एका अनपेक्षित वळणावर-गोष्ट तुझी न माझी
नीलांबरी आज लवकर निघाली ऑफिस मधून नेहमीच जादा तास काम करणाऱ्या नीलांबरी ला HOD नेही जाण्याची परवानगी दिली.परवानगी मिळताच ती घाईघाइने निघाली.नावा प्रमानेच निळसर डोळे गोरा वर्ण सरळ नाक काळभोर केशसंभार आणि ओठांवर नेहमी हसु.एखाद्या कवीने पाहील की म्हणाव जिवंत कविता नजरेसमोर उतरली आहे.या सर्वातहि तीच सर्वांशि मिळून मिसळून वागण सर्वनाच् तीआवडे.पण तिलाही थोडासा गर्व हा होताच. नाही गर्व रूपाचा नाही तर तिच्या कर्तुत्वाचा होता. कारण तिला साजेस स्वताच करियर तिने घडवल होत.