सुटलेल्या पोटाची कहाणी -१
ही सगळी कहाणी सुरु झाली दिवाळी पासून . मला कल्पनाच नव्हती की मी या कहाणीचा हिरो आहे म्हणून. म्हणून आधी सगळे अनुभव टिपून ठेवले नव्हते. त्यामुळे आता जसे तुकड्या तुकड्याने आठवतायत तसे लिहितो. जर दोन तुकड्या मधलं अंतर जास्त वाटलं तर खुशाल समजा की चाळीशीच्या उंबरठ्यावर असल्याने मध्ये मध्ये येणाऱ्या विरक्तीच्या झटक्याने, मी या सर्व उपद्व्यापातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असीन.
---------------
हा तर मी काय म्हणत होतो. २०१५ ची दिवाळी आली. ऑफिस मधल्या मुलींनी ऑफिस सजवायचा घाट घातला. त्यांचा उत्साह पाहून मी देखील हो म्हटलं. पोरींनी छान सजवलं ऑफिस. मी पण खूष झालो. त्यांच्या कामगिरीचे फोटो बिटो काढले आणि मग सरांबरोबर फोटो काढूया अशी कल्पना एकीच्या सुपीक डोक्यातून निघाली. (डोके नेहमी सुपीकच का असते कुणास ठावूक? एकही नापीक, दुष्काळी, गेला बाजार कोरडवाहू वगैरे का नसावे ? असो इथे कंस थांबवतो, उगाच तुम्हाला माझ्या डोक्याला कुठली विशेषणे द्यायची त्याची यादी मीच करून द्यायला नको) दिवाळीच्या आनंदाच्या भरात मी देखील या कल्पनेला हो म्हणून, फोटो काढायला मागे उभ्या असलेल्या या मुलींसमोर बसलो. आणि घात झाला. “जे न देखे रवी ते देखे कवी”, च्या चालीवर मला नवीन साक्षात्कार झाला. "जे न दाखवी आरसा ते ठळकपणे दाखवी कँमेरा फोनचा".
इतके दिवस माझ्या नाकाखाली, माझ्या नकळत, सुगरण बायकोने (ती इथे आणि फेसबुकवर आहे. चांगली active आहे. त्यामुळे ती सुगरण आहे इतकंच सत्य मी उघड करू शकतो) बनवलेल्या आणि अंमळ जास्तच आवडीने खालेल्ल्या सर्व अन्नामुळे, मी कमावलेल्या आणि एकही गोष्ट वाया न घालवण्याच्या मध्यमवर्गीय मानसिकतेने वाचवून ठेवलेल्या कॅलरीज, चरबीच्या रूपाने माझ्या मूळच्या सपाट पोटावर घेराव देऊन बसल्या होत्या. पोरी फोटो बघून खूष झाल्या. त्यांच्या खुशीचे कारण त्यांचे छान आलेले फोटो की सरांपेक्षा आपण कित्ती बारीक आहोत याचा स्क्रीनवर दिसणारा पुरावा होता, हे मला अजून कळले नाही. आणि मग सुपीक डोक्याच्या मुलीच्या डोक्यातून अजून एक पीक निघाले की ऑफिस च्या whatsapp ग्रुप ला हा फोटो डी पी म्हणून ठेवायचा. मी कसनुसा हसत होकार दिला. झुक्या बाबाने whatsapp घेतल्यावर डी पी क्रॉप करायची सोय काढली नाही म्हणून त्याचे आभार मानत केवळ हसरा चेहरा दिसेल इतपत फोटो ठेवून बाकीचा अनावश्यक सत्याचा भाग कापून, ऑफिस मध्ये दिवाळी साजरी केली.
घरी यंदा बायकोने फराळाचे वेगवेगळे १२ पदार्थ केलेले असल्याने आणि मी आज्ञाधारक नवरा असल्याने गपचूप सर्व पदार्थ खावेच लागले. त्यात पुन्हा आमच्या सोसायटीतले शेजारी अजूनही फराळ देण्याघेण्याच्या गतकालीन सवयी मोडायला तयार नसल्याने, पदार्थांची संख्या वाढली नसली तरी खाण्याचे प्रमाण वाढले.
मी डी पी त लपवलेल्या पोटाचा विचार करीत दिवाळीचा फराळ हाणत होतो.
अपूर्ण … पुढे चालू ठेवता येईल अशी आशा …
भाग २
- सुटलेल्या पोटाची कहाणी -२
- सुटलेल्या पोटाची कहाणी -३
- सुटलेल्या पोटाची कहाणी -४
- सुटलेल्या पोटाची कहाणी -५
प्रतिक्रिया
हा हा हा , मस्त लिखाण
:-)
:)
;)
ही ही !!
जले पे नमक … जास्त मीठ
सांताक्लॉज
ख्रिसमस ट्री
हा हा हा.. दोन्ही भाग आवडले.
धमाल लिहिलंय! पुभाप्र.
:-)
खुसखुशीत !
तुम्ही खूप धाडसी आहात
व्हॉट?
हो ना !
(ती इथे फेसबुकवर आहे...
लक्ष बारीक आहे. इथे एडीट कसं
एक मिपाकर...
अहो मिपाकर जर मदत करा. भिडू
ते शक्य नाही!
धन्यवाद
हे वाचा
पुनश्च धन्यवाद :-)
छान ! पुभाप्र ...
:-)
मस्तं लिहिलंय. पु.भा.प्र.
छांन लेखनशैली.
बायको केवळ फेसबुकवर आणि
हम्म
पोटाचा प्रश्न सुटला कि
मस्त सुरवात
बरं … लक्षात ठेवीन. अरे चुकलो
मस्त लिहिलंय!
लेख आवडला
इथे इतिहास अधुनमधून डोके वर
वा सुटलेल्या ढेरीची कहाणी
लेखन आवडले.
कहाणी आवडली.
जमळ णा...
आवडल. पुभाप्र. :)
वा वा! पुभाप्र!
तेवढा ..
वाह!!
मजेशीर!
+१ मस्त लिहिलय अगदि!