ऑफीस ऑफीस...

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
26 Jun 2013 - 12:38 am

हाफिसात मागच्या आठवड्यात घडलेला एक किस्सा..

एखादा प्रश्न विचारला गेल्याने "न हसता आणि न वैतागता" कसे उत्तर द्यावे हे न कळणार्‍या प्रसंगांपैकी एक प्रसंग..

मंथली प्रेझेंटेशन सुरू होते..

माझ्या एका रिपोर्टमधील आकडेवारी आणि आमच्या लंडन ऑफीसमधील एकाने तयार केलेली आकडेवारी काही केल्या जुळत नव्हती...

शेवटी असा निष्कर्ष निघाला की "दोन्ही रिपोर्टस चुकीचे आहेत व एक तिसराच रिपोर्ट तयार केला जावा.."

अचानक आमचा एका मोठ्ठा सायेब वदला...

आय अंडरस्टँड रिपोर्ट A इज इनकरेक्ट, रिपोर्ट B इज इनकरेक्ट अ‍ॅजवेल! बट व्हाय दोज इनकरेक्ट फिगर्स आर नॉट कन्सिस्टंट..? इट शुड बी इन सिंक यू नो..

आम्ही सर्वजण हसू दाबण्याच्या प्रयत्नात काय भाव दर्शविले असावेत देव जाणे!! :-))

*******************************************************************************

तुमच्या हाफिसात अशा मजा होत असतील तर जरूर टंका. (आणखी टंकण्यासारखे बरेच मटेरीयल आहे माझ्याकडे, सवडीने टंकेन)

*******************************************************************************

विनोदनोकरीप्रकटनप्रतिसादआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

स्पा's picture

26 Jun 2013 - 9:18 am | स्पा

असं झालं तर

बॉसच्या म्हणण्यात काहीतरी इतरांना न समजलेला अर्थ किंवा भाग असावा असं वाटतंय.. कदाचित त्याची मांडणी चुकली असावी.. :)

दोन्ही रिपोर्ट्समधे इन देमसेल्व्हज काहीतरी इंटेग्रिटी प्रॉब्लेम जाणवला असेल आणि त्याच्या वाक्यरचनेत थोडं कन्फ्युझन झालं असेल असं वाटतं.

म्हणजे प्रत्येक रिपोर्टमधली अ‍ॅन्युअल अ‍ॅव्हरेजेस वेगवेगळी येताहेत पण निदान मंथली नंबर्स, जे थेट कोणत्यातरी सिस्टीममधून बेस म्हणून उचलले आहेत ते तरी एकसमान असावेत अशा अर्थाने बेसमधेच लोचा आहे हे त्याला सांगायचं असावं.

अशी अनेक उदाहरणं टीममधे पाहिली असल्याने शंका आली इतकंच.

- (बॉस) गवि ;)

ब़जरबट्टू's picture

26 Jun 2013 - 11:58 am | ब़जरबट्टू

चायला... आम्ही हापसात मजा करायला जात नाय हो.. कारण. ब्वासच लय माजलेला हाय... :(..

अग्निकोल्हा's picture

27 Jun 2013 - 7:55 pm | अग्निकोल्हा

.

विजुभाऊ's picture

30 Jun 2013 - 3:21 pm | विजुभाऊ

पोट धरुन हसत आहे...
कोणाचे ?