गाभा:
ए फ्यांड्री SSSS ईई ..
अंधारातून चाललेल्या एका सावलीला मी हाक मारली..
"ए अंड्या, XXXच्या, मर ना मेल्या.." तितक्याच उत्स्फुर्तपणे प्रतिक्रिया आली.
यारी दोस्ती मध्ये हे असे चालतेच.
फँड्री चित्रपट पाहिल्यापासून मी माझ्या दोन कृष्णवर्णीय मित्रांचे नामकरण फँड्री असे केलेय. पैकी हा एक. तितकेच स्पोर्टीगली घेणारा आणि पलटून एक कचकचीत शिवी घालणारा.
दुसर्याला मात्र काय माहीत, ते फारसे रुचले नाहीये. काल मात्र त्याला गाठून मी विचारलेच, "काय बे रताळ्या, मोठा झालास का? राग का येऊन राहिला?"
तर म्हणला कसा, "अंड्या, आमची जात एवढ्या पण खालची नाहीये रे ..... "
थोडावेळ मला काय बोलावे आणि कोणत्या टोनमध्ये बोलावे समजेणासे झाले..
तरी उत्तरलो,
"म्हणजे तू सुद्धा एखाद्या जातीला आपल्यापेक्षा खालची मानतोस तर..... मग काय फरक राहिला??
आता निरुत्तर व्हायची पाळी त्याची होती.
प्रतिक्रिया
1 Mar 2014 - 12:41 pm | आतिवास
तुम्ही मित्रांना 'फँड्री' म्हणून हाक मारता? तेही तो चित्रपट पाहून आल्यावर?
कठीण आहे!! :-(
1 Mar 2014 - 12:52 pm | साळसकर
फक्त मित्रांनाच
4 Mar 2014 - 9:15 pm | बॅटमॅन
अन त्यावर दिमाखात करून धागा लिहिणे ही तर हैट्ट आहे.
4 Mar 2014 - 10:04 pm | साळसकर
जर तुम्ही आजवर तुमच्या कुठल्या मित्राला "ए काळ्या, जाड्या, ढापण्या, सुकड्या... वगैरे वगैरे अशी त्याच्या व्यंगावरून हाक मारली नसेल तर इतकेच बोलेन की तुमच्या मैत्रीच्या व्याख्या आणि बेंचमार्क माझ्यापेक्षा वेगळ्या आहेत आणि यात तुम्ही बरोबर किंवा मी चूक असे नाहीये, म्हणून आपल्या मताचा आदर आहे च. :)
4 Mar 2014 - 11:33 pm | बॅटमॅन
जाडेपणा काळेपणा कुठे अन फँड्री म्हणणे कुठे. दोहोंतला फरक समजून घेता येत नसेल किंवा तरी सांस्कृतिक इंपीरियलिझम चालवायचा असेल तर आपल्या मताचा शष्प आदर नाही. :)
4 Mar 2014 - 11:53 pm | साळसकर
तेच तर म्हणालो, मैत्रीच्या व्याख्या किंवा बेंचमार्क वेगळे असतील. अन्यथा जसे तुम्ही फँड्रीचा अर्थ काढलात तसे मैत्रीखात्यात दिल्या जाणार्या शिव्यांचेही शब्दशा अर्थ घेतले तर कठीणच नाही :)
4 Mar 2014 - 11:58 pm | बॅटमॅन
शिव्यांचे शब्दशः अर्थ घेऊ नयेत हे वेगळे सांगण्याचे काही कारण नाही.
पण फँड्री पिच्चर पाहूनही त्या संज्ञेचा वापर अशा थट्टेसाठी करावा यातली असंवेदनशीलता फार रोचक वाटली. :)
5 Mar 2014 - 12:06 am | साळसकर
चला एक तर चांगली गोष्ट समजली, मी माझ्या मित्राला मस्करीत चिडवायला फॅंड्री हाक मारणेही लोकांना रुचत नाहीये, म्हणजे ज्यांना खरोखर समाजात फॅंड्री म्हणून बघितले जाते अश्यांच्या पाठीशी बरेच लोक उभे राहू शकतात.
या भावना अश्याच राहू द्या !!
तुर्तास मला रजा द्या, शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज :)
5 Mar 2014 - 12:11 am | बॅटमॅन
उपरोध समजला.
तोंडाला येईल ते बरळून वर परत स्वतः पददलितांच्या पाठीशी उभे इ. राहणार अन बाकीचे तेवढे फेसबुकीय विचारजंत इ.इ.इ. छाप असा दबंग पवित्रा घेणे ही तर तद्दन टाळ्याखाऊ टॅक्ट झाली हो. दुसरं काही जमत असेल तर बघा.
अन तरीही तुमचे आभार, कारण "समाजस्थिती समजली काही | तुम्हांकारणे ||"
5 Mar 2014 - 12:20 am | खटपट्या
+१११११
5 Mar 2014 - 10:56 am | साळसकर
काय राव कुठच्या कुठे चालायत.. खरे तर लिहिलेले इसकटवून सांगण्यात मजा नाही पण बघतो इथले प्रतिसाद पाहता काही उलगडवून समजवता येईल का..
