*वाईट 'इमोशनल' फजिती*
नेहमी प्रमाणे मे महिन्यात अलिबाग इसटी ने आक्षीला चाल्लेलो, पुण्यात बसून लोणावळा घाटापर्यंत आली बस, मी रीझर्वेषन केले नसल्यानी ड्राईव्हर च्या बाजूच्या त्या 'न' असलेल्या 'शीटा' वर बसलेलो, अचानक स्पीडोमीटरच्या बाजूचा एक लोखंडी पत्रा थडथड वाजायला लागला, वाफ येत होती… जारावेळनी कुकरची शिटी उडावी तसा कायतरी प्रकार झाला, एसटी थांबवली ऐन घाटात, कंडक्टरसाहेब हातात एसटीतच ठेवलेला एक दगड घेऊन बाहेर उतरले, एकूणच बहुतांश प्रवाशांची फाटली होती, कारण हे अनुभवणारे निदान अर्धे लोक तरी एसटी मध्ये असावेत!