर्चेत आला आहे.
ऐन गणपतीच्या सणाच्या दिवशी त्याने गणपतीबद्दल अनेक वादग्रस्त ट्वीटे करुन खळबळ माजवली आहे.
काही नमुने इथे आहेत.
http://www.deccanchronicle.com/140829/entertainment-bollywood/article/ra...
ह्यातली काही विधाने म्हटली तर गमतीदार म्हटली तर अपमानकारक आहेत. सुदैवाने हिंदू धर्मात देवांची चेष्टा करणे हे इतके अब्रह्मण्यम मानले जात नाही. (अन्य काही धर्मात थेट शिरच्छेद करायची भाषा झाली असती. असो.)
ऐन सणाला, उत्सवमूर्तींबद्दल असे बोलणे तितकेसे प्रसंगोचित वाटत नाही. पण कदाचित हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा सवंग प्रयत्न अर्थात पब्लिसिटी स्टंट असावा.
हे घडताच काँग्रेसचा कुणी कार्यकर्ता तोही मुसलमान राम गोपालाबद्दल तक्रार करतो तेही विधानसभा तोंडावर आलेल्या असताना हाही एक अजब योगायोग म्हणायचा! असो. कॉग्रेसचे हिंदू धर्मावरील प्रेम जगजाहीर असल्यामुळे असल्या फिल्मी प्रकाराला किती हिंदू भुलतील ह्याविषयी मला तरी शंका वाटते. हा योगायोग आहे का हे सगळे ठरवून केले आहे हेही सांगणे अवघड आहे. २६/११ नंतर लगेचच विलासराव देशमुखांनी वर्माला जिथे अतिरेकी हल्ले झाले तिथे नेऊन त्याच्या पुढच्या सिनेमाकरता मदत केली होती. त्यावरुन बरेच रान उठले होते. कदाचित ह्या उपकाराला जागून वर्मासाहेबांनी ही काडी सारली असेल.
आत्ताच गणपती बसला आहे त्यामुळे आल्या आल्या पाहुण्याला खजिल करता कामा नये. पण वर्माजींनी उल्लेखलेले मुद्दे अगदीच काही चुकीचे नाहीत. असो.
प्रतिक्रिया
30 Aug 2014 - 10:18 pm | काळा पहाड
राम्गोपाल्वर्मा.. हं नाव ऐकल्यासारखं वाटतय खरं..
31 Aug 2014 - 7:08 am | चिऊकाऊ
गणपती बाप्पा असोत की ईतर कोणतेही देव. पुराणातील बहुतेक कथा बुद्धीच्या निकषावर टिकणे कठिण आहे. पण या देवांच्या कथा लिहिणारेसुद्धा मनुष्यप्राणीच होते. देव ही संकल्पना व्यक्तिसापेक्ष असल्याने पुराणातील कथा बुद्धीच्या निकषावर घासून बघावे अथवा नाही हा सुद्धा व्यक्तीगत निर्णय असावा. पण भूत, फूंक यासारखे भुताळी चित्रपट काढतांना मात्र राम गोपाल वर्मांना असे बुद्धिवादी प्रश्ण पडले नाहीत का?
31 Aug 2014 - 7:27 am | नानासाहेब नेफळे
रामू नेहमी लोकांच्या वर्मावर बोट ठेवतो.(पुल्श्टाईल)
31 Aug 2014 - 9:57 am | मदनबाण
हॅहॅहॅ... रामुला आता कोणी विचारणारे राहिले नाही असं दिसतय ! कुठुन तरी लाईम लाईट मध्ये येण्याची धडपड दिसते !
असो... बर्याच दिवसांनी रामु आणि सत्या याच्यामुळे गोली मार भेजे मे हे गाणं मात्र आठवलं....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गणाधीशा भालचंद्रा गजवक्त्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया :- मोरया
31 Aug 2014 - 1:14 pm | माम्लेदारचा पन्खा
भेजे की सुनेगा तो मरेगा रामू …वर्मा …. रामुवर्मा…धिश्क्याव
31 Aug 2014 - 2:02 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
इकडे माफी मागितली आहे. विषय संपला-
http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Ra...
आगीत तेल ओतून प्रश्न पेटवत ठेवायचाच असा निर्धार केला असेल तर चालू द्या.
