गाभा:
नमस्कार मित्रहो...
२-३ दिवसापुर्वी श्री शरद पोन्क्शे यान्च्या व्याख्यानाला जायचा योग आला होता. अतिशय तळमळीने त्यानी जन गण मन आणि वन्दे मातरम मधला फरक आणि त्यामागचे भयानक राजकारण समोर आणले. ऐकुन रक्त खवळले आहे. नेहरु आणि गान्धी घराणे देशाचे मातेरे करण्यात पहिल्यापासून अग्रेसर आहेच...आई भवानीने सर्व दानवान्चा नाश करण्याची शक्ति आमच्या बाहूत निर्माण करावी हीच प्रार्थना....
बातमीचि लिन्क खाली डकवली आहे.....
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/---/artic...
प्रतिक्रिया
10 Oct 2013 - 3:19 pm | बाळ सप्रे
दोन्ही गीते छान आहेत.. पण अधिकृत राष्ट्र्गीत एकच असावे/ असु शकते त्यामुळे त्यातील जन गण मन निवडले गेले.. नेहेरुंनी निवडले.. त्याने देशाचे मातेरे कसे झाले .. आणि यात राजकारण काय आणि कसे?
10 Oct 2013 - 3:25 pm | सुनील
शतकासाठी शुभेच्छा!!!! ;)
10 Oct 2013 - 3:35 pm | खबो जाप
+१००
10 Oct 2013 - 3:50 pm | उद्दाम
नाटक करुन गांधीजींवर चिखलफेक करुन झाली.
आता रास्।ट्रगीतावरुन नेहरुंवर चिखलफेक सुरु झाली.
वाजवा रे वाजवा ! २०१४ आले.
10 Oct 2013 - 4:21 pm | अनिरुद्ध प
जरा शब्द तरी नीट टन्काना,राष्ट्रगीत असा.
10 Oct 2013 - 4:47 pm | मितभाषी
सध्या शब्दावर आहेत. थोड्यावेळाने शुध्दलेखनावर घसरतील.
संघप्रेमींचा आता शिमगा चालू होइल.
ताई माई आक्का
पंजावर मारा शिक्का.
10 Oct 2013 - 6:38 pm | अनिरुद्ध प
साहेब आता राष्ट्रगीत हा शब्द नीट नाही लिहिला/टन्कला त्यावरुन लोकान्च्या राष्ट्रगीताबद्दलच्या भावना कळुन येतात त्याचा ईथे सन्घ्रप्रेमी असण्याचा काय सम्बध? आणि मुळात मी स्वता कुठे शुद्धलेखन तपासतो तर दुसर्याच्या शुद्धलेखनावर लिहीणार (घसरणार)?
10 Oct 2013 - 6:44 pm | मुक्त विहारि
जावु द्या हो..
मुळात ज्याने धागा काढला त्याने फक्त "नेहरू आणि गांधी" हे शब्द वापरले.म्हणून त्यांनी "संघ" हा शब्द अॅड केला असावा..
चला आपण आपले स्मॉल पेग घेवू या...
10 Oct 2013 - 6:52 pm | अनिरुद्ध प
पेग कसले?
चाइ अथवा कषायपेय तेव्हडे चालेल्,कारण बाकी आम्ही गवत खाणार्यात मोडणारे असल्याने,अभक्षभक्षण तसेच अपेयपान हे वर्ज्य आहे.
10 Oct 2013 - 6:58 pm | मुक्त विहारि
बघा हा असा अर्थाचा अनर्थ होतो...
"पेग" हे द्रव पदार्थ मोजायचे एकक आहे.
आपण आपले दोघेही स्मॉल पेग अख्खा भरून कोक पियु या...उरला तर बांधुन घेवू...
बोला कधी येताय डोंबिवलीला..
10 Oct 2013 - 7:05 pm | अनिरुद्ध प
डोम्बिवली कट्टा ठरवुन अटेन्ड करावा लागेल कारण मी मालाडला रहातो.
10 Oct 2013 - 7:08 pm | मुक्त विहारि
आपण दादरला भेटू...
आणि लेख पण टाकू...
10 Oct 2013 - 7:58 pm | अनिरुद्ध प
पण आपण भारतात कधी परत येणार त्यावर हे अव्लम्बुन असेल.
10 Oct 2013 - 7:14 pm | बॅटमॅन
प्युअर गवतखौ असलेले कैक ओळखीचे लोक अट्टल दारुडे शोभतील इतकी दारू ढोसणारे पाहिले आहेत. आपण दोन्हीपैकी काही करत नसाल, कौतुकच आहे. पण ती कारणमीमांसा अंमळ गंडलेली आहे इतकेच सांगतो आणि अवांतरातून रजामंद होतो.
10 Oct 2013 - 7:23 pm | अभ्या..
"मुझको रजामंद करलो .
दरवाजा बंद करलो "
हे रजामंद का रे ब्याट्या ?
मला रजामंद म्हणजे `हापिसला रजा न घेणारा ` असे वाटायचे.
10 Oct 2013 - 7:28 pm | बॅटमॅन
मूळ अर्थ कायकी. बहुतेक "खूष" वैग्रे असावा. इथे मात्र रजा घेणे या अर्थी वापरला आहे.
11 Oct 2013 - 9:25 pm | चिगो
'रजामंद' म्हणजे ”तुला जे काही करायचंय, त्यासाठी मला तयार कर ” असा अर्थ गाण्यात अभिप्रेत असावा..
('लोटन कबूतर' प्रेमी) चिगो
12 Oct 2013 - 2:59 am | बॅटमॅन
ओह अच्छा..माहितीकरिता धन्यवाद :)
13 Oct 2013 - 5:47 pm | चित्रगुप्त
रजामंद चा अर्थ:
मोरोपंतांची सुप्रसिद्ध आर्या: "शादीके लिये रजामंद कर ली, मैने इक लडकी पसंद कर ली" यातून स्पष्ट होत आहे. 'पटवणे, सहमत करणे इ.
बघा:
http://www.youtube.com/watch?v=ZFyJtRCFgcw
http://www.youtube.com/watch?v=UE65HF_1Caw
http://www.youtube.com/watch?v=BZOCi41J1Qk
13 Oct 2013 - 8:32 pm | बॅटमॅन
मोरोपंत इकडे कसे आले?
10 Oct 2013 - 7:34 pm | प्यारे१
अरे काय चाल्लंय काय?
धागा काय, विषय काय, चर्चा काय?
ह्या बघू इकडे कोपच्यात आपापले द्रवपदार्थ नि भक्षण करायचे पदार्थ घेऊन. 'बसून' बोलू. ;)
-गवताळ प्या रे
10 Oct 2013 - 7:35 pm | बॅटमॅन
तुम्ही गवताळ नसून ओढाळ आणि वाढाळ व खट्याळ आहात.
-(गटणेइतका सज्जन) बॅटमॅन.
10 Oct 2013 - 7:58 pm | पैसा
गंभीर विषयावरील धाग्यावर अवांतर करून त्याचा खरडफळा करणार्या मुक्तविहारी, अनिरुद्ध प, बॅटम्यान, अभ्या, आणि प्यारे१ यांचा कडकडीत णिशेढ.
10 Oct 2013 - 8:04 pm | प्यारे१
माझा का म्हणून?
मी गरीब सगळ्या अवांतरकारांना किंवा सगळ्या गरीब अवांतरकारांना किंवा कसेही... कोपर्यात 'एकत्रीकरण' करुन 'मंडल' करुन 'उपविश' करुन बौद्धीक घेणार्यांची चिंतन बैठक घेणार होतो.
जेणेकरुन चर्चा सुरळीत नि शिस्तीत चालावी.
10 Oct 2013 - 8:07 pm | बॅटमॅन
या गंभीर धाग्याचा शेवटी ख"रड"(पट्टी)फळाच होणारे, त्यात चार क्षण सुखाचे अनुभवू म्हटले तर संमंला बघवेना बघा. घोर कलयुग...
10 Oct 2013 - 8:35 pm | मुक्त विहारि
तुम्ही मध्ये येव्वुन लिहील्याबद्दल तुमचा पण णिषेध..
