गाभा:
काही महिन्यांपूर्वी वेद आणि विज्ञान या विषयावर चर्चा झाली होती. त्या संदर्भात मी प्रो. डोंगरे आणि डॉक्टर नेने यांनी महर्षी कणाद यांचे पदार्थविज्ञान आणि अम्शुबोधिनी शास्त्र यांवर लिहिलेल्या पुस्तकांचा उल्लेख केला होता. शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉक्टर नेने यांनी नुकतेच पुणे आकाशवाणीवर भाषण दिले त्याचा दुवा देत आहे.
https://mail.google.com/mail/u/0/?ui=2&ik=a3dfa7f36d&view=att&th=1410291...
प्रतिक्रिया
9 Sep 2013 - 8:30 pm | चित्रगुप्त
तुम्ही दिलेला दुवा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातून फक्त जीमेल लॉगइन उघडते.
10 Sep 2013 - 6:28 am | श्रीनिवास टिळक
क्षमस्व. श्री. नेने यांचा लेख pdf मध्ये असल्यामुळे मला तो व्यवस्थित दुव्यामध्ये रुपांतर करता आला नाही. कोणा सदस्याला हे तंत्रज्ञान अवगत असेल तर त्यांना मी हा लेख पाठवू शकतो. त्यांनी नंतर तो दुवा म्हणून प्रसिद्ध करावा.
9 Sep 2013 - 9:51 pm | llपुण्याचे पेशवेll
दुवा उघडत नाही.
9 Sep 2013 - 10:17 pm | विजुभाऊ
पेशवे अहो वेदात लिहीलेले आहे हे मान्य करा ना. दुवा उघडणे ही दुय्यम गोष्ट आहे.
11 Sep 2013 - 12:40 pm | दादा कोंडके
मला एकदा या विषयावर आपल्याशी बोलायचं आहे. ;)
9 Sep 2013 - 10:21 pm | अग्निकोल्हा
आवो काय हॅकिंग करुन ति अटेच्मेंट बगायचा प्रस्तावै कै ?
11 Sep 2013 - 1:25 pm | अनिरुद्ध प
त्याना मदत करायची सोडुन कशाला भलत्या मार्गावर (हेक्किन्ग्च्या) भरकटताय राव.
10 Sep 2013 - 7:58 pm | मराठे
तुमची फाईल कोणत्याही पब्लिक शेअरिंग साईट (जसे गूगल ड्राईव्ह, स्काय-ड्राईव्ह) अशा ठिकाणी चढवा. मग फाईल सगळ्यांना दिसेल अशा परमिशन सेट करा. मग त्याचा दुवा इथे द्या.
12 Sep 2013 - 2:05 pm | महेश_कुलकर्णी
नमस्कार,
या विषयाच्या नावावरून माहितीची उत्सुकता वाढली आहे कृपया लवकरात लवकर माहिती मिळण्याची व्यवस्था करावी ही विनंती.
13 Sep 2013 - 12:19 am | रॉजरमूर
डॉक्टर नेने म्हणजे धक धक माधुरीचे पतीराज का हो ?
एकदम वेदांची surgery करायला घेतली की काय ?
15 Sep 2013 - 6:33 am | श्रीनिवास टिळक
वेद आणि विज्ञान
शंकर नेने यांच्या पुणे आकाशवाणीवर महर्षी कणाद यांचे पदार्थविज्ञान या विषयावर झालेल्या भाषणाचा दुवा खाली देत आहे तो बरोबर उघडेल हीच एक छोटीसी आशा! (माझ्या खरडवहीवर टाकला आहे तेथे बरोबर उघडला)
https://skydrive.live.com/redir?resid=838F479655AE3BFB!129
16 Sep 2013 - 11:46 pm | शशिकांत ओक
श्रीनिवास टिळक जी
वााचयचा प्रयत्न केला. पुढे पुढे फार किचकट झाल्याने अर्धवट सोडावयाला लागला. असो.
आपण असे विषय सादर करून मिपाकरांना वेगळया विषयांवरील विचारकांची मते वाचायला सादर केलीत याबद्दल धन्यवाद...
17 Sep 2013 - 9:52 am | महेश_कुलकर्णी
शाशिकांतजी, कोणता दुवा उघडला ते पुन्हा इथे देता का?
17 Sep 2013 - 8:00 pm | अनिरुद्ध प
दुसरा दुवा उघडला.
18 Sep 2013 - 12:51 am | अग्निकोल्हा
चक्क झोप यायला लागलिना राओ.
18 Sep 2013 - 2:22 am | बॅटमॅन
बरेच काही सांगायचा प्रयत्न केलाय त्या लेखात. सकृद्दर्शनी काही ठीक वाटतेय, पण ते लीलावतीत न्यूटनची समीकरणे होती हे जरा पटत नाहीये. भास्कराचार्यांनी समीकरणे बरीच दिली असतील, पण नक्की तीच आहेत किंवा कसे, ते पाहिले पाहिजे. बाकीचा बराचसा भाग जेनेरिक आणि प्राथमिक आहे.