गेले आठ दिवस ऑफिसात शीतयुद्ध सुरु आहे. एच्चारने बारीकसारीक खुसपटे काढून फतवे काढून मला पिडायचे आणि मी शक्य तितक्या विणम्रतेने फतव्यांची अंमलबजावणी करायची किंवा ऑफिशियल भाषेत आदबशीर उत्तरे द्यायची. आज तर हायला, कहरच झाला ! उन्हातून धावतपळत बस पकडून खुर्चीवर येऊन बसते न बसते तोवर टेबलावर प्रेमपत्र हजर !
‘गेल्या आठवड्यात सहापैकी तीन दिवस तुम्ही किमान वीस मिनिटे लेट आलात अशा नोंदी थंब मशीनने दर्शित केल्या आहेत. याबाबत आपणास सूचना देणेत येते की इत;पर आपण कार्यालयात निर्धारित वेळेत हजर राहावे अन्यथा....’ इ.इ.
कालच एच्चारवाल्याचे पाचवे लौलेटर वाचून डोके भंजाळलेले तोवर आज आणि हे ? ऐला, संध्याकाळी टाईम संपून गेला तरी वर्क अर्जन्सी बघून न सांगता आठाठ वाजेतो मरमर काम करायचे आणि सकाळी दहा मिनिटं उशीर झाला तर लगेच लेटर ?
आता मात्र माझी सटकली !!
दहा मिनिटे दम खाल्ला. एक ग्लास पाणी प्याले. एसीच्या थंड हवेत डोके गार केले आणि मग विचार केला.
केला !! पक्का विचार केला आणि उठले. एच्चारवाल्या मुथ्थुस्वामीच्या केबिनचा दरवाजा धाडकन उघडला आणि आत गेले. खुर्चीवर बसलेले दोघे आणि खुद्द मुथ्थुस्वामीसाहेब टाण्णकन उडाले.
‘हौ यु डेअर टू कमिण्ण विदौट्ट माय पर्मिशण्ण ??’ मुथ्थुस्वामी अँग्री ओल्ड मॅन.
‘आयम गोइंग टू डेअर मच मोर दॅन दॅट मि. मुत्तू !’ मी अँग्री यंग वूमन.
‘मुत्तू..???’ यु सेड मी मुत्तू ?’ मुथ्थुस्वामीचे गटाणे डोळे खोबणीच्या बाहेर आले. पण मी बिलकुल लक्ष दिले नाही. मेरेकू उससे भी जादा आखे निकालनेकू आता हय !
‘व्हॉट इज धिस, मुत्तू ?’ मी लौलेटर टेबलावर आदळले.
‘हॅव यू युवरसेल्फ एव्हर कम बिफोर एलेव्हन ? देन हौ यू डेअर टु गिव्ह मी धिस लेटर ? सी, आयम नॉट हिअर टू अॅ न्सर फूलिश थिंग्ज लाईक धिस बट टु वर्क फॉर दि कंपनी अॅदट माय बेस्ट. सो आय डोंट नीड इट. यू मे टेक धिस फॉर युवरसेल्फ अँड कीप इन सेफ कस्टडी बिफोर आय कम्ल्पेन इन लेबर सेक्शन !
इज इट क्लिअर मि, मुत्तू ?’
मुत्तूला हार्ट अॅ टॅकच यायचा बाकी राहिला. मी शांतपणे त्याच्या खुर्चीजवळ गेले. त्याची मद्राशी टोपी उचलून ते लौलेटर त्याच्या टकलावर विळखा घालून बसलेल्या शेंडीवर ठेवले आणि परत त्यावर टोपी ठेवून मी एक थापटी दिली. मग मी टेबलवरची पाण्याची बाटली उचलली आणि टोपण काढून शांतपणे मुत्तूच्या डोक्यावर उलटी केली.