(ज्योती ताई रागावू नका हो...मी ना थोडा सिरियश मूड मध्ये होतो)
10 Oct 2013 - 7:53 pm | अनिरुद्ध प
धन्यवाद,
आपण पहिलेच आहात कि जे माझ्या सारख्याचे कौतुक करत आहात्,कारण बर्याच ठीकाणी मागासलेला orthodox,वगैरेत सम्भावना केली जात होती,त्यामुळे पुनस्च धन्यवाद्,अवान्तर रजामन्द होणे म्हणजे माझ्या मते स्विक्रुती देणे असा होतो,तर आपल्याला रजा घेतो असे म्हणावयाचे आहे असे समजतो.
14 Oct 2013 - 12:24 pm | विटेकर
स्वानुभावाने सांगतो , हेच लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. काही दिवस जाउ द्यात. पण हेच क्षण संभाळायचे असतात.. आजिबात पीअर प्रेशर ( मराठी शब्द? ) येऊ देऊ नका !
10 Oct 2013 - 3:53 pm | विटेकर
नेहरूंचे मुस्लिम प्रेम जग जाहीर आहे आणि त्यामुळे त्यांनी अनेक गोष्टी मुस्लिमधार्जिण्या केल्या यात नवल नाही.
मातृभूमीला देवता स्वरुप मानणे, सगुणपूजा ही हिंदू संकल्पना आहे त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या मुस्लिम बांधवांचा त्याला विरोध होता. अनुनय करण्यासाठी काँग्रेस शरण जाणरच !
" वंदे मातरम" हे अत्यंत स्फुर्तीदायक गीत आहे. संपूर्ण वंदेमातरम तर अफलातून आहे. समजा या गीतापासून स्फुर्ती घेऊन निद्रिस्त आणि सुस्त हिंदू समाज जागृत झाला तर काँग्रेस पुन्हा निवडून कशी येणार ?
या सार्या गोष्टी अत्यंत चीड आणणार्या आहेत पण त्याच्या मुळाशी आपला निलंड्पणाच आहे हे ही तितकेच खरे !
10 Oct 2013 - 4:23 pm | अनिरुद्ध प
+१ सहमत
10 Oct 2013 - 7:43 pm | उद्दाम
समजा या गीतापासून स्फुर्ती घेऊन निद्रिस्त आणि सुस्त हिंदू समाज जागृत झाला तर काँग्रेस पुन्हा निवडून कशी येणार ?
आँ !!!! म्हणजे काँग्रेसने वंदे मातरम राष्ट्रगीत म्हणून मान्य नाही केले तर तुम्हा हिंदुंची ते गीत म्हणायला कुणी तोंडं धरुन ठेवली आहेत का? तसेच म्हणायचे की ! मूळ वंदे मातरम जेंव्हा स्वातंत्र्यापूर्वी गाजत होते तेंव्हा कुठे त्याला न्हेरुंचे सर्टिफिकेट मिळाले होते? मग आता तुम्हाला त्या सर्टिफिकेटची गरज का पडावी? तसेच म्हणा की राव!
उद्या म्हणाल, आम्हाला नेहरुनी रात्री दुधाचा पेला दिला नाही, म्हणून आम्हाला पोरं झाली नाहीत ..
हिंदुंना गाणं म्हणायचंच आहे तर तसेच म्हणावे. कुणीही अडवलेले नाही.
10 Oct 2013 - 4:03 pm | विटेकर
वन्दे मातरम्
सुजलां सुफलां
मलयजशीतलाम्
शस्यशामलां
मातरम् ।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं
सुहासिनीं सुमधुर भाषिणीं
सुखदां वरदां मातरम् ।। १ ।। वन्दे मातरम् ।
कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले
कोटि-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले,
अबला केन मा एत बले ।
बहुबलधारिणीं नमामि तारिणीं
रिपुदलवारिणीं मातरम् ।। २ ।।
वन्दे मातरम् ।
तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणा: शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारई प्रतिमा गडि
मन्दिरे-मन्दिरे
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी,
नमामि त्वाम्
नमामि कमलां
अमलां अतुलां
सुजलां सुफलां मातरम् ।। ४ ।।
वन्दे मातरम् ।
श्यामलां सरलां
सुस्मितां भूषितां
धरणीं भरणीं मातरम् ।। ५ ।।
वन्दे मातरम् ।।
10 Oct 2013 - 8:05 pm | उद्दाम
ते कोटी कोटी वगैरे काही नाही.
सप्त कोटी कंठ आणि द्विसप्तकोटी भुजै
असे आहे. ते तसेच ठेवा.
11 Oct 2013 - 1:42 pm | अनिरुद्ध प
+१ सहमत
13 Oct 2013 - 9:33 am | नगरीनिरंजन
हे गाणे लिहीले तेव्हा भारताची लोकसंख्या फक्त सात कोटी होती? की ती फक्त बंगाल्यांची संख्या आहे?
आमची आपली एक शंका बरं का! गाण्याला आमचा विरोध नाही आणि हे राष्ट्रगीत झाले तरी काही हरकत नाही.
13 Oct 2013 - 10:47 am | पैसा
पूर्व + पश्चिम बंगाल मिळून ७ कोटी असणार. कारण १७७० मधे बंगालच्या मोठ्या दुष्काळात ३ कोटीपैकी १ कोटी लोक मृत्युमुखी पडले होते.
वंदे मातरम बद्दल बरीच चर्चा विकिवर सापडली. http://en.wikipedia.org/wiki/Vande_Mataram
सुरुवातीपासून या गाण्याला धार्मिक रंग असल्याची चर्चा झाली तरी राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिलेली आहे. १८८२ नंतरच्या सगळ्या राष्ट्रीय चळवळी "वंदे मातरम" च्या आधारे लढल्या गेल्या. आमच्या लहानपणी शाळा भरताना जन गण मन तर शाळा सुटताना वंदे मातरम म्हणायची पद्धत होती. बहुतेक पब्लिक कार्यक्रम संपताना वंदे मातरम म्हटले जात असे. २००६ पर्यंत फार मोठे वाद झाले नव्हते. त्या वर्षी मात्र मोठेच प्रकरण घडवून आणण्यात आले.
कोणी बंदी घातली तरी वैयक्तिक पातळीवर वंदे मातरम चे महत्त्व कित्येक मुस्लिम सुद्धा मान्य करतात. ए आर रहमानने तर वंदे मातरम वर अख्खा आल्बम काढला आणि त्यातलं "माँ तुझे सलाम" ऐकताना काहीही गैर वाटत नाही. वंदे मातरम मधली तीच भावना!
10 Oct 2013 - 4:29 pm | माम्लेदारचा पन्खा
इथे फक्त गाण्याचा सम्बन्ध नसून त्यामागे किती द्ळिद्री विचार आहेत हे पण पाहिले पाहिजे..... मलाही असेच वाट्ले होते की ह्यात काय असणार पण हा गहन मुद्दा आहे...बाकी वन्दे मातरम झकासच आहे.......
10 Oct 2013 - 4:41 pm | ग्रेटथिन्कर
देश फक्त हिंदूंच्या मालकिचा आहे काय? देश सर्वधर्मियांचा आहे .राष्ट्रगित सर्वांच्या पसंतीला उतरले आहे. जन गन मन उर्दु किंवा अरबी भाषेत आहे काय? मुस्लिमांनी ख्रिच्चनांनी ते स्विकारले हा त्यांचा मोठेपणा आहे. पोँक्षे हे कट्टर गांधीद्वेष्टे आहेत. कोणता तरी मुद्दा उकरुन काढायचा आणि हिंदू मुस्लिमांत लावून द्यायची हा या संघिष्ट लोकांचा आवडता उद्योग असतो.
10 Oct 2013 - 5:20 pm | विटेकर
देश फक्त हिंदूंच्या मालकिचा आहे काय? देश सर्वधर्मियांचा आहे
हायला , हे माहीतीच नव्हतं , बरे झाले सांगितले ते !