31 Aug 2014 - 10:14 pm | धर्मराजमुटके
काहिही झाले की माझा तो हेतू नव्हता असे बोलून मोकळे व्हायचे. मला वाटते आता सोशल मिडीयाचा वापर करताना तिथे तुमचा हेतू काय असा एक कॉलम टाकावा म्हणजे नंतर त्रास नको.
31 Aug 2014 - 10:15 pm | काळा पहाड
आग लावायची आणि मग माफी मागायची हे आता विसरा. "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी.
1 Sep 2014 - 7:46 am | नितिन थत्ते
ही धमकी वगैरे आहे का?
1 Sep 2014 - 1:16 pm | मंदार दिलीप जोशी
सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवायच्या असतील तर धमकीच समजा. कायदेशीर फटके बसतील.
1 Sep 2014 - 1:30 pm | सुनील
फटक्यांची शिक्षा कायदेशीर झाली?
1 Sep 2014 - 1:37 pm | मंदार दिलीप जोशी
आहो फटके म्हणजे पोलीस केस, खटला वगैरे. त्या हुसेनला नैका पळवून लावला होता परदेशात.
1 Sep 2014 - 1:46 pm | नानासाहेब नेफळे
एम एफ हुसेन भारतातले एक थोर चित्रकार होते, त्यांचा एकेरी उल्लेख करणे टाळावे.
1 Sep 2014 - 1:55 pm | मृत्युन्जय
मी तर म्हणतो त्याचा उल्लेखच टाळावा
1 Sep 2014 - 1:59 pm | मंदार दिलीप जोशी
करेक्ट
1 Sep 2014 - 4:49 pm | बॅटमॅन
हाहा, सहमत.
1 Sep 2014 - 3:53 pm | टवाळ कार्टा
कसाबलासुध्धा त्याच्या देशात हुतत्मा वगैरे म्हटले जात असेल हो...
1 Sep 2014 - 5:43 pm | तिमा
इकडे माफी मागितली आहे. विषय संपला-
इकडून माफी मागितली आहे, असं घाईने वाचलं. सदस्य नामामुळे घोटाळा झाला.
1 Sep 2014 - 11:19 am | विवेकपटाईत
विवाद + नाव = प्रसिद्धी (अप्रसिद्धी)= पैसा
एक चित्रकार हेच करून प्रसिध्द झाला आणि अमाप पैसा मिळविला. राम गोपाल वर्माचे सिनेमे चालत नाही. सध्या रिकामटेकडे आहे. हिंदू धर्माच्या प्रतीकांना शिव्या दिल्या तर प्रसिद्धी मिळते आणि नुकसान ही काही होत नाही.
म्हणूनच मी गणपती पूजे मागची अवधारणा हा लेख लिहिला होता जेणे करून लोकांना आपण गणपतीची पूजा का करतो हे समजावे. http://vivekpatait.blogspot.in/2014/08/blog-post_29.html
1 Sep 2014 - 12:48 pm | बॅटमॅन
हिंदूद्वेष = प्रसिद्धी, दुसरे काय? चालू फ्याषन आहे ही, त्याला इलाज नाही.
1 Sep 2014 - 1:43 pm | मृत्युन्जय
जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका थोर समाजसुधारकानेही गणपतीवर अशीच आगपाखड केली होती ना म्हणे? त्यांना तर तुम्ही द्रष्टे, विचारवंत, महान मानता. रामू देखील आता महात्मा बनण्याच्या मार्गावर असावा.
1 Sep 2014 - 2:00 pm | मंदार दिलीप जोशी
रामगोपाल वर्माने इतर कोणते समाजकार्य केले आहे? ते कार्य महान असेल तर ठीक नैतर लायकी शून्य आणि उगाचच आगपाखड याला काय अर्थ आहे?
1 Sep 2014 - 5:26 pm | मृत्युन्जय
सत्या, कौन यांसारखे अप्रतिम चित्रपट देउन त्यांनीही समाजोपयोगी कामच केले आहे. तरी नशीब त्यांनी गणपतीला शेंबड्या नाही म्हटलेले.
बादवे एखाद्या महान लोकोत्तर समाजसेवकाला धार्मिक भावना भडकवणारे आणि जातिय पातळीवर उतरणारे विधान करण्यास परवानगी असते काय?
