पुरस्कार परत करण्याचा आनंद मिळाला नाही ही खंत!
सायंकालची वेळ. दरवाजा उघडून बाईंनी बाबारावांना आत घेतले. हुप्प चेहरा पाहून काहीतरी बिनसले आहे हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. नातवंडाला घेऊन त्याचा डॅड परतला. एका हातात चॉकलेट अन दुसऱ्या हाताने मोबाईलवरील कार्टून पाहात त्याने शूज उतरवले.
‘चार्वाकवादावरचा लेख पेपरात आल्याने सकाळी उसाही दिसणारे बाबाराव आत्ता रुसलेले का?’ असा मुलाने हात करून आईला प्रश्न केला. ‘काय की’ म्हणून त्यांनी तोंड फिरवले.
‘काय रे, ते शूज रॅकवर कोण ठेवणार? तुझा बाप?’ बाबारावांचा नातवावर राग निघाला.
‘काय झाले?’ म्हणत सुनबाईने रागरंग ताडला. पुर्वी मोठा एक पुरस्कार थोडक्यात हुकला म्हणून नातवावर असाच रागराग केलेला तिला आठवत होता.
‘मी इतरांप्रमाणे तेंव्हा लॉबीइंग केले नाही म्हणून माझे नाव बारगळले आणि आयुष्यातील एक मोठी संधी गमवायची वेळ आली. आता इतकी झकास आमची लॉबी तयार असताना मला पुरस्कार परत करायची संधी गमावायला लागतेय याचे वैषम्य वाटते.’ चहाचा कप हाती आल्यावर पत्नीसमोर मन मोकळे करत बाबाराव म्हणाले. ‘काय चर्चा रंगतायत पेपरात अन टीव्हीवर! असा ताव कित्येक वर्षात आम्हाला आला नव्हता!’ मला ही असेच ते पुरस्कार परत करून वर आम्हा बुद्धिवादी साहित्यिकांवरील होणाऱ्या कुचंबणेला वाचा फोडताना प्रत्येक चॅनेलवर बोलावणे आले असते. ही गळचेपी कदापिही सहन केली जाणार नाही असे मला ठासून सांगता सांगता पुरेवाट झाली असती.’ पत्नीसमोर जागतिक किर्तीच्या विचारकांनी उसासा टाकला!
टीव्हीवरील चॅनेल लागेपर्यंत चाळा म्हणून मुलाने लोकसत्ता पेपर उघडला मात्र...
...‘फेकून दे तो पेपर आजचा. ज्यांच्या खांद्यावर आम्ही अभिमानाने मान ठेवली, ते आता आम्हालाच नावे ठेवत अग्रलेख लिहितायत काय? आम्ही वावदुक काय? हो, आम्हाला सध्याचे सरकार स्वबळावर सत्तेवर आल्याचे दुःख आहे. आणीबाणीपेक्षा परिस्थिती गंभीर आहे असे म्हणणारे आम्ही बोलघेवडे, दांभिक काय?' बाबारावांनी आवाज चढवला.
बाहेर बागेतील जमलेल्यांमधून ‘नमस्ते सदा वत्सले'... चालू झालेले वाटताच, चिरंजिवांनी खिडकीचे शटर पुर्ण बंद करून घेतले. तरीही बारीक आवाजात गीत चालूच होते... !!!
प्रतिक्रिया
30 Oct 2015 - 8:10 pm | आनन्दा
हम्म.. बर्याच अंशी खरे आहे हे.
30 Oct 2015 - 8:17 pm | चित्रगुप्त
थोडक्यात खूप काही सांगून जाणारा लेख.
हे पुरस्कार वगैरे हमखास मिळवून देणारे एजंट आहेत दुकान उघडून बसलेले. त्यामुळे त्यात विशेष असे काही नाही . पुरस्काराबरोबर मिळालेली रक्कम सरकारजमा केली का, हे समजले नाही .
31 Oct 2015 - 1:27 am | उगा काहितरीच
हे महत्त्वाचे ! बाकी व्याज पण द्यावे की काय ?
31 Oct 2015 - 1:36 am | चित्रगुप्त
कीप द चेंज. ऐश करलो.
1 Nov 2015 - 11:53 pm | शशिकांत ओक
चित्रगुप्त,
आपण म्हणता ते खरे आहे...
लोकसत्तेतील अग्रलेख आणखी बरेच सांगून जातो. आपणास किंवा इथल्या अनेकांना तो वाचायला मिळालेला दिसत नाही.म्हणून त्यातील काही ठळक उतारे देतो. त्यात अनेकांची नावे देखील घेतल्याने त्याचे विशेष महत्व.
