ही सगळी कहाणी सुरु झाली दिवाळी पासून . मला कल्पनाच नव्हती की मी या कहाणीचा हिरो आहे म्हणून. म्हणून आधी सगळे अनुभव टिपून ठेवले नव्हते. त्यामुळे आता जसे तुकड्या तुकड्याने आठवतायत तसे लिहितो. जर दोन तुकड्या मधलं अंतर जास्त वाटलं तर खुशाल समजा की चाळीशीच्या उंबरठ्यावर असल्याने मध्ये मध्ये येणाऱ्या विरक्तीच्या झटक्याने, मी या सर्व उपद्व्यापातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असीन.
---------------
हा तर मी काय म्हणत होतो. २०१५ ची दिवाळी आली. ऑफिस मधल्या मुलींनी ऑफिस सजवायचा घाट घातला. त्यांचा उत्साह पाहून मी देखील हो म्हटलं. पोरींनी छान सजवलं ऑफिस. मी पण खूष झालो. त्यांच्या कामगिरीचे फोटो बिटो काढले आणि मग सरांबरोबर फोटो काढूया अशी कल्पना एकीच्या सुपीक डोक्यातून निघाली. (डोके नेहमी सुपीकच का असते कुणास ठावूक? एकही नापीक, दुष्काळी, गेला बाजार कोरडवाहू वगैरे का नसावे ? असो इथे कंस थांबवतो, उगाच तुम्हाला माझ्या डोक्याला कुठली विशेषणे द्यायची त्याची यादी मीच करून द्यायला नको) दिवाळीच्या आनंदाच्या भरात मी देखील या कल्पनेला हो म्हणून, फोटो काढायला मागे उभ्या असलेल्या या मुलींसमोर बसलो. आणि घात झाला. “जे न देखे रवी ते देखे कवी”, च्या चालीवर मला नवीन साक्षात्कार झाला. "जे न दाखवी आरसा ते ठळकपणे दाखवी कँमेरा फोनचा".
इतके दिवस माझ्या नाकाखाली, माझ्या नकळत, सुगरण बायकोने (ती इथे आणि फेसबुकवर आहे. चांगली active आहे. त्यामुळे ती सुगरण आहे इतकंच सत्य मी उघड करू शकतो) बनवलेल्या आणि अंमळ जास्तच आवडीने खालेल्ल्या सर्व अन्नामुळे, मी कमावलेल्या आणि एकही गोष्ट वाया न घालवण्याच्या मध्यमवर्गीय मानसिकतेने वाचवून ठेवलेल्या कॅलरीज, चरबीच्या रूपाने माझ्या मूळच्या सपाट पोटावर घेराव देऊन बसल्या होत्या. पोरी फोटो बघून खूष झाल्या. त्यांच्या खुशीचे कारण त्यांचे छान आलेले फोटो की सरांपेक्षा आपण कित्ती बारीक आहोत याचा स्क्रीनवर दिसणारा पुरावा होता, हे मला अजून कळले नाही. आणि मग सुपीक डोक्याच्या मुलीच्या डोक्यातून अजून एक पीक निघाले की ऑफिस च्या whatsapp ग्रुप ला हा फोटो डी पी म्हणून ठेवायचा. मी कसनुसा हसत होकार दिला. झुक्या बाबाने whatsapp घेतल्यावर डी पी क्रॉप करायची सोय काढली नाही म्हणून त्याचे आभार मानत केवळ हसरा चेहरा दिसेल इतपत फोटो ठेवून बाकीचा अनावश्यक सत्याचा भाग कापून, ऑफिस मध्ये दिवाळी साजरी केली.
घरी यंदा बायकोने फराळाचे वेगवेगळे १२ पदार्थ केलेले असल्याने आणि मी आज्ञाधारक नवरा असल्याने गपचूप सर्व पदार्थ खावेच लागले. त्यात पुन्हा आमच्या सोसायटीतले शेजारी अजूनही फराळ देण्याघेण्याच्या गतकालीन सवयी मोडायला तयार नसल्याने, पदार्थांची संख्या वाढली नसली तरी खाण्याचे प्रमाण वाढले.
