मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
23 May 2013 - 10:43 pm

प्रेम म्हणजे अनुभूती असते, असेच कधी तरी मी व माझा मित्र प्रेम या विषयावर चर्चा करत होतो. नवतारुण्याच्या उंबरठ्यावर आम्ही दोघे ही तेव्हा होतो त्यामुळे भावना महत्त्वाची की संबध महत्त्वाचे यावर चर्चा चालू होती, अचानक त्या चर्चे मध्ये आमचीच एक मैत्रीण सामील झाली. सर्व चर्चा ऐकल्यावर तीने फक्त आपल्या केबीन मधून एक डायरी घेऊन आली व खालील कविता समोर ठेवली, अमृता प्रीतम यांची.

मैं तैनू फ़िर मिलांगी
कित्थे ? किस तरह पता नई
शायद तेरे ताखियल दी चिंगारी बण के
तेरे केनवास ते उतरांगी
जा खोरे तेरे केनवास दे उत्ते
इक रह्स्म्यी लकीर बण के
खामोश तैनू तक्दी रवांगी

जा खोरे सूरज दी लौ बण के
तेरे रंगा विच घुलांगी
जा रंगा दिया बाहवां विच बैठ के
तेरे केनवास नु वलांगी
पता नही किस तरह कित्थे
पर तेनु जरुर मिलांगी

जा खोरे इक चश्मा बनी होवांगी
ते जिवें झर्नियाँ दा पानी उड्दा
मैं पानी दियां बूंदा
तेरे पिंडे ते मलांगी
ते इक ठंडक जेहि बण के
तेरी छाती दे नाल लगांगी

मैं होर कुच्छ नही जानदी
पर इणा जानदी हां
कि वक्त जो वी करेगा
एक जनम मेरे नाल तुरेगा
एह जिस्म मुक्दा है
ता सब कुछ मूक जांदा हैं

पर चेतना दे धागे
कायनती कण हुन्दे ने
मैं ओना कणा नु चुगांगी
ते तेनु फ़िर मिलांगी
(पंजाबी)

(हिंदी)

मैं तुझे फ़िर मिलूंगी
कहाँ किस तरह पता नही
शायद तेरी तख्यिल की चिंगारी बन
तेरे केनवास पर उतरुंगी
या तेरे केनवास पर
एक रहस्यमयी लकीर बन
खामोश तुझे देखती रहूंगी

या फ़िर सूरज कि लौ बन कर
तेरे रंगो में घुलती रहूंगी
या रंगो कि बाहों में बैठ कर
तेरे केनवास से लिपट जाउंगी
पता नहीं कहाँ किस तरह
पर तुझे जरुर मिलूंगी

या फ़िर एक चश्मा बनी
जैसे झरने से पानी उड़ता है
मैं पानी की बूंदें
तेरे बदन पर मलूंगी
और एक ठंडक सी बन कर
तेरे सीने से लगूंगी

मैं और कुछ नही जानती
पर इतना जानती हूँ
कि वक्त जो भी करेगा
यह जनम मेरे साथ चलेगा
यह जिस्म खतम होता है
तो सब कुछ खत्म हो जाता है

पर चेतना के धागे
कायनात के कण होते हैं
मैं उन कणों को चुनुंगी
मैं तुझे फ़िर मिलूंगी !!

कविता वाचली, जिवनात पहिल्यांदा अमृता प्रीतमच्या लेखनीची ओळखत त्या वेळी झाली. अद्भुत! मागे मी लिहले होते, प्रत्येक गोष्ट शब्दात व्यक्त करणे जवळ जवळ अशक्य असते, तसे काहीसे घडलं होते जेव्हा ही कविता सर्वात प्रथम वाचली होती तेव्हा. त्यानंतर अनेक पारायणे झाली या कवितेची, प्रत्येक वाचनानंतर खूप काही नवीन सापडतं जातं या कवितेत. व ज्यांना अमृता प्रीतम व त्यांचे जीवन या बद्दल थोडेफार जरी माहिती असेल तर या कवितेचे मर्म समजेल.