"...गजेंद्र सिंग चौहान या अगदीच दुय्यमाच्या हाती या संस्थेची सूत्रे दिली म्हणून विद्यार्थी नाराज होते. हे कारण पूर्णसत्य नाही. म्हणजे चौहान हे दुय्यम आहेत हे सत्य. परंतु म्हणून विद्यार्थी नाराज होते, हे असत्य. चौहान हे गुणवंत नाहीत म्हणून आपण आंदोलन करीत आहोत, हे त्यांचे म्हणणे खरे मानले तर मोहन आगाशे हे संस्थेच्या प्रमुखपदी असतानाही या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते, ते का, असे विचारावे लागेल!...
...इतके दिवस डाव्यांची मक्तेदारी असलेली ही संस्थाही आपल्या हातून जाणार ही भीती या आंदोलनामागील खरे कारण. अत्यंत संरक्षित आणि सवलतीच्या वातावरणात राहणाऱ्या या संस्थेच्या विद्यार्थ्यांचे अन्य उद्योग हा नेहमीच चच्रेचा विषय राहिलेला आहे. तेव्हा या उद्दाम आणि काहीही सिद्ध न करता उगाच कलात्मक माज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकारने भीक घातली नाही, ते योग्यच केले. या विद्यार्थ्यांनी वाटेल ते करून बघितले. उपोषणाचे नाटकही केले. परंतु सरकार बधले नाही...
... कारकीर्दीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावरचे १४० दिवस वाया घालवून आपण काय मिळवले, काय शौर्य गाजवले आणि त्यातून काय साध्य झाले याचा विचार या विद्यार्थ्यांनी नाही तरी त्यांचे शुल्क भरणाऱ्यांनी तरी करावा.... तसा तो करण्याची गरज आनंद पटवर्धन आदींना असावयाचे कारण नाही. चित्रपट क्षेत्राशी संबंधित अशा १३ जणांनी बुधवारी आपल्या पुरस्कार -वापसीची घोषणा केली. पटवर्धन हेदेखील त्यात होते. व्यवस्थेचे सर्व फायदे मिळवत व्यवस्थेच्या विरोधात सतत छाती पिटणाऱ्यांतील ते एक आघाडीचे नाव...
... नरेंद्र दाभोलकर वा कलबुर्गी वा पानसरे यांच्या हत्यांची. यातील पानसरे यांची हत्या वगळता अन्य दोघे जण मारले गेले ते काँग्रेसच्या राज्यांत. या तिघांच्या हत्यांची चौकशी होऊ नये वा झाली तर सत्य गवसू नये यासाठी केंद्राकडून काही दबाव येत असेल तर तसेही नाही. तरीही हे सर्व आचार-विचार स्वातंत्र्याचा गळा घोटला जात असल्याबद्दल रडगाणे गाणार, हे सर्वच अजब...
... वास्तविक हे गळाकाढू ... कलबुर्गी वा दाभोलकर वा पानसरे हे िहदू धर्मापुढे मुळी आव्हान म्हणून अगदीच किरकोळ होते, असे मानावे लागेल. या धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरांवर आंबेडकर ते सावरकर ते कुरुंदकर अशा अनेकांनी याही आधी किती तरी कठोर प्रहार केले आहेत वा चळवळी केल्या आहेत. त्या तुलनेत पानसरे वा दाभोलकर यांची आंदोलने व्यवस्थेच्या कडेकडेनेच चालली..."
वरील धागा यावरून लिहावासा वाटला...
30 Oct 2015 - 9:27 pm | पैसा
:) :D
31 Oct 2015 - 4:44 am | कवितानागेश
:-ड
31 Oct 2015 - 6:19 am | कंजूस
अगोदर पुरस्कार तर मिळू दे मग परत करून दाखवतोच.दक्ष राहून काही मिळालं नाही आराम करून मिळतं का पहातो.
मस्त आहे.
1 Nov 2015 - 4:53 pm | शशिकांत ओक
पुरस्कार परतीच्या टपालाची पाकिटे अजून उघडली देखील नाहीत... घाई काय आहे... आणखी कोणाला सुरसुरी आली तर... म्हणून म्हणे...