मी डी पी त लपवलेल्या पोटाचा विचार करीत दिवाळीचा फराळ हाणत होतो.
अपूर्ण … पुढे चालू ठेवता येईल अशी आशा …
भाग २
प्रतिक्रिया
4 Dec 2015 - 4:57 pm | कविता१९७८
हा हा हा , मस्त लिखाण
4 Dec 2015 - 5:04 pm | Anand More
:-)
4 Dec 2015 - 5:05 pm | टवाळ कार्टा
:)
4 Dec 2015 - 5:29 pm | Anand More
;)
4 Dec 2015 - 5:10 pm | नीलमोहर
काढा अजून फोटो :)
4 Dec 2015 - 5:13 pm | Anand More
जले पे नमक … जास्त मीठ खाल्ल्याने पण जाडा होतो मनुष्य
4 Dec 2015 - 5:17 pm | कपिलमुनी
तुमच्या ऑफिसमधल्या ख्रिसमस पार्टीला तुम्हाला सांता म्हणून उभे करणार
4 Dec 2015 - 5:22 pm | Anand More
नाही ते ख्रिसमस ट्री साठी शोधत होते
5 Dec 2015 - 9:40 pm | स्रुजा
हा हा हा.. दोन्ही भाग आवडले.
4 Dec 2015 - 5:17 pm | अजया
धमाल लिहिलंय! पुभाप्र.
4 Dec 2015 - 5:29 pm | Anand More
:-)
4 Dec 2015 - 5:24 pm | सस्नेह
जरा मोठे भाग चालतील.
4 Dec 2015 - 5:28 pm | Anand More
तुम्ही खूप धाडसी आहात
4 Dec 2015 - 6:08 pm | जातवेद
व्हॉट?
4 Dec 2015 - 7:10 pm | सस्नेह
तुमचा धागा आणि सर्व प्रतिसाद वाचले म्हणजे धाडसीच की ! ( ह घ्या)
बाकी, एडिट काय करायचे आहे ते व्यनि करू शकता.
व्यनि माहिती आहे का ?
4 Dec 2015 - 5:33 pm | खेडूत
4 Dec 2015 - 5:37 pm | Anand More
लक्ष बारीक आहे. इथे एडीट कसं करायचं ते काळात नाहीये. खेडूत मदत करतील काय?
4 Dec 2015 - 5:51 pm | चांदणे संदीप
एक मिपाकर...
सवा लाख बराबर!
अस काहीस आहे बघा, नजरेतून सुटण शक्यच नाही!
प्रत्यक्ष अनुभव हीच खात्री! ;-)
बाकी, सुटलेल्या पोटाची कहाणी(ण्या) येऊद्या अजून, मस्त आहे!
Sandy
4 Dec 2015 - 5:56 pm | Anand More
अहो मिपाकर जर मदत करा. भिडू नवीन आहे. एडीट कसं करायचं ते सांगा की राव. कुठल्या तरी धाग्याची लिंक तरी द्या. जंग जंग पछाडतोय मी. कसं करू एडीट ?
4 Dec 2015 - 6:06 pm | चांदणे संदीप
संपादकांना व्यनितून विनंती करावी लागेल दुरुस्तीसाठी.
4 Dec 2015 - 6:13 pm | Anand More
धन्यवाद
4 Dec 2015 - 6:09 pm | चांदणे संदीप
हे आणि हे वाचले का?
4 Dec 2015 - 6:14 pm | Anand More
पुनश्च धन्यवाद :-)
4 Dec 2015 - 6:03 pm | उगा काहितरीच
छान ! पुभाप्र ...