जन गन मन उर्दु किंवा अरबी भाषेत आहे काय?
नाही , पण तसे करुन घ्यावे , तुमचं काय म्हणण आहे ?
मुस्लिमांनी ख्रिच्चनांनी ते स्विकारले हा त्यांचा मोठेपणा आहे.
डोळे पाणावले ! केव्ढा हा मोठेपणा !
कोणता तरी मुद्दा उकरुन काढायचा आणि हिंदू मुस्लिमांत लावून द्यायची हा या संघिष्ट लोकांचा आवडता उद्योग असतो.
अरे वा! हे काय संघाने तुम्हाला कानात येऊन सांगितले काय ? रच्याकने तुमचा आवडता उद्योग काय आहे ?
10 Oct 2013 - 5:27 pm | बॅटमॅन
तुमच्या (नसलेल्या) बुद्धिमत्तेचे कौतुक वाटत आलेलेच आहे नेहमी. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
11 Oct 2013 - 3:32 am | स्पंदना
वाईच जास्त थिंकिंग झालया!
10 Oct 2013 - 4:50 pm | मितभाषी
हिन्दू-मुस्लीम तेढ वाढवायची आणि नंतर दोन्हिवर राज्य करायचे हा कावा लोकांनी कधीच ओळखला आहे.
10 Oct 2013 - 4:57 pm | मुक्त विहारि
"जन गण मन"
हे पंचम जॉर्ज वर रचलेले आहे.. असे वाचलेले आहे..
तर ते राष्ट्र गीत व्हावे का?
आता ह्यात संघाचा किंवा हिंदूंचा काय संबंध?
10 Oct 2013 - 5:02 pm | ग्रेटथिन्कर
गांधीजी ,पंच्चावन्न कोटी ,गोहत्या ,राममंदीर /सेतू यांचा वापर करुन संघ आणि त्यांचे भाट जातीधर्मात आग लावायचे काम करत असतात ,इथे संघा संबंध येतो.
10 Oct 2013 - 5:10 pm | मुक्त विहारि
कारण
गेल्या १०-१२ वर्षांत भाजप प्रणीत गुजरात राज्यात दंगली अजिबात झाल्या नाहीत पण कोंग्रेस प्रणीत राज्यांत मात्र झाल्या. हे पण संघाचेच राजकारण असावे.
मुझफ्फर (उ.प्र) ला काय झाले? का ते पण संघाचेच राजकारण हो?
आझाद मैदानात नक्की काय झाले? का ते पण संघाचेच राजकारण?
बरे ते जावू दे पण भारतावर जे अतिरेकी हल्ले झाले त्यात जास्तीत जास्त कोण होते? का ते पण संघाचेच राजकारण?
11 Oct 2013 - 3:34 am | स्पंदना
ह्या! मुवि आसल काय इचारु नका.
आवो आगदी क्रिकेट खेळ्ताना सुद्धा आम्ही भारताच्या भाकरी मोडत पाकिस्तानला आगे बढो म्हणणार. तुमी आगदीच ह्ये बगा!
14 Oct 2013 - 3:12 pm | ग्रेटथिन्कर
गुजरातेत दहा वर्षात दंगली झाल्या नाहीत याचे कारण हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांना आपण वापरले गेलो आहोत याची पुरती जाणिव झाली आहे, फेकू मोदीचा या शांतिवादाशी काडीचाही संबंध नाही/नसावा.
आणि उपरोक्त इतर गोष्टींची आणि हल्ल्यांची सुरवात(आझाद मैदान वगैरे) बाबरी मशिद पाडल्यानंतर झाली ,
बाबरी कुणी पाडली हो!!! ....
आता असे म्हणू नका कि संघाचा त्याच्याशी कशाला संबंध जोडता म्हणून :-P
लोक भूलथापांना जास्त दिवस बळी पडत नाहीत. ;-)
14 Oct 2013 - 3:24 pm | बॅटमॅन
ते बाबरी पाडायच्या अगोदरची काडी राजीव गांधींनीच टाकली होती की हो. स्वतः जाऊन पूजाबिजा करून आले तिथे.
14 Oct 2013 - 3:37 pm | ग्रेटथिन्कर
मग कशाला काँग्रेसच्या नावाने बोंबलताय :-P
14 Oct 2013 - 3:50 pm | बॅटमॅन
मी काँग्रेसच्या नावाने बोंबलत असल्यागत तुम्ही कशाला बोंबलताय =))
14 Oct 2013 - 4:14 pm | मुक्त विहारि
कुणी तरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय?
ह्या टोपी खाली दडलंय काय?
14 Oct 2013 - 4:13 pm | मुक्त विहारि
@ ग्रे.थि.
आपण ज्या काही ४ ओळी खरडल्या त्या बद्दल आभार..
पण ते
मुझफ्फर नगरचे राहिलेच बघा... असे एक एक करून कसे चालेल? तुम्ही जरी विसरलात तरी मी नाही ना विसरु शकत...
तो पर्यंत अजून एक होम वर्क
"अफगणिस्तान मधील बौद्ध मुर्तींचे काय झाले?"
बाकी तुमची पदरा आड लपण्याची व्रुत्ती माहित असल्याने हा होम वर्क फक्त तुम्हालाच आहे...
14 Oct 2013 - 4:18 pm | ग्रेटथिन्कर
बामियानात काय झाले! मला कशाला विचारताय?
तूमा हिंदुत्ववाद्यांच्या धर्मानुसार बुद्ध हा विष्णुचा नववा अवतार आहे ,मग तूमी जायचे कि तिकडे....
कि तुमच्या उड्या अयोध्येपलिकडे जात नाहीत. :-P
14 Oct 2013 - 4:35 pm | मुक्त विहारि
काय हो तुम्ही आजचा ग्रुह पाठ तर लगेच पुर्ण केलात.
पण त्या मागच्या ग्रुह पाठाचे काय?
बाकी काही ही म्हणा पण तुमचे अवतार कार्य फार जोरदार सुरु आहे..नाही म्हटले आमच्या शंकांची उत्तरे द्यायला वेळ मिळायला लागला म्हणून विचारले.... का तिथे पण कूणाच्या पदरा आड लपत होतात?
तुमच्या स्मायली पण जाम भारी असतात हो.
14 Oct 2013 - 9:39 pm | विद्युत् बालक
चाटायची सवय दिसत्येय त्यांना बहुतेक !!
14 Oct 2013 - 10:26 pm | मुक्त विहारि
चालायचेच...
पदरा आड कोण हा लपला
शोध पाहु जरा..
ह्यांचे थिंकिंग आहे जबरा...
11 Oct 2013 - 8:38 pm | वडापाव
खरंय... 'जन-गण-मन अधिनायक जय हे भारतभाग्यविधाता' हे तेव्हा पंचम जॉर्जच्या सन्मानार्थ म्हटलं गेलं, आता आपण ते नेमकं कोणाला उद्देशून म्हणतो हे अजुनपर्यंत उमगलेलं नाही. वैयक्तिक पातळीवर मी ते तिरंग्याला उद्देशून म्हणतो आणि स्वतःचं समाधान करून घेतो. बाकी वंदे मातरम कधीही उजवेच वाटत आले आहे.
बाकी स्वतःच्या देशाचं जागतिक पातळीवर अधिकृत नाव ठरवताना आधीपासूनच भारत, आर्यवर्त, हिंदुस्तान(-ज्यांनी हे नाव ठेवलं त्यातले बहुतांशी नंतर भारतीय संस्कृतीचा भाग झाले असा ग्रह आहे. चुकलो असल्यास खुलासा करावा.) असे पर्याय असतानासुद्धा परकीयांनी सुचवलेला इंडीया हा पर्याय वापरण्याची लाचारी ज्यांच्यावर यावी त्यांनी राष्ट्रगीत निवडतानाही पुरुषार्थ दाखवला नाही यात काय नवल??
11 Oct 2013 - 9:12 pm | ग्रेटथिन्कर
तुमचे हिंदुत्ववाद्यांचे एकदा १३ दिवसांचे व नंतर चार वर्षे सरकार असताना तुम्हाला आर्यावर्त असे नामांतर करण्यासाठी गागाभट्टाकडून मुहुर्त काढून हवा होता :-Pकाय ? करुन टाकायचं कि नामांतर तेव्हाच..
