प्रसिद्ध कन्नड साहित्यिक अनंतमूर्ती ही नुकतेच मरण पावले. निवडणुकीपूर्वी मोदींना असणारा तीव्र विरोध दर्शविण्याकरता त्यांनी असे वादग्रस्त विधान केले की मोदी पंतप्रधान बनले तर मी हा देश सोडून जाईन. (आता उशीराने का होईना बोले तैसा चाले असे त्यांनी करून दाखवले आहे. नुसता देशच नाही तर जगच सोडून त्यांनी आपले वचन पाळले हा भाग वेगळा) पण त्यांच्या त्या विधानाचे व त्या विधानाने उठलेल्या गदारोळाचे कवित्व अद्याप बाकी आहेच.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/editorial-on-veteran-kannada-wri...
ह्या लोकसत्तेतील लेखात ह्या लेखकाचा गौरव करताना त्यांच्या वादग्रस्त विधानाला मोदी आणि त्यांचे पाठिराखेच कसे जबाबदार आहेत असा एक विसंगत सूर लावलेला आहे. ह्या लेखकाला इतके टोकाचे विधान करूनही काडीचाही दोष दिला जात नाही. आपल्याला न पटणारा विचार मांडणारा नेता असेल तर आपण पराकोटीची असहिष्णुता दाखवायची आणि तरी त्या असहिष्णुपणाकडे बाकीच्यांनी सहिष्णूपणे बघावे अशी गैरवाजवी अपेक्षा ठेवायची. तथाकथित बुध्दीवाद्यांची दुटप्पी भूमिका ह्या निमित्ताने उघड होताना दिसत आहे.
काही लोकांनी फटाके वाजवून ह्या मृत्यूविषयी आनंद साजरा केला. ह्याचेही खापर आता थेट मोदींवरच फोडले जाईल ह्याची खात्री बाळगा!
ज्या कुणाला मूर्तींच्या मृत्युचा आनंद झाला असेल तो होवो. त्यांना तो व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुणाच्या वृद्धापकाळाने झालेल्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणे फार जनसंमत नाही. पण तो गुन्हा नाही आणि त्याकरता अटक करण्याचीही आवश्यकता नाही.
प्रतिक्रिया
24 Aug 2014 - 7:48 am | श्रीरंग_जोशी
स्व अनंतमूर्ती यांनी मी 'देश सोडून जाईन' असे म्हंटले नव्हते.
त्यांचे विधान खालिलप्रमाणे आहे.
I won't like to live in a country where Modi is a Prime Minister.
'देश सोडून जाईन' हे माध्यमांचे रूपांतर होते.
25 Aug 2014 - 4:18 am | रमेश आठवले
अनंत मूर्ती यांनी मोदी पंत प्रधान झाल्यावर तीन महिन्याच्या आत आपला पण खरा केला.
25 Aug 2014 - 4:57 pm | श्रीरंग_जोशी
एखादी व्यक्ती मला खाजगी बसने प्रवास करायला आवडणार नाही असे म्हणते तेव्हा राज्य परिवहन मंडळाची बस न भेटल्यास मी प्रवास करणारच नाही असा होत नाही. माझा खाजगी बसेसला विरोध आहे. दुसरा पर्याय नसल्यास खाजगी बसने प्रवास करण्यास हरकत नसणार.
माध्यमांनी एखाद्या व्यक्तीच तोंडी घातलेले अन कधीच न निघालेले उदाहरण म्हणजे ज्युलिओ रिबेरो यांचे 'बुलेट फॉर बुलेट. पंजाब पोलिसांचे मुख्य असताना त्यांच्या टीममधला एक महत्वाचा अधिकारी खलिस्तानी अतिरेक्यांकडून मारला गेला. त्यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता यावर कडक उत्तर दिले जाईल अशा अर्थाचे उत्तर दिले. एका वृत्तपत्राने त्यांचे वाक्य बुलेट फॉर बुलेट असे छापले. अर्थातच यावर मोठा वाद झाला. रिबेरोनी अनेकदा स्पष्टीकरण देऊनही ते वक्तव्य त्यांना चिकटले ते कयमचेच. निवृत्तीनंतर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नावही 'बुलेट फॉर बुलेट' हेच ठेवले.
24 Aug 2014 - 9:47 am | पिंपातला उंदीर
http://www.hindustantimes.com/india-news/bjp-activists-booked-for-celebr...
हि बातमी वाचून यातना झाल्या . गांधीजी च्या हत्येनंतर कांही पेठांमध्ये पेढे वाटले गेले होते असे ऐकले होते . मिपावरच दाभोलकरांच्या श्रद्धांजली धाग्यावर काही प्रतिक्रिया वाचून धक्का बसला होता . आणि आता हे .