4 Dec 2015 - 6:14 pm | Anand More
:-)
4 Dec 2015 - 6:11 pm | पद्मावति
मस्तं लिहिलंय. पु.भा.प्र.
4 Dec 2015 - 6:14 pm | जातवेद
छांन लेखनशैली.
तुम्ही ज्युसाहारासाठी योग्य कॅंडिडेट आहात :)
(ऑफिस मधल्या पोरिंच्या (फोटोच्या) प्रतीक्षेत!
4 Dec 2015 - 6:19 pm | Anand More
बायको केवळ फेसबुकवर आणि मिपावरच नव्हे तर घरातही active आहे. आणि माझ्या फोनची तपासणी हे तिचे नैमित्तिक कार्य असल्याने सर्व महत्वाच्या गोष्टी नाशिवंत असतात.
4 Dec 2015 - 7:02 pm | जातवेद
काळजी घ्या.
सज्जनहो, बघताय ना कोनाडयाची गरज!
4 Dec 2015 - 6:17 pm | सुबोध खरे
पोटाचा प्रश्न सुटला कि सुटणाऱ्या पोटाचा प्रश्न चालू होतो.
सुटणाऱ्या पोटावर चढणारी चरबी हि सरकारी सबसिडी सारखी असते.
कमी करणे फार फार कठीण.
सुरेख लेख.
4 Dec 2015 - 6:22 pm | मी-सौरभ
आपण छान लिहिता :)
फक्त प्रत्येक प्रतिसादाला ऊपप्रतिसाद देणे टाळा.
4 Dec 2015 - 6:37 pm | Anand More
बरं … लक्षात ठेवीन. अरे चुकलो वाटतं
4 Dec 2015 - 6:26 pm | यशोधरा
मस्त लिहिलंय!
4 Dec 2015 - 6:33 pm | मित्रहो
पुढचे भाग येऊ द्या लवकर.
आम्हाला आम्हीच लिहिलेले सुटण्याचे प्रयोग आठवले.
4 Dec 2015 - 6:37 pm | कंजूस
इथे इतिहास अधुनमधून डोके वर काढतो हा फरक आहे इथला आणि फेसबुकातला.
बाकी ओफिसातल्या सर्व महिलांना मुली म्हणण्याचा प्रघात पाळलात त्यामुळे एक सोडून सर्वांना बरं वाटेल.where are all the girls? हा प्रश्न ऐकून मला अजूनही बुचकुळ्यात पडायला होतं ते त्याचं ग्रामर न कळल्याने.लिहित रहा, संपादक मागच्या गाडीने येतीलच इतक्यात.
4 Dec 2015 - 6:56 pm | पियुशा
वा सुटलेल्या ढेरीची कहाणी मोरे साब की ज़ुबानी येउ दया पु भा प्र
4 Dec 2015 - 7:42 pm | रेवती
लेखन आवडले.
4 Dec 2015 - 7:56 pm | दमामि
कहाणी आवडली.
4 Dec 2015 - 8:08 pm | बाबा योगिराज
लै म्हणजे लगे लैच जिव्हळ्याचा ईशाय हाय ह्यो....
कोनाडा कुठै??
चिंतातुर बाबा
5 Dec 2015 - 4:52 am | रातराणी
आवडल. पुभाप्र. :)
5 Dec 2015 - 10:41 am | बोका-ए-आझम
(गेली तीन वर्षे हाच प्राॅब्लेम असलेला) बोका-ए-आझम!
5 Dec 2015 - 10:56 am | रिम झिम
तेवढा, तुमचा तो फोटोपण टा़का ना...
(जाहिरात - आम्ही येथे लिहीतो)
7 Dec 2015 - 7:00 pm | सूड
वाह!!
8 Dec 2015 - 10:35 am | पैसा
खूप मजेशीर लिहिलंय!
8 Dec 2015 - 11:44 am | इशा१२३
+१
मस्त लिहिलय अगदि!