मग मी धीरोदात्तपणे पावले टाकत केबिनच्या दारापाशी गेले आणि एका हाताने ते उघडून पुन्हा म्हणाले,
‘आय होप, यू विल नॉट ट्राय टू प्ले धिस डर्टी गेम विथ एनी ऑफ दि इन्नोसंट एम्प्लॉयीज एव्हर आफ्टर धिस !!’
..आणि शांतपणे बाहेर पडले.
इतके झाल्यावर ऐला, काम करायचा मूडच गेला ! मी धीरोदात्तपणे टेबल आवरले, पर्स खाकोटीला मारली आणि कँटीनात जाऊन एक कप कॉफी ढोसली. मग ऑफिसात परत यायच्या भानगडीत न पडता सरळ घरी गेले आणि तण्णावून दिली.
दुसऱ्या दिवशी आज ऑफिसात जावे की नाही याचा मी गंभीरपणे विचार करत असतानाच बेल जोरजोरात वाजली.
दर उघडले तर खुद्द कंपनीचे एमडी दारात उभे !
‘सर, आपण आत्ता ?’ मी विनम्रपणे. ‘या ना आत !’
एमडी आत येऊन घाम पुसत खुर्चीवर टेकले.
‘मॅडम, काल जो प्रकार झाला त्याबद्दल मी पर्सनली दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही कंपनीच्या कार्यक्षम कर्मचारी आहात आणि आजपर्यंतच्या कंपनीच्या उत्कर्षात कर्मचारी या नात्याने उत्कृष्ट योगदान दिले आहे. कंपनीला तुमच्या कामाची कदर आहे, गरज आहे. कालच्यासारखा प्रकार पुन्हा होणार नाही आणि श्री मुथ्थुस्वामी यांना याबाबत समज दिली आहे. तुम्ही आज कामावर यायला हरकत नाही, प्लीज.’
‘’इट’स माय प्लेजर सर. आपण विनंती करणे हा आपला मोठेपणा आहे, पण याची गरज नव्हती. आपल्याला जाणीव आहे, यातच आम्हा कर्मचाऱ्यांचे समाधान आहे. ‘
आणि मी एमडीच्या गाडीतून त्यांच्याबरोबर सन्मानाने ऑफिसात प्रयाण केले !
हा:हा:हा: ! कसा वाटला किस्सा ?
तुम्ही नक्कीच म्हणत असाल, माझा वरचा मजला रिकामा झालाय किंवा केमिकल लोच्या झालाय.
तसं काही नाही लोक्सहो !
काय्येना, की कधी कधी लंच झाल्यावर मॉनिटरसमोर बसलं, की डोळे असे अर्धवट अधोमुख होतात आणि अशी स्वर्गीय दृश्ये मन:पटलावर रेंगाळत राहतात.
सो हे जे वरती लिहिलंय ना, वो तो है अपना सपना फनी फनी !!!
प्रत्यक्षात येउदे नै तर नै, एक आपलं तुम्हाला थाप मारायला काय हरकत आहे, असं झालं म्हणून ? काय ?
नाही, म्हणजे थोर्थोर संत मंडळीसुद्धा ढाका लावतात,
‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी...’
फिर अपन क्यू पीछे रैनेका ?
......तुमचंपण असं काही स्वप्न आहे का ? सांगा की हो मग ! लावा मस्त थाप !
(अनाहितामध्ये पूर्वप्रसिद्ध)
प्रतिक्रिया
29 Oct 2015 - 12:12 pm | अभ्या..
अगागागागा. फुल्टॉस चक्क.
म्या जरा स्वप्नात रंग भरले की लिहितो हं. सध्या स्केचिंग चालूय.
29 Oct 2015 - 12:17 pm | द-बाहुबली
टायटलचा कथानकाशी फारच विनोदी संबंध जोडला आहे. आपल्या विनोद्बुध्दीचे विषेश कौतुक.
खिक्क...!