1 Sep 2014 - 6:36 pm | प्रतापराव
सरळ सरळ लिहा न तुम्हाला महात्मा फुले ह्यांच्या बद्दल बोलायचे आहे.महात्मा फुलेंनी गणपतीवर टीका केली त्याबद्दल वाईट वाटते पण आस्तिक विरुद्ध नास्तिक हा संघर्ष आपल्या देशातच नव्हे तर जगातही सतत चालूच असतो त्यात नवे काही नाही..काही लोकांना देवांबद्दल कोणी आक्षेपार्ह लिहिले तर चीड येते तर काही लोकांना समाजातील जातीभेद, गरिबी, धर्माच्या नावाने लुटमार ह्याबद्दल चीड येते. देव हा समर्थ असतो परंतु समाजातील अन्यायग्रस्त पिडीत हे समर्थ नसतात. देवावर कोणी टीका केली तर देव त्याचे बघण्यास समर्थ असतो पण पीडितांचे तसे नसते त्यांना कोणी वाली नसते. एखादी व्यक्ती धार्मिक असेल आयुष्यभर देवाचे गुणगान गाणारी असेल परंतु समाजातील ज्या अन्यायी गोष्टी आहेत त्याच्याशी त्याला काहीही देणे घेणे नसेल तर त्याला अर्थ नाही.परंतु एखादी व्यक्ती नास्तिक असेल देवधर्माशी त्याला काही घेणे देणे नसेल परंतु त्याला समाजातील वंचिताबद्दल जर तळमळ वाटत असेल तर ती व्यक्ती माझ्या दृष्टीने श्रेष्ठ होय. देवाची भक्ती करणे सोपे असते हो पण असे समाजकार्य शतकातून एखादीच व्यक्ती करू शकते.महात्मा फुले जरी नास्तिक होते देवांवर कठोर टीका करत तरी त्यांनी केलेले समाजकार्य हे थोरच राहील. मी गणेश भक्त आहे त्याची पूजा अर्चा करतो परंतु महात्मा फुलेंनी जे स्त्री वर्गासाठी, अस्पृश्यांसाठी समाजसुधारणेचे कार्य केले त्याला माझा मानाचा मुजरा
1 Sep 2014 - 6:47 pm | मंदार दिलीप जोशी
प्रतापराव, माझ्या मनातले बोललात (जे मला शब्दात मांडता येत नव्हते ते).
मृत्युंजयराव, हेच माझेही उत्तर आहे असे समजा.
2 Sep 2014 - 11:28 am | प्रसाद१९७१
स्त्री शिक्षणाच्या बद्दल मला मोठेच कोडे आहे.
माझ्या माहीतीत ब्राहम्णांच्या स्त्रिया पूर्वी पासुनच लिहीत वाचित होत्या, अगदी १००% नाही पण बर्याच. फुलेंच्या आधी पण पुण्यात ब्राम्हण मुलींना शिकवण्याच्या अगदी शाळा म्हणता येतील अशा नाही पण सोयी होत्या. ते शिक्षण पण त्या वेळेस अनुसरुन लिहीणे वाचणे पाठांतर असेच होते.
बंगाल , पंजाब मधे पण मुलींना शिकवण्याची पद्धत त्याच सुमारास हळु हळु का होइना चालू झाली. बंगाल मधे तर कदाचित बरीच आधी. मग हे फुले म्हणजे स्त्री शिक्षण हे कुठुन आले?
2 Sep 2014 - 11:42 am | पोटे
नुस्ते ब्राह्मण म्हणजे समाज नव्हे. बहुजन समाजात स्त्रीशिक्षणाची प्४अथा सुधारकांनी सुरु केली.
ब्राह्मणच कशाला, मोघल स्त्रीयादेखील लिहिण्या वाचण्यात पारंगत होत्या.. शायरी, इतिहास , पाककला याबाबतीत मोघल स्त्रीयांनी विपुल लेखन केलेले आहे.
तरीही सामान्य बहुसंख्य जनात स्त्री शिक्षण नव्हते.
2 Sep 2014 - 12:30 pm | प्रसाद१९७१
माझ्या बंगाल आणि पंजाब च्या स्त्री शिक्षणाच्या बद्दल च्या मताचे काय? त्याबद्दल काही माहीती आहे का?