काही व्यक्ती जिवन स्वप्नवत जगतात, त्यातील एक म्हणजे अमृता प्रीतम. स्त्रीची व्यथा, दुखः त्यांनी सशक्तपणे आपल्या लेखनीद्वारे व्यक्त केल्या. "मैं तैनू फ़िर मिलांगी" ही फक्त कविता नाही आहे. आपल्या प्रेमीची वाट पाहत असलेल्या प्रियसीच्या अतंरगातील अवस्था आहे , अमृता जेव्हा खूप आजारी होत्या व त्यांना आपल्या अंताची कल्पना आली होती तेव्हा ही कविता त्यांनी इमरोज साठी लिहली होती. अमृतासाठी इमरोज काय होते हे त्यांच्या लेखनीतून वारंवार येत असे, पण ही कविता म्हणजे इमरोज वर त्यांच्या असलेल्या उत्कट प्रेमाची साक्ष आहे.

प्रेम, विरह, मिलन या तीन गोष्टीवर उभी असलेली ही कविता, पाहताना साधी वाटते एकदम सोपी शब्द रचना पण जेव्हा त्यातून अर्थ ध्वनीत होतो, जेव्हा त्या कवितेचा भावार्थ आपल्याला समजतो तेव्हा ही कविता आपल्या मनाच्या कुठल्यातरी नाजुक कोपर्‍याला हलकसे स्पर्श करुन जाते. प्रत्येक ओळ आणि ओळ आपल्या समोर कवियत्रीच्या मनातील भावना चित्रवत उभ्या करतात.

मैं तैनू फ़िर मिलांगी
कित्थे ? किस तरह पता नई
शायद तेरे ताखियल दी चिंगारी बण के
तेरे केनवास ते उतरांगी
जा खोरे तेरे केनवास दे उत्ते
इक रह्स्म्यी लकीर बण के
खामोश तैनू तक्दी रवांगी

मी तुला कशी, कुठे भेटेन माहिती नाही, शक्यतो तुझ्या कुठल्यातरी कलाकृतीतील अनुभुती म्हणून, एखादी मनातील तेजस्वी कल्पना म्हणून, एक कलाकृती म्हणून येईन व तुझ्या केनवास वर अवतरीत होईन. नाहीतर त्याच केनवासवर एक रेघ म्हणून असेल, तुला नकळत तुला पाहत राहीन. काय सहज सुंदर कल्पना आहे, आपल्याच प्रेमीच्या कलाकृतीमध्ये येण्याची आस, ती रचना. वाचताना आता सोपं वाटतं, पण थोडं विचार करून पाहिले की लक्ष्यात येईल ही विरह नक्की आहे, कवयत्रीला तो मान्य देखील आहे पण तीची इच्छा आहे परत येण्याची आपल्या आवडत्या व्यक्तीकडे. शक्य नसेल तर इतर माध्यमातून पण यायचे आहे, त्याच्यात हरवून जायचे आहे.

जा खोरे सूरज दी लौ बण के
तेरे रंगा विच घुलांगी
जा रंगा दिया बाहवां विच बैठ के
तेरे केनवास नु वलांगी
पता नही किस तरह कित्थे
पर तेनु जरुर मिलांगी

उच्च! वरील ओळी शब्दात कश्या व्यक्त कराव्यात, शब्द अपुरे पडत आहेत. कसं ही करून मला तुझ्या सोबतच रहायचे आहे, तुझ्यापासून मी दुर राहू शकत नाही ही भावना व अतुट प्रेमाची उच्चतम अवस्था अश्या प्रकारे सहज भाषेत व्यक्त करणे अमृताच जाने. तिला विश्वास आहे, ती नसली तरी प्रेमीच्या मनातून, त्याच्या अंतरंगातून ती कधीच जाणार नाही म्हणून तीला खात्री आहे, त्याच्या कलाकृती मधून, रंगाच्या छटामधून ती डोकावत राहिल, अनेक वेळा.

