आठवणीतील मराठी (इमेल) ग्रूप्स आणि संस्थळे

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
9 Apr 2014 - 1:55 pm
गाभा: 

खर म्हणजे मागच्याच महिन्यात इंटरनेट चा उदय होऊन पंचविस वर्षे झाली. सर्नचे अभियंता टिम बर्नर-ली यांनी १९९० मध्ये आंतरजालाची सुरुवात केली[१]. सर्न या संस्थेने ३० एप्रील १९९३ पासून आंतरजाल संकल्पना सर्वांना मुक्त केली.[२] सायबर विश्वात मराठीचे पहिले पाऊल रोवण्याचा मान ‘मायबोली‘ या संकेतस्थळाला जातो. १९९६ मध्ये (www.maayboli.com) हे संकेत स्थळ सुरू झाले[३] म्हणजे मराठी आंतरजालावर येऊनही जवळपास १८ वर्षे झाली.

या काळात बरीच मराठी इमेल ग्रूप्सही तयार झाली त्यात माझ्या आठवणीतला म्हणजे मराठी पीपल २ हा याहू ग्रूप. याहू ग्रूप्स नंतरच्या पिढीला आर्कूटने आकर्षीत केलं तस मला अजूनही आठवत माझ्या एका याहू ग्रूपवर एकदा एक मेसेज आलेला की कृपया तुमचा याहू ग्रूप आता बंद करण्यास हरकत नाही कारण आता आमचा आर्कुट्वरील ग्रूप अधिक अ‍ॅक्टीव्ह आहे आणि तूम्ही पण तुमचा ग्रूप बंद करून तिकडेच जॉईन व्हा तीही लाट गेली आज काल फेसबुक वर ग्रूपस बनले आहेत.

खरे तर मराठी विकिपीडियातील लेख अद्ययावत करण्यासाठी मला मागे पडलेल्या अथवा बंद पडलेल्या ग्रूप्स आणि संस्थळांची माहिती हवीच होती. मराठी संकेतस्थळ दैन्या वस्था या धाग्यावरही बंद झालेल्या संस्थळांचे काही दुवे उपलब्ध होताहेत पण माझा उद्देश सोबत जरासे परिच्छेद लेखनही करण्याचा आहे. इंटरनेटची २५ आणि मराठी च्या १८ वर्षात पुला खालून बरेच पाणी वाहून गेले. तर या धाग्याच्या निमीत्ताने केवळ बंद पडलेली अथवा मागे पडलेली म्हणून नव्हे पण अशाही मराठी ग्रूप्स आणि संस्थळांच्या आठवणी शेअर कराव्यात कि जिकडे हल्ली म्हणजे गेल्या एक-दोन वर्षाच्या किंवा अधिक कालावधीत तुम्ही फिरकला नाहीत पण तुमच्या आठवणी ताज्या आहेत.

संस्थळ, तेथील माहिती, जूने कंपू, सोबत जमल्यास संस्थळ केव्हा चालू झाले त्याचा भरभराटीचा काळ आणि ओहोटीचा अथवा तुम्ही बाहेर पडण्याचा काळ संस्थळाला भरभराटीच्या काळात मिळालेल्या हिट्सची संख्या ते का मागे पडले किंवा तुम्ही त्याला का सोडले, बंद पडले असेल तर केव्हा आणि का ? तुम्ही अशा मागे पडलेल्या संस्थळाचे ग्रूपचे मालक अथवा वेब मास्टर होता का ? तसे असेल तर त्या बद्दल अधीक आठवणी.

बरीच मराठी माणसे आंतरराष्ट्रीय वेबसाईट्स कंपनी करता काम करतात तर तुम्ही असे कर्मचारी असाल तर तुमच्या कडे काही जुन्या शेअर करण्या सारख्या आठवणी असल्यास येऊ द्यात.

तुम्ही तुमच्या मनमोकळ्या पद्धतीने लिहा, (कुणालाही जाणीवपुर्वक दुखावण्याचे जमेल तेवढे टाळाल, असा विश्वास आहेच ;) ) माझा उद्देश मराठी संकेतस्थळे या मराठी विकिपीडियावरील लेखा करता वेगवेगळ्या मार्गाने माहिती जमा करणे आहे. त्यामुळे आपले या धाग्यावरील लेखन प्रताधिकारमुक्त होत आहे असे गृहीत धरून चालतो.

चर्चा सहभागासाठी आणि अनुषंगिक नसलेले विषयांतर टाळण्या बद्दल मिपा सदस्यांचे आणि मिपा प्रशासनाचे आभार.

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

9 Apr 2014 - 3:16 pm | आत्मशून्य

मला म्हातारे झाल्यासारखे वाटु लागले आहे.

माहितगार's picture

9 Apr 2014 - 4:05 pm | माहितगार

झपाट्याने बदलणारे संगणक आणि आंतरजाल रोज काहीतरी नवे-नवे घेऊन येते त्यामुळे मागे पडलेला काळ लक्षात येत नाही. उद्देश मागोवा घेऊन येणार्‍या बदलांना स्विकारण्यास नव्याने सज्ज होणे.

मला म्हातारे झाल्यासारखे वाटु लागले आहे.

आंतरजालावर वय मिटून गेल्या सारखे वाटते ना मग कसली आलीए काळजी, फक्त गेल्या आठवणींना जरासा उजाळा द्यायचा हे तर शालेय विद्यार्थीही करतात मगतर तुम्ही तरूणच ना ! :)

माहितगार's picture

26 Sep 2014 - 11:14 am | माहितगार

मध्ये http://marathipustake.org उघडत नव्हत नशिबाने पुन्हा उघडतय; लीळाचरीत्र चाळायच होत आता अचानक http://www.khapre.org/ उघडत नाहीए. नेमकं काय म्हणायच ? कोणत्या संकेतस्थळावर केव्हा बंदपडण्याची वेळ येईल ते सांगून येते का ? किमान पक्षी कॉपीराईट फ्री जुने ग्रंथ मोकळ्या मनाने चार ठिकाणी ऑनलाईन उपलब्ध करण्यास काय हरकत आहे ?

पैसा's picture

27 Sep 2014 - 11:30 am | पैसा

खाप्रे बरेच दिवस झाले उघडत नाहीये.

श्रीरंग_जोशी's picture

29 Sep 2014 - 12:46 am | श्रीरंग_जोशी

२००५ साली नव्याने स्थापन झालेल्या मराठी डॉट नेट (MarrathiDtNet) याहू ग्रुपचा मी सदस्य झालो होतो. माझ्या माहितीप्रमाणे गौतम सोमण यांनी तो समुदाय सुरू केला होता. २००९ पर्यंत तरी त्यावर संवाद सुरू होते. नंतर कधी तरी तो बंद पडला.