बहुजन समाजात स्त्री शिक्षण नव्हते त्या मागे अडवणुकीची भुमिका ब्राह्मणांची होती का? मी तर ऐकले आहे की फुल्यांच्या शाळे साठी वाडा एका ब्राह्मणानीच दीला होता आणि दगडे पडायची ती पण त्याच वाड्यावर. दुर्दैवानी कींवा मुद्दामुनच त्या वाडा देणार्या आणि दगडाचा मार खाणार्या ब्राहमणाचे नाव मात्र इतिहासातुन पुसुन टाकलय कोणी तरी
2 Sep 2014 - 11:57 am | विवेकपटाईत
महात्मा फुले नास्तिक नव्हते. केवळ धर्माच्या नावावर चाललेल्या अत्याचारांचा विरोध होता.
1 Sep 2014 - 6:12 pm | प्यारे१
मृत्युंजयसेठ,
नया हय वह. बक्ष दो!
1 Sep 2014 - 8:24 pm | नानासाहेब नेफळे
खरंय हो ,ह्या महात्म्याने हिंदुंच्या भावना फार दुखावल्या,
नवरा मेल्यावर विशिष्ट जातीत केशवपन करुन, आलवण नेसवून बायकांचा उद्धार करायची पद्धत होती, जर या बायका तारुण्यात विधवा झाल्यास पुढील आयुश्य आलवणात फार सुखात जायचे, नवर्यामाघारी नातातल्याच एखाद्याच्या'कृपेने' यांना मुले व्हायची, मग श्रेष्ठ धर्म सांगायचा कि मुले फेकुन द्या ,पण या महात्म्याने व त्याच्या बायकोने अशा स्त्रीयांना व त्यांच्या अनौरस मुलांना सांभाळण्यासाठी आश्रम काढून चक्क धर्म बुडवला हो! काय हे पाप!! कुठे फेडले असेल!!!
स्त्रीया शिकल्या तर पुरषांना अश्लील पत्र लिहतील" असा स्पष्ट इशारा धर्ममार्तंडांनी देऊनही या जोडप्याने आशिया खंडातली मुलींसाठीची पहीली शाळा उघडून धर्म बुडवला,
शिवाजींची समाधी शोधुन, तिथे दिवाबत्तीची सोय करुन या माणसाने काय साधले?
आणि थेट गणपतीवर टीका केली..... लंबोदराकडे पाठ करुन, पोट खपाटीला गेलेल्यांची काळजी करण्याची औदसा फक्त हिंदू धर्मातल्या महात्मांनाच आठवते, आपले दुर्दैव! दुसरे काय?
1 Sep 2014 - 9:01 pm | पोटे
आणि त्यांच्या बायकोने पहा काय लिहिले आहे..
पुढे पेशवाई तिने राज्य केले
अनाचार देखी अतिशूद्र भ्याले
स्वथुकी थुकाया मडके गळी ते
खुणा पुसाया ढुंगणी झाप होते... १७
तुला बोलवी बाजी शौरी धनी गं
स्वपत्नीस धाडे निलाजरा पती गं
अशा ब्राह्मणीला छळे स्त्रेणशाही
मुखा बोलती त्या जळो पेशवाई.. १९
..बावनकशी सुबोध रत्नाकर ... सा. फु. .. ०७.११.१८९२
संपादित
रामू खरेच बोलला की !
1 Sep 2014 - 10:37 pm | मृत्युन्जय
वोक्के. म्हणजे काही चांगले काम केल्यावर असलं काहीबाही लिहिता येते. उत्तम.
2 Sep 2014 - 10:35 am | पोटे
विद्येच्या गावात विद्येच्या देवाबद्दल काहीबाही लिहुनही विद्येच्या विद्यापीठाला त्यांचेच नाव मिळाले.
:)
1 Sep 2014 - 3:09 pm | शिद
कोण रामगोपाल वर्मा?
धन्यवाद.
1 Sep 2014 - 3:19 pm | ऋषिकेश
सहमत आहे!
1 Sep 2014 - 5:10 pm | प्रतापराव
रामू जे बोलला त्याचा निषेध.
त्याविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल झालीय. परंतु त्याविरुद्ध धमक्या देणे, फटके पडतील असे शब्द वापरणे चुकीचे आहे. पाकिस्तानातील अशाच मनोवृत्तीच्या लोकांमुळे आज पाकिस्तान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
वरती काळा पहाड ह्यांनी "मां बेटे" चं राष्ट्रविरोधी सरकार होतं तोपर्यंत हे चालत होतं. आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी." हे जे विधान केलाय त्या विधानात नि रामूच्या विधानात जास्त फरक नाही आहे. दोन्हीही विधाने मंदपणा दर्शवतात. मी स्वत भाजपचा समर्थक आहे पण कॉंग्रेसचे जे सरकार होत तेही लोकांनीच निवडून दिल होत त्या सरकारला देशद्रोही म्हणन म्हणजे मूर्खपणा आहे.