5 Mar 2014 - 6:28 pm | साळसकर
सर, ते खाली स्पष्टीकरण दिले आहे, ते नक्की वाचाल. याउपरही पटले नाही तर आपल्या मतांमध्ये भिन्नता आहे असे समजून या वादावर पडदा . :)
4 Mar 2014 - 4:24 pm | म्हैस
दोघांचही चुकलं. सिनेमा मधून काय घ्यायचा आणि काय नाही हे समजलं पाहिजे .
4 Mar 2014 - 10:03 pm | राजेश घासकडवी
तुमच्यात आणि तुमच्या मित्रात काही फारसा फरक जाणवला नाही. त्याने शरमिंदा होणं आणि तुम्ही अभिमानाने लेख लिहिणं हे तर फारच खटकलं.
4 Mar 2014 - 10:05 pm | साळसकर
माझ्या आणि माझ्या मित्रात खरेच काही फरक नाहीये फारसा, आणि म्हणूनच आम्ही मित्र आहोत :)
4 Mar 2014 - 10:13 pm | राजेश घासकडवी
तुमच्या मित्राचा लेख आला मिपावर की मग बोलू. तोपर्यंत जे झालं ते स्पष्ट आहे.
4 Mar 2014 - 11:17 pm | साळसकर
तुमच्या मित्राचा लेख आला मिपावर.... पटकन मी इथे लेक असे वाचले :)
असो, प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)
4 Mar 2014 - 10:12 pm | खटपट्या
पालथ्या घड्यावर पाणी
5 Mar 2014 - 9:47 am | स्पा
गेट वेल सून
शुभेच्चा
5 Mar 2014 - 12:28 pm | आनन्दा
म्हणजे फॅण्ड्री ची थट्टा करणे हा असंवेदनशीलपणा आहे का?
या गोष्टीतला संदेश पहा.
थोडक्यात तथाकथित संस्क्रुतीरक्षक आणि फँड्रीची थट्टा सहन न होणारे लोक यांच्यात तात्विक्द्रुष्ट्या काहीच फरक नाही. आशयापेक्षा शब्द महत्वाचे नाही का?
5 Mar 2014 - 1:14 pm | गणपा
परिक्षण असो वा अन्य काही फँड्री जिथे जातो तिथे वाद उकरुन काढतो हेच खरं. :p
5 Mar 2014 - 1:32 pm | साळसकर
ए फ्यांड्री SSSS ईई ..
_ _ कथासार
कथेतील नायक हा "फँड्री" नामक बहुचर्चित चित्रपट बघून आला आहे. त्या चित्रपटातील प्रमुख पात्र `जब्या' हा रंगाने काळा असल्याने कथेच्या नायकाने मस्करीत आपल्या दोन मित्रांचेही नामकरण फँड्री असे केले आहे. अर्थात याआधीही त्यांच्यात अशी मस्करी चालावीच अशी त्यांची यारीदोस्ती. पण हे नाव एकाने चालवून घेतले तर एकाला रुचले नाही. नायकाने चौकशी करता त्याला समजले की त्याने मित्राला काळ्या रंगावरून पाडलेले नाव मित्राने चुकीच्या अँगलने जाऊन जातीयवाचक संबोधन म्हणून घेतले. त्या मित्राला तसे वाटले कारण समाजात त्याची जात तुलनेत खालची समजली जाते आणि हे कुठेतरी त्याच्या डोक्यात घोळत होते. पण हे नायकाला अनपेक्षित होते. अप्रत्यक्षपणे आपल्यावर जातीयवादाचा आरोप करणार्या आपल्या या मित्राला काय स्पष्टीकरण द्यावे हे नायकाला समजले नाही. समाजातील जातीभेदाच्या भिंती कुठेतरी मैत्रीत येत आहेत याची जाणीव बरेचदा विषण्ण करणारी असते, जी त्याला त्या क्षणी झाली. पण पुढे त्या मित्राने उच्चारलेल्या वाक्याचा धागा पकडूनच नायक उत्तरला, जर तुला वाटत असेल की मी तुझ्या जातीला हलके लेखत असेल तर तू तरी वेगळे काय करत आहेस.... मित्र निरुत्तर झाला पण आपण विचार करायला घ्यालच !
खरे तर असे उलगडण्यात मजा नाही म्हणतात काही जण, पण याबाबतीत जे मांडायचे होते ते नीट पोहोचलेच नाही तर लिहिलेलेच व्यर्थ म्हणून हे थोडक्यात स्पष्टी...
याउपर कोणाला काही शंका असल्यास मला व्यक्तीगत संपर्क साधा तर इतरांसाठी म्हणून हे गाणे.. तुझा झग्गा ग झग्गा ग वार्यावरती उडतो.. माझा जब्या ग्ग जब्या ग्ग शालूवरती मरतो... एंजाँय