मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राम गोपाल वर्माने लावलेली आग!

हुप्प्या · · काथ्याकूट
अनेक गाजलेले सिनेमे आणि शोलेचा केविलवाणा रिमेक बनवणारा राम गोपाल वर्मा पुन्हा चर्चेत आला आहे. ऐन गणपतीच्या सणाच्या दिवशी त्याने गणपतीबद्दल अनेक वादग्रस्त ट्वीटे करुन खळबळ माजवली आहे. काही नमुने इथे आहेत. http://www.deccanchronicle.com/140829/entertainment-bollywood/article/ram-gopal-verma-sparks-another-controversy-tweets-ganesh ह्यातली काही विधाने म्हटली तर गमतीदार म्हटली तर अपमानकारक आहेत. सुदैवाने हिंदू धर्मात देवांची चेष्टा करणे हे इतके अब्रह्मण्यम मानले जात नाही. (अन्य काही धर्मात थेट शिरच्छेद करायची भाषा झाली असती. असो.) ऐन सणाला, उत्सवमूर्तींबद्दल असे बोलणे तितकेसे प्रसंगोचित वाटत नाही. पण कदाचित हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा सवंग प्रयत्न अर्थात पब्लिसिटी स्टंट असावा. हे घडताच काँग्रेसचा कुणी कार्यकर्ता तोही मुसलमान राम गोपालाबद्दल तक्रार करतो तेही विधानसभा तोंडावर आलेल्या असताना हाही एक अजब योगायोग म्हणायचा! असो. कॉग्रेसचे हिंदू धर्मावरील प्रेम जगजाहीर असल्यामुळे असल्या फिल्मी प्रकाराला किती हिंदू भुलतील ह्याविषयी मला तरी शंका वाटते. हा योगायोग आहे का हे सगळे ठरवून केले आहे हेही सांगणे अवघड आहे. २६/११ नंतर लगेचच विलासराव देशमुखांनी वर्माला जिथे अतिरेकी हल्ले झाले तिथे नेऊन त्याच्या पुढच्या सिनेमाकरता मदत केली होती. त्यावरुन बरेच रान उठले होते. कदाचित ह्या उपकाराला जागून वर्मासाहेबांनी ही काडी सारली असेल. आत्ताच गणपती बसला आहे त्यामुळे आल्या आल्या पाहुण्याला खजिल करता कामा नये. पण वर्माजींनी उल्लेखलेले मुद्दे अगदीच काही चुकीचे नाहीत. असो.

वाचन 16093 प्रतिक्रिया 0