1 Sep 2014 - 5:12 pm | बॅटमॅन
पूर्ण सहमत!!!!!
1 Sep 2014 - 5:14 pm | मंदार दिलीप जोशी
संपूर्ण असहमत. असल्या लोकांना फटकेच द्यायला हवेत. अर्थात कायदेशीररित्या.
1 Sep 2014 - 5:37 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"तुमची लोकशाही घाला चुलीत' असे म्हणणार्या दिवंगत ह्रुदयसम्राटाविरुद्ध असे लिहायची हिंमत झाली असती का रे मंदिजो?
1 Sep 2014 - 5:41 pm | मंदार दिलीप जोशी
त्याचा इथे काय संबंध?
बाय द वे, बाईचा आयडी घेऊन काय बोलतोस? पडद्याबाहेर ये रे ;)
1 Sep 2014 - 5:40 pm | काळा पहाड
अच्छा म्हणजे तुम्ही दुसर्याला मूर्ख म्हटलं तर ते चालेल. पण एखाद्या सरकारला देशद्रोही म्हणणं म्हणजे मूर्खपणा.
१. मला वाटतं तुम्हाला भाषेमध्ये सिव्हिलिटी हवी होती. ती तुम्ही स्वतः का वापरली नाही?
२. श्री श्री श्री मनमोहन सिंग यांचं सरकार हा भ्रष्ट्राचाराचा कळस होतं यात फारसं दुमत नसावं.
२.१. जे सरकार "भ्रष्टाचार हेच त्याचं मूळ ध्येयधोरण आहे" अशा प्रकारे वागतं ते राष्ट्रद्रोह करत नाही तर काय करतं? आठवा अण्णा हजारेंचं जनआंदोलन तोडाण्यासाठी या सरकारने काय काय जंग पछाडले होते. आठवा कशा प्रकारे या सरकारचे निर्णय शेतकर्यांच्या आणि जवानांच्या जिवावर उठले होते. आठवा या सरकारनं स्वतःला टिकवण्यासाठी कशा तडजोडी केल्या सामान्य जनतेच्या जिवावर. एखादं सरकार जनतेच्या हिताचे निर्णाय न घेता जेव्हा फक्त स्वतःला टिकवण्यासाठी मनमानीपणाने निर्णय घेतं तेव्हा त्याला राष्ट्रद्रोह नाही तर काय म्हणायचं? दोन दोन ब्यूरोक्रॅट्स नी सांगितलेलं आहे की फायली १० जनपथ ला अप्रूव्हल साठी जात होत्या. सोनिया गांधी घटनाबाह्य सत्ताकेंद्र असताना घटनेची शपथ घेतलेला प्रधान् मंत्री या फायली साठी गुपचूप तिकडे पाठवतो आणि वर गुळमुळीत पणे त्याचा इन्कार करतो हे राष्ट्रद्रोह नाही तर काय आहे? कॅगनं - एका घटनादत्त पोस्टवरच्या व्यक्तीनं - स्वतः खुलासा केलाय की त्यांच्यावर सरकार कडून दबाव येत होता नावं गाळण्यासाठी. हा राष्ट्रद्रोह नाही? काय केलं म्हणजे हे सरकार राष्ट्रद्रोही व्हायला पात्र होईल? उदाहरणार्थ, मनमोहन मंत्रीमंडळाने गुप्त कागद्पत्रं शत्रू देशाच्या हवाली करायला हवी तर आणि तरच तुम्ही त्याला राष्ट्रद्रोही मानणार का?
२.२. जनतेनं निवडलेलं सरकार राष्ट्रद्रोही असू शकत नाही का? जनतेनं आधी निवड्लं की कोळसाकांड आधी घडलं? जनतेला काय स्वप्न पडलं होतं का असं होणार आहे? की जनतेनं निवड्लं म्हणजे या लोकांना सौ खून माफ?
"फटका" शब्दाबद्दल मी स्वतंत्रपणे बोलेनच.
