शीर्षकामधे जरी शब्दांतरिताचे श्रवण असं म्हटलेलं असलं.तरी तो नुसताच काटेकोरपणा आहे. भाषाशास्त्राच्या नियमानुसार असलेला. मुळात उपक्रम संस्थळावर येथे श्री धनंजय यांनी या सूक्ताचे जे छंद आणि वृत्ताचा नियम पाळून शब्दशः भाषांतर तसच्या तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे.. तोच ऐंशी टक्के बाजी मारून जाणारा आहे. कारण मंत्र त्याच्या स्वरांमुळे ज्या तालात लयीत म्हणता येतात..तसच हे काव्यात्म भाषांतर देखील म्हणता येत आहे..एव्हढं हे काम त्यांनी चपखल केलेलं आहे.आणि हे माझ्या तसच म्हणण्याचा प्रयोग करून पाहिल्यावर लक्षात आलं.आणि मनात विचार आला.. ज्यांना मंत्र्रांच्या - शक्ति या श्रद्धेपेक्षा, त्याचे अर्थ या श्रद्धेशी ममत्व आहे..त्यांना हा प्रयोग ऐकण्यासाठी का शेअर करू नये?(सदर नासदीय सूक्त हे उदकशांति,नावाच्या विधीमधे..कृष्णयजु:शाखीय मंत्र संहितेतून आलेलं आहे..जे आंम्ही उदकशांतीत नेहमी म्हणतो.) आधी मी आर्धी ओळ मग भाषांतरातल्या पहिल्या दोन ओळी असं करून पाहिलं.पण मन म्हणे..की बात कुछ जम्या नही। का? ,तर मंत्राचा छोटा तुकडा (चरण) ऐकल्या ऐकल्या लगेच पाठून भाषांतर त्याच स्वरलयीत ऐकायला जी आशयपूर्ण सुसंबद्धता वाटते..ती अर्ध्याओळीच्या खेळात वाटे ना! मग तो खेळ करून पाहिला.. फिर मन मे लड्डू फुटा...की जम्या जम्या..यिसमे बहुतही मज्जा आ रहा है.. म्हणून मग तोच प्रयोग इथे तुम्हाला ऐकायला देत आहे..थोड्या केलेल्या प्रस्तावनेसह... खाली मूळ सूक्तपण (उपक्रमवरून साभार) देत आहे. म्हणजे ऐकताना ते लगेच इथेच पहाता येइल..व त्याचा आनंद आणखि वाढेल..(राजेश घासकडवींचे आभार..त्यांच्या लेखात त्यांनी देलेल्या या लिंक/माहितीमुळेच हा प्रयोग करता आला..) चला आता फार ताटकळवत नाही तुम्हाला... चला तर..ऐकू या मग.. नासदीय सूक्त-शब्दांतरिताचे श्रवण
(रेकॉर्डिंग करताना बॅग्राऊंडला तानपुरापण आहे,ज्याने सूक्त-अर्थ ऐकायला अधिक आनंद मिळणार आहे)
http://www.mediafire.com/watch/wo3xknkgy3n2523/Nasadiya_sukta..artharup_...
नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् ।
किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥
तेव्हा ना असणे ना नसणे होते,
धूळही नव्हती, ना आकाश पल्याड
कुठे, काय आश्रय, काय आवरण होते?
होते का पाणी गहन आणि गाढ?
न मृ॒त्युरा॑सीद॒मृतं॒ न तर्हि॒ न रात्र्या॒ अह्न॑ आसीत्प्रके॒तः ।
आनी॑दवा॒तं स्व॒धया॒ तदेकं॒ तस्मा॑द्धा॒न्यन्न प॒रः किं च॒नास॑ ॥ २ ॥
ना होता मृत्यू, ना अमृतत्व तेव्हा
रात्री-दिवसांचे प्रकटणे नव्हते
निर्वाताने एका स्वत:ला आणले जेव्हा,
आणिक नव्हते नाही, काहीच नव्हते.