30 Oct 2015 - 3:19 pm | जातवेद
अच्च नाय कलायच्च
30 Oct 2015 - 3:23 pm | सस्नेह
का हो ? स्वप्नं बघायला तुम्हाला नाही का आवडत ? =)
30 Oct 2015 - 3:40 pm | जातवेद
अस्मादिकांचे दर वर्षी बॉस बदलत असल्यामुळे अशी स्वप्नं बरीच पाहिली. आणि त्यातली बरीच सत्यातपण उतरवली :) काही लोक्स स्वप्नं सत्यात उतरवल्यामुळेच बॉस दरवर्षी बदलतात असे पण म्हणतात =)
29 Oct 2015 - 1:05 pm | प्यारे१
खिक्क्क्क्.
29 Oct 2015 - 1:13 pm | चाणक्य
भारी है तुम्हारा सपना.
29 Oct 2015 - 1:19 pm | चांदणे संदीप
वरडा!!
लई भारी!
29 Oct 2015 - 1:27 pm | प्रभाकर पेठकर
तुमचे स्वप्न सत्यात उतरो एव्हढी त्या जगन्नियत्याच्या चरणी प्रार्थना.
29 Oct 2015 - 1:57 pm | मित्रहो
मजा आली वाचताना
मागे कुठेतरी वाचले होते. तिथे बॉसचा पुतळा बनवून बेसमेंटमधे ठेवला असतो. कर्मचाऱ्याला बॉसचा भयंकर राग आला की जायचे आणि पुतळ्याला बदडून काढायचे. सारा राग शांत होत पर्यंत तसेच करायचे. राग शांत झाला की परत काम जोमाने सुरु. मुंगी उडाली आकाशी ........
29 Oct 2015 - 2:29 pm | टवाळ कार्टा
स्वस्तात सोडला =))
29 Oct 2015 - 3:04 pm | मदनबाण
स्वप्न आहे म्हणुन चांगले आहे, रिसेशन जवळ आले की कंपन्या अश्या पॉलिसीज अंमलात आणतात, एचपीने हल्लीच हा उध्योग केल्याचे वाचले आहे,तसेच ९० दिवसांचा बेंच पिरेडची मर्यादा देखील घातली जाते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Truly Madly
Deeply :- Savage Garden
29 Oct 2015 - 3:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारी !
म्हणूनच म्हणतात की, "जेव्हा तुम्हाला नोकरीची गरज नसते तेव्हाच तुम्ही नोकरीची मजा घेऊ शकता !"
29 Oct 2015 - 3:13 pm | अरुण मनोहर
कथा आवडली.
29 Oct 2015 - 4:16 pm | तुषार काळभोर
असेच असतात का?
मला कधीतरी एकेकाला बदडायची लहर येते. मग मी ड्रॉअरमधून माझा ५०-५० नायतर मोनॅकोचा पुडा काढतो, पॅण्ट्रीत जाऊन ग्लासभर पाणी घेतो आणि तो पुडा संपवतो. (पॅण्ट्रीचा मशिनमधला चहा भिक्कारडा असतो. त्यापेक्षा पाण्यात बिस्कीटं बुडवून खाल्लेली चांगली!)
29 Oct 2015 - 4:36 pm | नीलमोहर
काय ताई, अपेक्षाभंग केलात. :(
लेखाच्या शेवटपर्यंत मी म्हणत होते हे स्वप्न नसू दे, सत्य असू दे..
काश ऐसा भी कभी हो,
पण नाही..
अशी हजारो स्वप्नं मनात जन्मतात आणि तिथेच मान टाकतात.
मला मात्र स्वप्नात राजीनामा दिल्यानंतर होणारा आनंदच दिसतो नेहमी.
आजच महिन्यातल्या ६व्या लेटमार्कचा ठप्पा पाहिला.