1 Sep 2014 - 5:42 pm | मंदार दिलीप जोशी
जबरदस्त थुत्तरफोड उत्तर
1 Sep 2014 - 5:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
२. श्री श्री श्री मनमोहन सिंग यांचं सरकार हा भ्रष्ट्राचाराचा कळस होतं यात फारसं दुमत नसावं.
२.१. जे सरकार "भ्रष्टाचार हेच त्याचं मूळ ध्येयधोरण आहे" अशा प्रकारे वागतं ते राष्ट्रद्रोह करत नाही तर काय करतं? आठवा अण्णा हजारेंचं जनआंदोलन तोडाण्यासाठी या सरकारने काय काय जंग पछाडले होते. आठवा कशा प्रकारे या सरकारचे निर्णय शेतकर्यांच्या आणि जवानांच्या जिवावर उठले होते. आठवा या सरकारनं स्वतःला टिकवण्यासाठी कशा तडजोडी केल्या सामान्य जनतेच्या जिवावर. एखादं सरकार जनतेच्या हिताचे निर्णाय न घेता जेव्हा फक्त स्वतःला टिकवण्यासाठी मनमानीपणाने निर्णय घेतं तेव्हा त्याला राष्ट्रद्रोह नाही तर काय म्हणायचं? दोन दोन ब्यूरोक्रॅट्स नी सांगितलेलं आहे की फायली १० जनपथ ला अप्रूव्हल साठी जात होत्या. सोनिया गांधी घटनाबाह्य सत्ताकेंद्र असताना घटनेची शपथ घेतलेला प्रधान् मंत्री या फायली साठी गुपचूप तिकडे पाठवतो आणि वर गुळमुळीत पणे त्याचा इन्कार करतो हे राष्ट्रद्रोह नाही तर काय आहे? कॅगनं - एका घटनादत्त पोस्टवरच्या व्यक्तीनं - स्वतः खुलासा केलाय की त्यांच्यावर सरकार कडून दबाव येत होता नावं गाळण्यासाठी. हा राष्ट्रद्रोह नाही? काय केलं म्हणजे हे सरकार राष्ट्रद्रोही व्हायला पात्र होईल? उदाहरणार्थ, मनमोहन मंत्रीमंडळाने गुप्त कागद्पत्रं शत्रू देशाच्या हवाली करायला हवी तर आणि तरच तुम्ही त्याला राष्ट्रद्रोही मानणार का?
२.२. जनतेनं निवडलेलं सरकार राष्ट्रद्रोही असू शकत नाही का? जनतेनं आधी निवड्लं की कोळसाकांड आधी घडलं? जनतेला काय स्वप्न पडलं होतं का असं होणार आहे? की जनतेनं निवड्लं म्हणजे या लोकांना सौ खून माफ?
भारतिय जनतेला समज येतेय हे गेल्या निवडणूकीत दिसू लागले आहे. याचा अर्थ सर्वच भारतियांना समज येईल (किंवा ती येणे त्यांना स्वतःला सोईचे असेलच) असे नाही... हे ही तितकेच सत्य आहे म्हणा. :) :(
1 Sep 2014 - 5:57 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत. झापडमनोवृत्तीच्या लोकांना फटका पचनी पडणार नाही. बाकी अनंत फंदी या काळात झाले असते तर त्यांच्या फटक्यांपायी त्यानाही लोकशाही विरोधी ठरवले असते. :-)
3 Sep 2014 - 12:49 pm | प्रतापराव
देशद्रोह हा शब्द फार मोठा झाला काळा पहाड. जर ते सरकार देशद्रोही होते असे तुमचे मत आहे तर त्यांच्यावर सध्याच्या देशप्रेमी सरकारने काय कृती करावी असे तुमचे मत आहे. आणि जर हे देशप्रेमी सरकार आधीच्या देशद्रोही सरकारवर जर त्यांनी केलेल्या देश्द्रोहाबद्दल काहीहि कृती करणार नसेल तर हे सरकारही देशद्रोही असेल का?
1 Sep 2014 - 5:56 pm | शिद
राम गोपाल वर्माने लावलेली आग मिपावर बरीच फोफवलेली दिसतेय. ;)
चालू द्या.
1 Sep 2014 - 5:57 pm | आशु जोग
हुप्प्यारावांना काँपिटिशन नाही वर्तमानपत्रे चिकटवण्यात...