2 Nov 2015 - 8:11 am | मंदार कात्रे
देशातील असहिष्णू वातावरणामुळे व्यथित होऊन महर्षी वाल्मीकी आणि महर्षी व्यास या ऋषींनी देखील त्यांची महर्षी ही पदवी परत देण्याचे ठरवले होते परंतु तसे केल्य़ास, आपण एका झटक्यात कॉग्रेसचे भाट, हिंदुद्रोही आणि सुमार दर्जाचे लेखक ठरू शकतो याची जाणीव झाल्यामुळे आणि विशेष म्हणजे या कृतीने 'रामायण' आणि 'महाभारत' ही पवित्र, मंगल महाकाव्ये क्षणार्धात छचौर दर्जाचे साहित्य म्हणून जाहीर होण्याची दाट शक्यता असल्यामुळे मुन्नवर राणांकडून प्रेरणा घेऊन पुरस्कारवापसीचा निर्णय त्यांनी वापस घेतला असल्याचे उडत उडत कानी आल्याचे ऐकिवात असल्याचे संदिग्ध सुत्राकडून समजल्याचे वृत्त आहे.
Source- Elsewhere
2 Nov 2015 - 8:44 am | मारवा
साहीत्यीक ज्यांनी पुरस्कार परत केले.
ते आर्थिक द्रुष्ट्या काही फार बलवान नाहीत इतर उद्योगपतीं वगैरे सारखे.
त्यांच्या संघटना असल्याच तर प्रभाव टाकावा एखादा मोठा काही क्रांतीकारी बदल करावा अशा पण नाहीत.
राजकीय पक्षांसारखी मसल पॉवर नाही जी विरोध करु शकते
अस कुठलही ग्रेट पॉवरफुल इफेक्टीव्ह साहित्यीकांकडे काहीच नाही.
मग आहे ते काय फक्त एक स्वतःच्या विचार साहीत्यातुन निर्माण केलेली नैतिक प्रतिष्ठा वजन.
त्याला पणाला लाबुन त्यांनी काय केल फक्त तेवढच एक जे ते करु शकतात पुरस्कार परत करुन निषेध व्यक्त केला.
आणि काय झोंबलय ते काय झोंबलय कीती आतपर्यंत जखम झालीय.
आणि विरोध करावा तर ते राजकीय पक्ष नाही सवलती बंद कराव्या तर ते उद्योगपती नाहीत राडा करावा तर ते गुंड ही नाहीत
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दुर्लक्ष करावं तर ते शक्य नाही.
हिंदी चित्रपटांतले संवाद नेहमीच मुद्दा स्पष्ट करण्यासाठी उपयुक्त याहुन सुंदर साधन नाही म्हणुन दोन डायलॉग
तुम्हे आरक्षण से डर लगता है हा भेदक डायलॉग बदलुन तुम्ही लेखको से डर लगता है
आणि त्यावर सुहागा म्हणजे अक्षय कुमार हात बांधलेला मार खाल्लेला ज्या क्लास स्टाईल ने व्हीलन ला म्हणतो.
ये जो डर है
य जो डर हे तुम्हारे मनमे मुझे अच्छा लगता है. ये डर होना चाहीए हा हा हा हा
2 Nov 2015 - 9:17 am | मारवा
मुळ डायलॉग तुम्हे कॉम्पीटीशन से डर लगता है असा होता.
पण गंमत म्हणजे वरचा चुकलेला आरक्षण से डर लगता है पण चपखल बसतो
मात्र धार जरा बोथट होतेय
शिवाय तो पुरेसा फिल्मी वाटणार नाही.
2 Nov 2015 - 1:52 pm | शशिकांत ओक
मित्रा,
आरक्षण आणि कॉम्पिटिशन हा आरसा आहे. किंवा प्रश्नांची डावी उजवी बाजू आहे असे मानले तर आपले दोन्ही प्रतिसाद योग्यच आहेत.
2 Nov 2015 - 10:48 am | चिरोटा
पुरस्कार एवढे परत केले जात आहेत की लेखकांना टी.व्ही.वर येण्यापेक्षा "OLX" पे बेच दे म्हणायची वेळ आलीय.
2 Nov 2015 - 10:05 pm | शशिकांत ओक
तिथेही शक्य झाले नाही तर? बोह__ ... जाऊ दे... देणारे ठरवतील...
12 Nov 2016 - 12:53 am | शशिकांत ओक
कालांतराने मिपाकरांच्या संपर्कात आल्यावर आधी काय काय सादर केले होते ते पाहताना नव्या सदस्यांसाठी धागे उपसून वर काढतोय. राग नसावा.
16 Mar 2021 - 8:56 pm | शशिकांत ओक
वाचून या धाग्याची उगीचच आठवण झाली...कदाचित त्यांची केस तशी नसेल ही...