तम॑ आसी॒त्तम॑सा गू॒ळ्हमग्रे॑ऽप्रके॒तं स॑लि॒लं सर्व॑मा इ॒दम् ।
तु॒च्छ्येना॒भ्वपि॑हितं॒ यदासी॒त्तप॑स॒स्तन्म॑हि॒नजा॑य॒तैक॒म् ॥ ३ ॥
अंधार होता, अप्रकट पाणीच पाणी
अंधाराने होते ते सगळे लपवले -
हे पोकळ झाकलेले, न-झालेले... आणि
त्यात तपातून एक महान उपजले
काम॒स्तदग्रे॒ सम॑वर्त॒ताधि॒ मन॑सो॒ रेतः॒ प्रथ॒मं यदासी॑त् ।
स॒तो बन्धु॒मस॑ति निर॑विन्दन् हृ॒दि प्र॒तीष्या॑ क॒वयो॑ मनी॒षा ॥ ४ ॥
पुढे उद्भवला प्रथम तो काम
काम म्हणजे काय तर रेत मनाचे
मनीषेने हृदयात कवींना ये ठाव -
कळे नसण्याशी नाते असण्याचे
ति॒र॒श्चीनो॒ वित॑तो र॒श्मिरे॑षाम॒धः स्वि॑दा॒सी३दु॒परि॑ स्विदासी३त् ।
रे॒तो॒धा आ॑सन्महि॒मान॑ आसन्त्स्व॒धा अ॒वस्ता॒त्प्रय॑ति: प॒रस्ता॑त् ॥ ५ ॥
ओढलेले आडवे किरण... यांपैकी
काय होते खाली नि काय बरे वर?
महिमान होते, होते रेतधारी,
स्वयंसिद्ध येथे, प्रयत्न तेथवर
को अ॒द्धा वे॑द॒ क इ॒ह प्र वो॑च॒त्कुत॒ आजा॑ता॒ कुत॑ इ॒यं विसृ॑ष्टिः ।
अ॒र्वाग्दे॒वा अ॒स्य वि॒सर्ज॑ने॒नाथा॒ को वे॑द॒ यत॑ आब॒भूव॑ ॥ ६ ॥
कोण बरे जाणतो, कोण सांगतो बोलून
कुठून उद्भवली, ही झाली कुठून?
देवही त्यापुढचे, झाले हे होऊन
कोण मग जाणतो, ही झाली कुठून?
इ॒यं विसृ॑ष्टि॒र्यत॑ आब॒भूव॒ यदि॑ वा द॒धे यदि॑ वा॒ न ।
यो अ॒स्याध्य॑क्षः पर॒मे व्यो॑म॒न्त्सो अ॒ङ्ग वे॑द॒ यदि॑ वा॒ न वेद॑ ॥ ७ ॥
उद्भवले हे होते होय ज्याच्यापासून
धारण याला करतो, का नाहीच मुळी धरत?
बघणारा जो आहे परम आकाशातून,
तो हे जाणतोच - की नाही तोही जाणत?
=================================================
प्रतिक्रिया
5 Dec 2015 - 9:54 pm | मांत्रिक
अगागागा!!!
बुवेश मी पैला...
आता सखोल प्रतिसाद उद्या देतो!!!
5 Dec 2015 - 10:06 pm | अत्रुप्त आत्मा
आंSSSsss दू दू मांत्रिक्बाबा!
8 Dec 2015 - 9:23 am | पगला गजोधर
सृष्टि से पहले सत नहीं था, असत भी नहीं
अंतरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था
छिपा था क्या, कहाँ, किसने ढका था
उस पल तो, अगम अटल जल भी कहां था
सृष्टि का कौन है कर्ता?
कर्ता है या है विकर्ता?