जा खोरे इक चश्मा बनी होवांगी
ते जिवें झर्नियाँ दा पानी उड्दा
मैं पानी दियां बूंदा
तेरे पिंडे ते मलांगी
ते इक ठंडक जेहि बण के
तेरी छाती दे नाल लगांगी

वाह क्या बात है, वेगाने उसळणार्‍या, मुक्त होऊ पाहत असलेल्या एका पाण्याचा झरा व्हावे, नाही तर एक थेंब होऊन तुझ्यात विरून जावे. मिलन! या पेक्षा उत्कृष्ट मिलन दुसरे कुठले असू शकते ? रचनेचा भावार्थ जर पाहिला तर तुझी माझी भेट कशी व्हावी, तर ती अशी असावी की मी तुझ्यात व तु माझ्यात विरून जावे. जी व्यक्ती खरचं वाहत्या पाण्यासारखं जगली असेल, मनसोक्त, आपल्याला हवे तसे तीच एवढी सुंदर रचना उभी करू शकते, ज्यांनी त्यांचे आत्मचरित्र वाचले असेल त्यांना ते लगेच समजेल, आजच्या काळात लिव्ह-ईन-रिलेशन लोकांना पचनी पडत नाही तेथे अमृता प्रितम १९४०-४५ च्या आसपास लिव्ह-ईन-रिलेशन मध्ये राहत होत्या, इमरोज त्यांच्यापेक्षा वयांनी लहान होते. या वरून कल्पना येईल.

मैं होर कुच्छ नही जानदी
पर इणा जानदी हां
कि वक्त जो वी करेगा
एक जनम मेरे नाल तुरेगा
एह जिस्म मुक्दा है
ता सब कुछ मूक जांदा हैं

पर चेतना दे धागे
कायनती कण हुन्दे ने
मैं ओना कणा नु चुगांगी
ते तेनु फ़िर मिलांगी

जीवन-मरण, शरीर-आत्मा काहीच नाही, काळाच्या ओघात सगळे नष्ट होईल, मला माहिती आहे. मला तुझ्या सोबत रहायचे आहे पण हळूहळू सगळे नश्वर होत चालले आहे, मी ही जाईन, अशी वेळी येईल की सर्व संपलेले असेल. अमृता प्रीतम नी ही कविता फक्त लिहलेली नाही आहे तर जगल्या आहेत. प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ त्यांच्या अंतर्मनातून उमटत जात आहे हे वाचणार्‍याला समजतं, म्हणून म्हणालो त्या कविता जगल्या आहेत. अनेकवेळा छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरत असतो, अचानक नाती तोडतो, एखाद्याचे भावविश्व आपण उद्घवस्त करतो नकळत त्यावेळी आपण जीवनाचे सत्य कुठेतरी विसरतो. त्या म्हणतात "कि वक्त जो भी करेगा" काळाला काय करायचे आहे ते करू दे, हा वेळ तर तो माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. शरीर जाणार आहे, मी जाणार आहे पण कुठे ना कुठेतरी मी तुझ्या सोबत असेन, तुझ्या मनात, तुझ्या हदयात. एक एक अणू-रेणू गोळा करेन, स्वतःला पुन्हा तुझ्या समोर घेऊन येईन, काही होवो तु व मी कधी ना कधी तरी एक नक्कीच होऊ, तेथे बंधन नसेल, तेथे नश्वर वस्तुची गरज नसेल फक्त तु व मी असू आपली भावना, प्रेम असेल. काही हो आपण पुन्हा एकत्र येऊ. प्रबभ इच्छा व उत्कठ प्रेम यांचा संगम म्हणजे ही कविता. आपल्या एक एक अक्षरातून आपल्या समोर उभी राहत जाणारी एक प्रेम कविता.

