नावात काय आहे? किंवा नावातच सगळे आहे.

स न वि वि's picture
स न वि वि in काथ्याकूट
16 Apr 2014 - 12:29 pm
गाभा: 

लग्नानंतर काय काय बदलते ? घर, नाव, आडनाव, चाली-रिती , नाती-गोती, अगदी खाण्या-पिण्याच्या पद्धती सुद्धा … बघायला गेलो तर बरच काही ….

गेल्या आठवड्यात ऑफिस ला जात असताना बस मध्ये दोन मुली (कदाचित त्यातील एकीच लग्न-बिग्न ठरले असावे,आणि दुसरी तिला ज्ञानामृत देत असावी- ज्याचा अनुभव तिला असेल कि नाही कुणास ठाऊक ) काही तत्सम बाबींवर चर्चा करत होत्या. त्यातील रंगलेली चर्चा तर फक्त ' लग्ना नंतर नाव बदलावे कि नाही' हीच होती.

असे म्हणतात कि मुलाचे नाव राशी वरून ठेवत नाही कारण लग्न नंतर नाव बदलतच. मला खर तर नाव बदलणे हे काही से पटत नाही, तसेही आडनाव तर बदलतोच न.(न बदलून सांगतो कुणाला) मग नाव बदलण्यात काही शास्त्र , संस्कृती आहे का? सासर च्या माणसांनी त्यांना हवे ते नाव ठेवावे आणि मुलीला ते पसंत आहे कि नाही ह्याची देखील खबर न घ्यावी ? बर निदान मुलीला तरी विचारावे कि बाई ग तुला कोणते नाव मनात आहे का? माझ्या माहितीमध्ये २ मुलींचे आडनाव लग्ना आधी हि तेच आणि लग्न नंतर हि तेच(स्वर्ग सुख च म्हणावे नाई का)

नाव बदलायलाच हवे हे काही मला पटत नाही बुआ . ह्यावर तुमचे मत काय आहे ?

प्रतिक्रिया

मुलीने स्वत:च्या मर्जी खेरीज अजिबात नाव बदलू नये.
आणि तसे करायचे असेल तर मुलीलाही मुलाचे नाव बदलण्याचे स्वातंत्र्य द्यावे व् मुलीने मुलाचे बदलेले नाव मुलानेही स्वीकारावयास हवे.

आदिजोशी's picture

16 Apr 2014 - 2:34 pm | आदिजोशी

आमचं नाव आम्हाला लग्नानंतर बदलावं लागलं नाही ह्यातच आम्ही आनंदी आहोत.

पिलीयन रायडर's picture

16 Apr 2014 - 2:47 pm | पिलीयन रायडर

तसेही आडनाव तर बदलतोच न.(न बदलून सांगतो कुणाला)

गरज नाही.. माझे नाव-आडनाव मी बदललेले नाही.. घर आहे, होम लोन आहे, पासपोर्ट आहे.. फक्त परदेश वारी नाही झालेली.. पण अनेकींची झालेली आहे ज्यंची नाव बदललेली नाहित.. अशा अनेक जणी इथे असतील.. काही प्रॉब्लेम येत नाही

हे पहा:-

Now, women can retain their maiden name

MUMBAI: Women in Maharashtra have another reason to celebrate as International Women's Day approaches.

It is now perfectly legal for a woman to retain her maiden name after marriage. The Bombay high court recently amended a crucial rule under the Family Courts Act to prevent a woman from being compelled to file any marriage-related proceedings only in her husband's surname, thus offering relief to many seeking a divorce. It will also help a married woman file proceedings in other courts under her maiden name, say legal experts.

The radical rule says that "a wife who has not changed her name after marriage, by publishing in the official gazette, may continue to use her maiden name". The law is clear now: a woman is not obliged to take her husband's name after marriage.........

........

The Law On Names

After Marriage

* A wife may continue to use her maiden name if she has not changed it officially after marriage

* A wife can file for divorce in her maiden surname; married surname; any other name she may have adopted and officially gazetted

After Divorce

* A woman can continue using her former married surname, except if her intention is to defraud the ex

तुमचा अभिषेक's picture

16 Apr 2014 - 2:55 pm | तुमचा अभिषेक

जे त्यांना मोठेपणी आपला नाव बदलायची एक संधी मिळते.
अन्यथा मुलांना आपले नाव आत्माराम असले तरी आयुष्यभर तेच चालवावे लागते.

(वर उल्लेखलेले आत्माराम माझ्याच एका मित्राचे नाव होते कारण ते त्याच्या आजोबांच्या नावावरून ठेवले होते, बिचारा मुलगी असता तर बदलता तरी आले असते.)

अवांतर - आजोबांच्या वा आजीच्या नावावरून ठेवलेले ओल्ड फॅशन नाव हा देखील एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. बिचारे ते पाळण्यातले लहान मूल काही विरोध करू शकत नाही म्हणून आपली मर्जी चालवणे कितपत योग्य.

पिलीयन रायडर's picture

16 Apr 2014 - 2:58 pm | पिलीयन रायडर

जे त्यांना मोठेपणी आपला नाव बदलायची एक संधी मिळते.

ती जगात सगळ्यांनाच असते हो.. गॅझेट मध्ये तुम्ही नाव बदलु शकता..

तुमचा अभिषेक's picture

16 Apr 2014 - 3:20 pm | तुमचा अभिषेक

ते ही खरेच पण मग ते आईवडीलांनी ठेवलेल्या नावाला उघड उघड नापसंती दाखवल्यासारखे झाले ना. नाही म्हटले तरी त्यांचे मन दुखावणे वा वाईटपणा घेणे आलेच त्यात. आणि अगदीच काही विचित्र वा अगदीचे नावडीचे नाव असल्याशिवाय अशी वाट वाकडी करून कोण जाणार नाही.
काही मुली स्वताहून आपले नाव बदलण्यास उत्सुक असतात. स्वानुभव आहे :)

केदार-मिसळपाव's picture

16 Apr 2014 - 2:55 pm | केदार-मिसळपाव

मुलगा आणी मुली दोघेही नावे बदलतात ना...
मुलाचे नाव होतो मन्या, सोन्या, सोनुडा तर मुलीचे नाव होते मनी, शोनी, शोनु, पिल्लु, टिंगु इत्यादी इत्यादी.

खोटे वाटले तर विचारा कोणालाही...
म्हणुनच नावातच सगळे आहे.