वाट्सअॅप एक डोकेदुखी ?
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. आंतरजाल (इंटरनेट) युगात आपण सतत नाविन्याच्या शोधात असतो आणि आज त्याला प्रचंड महत्त्व आलं आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वेग इतका अफाट वाढलाय की आपण काही काळ जर यापासुन दूर राहीलो तर आपल्याला बरीच माहिती कळणार नाही, आपण अज्ञानी राहू की काय म्हणन्यापेक्षा दैनिकातील बातम्यांवर आपल्याला विसंबून राहावे लागेल.