तुम्हारे इकरार को फूल की तरह नहीं पकड़ा था, अपनी मुट्ठी में भींच लिया था. वह कई बरस मेरी मुट्ठी में खिला रहा. पर मांस की हथेली मांस की होती है, यह मिटटी की तरह हमेशा जवान नहीं रहती. इस पर समय की सलवटें पड़ती हैं और जब यह बंजर होने लगती है तो इसमें उगा हर पत्ता मुरझा जाता है. तुम्हारे इकरार का फूल भी मुरझा गया............अमृता प्रीतम

अमृताप्रीतम एक लेखिका, कवयत्री म्हणून जेवढ्या भावतात त्यापेक्षा ही जास्त त्यांच्यात असलेली प्रेमिका मला भावते, वादळी व्यक्तीमहत्त्व होते यात शंका नाही, त्यांच्या चांगल्या गोष्टीपेक्षा जास्त चर्चा त्यांच्या साहिर लुधयानवी सोबत असलेल्या संबधाच्या, इमरोज वर करत असलेल्या जिवापाड प्रेमाच्या व त्यांच्या सिगरेट पिण्यापासून त्यांच्या व्यक्तीगत सवयींच्याच झाल्या. पण ज्यांना त्यांची लेखनी भावली ते अमृता प्रितमला कधीच विसरू शकणार नाहीत, अशी एखादीच अमृता प्रीतम शतकामध्ये जन्मते, तिच्या लेखणी ला, तीच्या भावविश्व जपण्याच्या प्रवृत्तीला, स्वप्न पाहण्याची व ती खरी करण्याची जिद्दीला माझा मनापासून सलाम! ज्यांना भेटतं जेव्हा शक्य होतं तेव्हा भेटू शकलो नाही अश्या मोजक्याच व्यक्तीमध्ये अमृता प्रितम येतात याची हुरहुर मनाला कायम लागून राहील.

मुक्तकप्रकटनविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

लाल टोपी's picture

23 May 2013 - 10:49 pm | लाल टोपी

खुपच हळुवार तरल छान लिहलं आहे. लेखणीमध्ये ताकद आहे. लिखाण आवडलं

प्यारे१'s picture

23 May 2013 - 10:59 pm | प्यारे१

उत्कट कवितेचं तितकंच सुंदर रसग्रहण.
खूपच छान!

पैसा's picture

23 May 2013 - 11:05 pm | पैसा

मी वाचलेल्या काही उत्तम लिखाणापैकी एक!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 May 2013 - 12:15 am | मिसळलेला काव्यप्रेमी

अतिशय सुंदर रचनेवरील अतिशय समर्थ विवेचन.
हि रचना वेड लावल्याशिवाय राहत नाही. फार कमी रचना असतात अश्या.
हिच रचना गुलजारसाहेबांच्या आवाजात इथे

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 May 2013 - 12:55 am | डॉ सुहास म्हात्रे

वाह ! उत्तम कवितेचे उत्तम रसग्रहण आणि तेवढ्याच ताकदीने लिहिलेले कवयित्रिसंबंधिचे मनोगत !!!

इनिगोय's picture

24 May 2013 - 12:57 am | इनिगोय

अमृता प्रीतम... मूर्तीमंत उत्कटता.
अतिशय खोलातून, गाभाऱ्यातून उमटलेल्या भावना.
काही व्यक्ती कधीही न भेटताच सतत 'भेटत' राहतात, तशी ही अमृता.

इतक्या सुंदर लेखाबद्दल आभार..

भावना कल्लोळ's picture

24 May 2013 - 3:49 pm | भावना कल्लोळ

खूप सुंदर रचना आहे.

अतिशय सुरेख लेख. जितकी समर्थ रचना तितकेच लेखनही सुंदर उतरले आहे. अमृता प्रीतम यांना जे वाटत होते आणि जे म्हणायचे होते त्याचे संपूर्ण सार या ओळींत येते असे मला वाटते.

पर चेतना के धागे
कायनात के कण होते हैं
मैं उन कणों को चुनुंगी
मैं तुझे फ़िर मिलूंगी !!

हे वाचल्यावर मृत्यूच्या अपरिहार्यतेमुळे येणार्‍या वैफल्याची जाणीव होऊनही कवयित्रीचा वेडा आशावाद भावतो. तो वेडेपणाच खास आहे. ही प्रीती शेवटपर्यंत धगधगत राहणे म्हणजे अतीव आनंद आणि तितकेच दु:ख उरी बाळगणे, भावनिक इकॉनॉमीच्या कचाट्यातल्यांना हे कदाचित समजणार नाही कधीच.