24 Aug 2014 - 10:14 am | माईसाहेब कुरसूंदीकर
मराठीचा आग्रह धरणारा तू ना? चांगली भाषा वापरता येते. "विश्व हिंदु परिषदेचा म्हातारड्या गिरीराज किशोर नुकताच गचकला' असे म्हटले तर चालेल का??
मुर्ती ह्यांची 'संस्कार' ही कदंबरी वाच. दंगलीची उन्मत्त भाषा करणारा मोदी व मूर्ती ह्यातला फरक कळेल.
24 Aug 2014 - 7:56 pm | हुप्प्या
अमुक मरण पावले ही भाषा तमुक म्हातारड्या गचकला ह्या तोडीचीच आहे असे आपले मराठी ज्ञान असेल तर मी यावर काही बोलू इच्छित नाही. आपली तथाकथित "चांगली" भाषा आपल्यालाच लखलाभ. मला त्याची गरज नाही. माझ्या मते अमुक साहित्यिक नुकतेच मरण पावले हे पुरेसे आदरदर्शक आहे.
उगाच अमकी कादंबरी वाच वगैरे सल्ले देऊ नका. असले उथळ सल्ले कुणीही देऊ शकतो. आपली मते असतील तर ती मांडा. अन्यथा कटा.
24 Aug 2014 - 10:04 pm | पुण्याचे वटवाघूळ
या असल्या फुकटच्या सल्लागारांना असेच फटकारले पाहिजे.
27 Aug 2014 - 3:27 pm | विवेकपटाईत
माई साहेब राग मानू नका मोदी तुमची माहिती चुकीची आहे
मोदीनी दंगलीची भाषा कधीच वापरली नाही. ते एकमेव मुख्यमंत्री होते ज्यांनी दंगलखोरांना सख्तीने धडा शिकविला
होता. ११६ दंगल खोराना यमसदनी पाठविले (त्यात ९०% हिंदू होते). दुसरी कडे तथाकथित पुरोगामी राज्यात उदा. उत्तर प्रदेशात गेल्या वर्षातच जवळपास १००लोक दंगलीत मारल्या गेले त्यात अधिकांश अल्पसंख्यक होते. किती दंगल खोराना कंठस्नान घातले एक ही नाही. कारण त्यांना प्रेतांची राजनीती करायची होती.
तथाकथित पुरोगामी लोक सरकारी पुरस्कार करता 'हिंदू धर्माचा द्वेष करतात.जेणे करून त्यांना सेकुलर म्हणविता येईल. किंबहुना मोदी विरोधी पक्षाचे नेते होते म्हणून सरकारी चातुकारिता करून पुरस्कार मिळविण्यासाठी व पुस्तक खपविण्यासाठी ते खंर माहित असून ही असत्याचा आसरा घेतात. अनंतमूर्ती ही त्यातले. खरे लेखक असते तर गुजरात दंगली बाबतीत विरोधक जो खोटा प्रचार करतात त्यावर विश्वास न ठेवता 'सत्य जाणले असते'.
मी हे सांगतो आहे कारण मी देशाच्या सुरक्षा संबंधित मोठ्या अधिकार्यांबरोबर काय केलेले आहे.
24 Aug 2014 - 10:35 am | पुण्याचे वटवाघूळ
प्रख्यात कन्नड लेखक अनंतमूर्तींना श्रध्दांजली.
नरेंद्र मोदींना शिव्या घालून आपण किती मोठे उदारमतवादी आहोत हे दाखवायची अनेकांना उबळ येते. मिसळपाववर तर असे कित्येक लोक आहेत. विजय तेंडुलकर त्यातलेच आणि अनंतमूर्तींसारख्यांनाही त्याच पंगतीत जावेसे वाटले ही दुर्दैवी गोष्ट. विजय तेंडुलकर गेले त्या दिवशी नरेंद्र मोदी पुण्यात होते.त्यांनी ’आपल्याला गोळी घालायला तयार झालेल्या’ विजय तेंडुलकरांना श्रध्दांजली वाहिली होती.तसेच अनंतमूर्ती गेल्यानंतरही नरेंद्र मोदींनी त्यांनाही श्रध्दांजली वाहिली. हे भान मोदी समर्थकांनी ठेवायला हवे. अशा समर्थकांमुळेच मोदी समर्थकांची तालिबान आणि हमासबरोबर तुलना करायला रिकामटेकड्या विचारवंतांना हाती आयते कोलीत मिळते ही गोष्ट लक्षात ठेवायलाच पाहिजे.
