प्रतिसाद

सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
11 Nov 2013 - 3:25 am

दै. बातमीपत्र (बातमीपत्रच म्हणजे बातमीपत्र)

सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया

आमच्या वर्तमानपत्राकडे आलेल्या असंख्य प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया खाली देत आहोत.

गोपाळ सुंदर, अमरावती: सचिन म्हणजे क्रिकेटचा देव आहे. देव कधी रिटायर होतो का? लागू म्हणतात देवाला रिटायर करा.

पंकज मोरे, कारसुळ बु.: सचिनची निवृत्तीची बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. वडील म्हटले शेतावर जा अन कांद्याला पाणी दे. मी गेलो नाही, घरीच माळ्यावर रडत बसलो.

मौजमजाप्रतिसादशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधबातमीविरंगुळा

हलके व्हा .. !!

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
31 Oct 2013 - 12:02 am

त्रास झालाय त्रास.. गेले आठवडाभर ऑफिसमध्ये एवढे मरमरून काम करावे लागतेय जेवढे मी महिन्या महिन्याला मिळून नाही करत. जणू काही यंदा सर्व कर्मचार्‍यांचा दिवाळी बोनस मला एकट्यालाच काढायचा आहे. जेव्हा दिवसभरात आंतरजालावर (ईंटरनेटवर) एखादी चक्कर टाकायलाही वेळ मिळत नाही तेव्हा जशी जगाशी संपर्क तुटल्याची प्रकर्षाने जाणीव होते, ती गेले काही दिवस मी अनुभवतोय. पंधरा मिनिटांसाठी टॉयलेटला जाऊन हलके होणे आणि तिथेच गपचूप मोबाईल काढून व्हॉटसअपवरचे मेसेज बघणे हा एवढाच मनोरंजनाचा कार्यक्रम दिवसभरात उरलाय.

मुक्तकप्रकटनविचारप्रतिसादआस्वादलेखअनुभव

वन्दे मातरम का नाही??

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in काथ्याकूट
10 Oct 2013 - 2:55 pm

नमस्कार मित्रहो...

२-३ दिवसापुर्वी श्री शरद पोन्क्शे यान्च्या व्याख्यानाला जायचा योग आला होता. अतिशय तळमळीने त्यानी जन गण मन आणि वन्दे मातरम मधला फरक आणि त्यामागचे भयानक राजकारण समोर आणले. ऐकुन रक्त खवळले आहे. नेहरु आणि गान्धी घराणे देशाचे मातेरे करण्यात पहिल्यापासून अग्रेसर आहेच...आई भवानीने सर्व दानवान्चा नाश करण्याची शक्ति आमच्या बाहूत निर्माण करावी हीच प्रार्थना....

बातमीचि लिन्क खाली डकवली आहे.....

तिहेरी शतशब्दकथा - लाडका - लाडका - लाडकी

साळसकर's picture
साळसकर in जनातलं, मनातलं
23 Sep 2013 - 9:51 pm

लाडका

तो सर्वांचाच लाडका होता.. तीन भावांत शेंडेफळ म्हणून आईचा लाडका.. आपले नाव हाच काढणार म्हणून बापाचा लाडका.. अभ्यासात हुशार म्हणून शिक्षकांचा लाडका.. आणि मित्रांच्या ग्रूपची, बोले तर जान होता.. शांत स्वभाव आणि लाघवी बोलणे, कामानिमित्त जिथे जाईल तिथे आपली छाप पाडणारच.. ऑफिसमधल्या बॉसचाही लाडका न झाल्यास नवलच..!!

कथाप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाआस्वादलेखअनुभवमत

गणेशाची स्थापना. मूर्ती एक की दोन ? लहान की मोठी ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
13 Sep 2013 - 8:46 pm

नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने
यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषणे.

वेद आणि विज्ञान

श्रीनिवास टिळक's picture
श्रीनिवास टिळक in काथ्याकूट
9 Sep 2013 - 8:14 pm

काही महिन्यांपूर्वी वेद आणि विज्ञान या विषयावर चर्चा झाली होती. त्या संदर्भात मी प्रो. डोंगरे आणि डॉक्टर नेने यांनी महर्षी कणाद यांचे पदार्थविज्ञान आणि अम्शुबोधिनी शास्त्र यांवर लिहिलेल्या पुस्तकांचा उल्लेख केला होता. शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉक्टर नेने यांनी नुकतेच पुणे आकाशवाणीवर भाषण दिले त्याचा दुवा देत आहे.

https://mail.google.com/mail/u/0/?ui=2&ik=a3dfa7f36d&view=att&th=1410291...

कायद्यात काही 'जादूटोणा' नाही

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
5 Sep 2013 - 4:10 pm

एडव्होकेट निर्मलकुमार सूर्यवंशी,
महोदय,
आपला दि ५ सप्टेंबर २०१३ च्या लोकसत्तामधील 'कायद्यात काही "जादूटोणा" नाही' अशा समर्पक शीर्षकाचा लेख वाचला.
गैरसमज दूर व्हावेत याबाबत आपले लेखन स्तुत्य आहे.
काही विचारणा -
१. ज्या व्यक्तींच्या अनंत कष्टांमुळे हा कायदा निदान १२ कलमाच्या रू़पात
सध्या सादर केला आहे, त्यांच्या संस्थांला या कलमांच्या आधारे दोषी
लोकांना शोधायच्या व शिक्षा करायच्या कामात मदतनीस म्हणून सहभागी करता
आलेले आहे की नाही?

मांडणीविचारप्रतिसाद

अभिप्राय पाहिजे

देवांग's picture
देवांग in जनातलं, मनातलं
5 Sep 2013 - 3:14 pm

काही दिवसांपूर्वी मित्राकडून समजले कि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने तेथील रहिवास्यांसाठी हेल्प लाईन चालू केली आहे. तेथील ऑपरेटर तुम्ही ८ ८ ८ ८ ० ० ६ ६ ६ ६ वर फोन केला असता महानगर पालिकेच्या कामासंदर्भात माहिती हवी असेल तर देतो. तुमची काही तक्रार असेल तर ती नोंदवून घेतली जाते. तसेच त्या तक्रारीचा क्रमांक तुमच्या सेल फोन वर येतो. तसेच त्या तक्रारीचे त्वरित निवारण केले जाते.

उदा.

धोरणप्रतिसाद

एका गाजलेल्या पुस्तकाचे परिक्षण

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
28 Aug 2013 - 9:50 pm

आज प्रदर्शनात दुपारी थोडावेळ मिळाला म्हणून एक पुस्तक वाचण्यासाठी हाती घेतले. प्रथमदर्शनी पुस्तकाचे निर्माण कसे करु नये? याचे उत्तम उदाहरण म्हणून हे पुस्तक नक्कीच खपून जाईल, त्यामुळेच तर याला उत्कृष्ट वाडमयीन त्यावर्षी मिळाला होता. कव्हर ३०० जीएसम च्या जागी ३०५ आणि आतील पाने ५८ जीएसम च्या जागी ६० वापरली असती तर अजून हे पुस्तक चांगले घडू शकले असते, मॅथलीतो च्या जागी नॅचरल असता तर जगात भारी पुस्तक निर्माण झाले असते. पुस्तकाचे वजन अंमळ जास्त आहे, थोडी काही शे पाने कमी केली असती तर वजन नक्कीच कमी झाले असते. असो.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यप्रकटनविचारप्रतिसाद