१४ ला मोदीबाबा पीएम झाले तर मिपातर्फे एक नामांतराचे निवेदन पाठवून द्या ,कसे ?
'आर्यावर्त गव्हर्नमेँटचा सुर्वंट !
11 Oct 2013 - 9:16 pm | मुक्त विहारि
अहो ते आमच्या शंकांचे काय?
11 Oct 2013 - 9:49 pm | वडापाव
हे पाहा ग्रेथि, मी इथे हिंदुत्ववाद्यांच्या बाजुने, किंवा नमोंच्या बाजुने बोलत नाहीये. आपल्या पहिल्या वहिल्या राज्यकर्त्यांनी मुळात देशाचं नाव ठेवतानाच स्वाभिमान बाळगण्याचा सूज्ञपणा दाखवायला हवा होता एवढंच म्हणतोय. आणि तुम्हांला आर्यवर्तच दिसलं का हो?? मी इतर नावंही सुचवलीयत की... इंग्रजीत BHAARAT लिहिणं कसंसच वाटेल का हो तुम्हांला?
आणि काय हो, माणूस हिंदूंच्या बाजुने बोलतोय म्हणजे तो संघाचा, भाजपचा.. मराठीच्या बाजुने बोलतोय म्हणजे मनसेचा, असं गृहित धरून बोंबलत सुटता ते!! मी हिंदूंच्या बाजुने बोलत असेन तर संघ, भाजप किंवा हिंदुमहासभेची वकिली करण्याचा मक्ता घेतल्यागत त्यांच्या बाबतीतल्या तक्रारी काय ऐकवत सुटताय!! धर्माचा, भाषेचा, जातीचा कैवारी असल्याचा दावा करणा-या संघटनांपेक्षा त्या धर्माची, भाषेची आणि जातीची व्याप्ती आणि समाजजीवनातलं महत्त्व मोठं नाही का? आणि त्याबाबतीतलं व्यक्तिगत मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कसंतरी करून ते मत खोडून काढण्यासाठी लगेच वर नमूद केलेल्या आणि तशासारख्या कोणत्याही संघटनांशी त्याचा संबंध जोडण्याची काय गरज? त्याच्यामुळे मांडलेल्या वैयक्तिक मतामध्ये जे तथ्य आहे, ते कसं खोटं ठरवणार तुम्ही??
11 Oct 2013 - 9:55 pm | मुक्त विहारि
पण ग्रेथिं कडून अशा उत्तरांची अपेक्षा पण ठेवू नका.
11 Oct 2013 - 10:08 pm | ग्रेटथिन्कर
चांगला प्रतिसाद.
चारपाच मुस्लिम संघटना वंदे मातरमला विरोध करतातेत म्हणून सगळे मुसलमान त्याचा विरोध करतात. असा इथल्या अनेकांचा गैरसमज आहे किंवा टीनपाट लोक तसा तो करुन देतात. आपण तिथे टंकायचे श्रम घेतल्याचं दिसत नाही
12 Oct 2013 - 6:15 am | मुक्त विहारि
तुम्ही पण ना अगदीच हे आहात बघा...
उघाच ते वेड पांघरून पेडगावला जायचे सोंग आणू नका..
तुमच्या खरडवहीत लिहीले आणि संदेश पण पाठवला.
पण तुम्ही माझ्या शंकांची उत्तरे न देता भलतेच कुठे जाता?
असे कसे चालते हो तुमच्याकडे गड्या?
12 Oct 2013 - 9:28 am | उद्दाम
जनगनमन तेंव्हा वंदे जॉर्जला उद्देशून होते का आणि आज कुणाला उद्देशून आहे, याची चर्चा 'वैदिक' मंडळीनी करायची म्हणजे अजबच आहे!
ऋग्वेदातील एके काळचे ब्रह्मणस्पतीचे सूक्त गणपतीसाठी आजचे वैदिक दुकानदार वापरतात.
ऋग्वेदातील इंद्राच्या डाव्या आणि उजव्या हाताचे सूक्त हेदेखील आज गणपतीच्याच सोंडेचे वर्णन आहे, असेही हेच दुकानदार सांगतात आणि ते देखील बिनदिक्कतपणे आज गणपतीसाठी वापरतात.
ऋग्वेदातील रुद्र सूक्त आज शंकराचे म्हणून हीच मंडळी वापरतात.
आणि , समजा, ते जनगनमन पंचम जॉर्जलाच उद्देशून असले , तर न्हेरु मात्र ते भारताला/ विधात्याला का वापरतात ? असा प्रश्न विचारुन हीच वैदिक मंडळी इंटरनेटावर गळाही काढतात !!!! :)
14 Oct 2013 - 5:28 pm | अनिरुद्ध प
त्या सुर्वंटाला आधी बाजुला करा बघु उगीच खाजखुजली पसरायची,(आमचा गावठी ईनोद हो आपला)
10 Oct 2013 - 5:21 pm | आबा
असल्या टीनपाट लोकांची फालतू व्याख्याने ऐकून रक्त-बीक्त खवळून घेणारे लोक आहेत, हे बघून आश्चर्य वाटलं,
जरा शाळेची पुस्तकं वाचली असती, तर अन्वयार्थ लावणं सोपं गेलं असतं !
10 Oct 2013 - 5:22 pm | विटेकर
गांधीजी ,पंच्चावन्न कोटी ,गोहत्या ,राममंदीर /सेतू यांचा वापर करुन संघ आणि त्यांचे भाट जातीधर्मात आग लावायचे काम करत असतात ,इथे संघा संबंध येतो.
फिस्स्कन हसायची स्मायली !
10 Oct 2013 - 5:26 pm | मुक्त विहारि
आपण आपले स्मॉल थिंकर...आपले स्मॉल पेगर....
10 Oct 2013 - 5:45 pm | ग्रेटथिन्कर
तूमि स्मॉल थिँकरच राहणार, तूमची डोकी चालत असती तर विकासाच्या मुद्दावर राजकारण केले असते,
पण तसे नाही ,त्याऐवजी विद्वेष पसरवणार्या संघटना काढायच्या ,संघाची कल्पना हेडगेवारांनी हिटलरच्याच धर्तीवरुन उचलली होती .त्यांचे गेस्टेपो तसे तुमचे 'खाकी चड्डीवाले' ... एवढाच काय तो फरक.बाकि शुद्ध आर्य रक्त वगैरे मसाला कॉमन ठेवला आहे.
10 Oct 2013 - 6:09 pm | मुक्त विहारि
आमच्या वरील शंकांची उत्तरे तर द्या...
बाकी जमेल तशी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो...
"विकासाच्या मुद्दावर राजकारण केले असते"
हिंदूस्थानाचा विकास न होण्यामागे प्रमूख कारण आहे आणि ते म्हणजे लोकसंख्या.आता ती कशी आटोक्यात आणायची ते बघा.
दुसरे कारण म्हणजे समान नागरी कायदा.. आता तो पण कसा आणायचा ते बघा.
"त्याऐवजी विद्वेष पसरवणार्या संघटना काढायच्या"
हे एकदम पटले बघा.अजून संघावर बंदी नाही पण नक्की किती संघटनांवर बंदी आणली आणि ती का हे पण सांगा की...
"संघाची कल्पना हेडगेवारांनी हिटलरच्याच धर्तीवरुन उचलली होती .त्यांचे गेस्टेपो तसे तुमचे 'खाकी चड्डीवाले'"
हे पण पटले बघा.फक्त थोडा फरक आहे.आज देशावर कुठेलीही नैसर्गिक आपत्ती कोसळली की हेच ते चड्डीवाले इतरांना कपडे आणि इतर वस्तू देतात...
"बाकि शुद्ध आर्य रक्त वगैरे मसाला कॉमन ठेवला आहे."