25 Aug 2014 - 5:19 am | भृशुंडी
योग्य आहे.
अशा अतिउत्साही समर्थकांनी निवडणूकीच्या काळात अनेकदा मोदी नको पण समर्थक आवर म्हणायची वेळ आणली होती.
24 Aug 2014 - 10:56 am | पुण्याचे वटवाघूळ
दुसरे म्हणजे भारतात अनंतमूर्तींच्या ज्येष्ठतेचे अनेक साहित्यिक आहेत. अनंतमूर्तींना १९९४ मध्ये ज्नानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतरच सहा वर्षांनी म्हणजे २००० सालचा पुरस्कार मिळाला होता आसामीतल्या साहित्यिक इंदिरा गोस्वामींना.त्यांचे २०११ मध्ये निधन झाले. तीच गोष्ट गुजरातीतले ज्येष्ठ साहित्यिक राजेन्द्र शाह यांची.त्यांचे २०१० मध्ये निधन झाले. या साहित्यिकांचे निधन कधी झाले याचा पत्ताही आपल्याला लागला नाही. मिसळपाववर त्यांच्याविषयी काही लिहिले जायची शक्यता तर त्याहूनही कमी. कुणास ठाऊक अनंतमूर्ती नरेंद्र मोदींविरूध्द काही बोलले नसते तर त्यांची तरी दखल महाराष्ट्रात घेतली गेली असती की नाही!! असो.
24 Aug 2014 - 4:17 pm | कवितानागेश
दोन्ही प्रतिसाद आवडले.
24 Aug 2014 - 11:58 am | पुतळाचैतन्याचा
माझा विरोध कोणत्याही साहित्यिक मूल्यांना कधीच नव्हता पण हे व्यवस्थे वर आसूड ओढणारे कानडी लेखक जेव्हा बेळगाव मध्ये अत्याचारांचे समर्थक होतात तेव्हा माझी सटकते...मला त्यांचा राग येत नाही...त्यांच्या साहित्याचे गोडवे गाणार्या मराठी लोकांचा राग जास्त येतो...मुळात एखादा माणूस साहित्यिक म्हणून मोठा असेल आणि माणूस म्हणून तेवढा नसेल तर काही उपयोग नाही. नुसता धर्म-निरपेक्ष म्हणवून घेत पुरस्कार लाटायचे हि जुनी पद्धत आहे. कित्येक मोठ्या मराठी लेखकांना ते कॉंग्रेस विरोधी आहेत म्हणून ज्ञानपीठ वगेरे मिळाला नाही उदा. आचार्य अत्रे, नाना पाटील, सावरकर. तेव्हा या मुर्थीना सिरिअसलि घेण्याची गरज नाही.
24 Aug 2014 - 1:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
मग पुलंना पद्मश्री,पद्मभूषण्,पुण्यभुषण पुरस्कार मिळाले ते स्वतःला धर्म-निरपेक्ष म्हणवून घेत म्हणून मिळाले असे म्हणतोस्?साहित्यप्रभाव्,आशय,लोकांवरचा प्रभाव ह्या गोष्टींना काहीच किंमत नाही असे म्हणतोस?
24 Aug 2014 - 3:28 pm | पुतळाचैतन्याचा
माझ्या प्रतिक्रियेत तुम्हाला पु लं चे नाव कुठे दिसले? उगीच लोजिकल एक्स्टेन्शन केले तुम्ही...तुम्ही त्या मराठी माणसांच्या गटात पडता जे मी वर लिहिले आहे...मी पण लोजिकल एक्स्टेन्शन करतो...सैफ आली आणि हा.भ.प. तिस्ता सेटलवाड यांनी पण मोठेच कार्य केले आहे न पुरस्कार द्यायला...मैसाहेब तुम्ही मागच्या जमान्यातील दिसता...शालिनीताई पाटील यांच्या सारखी अवस्था दिसते तुमची.
24 Aug 2014 - 4:14 pm | विनोद१८
......नुसता धर्म-निरपेक्ष म्हणवून घेत पुरस्कार लाटायचे हि जुनी पद्धत आहे. माईला याचे ज्ञान आजच झाले असे दिसते, किती भाबडी ग माई तु ???
मग पुलंना पद्मश्री,पद्मभूषण्,पुण्यभुषण पुरस्कार मिळाले ते स्वतःला धर्म-निरपेक्ष म्हणवून घेत म्हणून मिळाले असे म्हणतोस्? पुलंनी कधी आपल्या कपाळावर 'धर्मनिरपेक्षतेचा शिक्का' मारुन मिरविल्याचे स्मरत नाही.