असो, मीडिऑकर लोकांची समजूत खुद्द ज्ञानेश्वरमाऊलींनी घातल्यामुळे अशा गोष्टी वाचून धसके बसायचं तरी कमी होतं हेही नसे थोडके.

>>>हे वाचल्यावर मृत्यूच्या अपरिहार्यतेमुळे येणार्‍या वैफल्याची जाणीव होऊनही कवयित्रीचा वेडा आशावाद भावतो. तो वेडेपणाच खास आहे. ही प्रीती शेवटपर्यंत धगधगत राहणे म्हणजे अतीव आनंद आणि तितकेच दु:ख उरी बाळगणे, भावनिक इकॉनॉमीच्या कचाट्यातल्यांना हे कदाचित समजणार नाही कधीच.

वैफल्य असणे गरजेचे आहे का ;)

बॅटमॅन's picture

25 May 2013 - 12:59 am | बॅटमॅन

वैफल्य का, तर मृत्यूमुळे प्रेमभावना खंडेल म्हणून. तिथे गरजेबिरजेचा प्रश्न कुठे आला, ती तर अपरिहार्यता आहे :)

या दृष्टीकोनातून पाहिले तर तुमच्याशी सहमत.

सर्व वाचकांचे आभार, खरं तर हा लेख खूप आधी लिहला होता.
पण तुम्ही गोड मानून घेतला यात आनंद आहे, धन्यवाद!

पिशी अबोली's picture

25 May 2013 - 8:12 pm | पिशी अबोली

अतिशय तरल लिहिलंय. खूप आवडलं. :)

केव्हढी उत्कटता आहे या शब्दा शब्दांमध्ये.
एकमेकात विरुन जाण, अगदी शरीरांच द्वैत्यही मधे येणं, इतक उत्कट लिखाण?
एका सुंदर कवितेची ही सुंदर ओळख अतिशय आवडली.

दशानन's picture

12 Aug 2013 - 10:07 pm | दशानन

धन्यवाद अपर्णा जी :)

पद्मश्री चित्रे's picture

26 May 2013 - 6:07 pm | पद्मश्री चित्रे

सुंदर.
एखादी रेशमाची लडी उलगडत जावी तशी कविता व रसग्रहण.

जयंत कुलकर्णी's picture

28 May 2013 - 7:32 am | जयंत कुलकर्णी

उत्कट.......

आभारी आहे, फुलवा आणि जयंत :)

उत्कट कवितेचं तितकंच सुंदर रसग्रहण >>>> आवडले.

निखिलचं शाईपेन's picture

13 Aug 2013 - 9:25 am | निखिलचं शाईपेन

सुंदर रसग्रहण दशानन, काही दिवसांपूर्वी राज्यसभा टीवी वर अमृता प्रीतम यांच्या आढावा घेणारा खूप छान प्रोग्राम पहिला लिंक इथे देतोय (कविता त्यातही आहे)

http://www.youtube.com/watch?v=jyng88pcU7g

खरं प्रेम हे समहाऊ मुचुअल असते यावर विश्वास बसत चाललाय. म्हणजे व्याख्या नाही पण तरीही अगदी परवा समिधा (साधना आमटे) वाचताना पण हे जाणवले. या व्यक्तींचे सोबती आणि या स्वतः त्या अगदी वलयांकित असल्या तरी त्यांच्यातले प्रेम हे त्यांच्यातल्या आतल्या (वाईट आणि चांगल्या) माणसांच्यावर केले गेलेय हे अगदी पटून जाते. प्रीतम बाईंना पण इमरोज मध्ये अगदी विरघळत जाउन हे सगळे लिहिता आलेय आणि तसंच इमरोज यांचेही आहे. आणि यात परत अमृता प्रीतम यांचे साहीर वरचेही खरे प्रेम आणि इमरोज यांची त्याला असलेली सहज मान्यता (जसं एक माणूस दोघांवर प्रेम करूच शकतो की त्यात काय !!) . खरंच खूप प्रगल्भ प्रेम आहे.
-निखिल