हे काही पटले नाही गड्या. आता बघ ना अमिर खानची,शाहरूख खानची बायको हिंदूच आहे ना? आणि आपले सलमान भाउ पण एका हिंदू मुलीच्याच प्रेमात पडले होते..
असो...
वेळ मिळाला तर माझ्या शंकांची पण उत्तरे द्या...
10 Oct 2013 - 6:56 pm | ग्रेटथिन्कर
चड्डीवाले आपत्तीकालात मदत करतात ?? :-P
मी तरी कधी बघितले, ऐकलेले नाही.
आपत्तीकाळात चमकोगिरी करणारे काहीजण असतात त्यातला हा प्रकार दिसतोय. ;-)
एवढाच देशसेवेचा पुळका आहे तर सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करायचा विषय निघाल्यावर या तथाकथित राष्ट्रसेवकांना पोटशुळ का उठतो ????
स्वतःच्या भावाच्या मनीऑर्डरमधले दहा रुपये कापून घेणारे ज्यांचे आदर्श आहेत ते चड्डीवाले आपत्तीकाळात मदत करायला जातात... वा रे मदत :-P :-P
10 Oct 2013 - 8:01 pm | मुक्त विहारि
"चड्डीवाले आपत्तीकालात मदत करतात ?? Blum 3
मी तरी कधी बघितले, ऐकलेले नाही."
संघवाले मदत करतात ही बातमी आपल्या पर्यंत आली नाही का?
मग एक काम करा.आत्ता उत्तर भारतात पुर आला तेंव्हा कोण कोण गेले होते त्याची जरा माहीती घ्या.माझ्या माहीतीप्रमाणे संघ वाले गेले होते.
"एवढाच देशसेवेचा पुळका आहे तर सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करायचा विषय निघाल्यावर या तथाकथित राष्ट्रसेवकांना पोटशुळ का उठतो ????"
मुळात मी सच्चर आयोग वाचलेला नाही त्यामुळे मला माहीत नाही.आणि मी काही संघाची धोरणे वगैरे ठरवत नाही.त्यामुळे आपणच ह्या बद्दल जास्त सांगू शकाल.
"स्वतःच्या भावाच्या मनीऑर्डरमधले दहा रुपये कापून घेणारे ज्यांचे आदर्श आहेत ते चड्डीवाले आपत्तीकाळात मदत करायला जातात... वा रे मदत"
ही पण कहाणी मला माहीत नाही.त्यामुळे आपण म्हणता तसे पण असेल.मान्य करतो.पण काय हो? औरंगजेब आणि शहाजहान स्वतःच्या भावांचे खून करून गादीवर आले होते ही गोष्ट खरी आहे का हो?
10 Oct 2013 - 8:36 pm | ग्रेटथिन्कर
संघवाले उत्तर भारतात पुरग्रस्तांच्या मदती साठी गेले होते ही चांगली गोष्ट आहे ...तसेच औदार्य त्यांनी इतर धर्मीयांच्या बाबतीतही दाखवावे तरच ते राष्ट्रीय होतिल.
एक शंका... हे संघाचे प्रचारक इतरांच्या घरी वार लावू जेवतात असे बघितले आहे ,हिंदूनी हे असले हजारो प्रचारक अनेक वर्षं फुकट खायला घातलेत/ घालत आहेत, त्यांनी पूरग्रस्तांना मदत दिली तर लगेच त्याचा बोभाट कशाला करायचा?
10 Oct 2013 - 8:40 pm | मुक्त विहारि
त्या पहिल्यांदा विचारलेल्या शंकांची उत्तरे न देता असे नविन नविन मुद्दे कशाला हो काढता?
10 Oct 2013 - 8:46 pm | रुस्तम
+१११११११११११११११११११११११११११११
11 Oct 2013 - 10:42 am | विश्वनाथ मेहेंदळे
ते मनसोक्त ट्रोलींग करताहेत आणि तुम्ही रक्त तापवून घेताय आणि टंकन श्रम वाया घालवताय.
तरी आमच्या संघप्रेमी विक्षिप्त भगिनी अजून आल्या नाहीत. त्या आल्या तर तुमचे अजून १०-२० प्रतिसाद नक्की.
11 Oct 2013 - 11:18 am | विटेकर
सहमत !
11 Oct 2013 - 10:56 am | ग्रेटथिन्कर
बातमी कानावर आलेली नाही,आणि केदारनाथला मदतीला गेले नाहीत तर लोक त्यांच्या तोंडात गोमय घालतील हे ठाऊक आहे त्यांना.संघटना' राष्ट्रीय' आहे तर मदत फक्त हिंदूंचीच का??? मुस्लिम शीख ख्रिस्ती हे भारतीय नाहीत असा संघवाल्यांचा समज आहे काय?? असल्यास तो का करुण दिला असावा
वाचा मुस्लिमांच्या सबलीकरणासाठी तो अहवाल लागू करायला हवा असे आयोग ख्रिस्ती शीख बौद्ध यांच्यासाठी नेमल्सास आपण ते वाचावे व त्याचे 'राष्ट्रीय' या नात्याने स्वागत करावे :-P
खरंय परंतु हेच फक्त का सांगायचे ?हिंदूराजे महाराजे गुण्यागोविंदाने एकत्र कुटुंबात रहायचे ,असा आपला इतिहास आहे काय?? :-P
11 Oct 2013 - 1:34 pm | मुक्त विहारि
पण अद्द्याप आपब आधीच्या शंकांबाबत काही मत व्यक्त नाही केले,,,
ते पण एकदा लिहून टाका...
तुम्ही असे नेहमी नका करू ना गड्या...
11 Oct 2013 - 1:52 pm | ग्रेटथिन्कर
तूमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आमचे अवतारकार्य नाहे. :-P :-P
11 Oct 2013 - 1:57 pm | मुक्त विहारि
'तूमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आमचे अवतारकार्य नाहे."
मग तुम्हाला पण शंका विचारायचा अधिकार नाही रहात ना गड्या....
कारण त्याचे काय आहे गड्या... आपण जर इतरांना शंका विचारत असू तर .. इतरांनी विचारलेल्या शंकांची उत्त्रे पण आपण द्यायला हवी ना......गड्या.....
13 Oct 2013 - 7:48 pm | उद्दाम
पण काय हो? औरंगजेब आणि शहाजहान स्वतःच्या भावांचे खून करून गादीवर आले होते ही गोष्ट खरी आहे का हो?
अगदी खरे.... त्या औरंग्याने आणि शहाझानने स्वतःच्या भावाचे खून कर, तुरुंगात टाक असले धंदे केले. किती ते क्रूर नै का?
आणि ही असली कामं करुन त्यान्नी इतिहासाची मझाच घालवली राव! भावाने दुसर्या भावाशी इस्टेटीसाठी भांडायचं तर कसं सिस्टिम्याटिकली भांडायचं .. म्हणजे आधी दोघानी द्युत खेळायचं . जिंकेल त्यानं हरणार्याची बायको नागडी करायची. मग त्यात मिटवामिटवी झाली की पुन्हा त्याच द्युताची खाज भागवायला पुन्हा खेळायचं .. मग हरलं की १४ वर्षे वनवास, मग अज्ञातवास .. मधल्या काळात एका भावानं दुसर्या भावाचं घर जाळायचं .. दुसर्यानं भुयार खणून पळून जायचं आणि त्याआधी कुठल्या तरी निष्पाप लोकाना मारुन त्यांची मढी फसवायला ठेवायची.
मग शेवटी त्या दीडदमडीच्या राज्यासाठी अर्धा भारत हिकडे आणि अर्धा तिकडे असं युद्ध करायचं . मग त्या युद्धात औरंगजेब अचानक धनुष्य टाकून खाली बसणार. त्याचा रथ हाकणारा मौलवी सांगणार : औरंग्या, उचल ते धनुष्य आणि लढ.
मग मुडदे, मढी, हातमोडके लोक, विधवा बाया, मग कुणीतरी कुणाची तरी छाती फोडून रक्त पिणार .. कुणीतरी कुणाचं तरी रक्त बायकोच्या केसात घालणार , अन काय , अन काय!