क्लायंट कडे लाखो रूपये अडकलेले असतात ते वसूल करणार नाहीत,
पण ज्यांच्या जीवावर ते लाखो रूपये कमवतात त्यांचे मात्र लेटमार्कचे पैसे कापणार
तुंबडीभरू लोक ##%@*&!!@#
29 Oct 2015 - 6:48 pm | दिपक.कुवेत
काश ये सच होता!!! माझा बॉस पण मल्लू आहे.....रीझाईन केलं की एक दिवस त्याला आणि फाईनांस मॅनेजर दोघांना घोंगडी मार द्यायचा प्लॅन आहे. पार बुकलून काढायचा आहेत दोघांना. देव करो आणि तो सुदिन लवकरच येवो.
29 Oct 2015 - 7:36 pm | प्यारे१
>>> घोंगडी मार द्यायचा प्लॅन
माझ्याकडून घोंगडी स्पॉन्सर करण्यात येईल. ;)
29 Oct 2015 - 7:47 pm | तर्राट जोकर
माझ्याकडून मार... ;-))
30 Oct 2015 - 4:56 pm | रंगासेठ
हा हा हा
29 Oct 2015 - 8:02 pm | प्रसाद गोडबोले
एकच नंबर लिहिले आहे !
आमचेही मधल्या काळात आमच्या बॉसशी खरेखुरे भांडण झाले होते ... मग वाद मिटवायला दोन डायरेक्टर स्वतः पुण्याला येवुन अस्मादिकांना भेटले होते ! हे स्वप्न नाही ... अगदी खरे खुरे घडलेली घटना आहे !
( अर्थात ह्या वर्षाचे अप्रेजल व्हायले आहे अजुन , डिसेंबरनंतर कळेल प्रमोशन होणार आहे की नवीन नोकरी शोधायची ते ;) =)) )!
29 Oct 2015 - 8:14 pm | टवाळ कार्टा
बॉस होता का होती? =))
29 Oct 2015 - 8:18 pm | प्रसाद गोडबोले
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
आमच्या डायरेक्ट हेयरार्की मधे फक्त एकच बॉसीण आहे की जी आम्हाला सीनीयर आहे - सी ई ओ एम डी =))))
29 Oct 2015 - 9:12 pm | प्रचेतस
लिखाण नेहमीप्रमाणेच खुसखुशीत.
29 Oct 2015 - 9:30 pm | याॅर्कर
खॅ.खॅ.खॅ
30 Oct 2015 - 8:24 am | रातराणी
:)
30 Oct 2015 - 8:37 am | निनाद
ते पाण्याची बाटली प्रकरण नसते तर खरे मानून चाललो असतो.
सात आठ वर्षांपुर्वी 'माईंड युअर लँग्वेज अँड डोन्ट टॉक टू मी अगेन लाईक धिस अगैन एव्हर'
असे मी माझ्या डोळ्यासमोर बॉसला एंप्लोयीने झापताना पाहिले आहे.
मागच्या पंधरवड्यापुर्वी एकजण सोडून जाताना
- 'यु अँड युअर रबिश प्रोसिजर्स हॅव क्रियेटेड धिस मेस' असे सुनावून गेला आहे. :)
वाजवणारे लोक अस्तित्त्वात असतात...
30 Oct 2015 - 8:58 am | एस
:-)
30 Oct 2015 - 1:42 pm | जव्हेरगंज
आवदस्ड्द्ममस्तदस्ड्द्ममसवदस्ड्द्ममवदस्ड्द्मम
माझंही असच एक स्वप्नं लिहिलं होतं.
http://www.misalpav.com/node/33070
30 Oct 2015 - 8:25 pm | पियुशा
लै भारी ,विनोदी खुसखुशीत स्वप्न रंजन आवडले बर का
31 Oct 2015 - 12:09 am | शिव कन्या
खमंग लिवलंय . आवडेश .
9 Nov 2015 - 11:50 am | सिरुसेरि
+१ . मुंगेरीलाल के हसीन सपने .