निखिलचं शाईपेन's picture

13 Aug 2013 - 9:48 am | निखिलचं शाईपेन

सुंदर रसग्रहण दशानन, काही दिवसांपूर्वी राज्यसभा टीवीवर अमृता प्रीतम यांच्या जीवनाचा आढावा घेणारा खूप छान प्रोग्राम पाहिला, लिंक इथे देतोय (कविता त्यातही आहे).

http://www.youtube.com/watch?v=jyng88pcU7g

खरं प्रेम हे समहाऊ मुचुअल असते यावर विश्वास बसत चाललाय. म्हणजे व्याख्या नाही पण तरीही अगदी परवा समिधा (साधना आमटे) वाचताना पण हे जाणवले. या व्यक्तींचे सोबती आणि या स्वतः अगदी वलयांकित असल्या तरी त्यांच्यातले प्रेम हे त्यांच्यातल्या आतल्या (वाईट आणि चांगल्या) माणसांच्यावर केले गेलेय हे अगदी पटून जाते. प्रीतम बाईंना पण इमरोजमधे अगदी विरघळत जाउन हे सगळे लिहिता आलेय आणि तसंच इमरोज यांचेही आहे. आणि यात परत अमृता प्रीतम यांचे साहीरवरचेही खरे प्रेम आणि इमरोज यांची त्याला असलेली सहज मान्यता (एक माणूस दोघांवर प्रेम करूच शकतो की त्यात काय !!) . खरंच खूप प्रगल्भ प्रेम आहे.
-निखिल

दशानन's picture

13 Aug 2013 - 10:21 pm | दशानन

धन्यवाद लिंकसाठी.

बाकी प्रेम हा विषय गहन आहे, यावर मी जास्त काय लिहणार :)

अतुलनियगायत्रि's picture

17 Aug 2013 - 11:23 pm | अतुलनियगायत्रि

अम्रुता प्रितम बद्द्ल खुप ऐकले होते.. मजा आली कवीता वाचुन..

मी तुला पुन्हा भेटेन
कधी, कशी, ठाऊक नाही
कदाचित तुझ्या कल्पनेतील
कलाकृतीची ठिणगी होऊन
किंवा कॅनव्हासवरची
एक रहस्यमय रेघ बनून
न बोलता तुला पाहतच राहीन

नाही तर सूर्याची ज्योत बनून
तुझ्या रंगांत रंगून जाईन
किंवा रंगांच्या खांद्यांवर स्वार होऊन
तुझ्या कॅनव्हासवर उमटून जाईन
माहीत नाही कशा प्रकारे
पण तुला भेटेन जरूर

किंवा मग डोळ्यांतून झरेन,
झर्‍यांच्या शिंतोड्यांगत
मग मी थेंब होऊन
तुझ्या शरीरावर विरून जाईन
आणि एक गारवा होऊन
तुझ्या छातीशी लगटेन

मला आणखी काही माहीत नाही
मात्र एवढे माहीत आहे
की काळ कसाही येवो
ह्या जन्मी माझ्यासोबत तू राहशील
शरीर नष्ट होईल तेव्हा तर
सगळेच संपत असते

पण चेतनेचे धागे
पार्थिवाचे कण होऊन मागे राहतातच
मी त्या कणांना शोधेन
आणि पुन्हा तुला भेटेनच भेटेन !

आयुर्हित's picture

15 Feb 2014 - 12:01 am | आयुर्हित

उत्तमोत्तम ......उत्तम कविता व उत्तम रसग्रहण'
कविता, कवयत्री, लेख व लेखक सर्वांना अभिनंदन आणि धन्यवाद!

चाणक्य's picture

16 Feb 2014 - 5:01 pm | चाणक्य

मस्त रसग्रहण. परत वाचणारे शांतपणे.

दशानन's picture

31 Aug 2014 - 10:34 pm | दशानन

आज अमृता प्रीतम यांचा जन्मदिवस!
त्यांची आठवण म्हणून हा जुना लेख परत वर घेऊन येत आहे.

कवितानागेश's picture

1 Sep 2014 - 11:17 pm | कवितानागेश

हलवून टाकते ही कविता.