1 Sep 2014 - 5:58 pm | सौंदाळा
+१
3 Sep 2014 - 7:58 pm | हुप्प्या
वर्तमानपत्रे चिकटवणे वगैरे गलिच्छ भाषा वापरायचे प्रयोजन कळले नाही. लेखाच्या विषयात बातमी असे स्पष्ट लिहिले आहे. घडणार्या बातम्यांवर चर्चा करायला मला आवडते. तुम्हाला असला उहापोह वर्ज्य वा त्याज्य असेल तर इथून निघा. लेख न वाचण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. उगाच वैयक्तिक शेरेबाजी करून ह्या चर्चेत चिखल का फेकत आहात?
3 Sep 2014 - 8:04 pm | टवाळ कार्टा
यात गलिच्छ काय आहे??
9 Jul 2015 - 11:57 pm | आशु जोग
पण कदाचित हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा सवंग प्रयत्न अर्थात पब्लिसिटी स्टंट असावा.
9 Jul 2015 - 11:59 pm | आशु जोग
हे आपण स्वतः लिहीलंत हे बरं झालं
1 Sep 2014 - 5:59 pm | काळा पहाड
पराचा कावळा करायची गरज आहे का? की पेपर वाचत नाही तुम्ही? ते वाक्य 'केलं तर निस्तरलं पाहीजे' अशा अर्थाचं होतं. बाकी इथं साध्या साध्या घटनेवरून दंगे होतायत. मागे फेस्बुक वरून उसळलेला दंगा विसरला की काय? आम्ही (प्रथमवचनी एकवचनी) फटके ही देत नाही आणि धमकी सुद्धा. फक्त एक शक्यता व्यक्त केली की कदाचित काही संघटना आता हे वाढवतील आणि वर्मा बाबू ना फटके बसतील (कायदेशीर किंवा शारिरिक - जसा त्या संघटनेचा वकूब असेल त्या प्रमाणे).
बाकी असं काही झालं तरी सेक्यूलर नसल्यामुळे याचा निषेध काही आम्ही करणार नाही, कारण तसं न करणं हा काही गुन्हा नाही.
3 Sep 2014 - 12:42 pm | प्रतापराव
राम गोपाल वर्मा विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. कायद्याने जो निर्णय व्हायचा तो होईल. पण ह्या घटनेचा फायदा घेवून काही संघटना हिंसाचार करण्याचा जर प्रयत्न करत असतील प्रक्षोभक वक्तव्ये करत असतील,तर त्यांना मोदी सरकारने वेसन घातली पाहिजे.कायदा हाती घेणार्यांना जरब बसवली पाहिजे.देशात न्याय करण्यासाठी न्यापालिका यंत्रणा आहे त्यांच्यापलीकडे जर काही संघटना स्वताला समजत असतील तर त्यांना त्याची जागा दाखवून देण्यास मोदी सरकार समर्थ आहे.
4 Sep 2014 - 11:11 am | मृत्युन्जय
सरकार नेहमीच समर्थ असते. असतो तो इच्छाशक्तीचा अभाव. या इच्छाशक्तीच्या अभावापायीच सरस्वतीची मुर्ती फोडणारे मोकाट सुटतात. असो. अजुन तरी रामूच्या वक्तव्यामुळे काही हिंसाचार घडल्याचे ऐकले नाही. त्यामुळे कदाचित मोदी सरकारला काही करावे लागणार नाही.
बादवे काही दंगा झालाच तर तो निस्तरणे राज्य सरकारचे काम असेल ना? नाही म्हणजे रामू च्या वक्तव्यामुळे देशव्यापी आंदोलन घडण्याची शक्यता कमीच म्हणुन विचारले.
4 Sep 2014 - 1:04 pm | प्रतापराव
बरोबर आहे राज्य सरकारच काम राहील. रामू दक्षिणेकडचा आहे तेथे काही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता कमी वाटते. कारण तेथे करुणानिधी नि जयललिता ह्यांची चलती आहे. करुणानिधी स्वताच त्यांच्या श्रीरामा बद्दल केलेल्या वक्तव्यांनी वादग्रस्त आहेत. त्यात जयललिता ह्या ज्या पक्षाच्या प्रमुख आहेत त्या पक्षाचे संस्थापक पेरियार इ वी रामास्वामी होते त्यांचे देवाबद्दलचे विचार इतके जहाल होते कि रामूचे वक्तव्य म्हणजे मामुली वाटेल.
