अंधश्रद्धाविरोधी वटहुकूमावरील मतमतांतरं...
पेपरात आणि माध्यमांमधे आलेल्या अंधश्रद्धाविरोधी वटहुकूमातली काही कलमं घेऊन त्यावर मतप्रदर्शन करतोय. ही मतं अर्थातच वैयक्तिक आहेत, पण इतरांची मतं समजून घेण्यासाठी आणि चर्चेला चालना म्हणून ही बाजू मांडली आहे. "अंधश्रद्धा" म्हणून ढोबळपणे जे काही मानलं जातं त्याला पाठिंबा दूरान्वयानेही नाही. ही चर्चा फक्त त्याविषयी "वेगळा कायदा" करण्याबद्दल आहे.