विरंगुळा
सुटलेल्या पोटाची कहाणी -३
मला आवडलेला विनोद
आपल्या विद्वानाच्या नगरितले नेते कृषिमंत्री होते तेव्हाचि गोष्ट.
एकदा आपले माननीय नेते काही परदेशी सन्माननीय पाहुण्याना भारतातील शेतीशी आधारित जोडधंदे दाखवायला घेऊन गेले. शहराबाहेरील एका मोठ्याशा गोठ्यात शिरुन त्यांनी पाहुण्याना पशुधन दाखवायला सुरुवात केलि. समोर असलेल्या गवळिबुवाची अगदी आपला शाळकरी मित्र असल्याच्या थाटात चौकशी केली. गवळीबुवाच्या पायाला भलेमोठे प्लास्टर पाहून त्यांनी त्याचे कारण विचारले.
गवळीबुवानी सांगितले की दूध काढ़ताना गाईने लाथ मारली.
बस मग काय , कृषिमंत्र्याचे त्या गवळ्याचे बौद्धिक घेणे सुरु झाले.
नासदीय सूक्त-शब्दांतरिताचे श्रवण.(एक उत्कट अनुभव!)
शीर्षकामधे जरी शब्दांतरिताचे श्रवण असं म्हटलेलं असलं.तरी तो नुसताच काटेकोरपणा आहे. भाषाशास्त्राच्या नियमानुसार असलेला. मुळात उपक्रम संस्थळावर येथे श्री धनंजय यांनी या सूक्ताचे जे छंद आणि वृत्ताचा नियम पाळून शब्दशः भाषांतर तसच्या तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे.. तोच ऐंशी टक्के बाजी मारून जाणारा आहे.
सुटलेल्या पोटाची कहाणी -२
भाग-१
क्लासला दिवाळीची सुट्टी सलग पाच दिवस दिली होती. घरी निवांत होतो. तीन चार नवीन पुस्तकं आणून ठेवली होती. त्यामुळे खुशीत होतो. दिवाळीचा फराळ करत पुस्तक वाचत बसलो होतो. ही शेजारी येउन बसली आणि अगदी हलक्या सुरात लाडीगोडीने बोलू लागली. नेहमीच्या तिच्या तारसप्तकाच्या सुराची सवय असलेल्या मला या हलक्या आवाजाने इतका धक्का बसला की मी जेंव्हा त्यातून सावरलो तोपर्यंत तिने माझ्याकडून गोव्याच्या ललित रिसोर्टच बुकिंग करून घेतलं होतं.
सुटलेल्या पोटाची कहाणी -१
ही सगळी कहाणी सुरु झाली दिवाळी पासून . मला कल्पनाच नव्हती की मी या कहाणीचा हिरो आहे म्हणून. म्हणून आधी सगळे अनुभव टिपून ठेवले नव्हते. त्यामुळे आता जसे तुकड्या तुकड्याने आठवतायत तसे लिहितो. जर दोन तुकड्या मधलं अंतर जास्त वाटलं तर खुशाल समजा की चाळीशीच्या उंबरठ्यावर असल्याने मध्ये मध्ये येणाऱ्या विरक्तीच्या झटक्याने, मी या सर्व उपद्व्यापातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असीन.
---------------
मनाची नाती
लहान असताना आई - वडील म्हणुन प्रत्येक मुला मुलीला त्यांचे आई-वडील हे बेस्टच वाटतात. मग ते कसेही असो, दुसर्यांसाठी दुष्ट , वाईट वागणारे अगदी कसेही. स्वतःच्या मुलांसाठी बाबा कदाचित कठोर वागत असल्याने ते जरी बर्याचदा बेस्ट वाटत नसले तरीही त्यांची आई ही एक आदर्श बाईच असते. पण आपले आई-वडील सोडुन आपण आणखीही कुणाच्या जवळ असतो जसे मावशी - मावशीचे मिस्टर, मामा - मामी , काका - काकु, आत्या - आत्याचे मिस्टर.
साज़
सर्वात अगोदर एक म्हणजे मी संगीताचा कुठल्याही प्रकारचा जाणकार नाही. दुसरं सर्व लेख आठवणींवर आधारीत त्यामुळे डळमळीत. थोडी कुठे कुठे गल्ली चुकण्याचीही शक्यता आहेच..
तर आपल्या हीन्दी सिनेमांची गाणी म्हणजे अनेक प्रतिभाशाली संगीतकारांनी योगदान दिलेला आनंद खजिना आहे. कधीही जा दार उघडा दोन चार गाणी घ्या और गम भुला दो सारे संसारके. हा आपला सर्वांचाच अनुभव. तर या विवीध गाण्यांत विवीध संगीतकारांनी अत्यंत कलात्मकतेने व कुशलतेने अनेक वाद्यांचा वापर केलेला आहे. या धाग्याचा विषय हा वाद्यांचा जिथे अप्रतिम वापर झालेला आहे त्या गाण्यांविषयी बोलणं हा.
मैदानी खेळ
शाळेत असताना मैदानी बरेच खेळ खेळले जायचे, कमी उंची असल्याने लांब उडी , उंच उडी असे जमायचे नाही पण लंगडी, कबड्डी खेळायला आवडायचे. पकडा पकडी , लगोरी खेळायचे पण धावण्याच्या शर्यतीतही कधीच जास्त टीकाव लागला नाही कधी. क्रीकेट सर्वान्चाच आवडता खेळ पण क्रीकेट सोडुन बाकी कुठले मैदानी खेळ तुम्हाला आवडायचे ??
लंगोटनगरी पोपटराजा.....
लंगोटनगरी पोपटराजा
वादळच जोराचे आले, की गाठी आपोआप ढिल्या झाल्या,
माहित नाही खास, काय घडले विशेष!
पण हाय!! लंगोट कड्यावरून घसरले,
अन पोपट सगळे फांद्यांवर दिसले.