[न्याना नेफळाप्रेमी] विनोद१८
24 Aug 2014 - 6:23 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"नरेंद्र मोदींना शिव्या घालून आपण किती मोठे उदारमतवादी आहोत हे दाखवायची अनेकांना उबळ येते"
मी तर उलट म्हणेन.मोदींना विरोध म्हणजे देशविरोध्,मोदींना पाठिंबा देणार असाल तरच तुम्ही सच्चे देशभक्त म्हणण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे. हुप्प्या ह्यांचा हा धागा हेच दर्शवतो.मूर्ती ह्यांनी मोदींना विरोध केला मग लगेच त्यांचे ज्ञानपीठ्,पात्रता ह्यावर चर्चा झाली.
"आम्ही ज्या देशभक्तीच्या,उदारमतवादीपणाच्या व्याख्या करू त्याच खर्या व्याख्या होत.बाकी सगळे झूट' स्वयंघोषित देशप्रेमी,हिंदुत्ववादी पूर्वीपासून करीत आले आहेत.आता त्यांना सत्तेचे पाठबळ आहे.
24 Aug 2014 - 7:59 pm | हुप्प्या
अनंत मूर्तींनी जे विधान केले ते असहिष्णू होते हे मान्य आहे का? लोकशाहीत नेहमी आपल्या आवडीचाच नेता निवडून आला पाहिजे. आला नाहीतर थेट देश सोडण्याची भाषा करणे हे सहिष्णूपणाचे आहे का?
मेल्या म्हशीला मणभर दूध म्हणण्याच्या भरात आपण त्या मृत (चांगल्या भाषेत दिवंगत म्हणा हवे तर) व्यक्तींच्या चुकांनाही डोक्यावर घ्यायचे का?
24 Aug 2014 - 10:18 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
२००२ साली शेकडो लोकांची कत्तल होत असताना गप्प बसून राहणे नव्हे तर कत्तल करणार्यांना प्रोत्साहन देणे हे जर तुला सहिष्णुपणाचे लक्षण वाटते तर मूर्तींचे विधान मला असहिष्णु वाटत नाही.
25 Aug 2014 - 1:44 am | हुप्प्या
२००२ पासून २०१४ पर्यंत काँग्रेसचे सरकार होते. त्या सरकारने जंग जंग पछाडूनही मोदींंवर कुठलाही आरोप शाबित होऊ शकला नाही. तरी मोदी दोषी असल्याचा अट्टाहास करणे म्हणजे निव्वळ रेम्याडोकेपणा म्हणायचा का हम करे सो कायदा अशी फाशिस्ट मनोवृत्ती म्हणायची ते तुम्हीच सांगा.
आणि निवडणुकीत जिंकणे म्हणजे कत्तलीला उत्तेजन देणे हे उफराटे समीकरण कसे बनवले आपण? मुळात मोदींवरचा दोषारोप सिद्ध व्हायच्या आधीच तो सिद्ध झाल्याचे समजणे आणि त्यावर असल्या तर्कटांचे इमले बांधणे हे धंदे बंद करा.
24 Aug 2014 - 9:26 pm | पुतळाचैतन्याचा
पु लं चे हे विचार ऐका आणि अपडेट करा...
https://www.youtube.com/watch?v=U0S9179jgRc
24 Aug 2014 - 11:17 pm | विनोद१८
........काय माई आज त्या तिस्ता सेटल्ड्वाडकदे... हळदीकुंकवाला जाउन आलीस काय ?? ..... गुण नाही पण वाण लागला वाट्टे..!!
बरे, तुझ्याकडे २००२ चे काही पुरावे असतील तर ते इथे लोड कर, आपण सर्व मिपाकर एक निवेद्न लिहू त्याला ते तुझ्याकडचे पुरावे जोडू आणि पाठवुन देउ त्या मोदीकदे आणि वर त्याला जाब विचारु मग पाहुया त्याची गंम्मत, कसे ??
25 Aug 2014 - 12:07 am | माईसाहेब कुरसूंदीकर
अगदी नावाप्रमाणे विनोद करतोस बघ. असो. 'अच्छे दिन' अनुभवित असशीलच तेव्हा मिपाकरांच्या वतीने तूच बोल मोदींकडे.
25 Aug 2014 - 5:16 am | भृशुंडी
अनंतमूर्ती ह्यांच्या साहित्याबद्दल काही लिहिले असेल अशी अपेक्षा ठेवून धागा उघडला होता.