ऊँचे आकाश में रहता
सदा अध्यक्ष बना रहता
वही सचमुच में जानता
या नहीं भी जानता
है किसी को नही पता
नही पता, नही है पता………
नही है पता………
वो था हिरण्य गर्भ सृष्टि से पहले विद्यमान
वही तो सारे भूत जाति का स्वामी महान
जो है अस्तित्वमान धरती आसमान धारण कर
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर
जिस के बल पर तेजोमय है अंबर
पृथ्वी हरी भरी स्थापित स्थिर
स्वर्ग और सूरज भी स्थिर
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर
गर्भ में अपने अग्नि धारण कर पैदा कर
व्यापा था जल इधर उधर नीचे ऊपर
जगा चुके व एकमेव प्राण बनकर
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर
ऊँ! सृष्टि निर्माता, स्वर्ग रचयिता पूर्वज रक्षा कर
सत्य धर्म पालक अतुल जल नियामक रक्षा कर
फैली हैं दिशायें बाहु जैसी उसकी सब में सब पर
ऐसे ही देवता की उपासना करें हम हवि देकर
ऐसे ही देवता की उपासना करें हम हवि देकर
6 Dec 2015 - 12:25 am | अनुप ढेरे
छान आहे रेकॉर्डिंग. पण एक मंत्र पूर्ण म्हणून मग त्याचं भाषांतर म्हणणं आवडलं असतं.
6 Dec 2015 - 1:04 pm | यशोधरा
हेच म्हणते. रेकॉर्डिंग आवडले. सुरेख म्हटले आहे.
6 Dec 2015 - 1:27 am | राजेश घासकडवी
आवडलं. मुळात वाचलं होतं तेव्हा छंदही इतका चांगला पाळला आहे हे लक्षात आलं नव्हतं.
6 Dec 2015 - 4:49 am | कंजूस
अप्रतिम ,अद्भूत काव्य भाषांतर.श्रवण थोडे उजाडल्यावर करतो आणि सांगतो तोपर्यंत एक कप चा.
6 Dec 2015 - 1:13 pm | बोका-ए-आझम
_/\_ अप्रतिम अनुभव.
7 Dec 2015 - 8:04 pm | अत्रुप्त आत्मा
मांत्रिक, अनुप ढेरे, यशोधरा, राजेश घासकडवी, कंजूस, बोका-ए-आझम >> धन्यवाद.
7 Dec 2015 - 11:47 pm | प्रचेतस
अतिशय सुंदर.
अत्रुप्त गुरुजी, आपला आवाज तयारीचा आहे. ह्याचा उपयोग अवश्य करून घ्या.
7 Dec 2015 - 11:56 pm | सूड
कशासाठी? =))
8 Dec 2015 - 12:27 am | प्रचेतस
गाणं म्हणण्य़ासाठी हो. =))
8 Dec 2015 - 9:37 am | नाखु
गातील, जोपर्यंत "आतला" आवाज त्यांना साद देत नाही तोपर्यंत धीर धरा..
आपली आवड वाला नाखु
तोपर्यंत ऐकू खास गीत मेरी कहानी
8 Dec 2015 - 9:48 am | प्रचेतस
'आतला' आवाज म्हणजे काय?
8 Dec 2015 - 2:45 pm | अत्रुप्त आत्मा
असो!
8 Dec 2015 - 9:53 am | अत्रुप्त आत्मा
नाखुकाका , आहो तुम्ही कुणाला सांगताय? सदैव कुजकट आणि तिरकस शेरेबाजी करण्यात धन्यता व मोठेपणा मानणाय्रा त्या मानवी जीवनातल्या सूडास!?
10 Dec 2015 - 2:24 pm | pacificready
शांत गदाधारी भीम शांत!
असतो स्वभाव एखाद्याचा. ऊंट तिरकाच चालतो.
9 Dec 2015 - 9:18 am | प्रमोद देर्देकर
गुरुजी हे पुर्ण सुक्त नाहीये का? कारण यात ती "हिरण्यगर्भात्समवर्तका..." ही ओळ नाहीये म्हणुन मी विचारतोय.
9 Dec 2015 - 9:41 am | स्रुजा
छान ! आवडलं.
10 Dec 2015 - 1:59 pm | पद्मावति
खूप सुरेख. आवडलं.