:)
तो औरंग्या अन त्याचा भाऊ बिनडोक, त्यानी असले काही नाही केले ना!
13 Oct 2013 - 8:33 pm | बॅटमॅन
बा ट्रोलभैरवा, आपण तर बॉ बेहद्द खूष झालो तुमच्या ट्रोलपाटीलकीवर. ट्रोलिंगचे क्लासेस लावणारे तुमच्याकडे .
13 Oct 2013 - 9:11 pm | मुक्त विहारि
ग्रे.थि. ह्यांना विचारले आहेत....
तुम्ही आमच्या आणि ग्रे.थि. ह्यांच्या प्रश्नोत्तरात पडू नका.
13 Oct 2013 - 9:35 pm | ग्रेटथिन्कर
त्यांनी चांगले उत्तर दिलेय मुक्तबिहारी! तेच मी दिलेय ...
हिंदूराजे हम साथ साथ है शिणुमा सारखे राहयचे असे आपल्याला वाटत असेल तर त्याला अमी तरी काय कर्नार..
13 Oct 2013 - 9:35 pm | ग्रेटथिन्कर
त्यांनी चांगले उत्तर दिलेय मुक्तबिहारी! तेच मी दिलेय ...
हिंदूराजे हम साथ साथ है शिणुमा सारखे राहयचे असे आपल्याला वाटत असेल तर त्याला अमी तरी काय कर्नार..
13 Oct 2013 - 9:38 pm | मुक्त विहारि
पण त्या पहिल्या प्रश्नांचे काय?
का ती पण उत्तरे दुसर्या कुणीतरी द्यायची वाट बघत आहात?
का आपल्याला अजून पण पदर लागतो?
14 Oct 2013 - 9:34 am | उद्दाम
मुक्तविहारी आण्णा, हा मुक्त फोरम आहे. इथे कुणालाही कुणीही प्रश्न विचारु शकतो आणि उत्तरही देऊ शकतो.
प्रायव्हेट प्रश्नोत्तरे करायची असतील तर एकमेकांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत द्यावेत.
14 Oct 2013 - 10:26 am | मुक्त विहारि
मी तरी तुमच्या बरोबर प्रायव्हेट प्रश्नोत्तरे करायचे ठरवले आहे.
त्यानुळे स्वप्नात येतो.
14 Oct 2013 - 12:20 pm | विटेकर
मुक्त विहार करायला यापेक्षा उत्तम जागा आहेत , कुठे त्यांच्या स्वप्नात जाता?
उद्या ते म्हणतील . मुक्तविहारी माझ्या स्वप्नात आले, त्यात संघाचा हात आहे!
त्यातून त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे, तेव्हा स्वप्न इल्ला !
14 Oct 2013 - 1:58 pm | उद्दाम
हा मुक्त फोरम असून कुणीही प्रश्न विचारत किंवा उत्तर देत मुक्तपणे विहार करु शकतो.
खाजगी सवाल जबाब खेळायचे असतील तर एकमेकांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत देत बसावे.
-----
मुक्तविहारी उद्दाम.
11 Oct 2013 - 3:39 am | स्पंदना
संघवाले आपत्तीकाळात टीव्ही चॅनेलची वाट बघत थांबत नाहीत हो ग्रेथीं . ते बिना पब्लीसीटी काम करतात. बिनडोकच लेकाचे. टीव्ही आल्याशिवाय काम सुरु करायच नाही असा विचारच नाही त्यांना. ह्या!
बा द वे ते पुर्वभारत..जे चिनच्या अगदी जवळा आहे ते...तिथली माणस सुद्धा जेनेटीकली चिनी लोकांसारखी दिसतात ते...ते पुर्वांचल कोणामुळे भारताला जोडुन आहे जरा विचारुन या. मग गावा गाणी हाताची.
11 Oct 2013 - 2:40 pm | सौंदाळा
प्रचंड सहमत.
राहुल, सोनिया गांधीनी पत्रकार, विविध वाहिन्यांचे छायाचित्रकार वगैरे बोलवुन हिरवा झेंडा वगैरे दाखवुन ट्रक रवाना केले ते बघुन तर प्रचंड संताप आला.
11 Oct 2013 - 10:01 pm | चिगो
आमच्या माहिती आणि अकलेप्रमाणे, भारत सरकार जो भरपुर पैसा ओतते (जो की खर्च करणे पण जमत नाही आम्हाला :-( ) त्यामुळे.. संघाचे लोक इथे एवढ्या कठीण परीस्थितीत काम करत असतात, ह्याचं कौतुक आहे.. पण त्यांच्यामुळे हा भाग देशाशी जोडलेला आहे, हे जरा जास्तच होतंय.. भाजपाचा ह्या भागातला परफाॅर्मन्स पाहीलात, तरी कळेल हे..
12 Oct 2013 - 5:44 am | स्पंदना
भाजप राजकारण झालं. तेथे काम करणारे संघवाले मत मागत नाहीत हा त्यांचा दोषच म्हणावा लागेल.
12 Oct 2013 - 10:37 am | चिगो
पण संघाचा ' सोशल इफेक्ट' ह्या भागात फारसा नाहीये, हे सांगतोय.. आपल्याकडे वेगळी माहिती असल्यास द्यावी..
10 Oct 2013 - 5:55 pm | विटेकर
तुम्ही फारच विनोदी लिहिता बुवा ! शक्यता आहे, त्यालाच ग्रेटथिंकिंक म्हणत असतील !
गडागडा लोळण्याची स्मायली !
10 Oct 2013 - 11:47 pm | पिशी अबोली
=))
खरंच, हे ग्रेटथिंकर कित्ती छान विनोदी लिहितात... =))
10 Oct 2013 - 6:03 pm | बॅटमॅन
नेहमीचे पावटे प्रतिसाद ओकून ग्रेटथिंकर इ. बिरुदे मिरवणार्यांची अलीकडे कीवही करवत नाही.
10 Oct 2013 - 7:41 pm | रुस्तम
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११
10 Oct 2013 - 8:08 pm | ग्रेटथिन्कर
मग पलीकडे उभे रहा,बघा किव येते का? :-P
10 Oct 2013 - 8:14 pm | मुक्त विहारि
अहो त्या माझ्या बाळबोध प्रश्नांचे काय करताय?
हे असे अर्ध्यावर सोडून कसे काय चालेल?
10 Oct 2013 - 8:47 pm | रुस्तम
+१११११११११११११११११११११११११११११
10 Oct 2013 - 8:18 pm | उद्दाम
:)
10 Oct 2013 - 10:39 pm | मुक्त विहारि
आमच्या शंका वाचून "ग्रेटथिंकर" शिक्षक पळाले काय?
ओ शिक्षक कुठे आहात?
10 Oct 2013 - 11:25 pm | ग्रेटथिन्कर
अरे एकाच दिवशी सगळं लिहायच का? हा धागा आता बरेच दिवस पेटता राहील ,हे तूमाला 'वंडे मॅटरम्' वाटले काय? :-P
चला,' शब्बाखैर वंदे मातरम'
11 Oct 2013 - 7:33 am | मुक्त विहारि
अहो शिक्षक
"अरे एकाच दिवशी सगळं लिहायच का?"
हो, लिहून टाका. आम्ह्ला झेपेल...
" हा धागा आता बरेच दिवस पेटता राहील"
राहू दे हो.त्याची चिंता आपण कशाला करायची. तुम्ही शिक्षक व्हा आणि आम्हाला शिकवा...
" शब्बाखैर वंदे मातरम'"
असे नाही चालायचे ना गड्या...प्रश्न असे अर्ध्यावर ठेवले की काय होते ते माहीत असेलच शिक्षक साहेब,,
10 Oct 2013 - 9:13 pm | श्रीरंग_जोशी
इयत्ता सहावीमध्ये असताना एकदा गुरूजींनी संपूर्ण वर्गाला प्रश्न विचारला की आपण राष्ट्रगीत म्हणताना खालिल कडवे इतर कडव्यांपेक्षा हळू आवाजत का म्हंटले जाते?
'तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे, गाहे तव जय गाथा'
या प्रश्नाचे उत्तर कुणालाच ठाऊक नव्हते. प्राथमिक शाळेपासून इतर लोक ज्या प्रकारे म्हणतात त्याच प्रकारे म्हणायची सवय प्रत्येकाला होती. हा प्रश्नही कुणाला तोवर पडला नसावा.
उत्तर देण्यासाठी कुणीच हात वर केला नाही हे पाहून गुरूजींनी स्वतःच उत्तर सांगितले.
स्वातंत्र्यापूर्वी कधीतरी इंग्लडचा राजा पंचम भारतभेटीवर आला होता. त्याच्या स्वागत समारंभात गाणे म्हणायला गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांना पाचारण करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात जे गीत त्यांनी म्हंटले तेच आपण रोज राष्ट्रगीत म्हणून म्हणतो. त्या कार्यक्रमाच्या वेळी राजाला त्याचा दुभाषी इंग्रजीमध्ये भाषांतर करून सांगत होता.
सदर गीत जरी स्वागत समारंभामध्ये गायले गेले असले तरी ते सर्वशक्तिमान इश्वराला उद्देशून होते. सुरूवातीच्या कडव्यांतील भारताचे वर्णन संपल्यावर राजालाच आशीर्वाद मागतोय असे समजायला नको म्हणून गुरूदेवांनी ते जाणूनच हळू म्हंटले.
तेव्हापासून हे कडवे हळूच म्हंटले जाते.
शाळा सुटून अनेक वर्षे झाली त्यामुळे रोज राष्ट्रगीत म्हणायची वेळ येत नाही. पण जेव्हाही (सार्वजनिक कार्यक्रम, चित्रपटगृह, दूरचित्रवाणी) ते ऐकू येते तेव्हा जे रोमांच उभे राहतात ते जगातले इतर कुठलेही गीत ऐकून उभे राहत नाहीत.
11 Oct 2013 - 9:39 am | विटेकर
आणि अतिशय धागोचित ( धाग्यासाठी उचित ) म्हणु या !
असे रंगवून शिकवणारे आणि ऑफ दी बीट शि़कवणारे मास्तर लोक होत म्हणून काही चांगले संस्कार घडत असत. याबाबतीत आमची पिढी भाग्यवानच म्हणायची!
मी सातवीत असताना आमच्या गायकवाड सरांनी इतका रंगवून इतिहास शिकवला की ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्याचा
धडा शिकवला , तेव्हा वर्गात सर्व मुलांनी उभे राहून टाळयांचा कडकडाट केला.
आमची पोरं याबाबतीत तितकीशी भाग्यवान नाहीत !
11 Oct 2013 - 12:00 am | आशु जोग
जन गण मन हे राष्ट्रगीत आहे आम्ही त्याचा सन्मान करणारच.
बा द वे
इथे संघ कुठे आला. संघाच्या स्थापनेपूर्वीच वंदे मातरमचा जन्म झाला. दुसरी गोष्ट गांधीजींबद्दल संघाला पूर्ण आदर आहे. किती पुरावे द्यावेत. संघाच्या कार्यालयात गांधीजींचा फोटो असतो. संघाच्या प्रातःस्मरणात 'दादाभाई गोपबन्धुः तिलको गांधिरादृता' अशी ओळ आहे. अर्थात गांधीजी हे संघाला प्रातःस्मरणीय आहेत. त्यामुळे कुणी आपल्या नाटकातून गांधीजींवर टीका करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.
जाता जाता -
शरद पोंक्षे हे विचारवंत म्हणून परिचित नाहीत. दुसरी गोष्ट ते संघाचे प्रवक्तेही नाहीत.
11 Oct 2013 - 6:37 am | सुनील
केलात धाग्याचा समारोप?
अहो, अजून शतक बाकी आहे ;)
11 Oct 2013 - 12:14 pm | उद्दाम
रविंद्रनाथांनी भारत आणि बांग्लादेश अशा दोन राष्ट्रांची राष्ट्रगीते लिहिली आहेत.
जगाच्या पाठीवर हा विक्रम फक्त त्यांच्याच नावावर आहे.
11 Oct 2013 - 2:31 pm | ज्ञानोबाचे पैजार
व राष्ट्रकवी सतिश यांचे "मोकलाया दाहि दिशा" हे गीत राष्टगीत म्हणुन जाहिर करावे अशी मी आग्रही मागणी करतो.
हे गीत गाताना त्याचा पुर्ण आदर राखला पाहिजे. एका जागेवर स्थीर उभे राहुनच हे गीत गायले पाहिजे असा कायदा करावा व कायदेभंग करणार्यांवर कडक कारवाई करावी.
11 Oct 2013 - 2:36 pm | बॅटमॅन
आणि या राष्ट्रगीताच्या मूळ पाठात बदल करून जर कोणी शुद्ध म्हणू पाहील तर त्यच्य(तिच्य पन म्हतले असते पन मग उगिच विशय तिस्रिकदे गेल असत) पर्श्वभग्वर पोक्ल बबुम्चे फतके दिल्य जतिल.
11 Oct 2013 - 4:37 pm | अनिरुद्ध प
ना ई ना चोलबे,तरिच तुमका असा सान्गुक होया,ईतको सन्स्क्रुत चो अब्यास बरा नवो कारण त्या राष्ट्रगीत नोया तर राष्टगीत होया,नायतर पयला लम्बर तुमचोच लागतलो.
11 Oct 2013 - 4:40 pm | बॅटमॅन
रस्त्रगित म्हनयचय कं? मग थिक. पन तरिहि अधिच सन्गुन थेव्लेले बरे अस्ते, उगिच कोनि शुद्द शुद्द म्हनेल तं तेला पोकल बंबुचे फतके दिल्य जतिन.
11 Oct 2013 - 5:15 pm | मुक्त विहारि
हसुन हसुन मेलो...
12 Oct 2013 - 3:03 am | खटपट्या
मोकलाया दाही दीशा ची लीन्क द्या ना राव !! आम्हाल पण मजा घेउद्या ना.. (अरे ये पीएसपीओ नही जानता असे म्ह्णू नका)
12 Oct 2013 - 11:43 am | बॅटमॅन
ही घ्या लिंक.
http://www.misalpav.com/node/6332
येंजाय!!!! मिपावर तरी उगा त्या वंदेमातरम किंवा जनगणमनपेक्षा मोकलाया दाही दिशा हेच राष्ट्रगीत म्हणून योग्य आहे हे आमचे मत पुन्हा एकद मांडून आपली (फुल पेड) रजा घेतो.
13 Oct 2013 - 10:24 pm | खटपट्या
मजा आली, दसरा आनंदात गेला. धन्यवाद
11 Oct 2013 - 7:34 pm | मृत्युन्जय
"मोकलाया दाहि दिशा" राष्ट्रगीत म्हणून मान्य करण्यासाठी मुसलमान आणि ख्रिश्चनांना मनाचा खुपच जास्त मोठे पणा दाखवावा लागेल. नकाहो असा दुष्टपणा करु
11 Oct 2013 - 7:32 pm | मृत्युन्जय
मुस्लिमांनी ख्रिच्चनांनी ते स्विकारले हा त्यांचा मोठेपणा आहे
?????.
मूळात हिंदुबहुल असा हा देश त्यांनी आपला म्हणुन स्वीकारला हेच त्यांच्या मोठेपणाचे द्योतक आहे असेही म्हणता येइल.
11 Oct 2013 - 7:43 pm | अनिरुद्ध प
हिन्दुबहुलानी त्याना ईथे गुण्यागोविन्दाने राहु दिले याला काहीच महत्व नाही का?पर्शियन, ज्यु यान्नातर या देशाचा खुपच अभिमान आहे जेव्हडा येथिल हिन्दु बहुलाना सुद्धा नसेल असे ऐकले आहे.
12 Oct 2013 - 3:45 am | बॅटमॅन
असेच म्हणतो. ग्रेटथिंकरचे पावटे अंमळ जास्तच मळमळू लागले आहेत.