मोदी-विधान-समर्थक वगैरे नेहेमीचा मालमसाला सापडला. चालू द्यात.
चूक बरोबर सोडून द्या. पण असल्या चर्वितचर्वाणाविषयी वेगळे धागे काढून समर्थन देण्याची काहीच गरज नाही.
25 Aug 2014 - 11:24 am | प्रसाद१९७१
अनंतमूर्ती ह्यांच्या साहित्याबद्दल काही लिहिले असेल >>>>>> साहीत्याबद्दल खरेच काही लिहीण्यासारखे आहे का? प्रसिद्धीसाठी सवंग विधाने केली नसती तर ह्यांचे नाव कीती मराठी लोकांना माहीती असते हा प्रश्न आहे.
25 Aug 2014 - 1:13 pm | काळा पहाड
अनंतमूर्तींनी येळ्ळूर मधल्या मारहाणीचा निषेध केला होता का? काही शरध्दांजली ब्रिद्धांजली मिळणार नाही.
25 Aug 2014 - 3:04 pm | पिंपातला उंदीर
अव्घड आहे
27 Aug 2014 - 2:05 am | विकास
अनंतमूर्तींना (या संस्थळावर किंचीत उशीराने) श्रद्धांजली.
कुणाचेही विचार अथवा तथाकथीत आचार आवडले नाहीत म्हणून स्पष्टवक्तेपणाने बोलण्यात काही गैर नाही पण मर्यादा नक्कीच असाव्यात असे वाटते. तेंडूलकरांनी मोदींना गोळ्या घालायची भाषा करणे, अनंतमूर्तींनी मोदी आल्यास देश सोडण्याची आणि मोदी पंतप्रधान झाल्यावर "A few months ago in Bangalore in a meeting, I was overcome by emotion, and I said I will not live in a country where Modi is Prime Minister. That was too much to say because I can't go anywhere except India," असे म्हणणे आणि परत पुढे जाऊन, "...when there is a bully we become cowards" असे म्हणणे गैर त्यावेळेस वाटले आणि आजही वाटते.
पण त्यांच्या साहीत्यातील योगदानाची अखेरची किंमत केवळ याच एका प्रसंगामुळे व्हावी हे अजून अपरीपक्व मनाचे लक्षण आहे. आणि हा अपरीपक्वपणा आपले विचारवंत आणि माध्यमे दाखवत आहेत अस कुठेतरी वाटते. आज, सीताकांत महापात्रा आणि वासुदेवन नायर कोण म्हणून विचारले तर किती जणांना माहीत असतील? महापात्रांना मूर्तींच्या आधी एक वर्ष तर नायर यांना नंतरच्या वर्षात ज्ञानपिठ मिळाले होते. असो.
27 Aug 2014 - 3:29 pm | विवेकपटाईत
माई साहेब राग मानू नका मोदी तुमची माहिती चुकीची आहे
मोदीनी दंगलीची भाषा कधीच वापरली नाही. ते एकमेव मुख्यमंत्री होते ज्यांनी दंगलखोरांना सख्तीने धडा शिकविला
होता. ११६ दंगल खोराना यमसदनी पाठविले (त्यात ९०% हिंदू होते). दुसरी कडे तथाकथित पुरोगामी राज्यात उदा. उत्तर प्रदेशात गेल्या वर्षातच जवळपास १००लोक दंगलीत मारल्या गेले त्यात अधिकांश अल्पसंख्यक होते. किती दंगल खोराना कंठस्नान घातले एक ही नाही. कारण त्यांना प्रेतांची राजनीती करायची होती.
तथाकथित पुरोगामी लोक सरकारी पुरस्कार करता 'हिंदू धर्माचा द्वेष करतात.जेणे करून त्यांना सेकुलर म्हणविता येईल. किंबहुना मोदी विरोधी पक्षाचे नेते होते म्हणून सरकारी चातुकारिता करून पुरस्कार मिळविण्यासाठी व पुस्तक खपविण्यासाठी ते खंर माहित असून ही असत्याचा आसरा घेतात. अनंतमूर्ती ही त्यातले. खरे लेखक असते तर गुजरात दंगली बाबतीत विरोधक जो खोटा प्रचार करतात त्यावर विश्वास न ठेवता 'सत्य जाणले असते'.
मी हे सांगतो आहे कारण मी देशाच्या सुरक्षा संबंधित मोठ्या अधिकार्यांबरोबर काय केलेले आहे.
2 Sep 2014 - 12:56 am | आशु जोग
हो परवाच वाचले होते वर्तमानपत्रात