1 Sep 2014 - 6:41 pm | प्रसाद गोडबोले
कंटाळा आलाय फार ...
ह्या धाग्यावर बॅटींगला उतरावे काय असा विचार करत आहे सध्या ....पण तुर्तास आमच्या कडुन पास !
1 Sep 2014 - 6:47 pm | पोटे
पण रामु बोलल्ल ते खरेच होते की ! खरे बोलणे हा गुन्हा झाला की
1 Sep 2014 - 6:49 pm | प्यारे१
मग माफी का मागितली? ट्विट का उडवली?
1 Sep 2014 - 11:45 pm | काळा पहाड
लक्ष द्यू नका. ते उगीचच रामू खरा बोल्ला वगैरे दोन तीन येळा बोलून काडी टाकाया बग्तंय. फाट्यावर मारा.
13 Jul 2015 - 2:57 pm | तुडतुडी
सुदैवाने हिंदू धर्मात देवांची चेष्टा करणे हे इतके अब्रह्मण्यम मानले जात नाही.>>>
बरोबर बोललात . हिंदू धर्माची , देवांची चेष्टा आणि बदनामी करायला दुसरं कोणी कशाला हवंय ? हिंदूच ते उत्तम रित्या पार पाडतात . उगीच का इतर धर्मीय त्यांना काफिर , मूर्ख समजतात का ?
पुराणातील बहुतेक कथा बुद्धीच्या निकषावर टिकणे कठिण आहे.>>>
होय . सामान्य बुद्धीच्या लोकांना काही आशय समजावून सांगण्यासाठी ह्या कथा रचलेल्या आहेत . कारण त्यामागचं खरं तत्व कळणं अवघड होतं . नंतर त्यामागचा खरा उद्देश किवा ते तत्व लोप पावून ह्या सुमार बुद्धीच्या लोकांनी केवळ कथांनाच जिवंत ठेवलं . आणि अति शहाण्या लोकांनी त्यामगे सत्य काय आहे हे शोधण्याचं सोडून पुराणातली वांगी म्हणून त्याची टिंगल केली .
मला वाटते आता सोशल मिडीयाचा वापर करताना तिथे तुमचा हेतू काय असा एक कॉलम टाकावा म्हणजे नंतर त्रास नको.>>>
हा हा हा … सहमत
एखादी व्यक्ती धार्मिक असेल आयुष्यभर देवाचे गुणगान गाणारी असेल परंतु समाजातील ज्या अन्यायी गोष्टी आहेत त्याच्याशी त्याला काहीही देणे घेणे नसेल तर त्याला अर्थ नाही>>>
समाजातील अन्यायी गोष्टींच्या विरोधात लढण्याचा ठेका फक्त धार्मिक व्यक्तींनी घायाय्चाय का ? समाजाला हात , पाय , बुद्धी लढण्याची ताकद दिलीये ती काय फक्त स्वार्थीपणा करण्यासाठी ? मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाण्यासाठी ? हरामीपणा, व्यभिचार करण्यासाठी , काहीही कामधंदा न करता फुकट खाणा साठी ? लायकी आणि ऐपत नसताना खंडीभर पोरं काढून पोरांना दुर्दैवाचे दशावतार बघायला लावण्यासाठी ?तसं असेल तर कशाला काही अर्थ नाही .
बरं ह्याची शिक्षा भोगायला लागल्यावर तथाकथित बुद्धिवादी 'देव काही करत नाही' म्हणून गळे काढतात. धार्मिक लोकांनी इतरांवर चिखलफेक केलेलं ह्यांना चालत नाही . पण इतरांनी देवा , धर्मावर चिखलफेक केलेली ह्यांना खुशाल चालते .
13 Jul 2015 - 2:58 pm | तुडतुडी
समाजातल्या वाईट , गलिछ चालीरीती , दुसर्यावर अन्याय करण्याच्या नवनवीन युक्त्या ह्या so called ब्राह्मणांनी आणल्यात . त्यासाठी इतर धार्मिक लीकांवर , देवा वर कशासाठी आगपाखड करायची . देवाचा आणि धर्मातल्या चांगल्या वाईट चालीरीतींचा संबंध का लावला जातो ? देवाचा धर्माशी काय संबंध ?
13 Jul 2015 - 3:24 pm | टवाळ कार्टा
आत्ता ट्रॅकवर आलात :)