11 Oct 2013 - 9:07 pm | हुप्प्या
जन गण मन हे गेले साठ एक वर्षे राष्ट्रगीत बनले आहे आणि ते बदलणे अशक्य आहे. पण हे शल्य विसरता कामा नये की
वंदे मातरम ह्या गीताचा राष्ट्रगीतपदावर अधिकार होता पण मुसलमान लोकांना घाबरुन कुठलाही आगा पिछा नसलेले, स्वातंत्र्य लढ्यात कुठलाही सहभाग नसणारे गाणे राष्ट्रगीत म्हणून लादले गेले.
जेव्हा हे घडले तेव्हा खास मुसलमानांकरता देशाचे दोन लचके तोडले गेले. ज्यांना भारतीय संस्कृतीचा तिटकारा आहे आणि धर्माच्या ताठरपणामुळे वंदे मातरम राष्ट्रगीत म्हणून मान्य नाही त्यांना "त्या" देशात जाण्याची मुभा होती. पण आपल्या शेपूटघाल्या नेत्यांनी इथेही शेपूट घातले.
वंदे मातरम ला राष्ट्रीय गीत असा सरकारी दर्जा दिलेला आहे. पण अर्थात मुस्लिमांचा विरोध आता जास्त कडवा झाल्यामुळे हे गीत पुन्हा सन्माननीय होणे शक्य नाही.
जनगणमन हे राष्ट्रगीत असल्यामुळे त्याचा आदर करणे आवश्यकच आहे. पण एक काव्य म्हणून ते अत्यंत सुमार आहे असे माझे मत. त्यातील राज्यांची नावे तर अत्यंत वादग्रस्त आहेत. मराठा हे राज्य? द्राविड हे राज्य? आणि कितीही सारवासारव केली तरी त्यात कुण्या राजाची स्तुती केली आहे हेच जाणवते. देशाचे गुणगान नसून देश कुणाचे तरी गुणगान करतो आहे असेच त्या ओळींमधून सूचित होते.
असले काव्य राष्ट्रगीत बनावे हे आमचे दुर्दैव दुसरे काय!
11 Oct 2013 - 9:20 pm | मुक्त विहारि
मी पण हेच विचारले की...
भो पंचम जॉर्ज साठी रचलेले काव्य राष्ट्र गीत होवू शकते का?
12 Oct 2013 - 9:31 am | उद्दाम
जनगनमन तेंव्हा वंदे जॉर्जला उद्देशून होते का आणि आज कुणाला उद्देशून आहे, याची चर्चा 'वैदिक' मंडळीनी करायची म्हणजे अजबच आहे!
ऋग्वेदातील एके काळचे ब्रह्मणस्पतीचे सूक्त गणपतीसाठी आजचे वैदिक दुकानदार वापरतात.
ऋग्वेदातील इंद्राच्या डाव्या आणि उजव्या हाताचे सूक्त हेदेखील आज गणपतीच्याच सोंडेचे वर्णन आहे, असेही हेच दुकानदार सांगतात आणि ते देखील बिनदिक्कतपणे आज गणपतीसाठी वापरतात.
ऋग्वेदातील रुद्र सूक्त आज शंकराचे म्हणून हीच मंडळी वापरतात.
आणि , समजा, ते जनगनमन पंचम जॉर्जलाच उद्देशून असले , तर न्हेरु मात्र ते भारताला/ विधात्याला का वापरतात ? असा प्रश्न विचारुन हीच वैदिक मंडळी इंटरनेटावर गळाही काढतात !!!!
12 Oct 2013 - 10:18 pm | हुप्प्या
घरात कुठले धर्मकृत्य करताना कुठले तरी धार्मिक स्तवन गायले जाते म्हणून पंचम जॉर्जचीही भक्ती करायला काय हरकत आहे? वा! काय तर्कट आहे!
कोंबडीचे अंडे खाल्ले जाते मग पिसे आणि शिटाही खायला काय हरकत आहे ह्या तर्कटाइतके आपले तर्कट तर्कशुद्ध वाटते!
धन्य आहात.
भारताला/विधात्याला? भारतभाग्यविधाता म्हणजे भारताचे भाग्य घडवणारा कुणी (म्हणजे अर्थातच पंचम जॉर्ज).
मुद्दे खोडताना आपले विचार मुद्देसूदपणे मांडता आले तर बघा. नुसती डोक्यात राख घालून आकांडतांडव करून उपयोग नाही.
14 Oct 2013 - 12:13 pm | अनिरुद्ध प
रुद्रसुक्त ऋग्वेदात ? मी आजपर्यन्त यजुर्वेदात आहे असे ऐकुन होतो चु भु द्या घ्या.
14 Oct 2013 - 2:01 pm | उद्दाम
मराठा हे राज्य? द्राविड हे राज्य? आणि कितीही सारवासारव केली तरी त्यात कुण्या राजाची स्तुती केली आहे हेच जाणवते.
अहो महाराज, हे गीत लिहिले गेले तेंव्हा भारतात आजची राज्ये आस्तित्वात नव्हती. ती त्या काळात असलेली प्रांतांची नावे आहेत.
12 Oct 2013 - 1:33 am | मराठे
१९४७ साली करायची चर्चा आता का करताहेत लोक?
12 Oct 2013 - 6:26 am | मुक्त विहारि
तुमचे म्हणणे एकदम बरोबर आहे....
पण त्याचे काय आहे....
बायबल मध्ये प्रुथ्वी स्थिर आहे आणि सुर्य तिच्या भोवती फिरतो असा उल्लेख आहे.कुठल्या तरी एका शास्त्रज्ञाने सुर्य स्थिर आहे आणि प्रुथ्वी तिच्या भोवती फिरते असा शोध लावला.
त्या शास्त्रज्ञाचा शोध मान्य करायला चर्चने ३०० का ४०० वर्षे घेतली.पण शेवटी त्या शास्त्रज्ञाचा शोध मान्य केला.
इथे होणार्या चर्चेने आपले सरकार पण कदाचित राष्ट्रगीता बबतीत योग्य तो निर्णय घेईल असे वाटते.
हातच्या कंकणाला आरसा कशाला?एक तर हात दाखवून तसेही अवलक्षण केले आहेच.आता जे काही हातात मिळेल ते योग्य मानून घेवुया...
12 Oct 2013 - 11:58 pm | विद्युत् बालक
खतरनाक प्रतिसाद ………। प्रचंड टाळ्या !!
13 Oct 2013 - 1:05 am | धन्या
छान चर्चा चालू आहे.
13 Oct 2013 - 10:08 am | राजेश घासकडवी
Rajendra Prasad, who was presiding the Constituent Assembly on 24 January 1950, made the following statement which was also adopted as the final decision on the issue:
“ ...The composition consisting of words and music known as Jana Gana Mana is the National Anthem of India, subject to such alterations as the Government may authorise as occasion arises, and the song Vande Mataram, which has played a historic part in the struggle for Indian freedom, shall be honored equally with Jana Gana Mana and shall have equal status with it. (Applause) I hope this will satisfy members. (Constituent Assembly of India, Vol. XII, 24-1-1950) ”
बाकी चालू द्यात.
14 Oct 2013 - 4:23 pm | मदनबाण
the song Vande Mataram, which has played a historic part in the struggle for Indian freedom, shall be honored equally with Jana Gana Mana and shall have equal status with it. (Applause) I hope this will satisfy
अच्छा अस हाय काय ! मग वंदे मातरम ला विरोध करणार्यांच्या दाढ्या कुरवाळ्याव्यात का उपटाव्यात ? ;)
14 Oct 2013 - 4:57 pm | मुक्त विहारि
हाय हाय ये जालीम
तुम अब तीर को मत छूवो
हो सके तो देखो भी मत...
ऐसे तीर मारते हो के ...
आदमी तो मरता ही है और
मरने पर अम्रुत भी जिंदा नही कर सकता....
14 Oct 2013 - 5:05 pm | आशु जोग
ग्रेट थिंकर यांचे प्रतिसाद वाचले. ते विरोधी वाटत असले तरी तसे नाहीत. ते फक्त हालवून खुंटी बळकट करण्याचे काम करीत आहेत.