पर्सनल स्टाईल ब्लॉग

रसिकामहाबळ's picture
रसिकामहाबळ in जनातलं, मनातलं
12 Jan 2016 - 8:22 pm

सकाळी उठून कपाटातील कपड्यांकडे 'आज काय घालाव' असा विचार करत तुम्ही बराच वेळ उभे राहिले आहात? काही गोष्टी चढवून न आवडल्याने ३-४ वेळा बदलाबदली केली आहे? मी अस बऱ्याच वेळा केल आहे. माझ्या मते तुमच्या पैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असणार आहे.

पर्सनल स्टाईल ब्लॉग काय असतो?

लोक त्यांचे फोटो ब्लॉगवर पोस्ट करून त्या वस्तू कुठून घेतल्या आहेत ह्याची माहिती पुरवतात, ही माहिती मग इतर चौकस मंडळी वापरू शकतात. स्टाईल ब्लॉग्स कपडे लत्ते वगैरे अश्या अमूर्त म्हणवल्या जाणाऱ्या मूर्त गोष्टींबद्दल असतात.

आपण काय घालतो ह्याने कोणालाही फरक पडत नाही, मग त्याकरता वेळ का घालवा?

ड्रेस, शूज, नविन हेअरकट, दागिने ह्या तर फार क्षुल्लक गोष्टी आहेत, खरे बघता त्याने आयुष्यात काहीच फरक पडायला नको कारण लोक म्हणतात आपल्या बाह्य स्वरूपास नव्हे तर आपल्या आतील सौदर्याचे जास्त महत्त्व असते. पण आपली वेषभूषासुध्दा आपली एकाप्रकारे ओळख देत नसते का?

प्रामाणिकपणे सांगायच झाल तर प्रत्येक मुलीला कपडे, शूज ह्यात नेहमीच रस असतो!

मी स्टाईल मासिक का वाचायला लागले?

उपरोधिक वाटेल पण कुठल्याही दिवशी कपड्यांवर विचार वा वेळ दवडण्याची मला काडीमात्र ईच्छा नसते. पोषाखी नसलं तरी निटनिटके व टापटिप रहायला मात्र मला नक्कीच आवडते. असे अनेक वेळा घडले आहे की मी आणलेले कपडे तसेच पडून राहिलेत कारण कधी ते माझ्याकडील असलेल्या कुठल्याच वस्तूवर चांगले दिसले नाहीत किंवा बऱ्याचदा ते कशावर चांगले दिसतील हे मला कळाले नाही. तेव्हा मला वाटले की किती बरे होईल जर मला कोणि कशावर काय चांगले दिसत, ते कुठून आणायच, किती निरनिराळ्या प्रकारे वापरायच अश्या युक्त्या रोज दिल्यात. म्हणून मग मी स्टाईलची मासिक व ब्लॉग्स बघायला सुरुवात केली.

मी पर्सनल स्टाईल ब्लॉग का सुरु केला?

निर्मितीमधून मला जास्त आनंद मिळत असल्याने मी काय उपभोगल त्यावर एक ब्लॉग सुरु केला! मला वाटल माझ्यासारखे अजून बरेच जण 'काय घ्याव, काय घालाव' अश्या गोंधळातून गेले असतील.

मी तो डेव्हिल नाही जी प्राडा घालते, लुई व्ह्टोन बाळगून मी विधानं करत नाही, मी स्टाईलिस्ट नाही किंवा माझ्या ब्लॉगकरता मला पैसेही मिळत नाही, मग माझा स्टाईल ब्लॉग तुम्ही का बघावा? कारण मग मी तुमच्यासारखीच आहे म्हणून…

माझ्या स्टाईल ब्लॉग मधे वेगळ काय आहे?

माझी स्टाईल खूप साधी आहे, मला खूप दागिने, वेशभूषा किंवा मेकअप आवडत नाही. रोज दोन मिनिटात निट्निटक तयार होता येईल अश्या आइडियाज मी ब्लॉगवर शेअर करते. माझ्या ब्लॉग मधून मला लोकांना नविन वस्तू घेण्यास मला प्रवृत्त करायचे नसून एकाच गोष्टीचा किती विविध प्रकारे वापर करता येतो व क्लॉझेट मधे कुठल्या वस्तूंचा समावेश आवर्जून करावा ते दाखवायचं आहे.

काय चांगल दिसत हे पूर्णपणे माझ मत आहे आणि अर्थातच ती काही आदर्श वगैरे पध्दत नाहीये. पण तरीदेखील तुम्हाला त्यामधील काहीतरी आवडू शकेल व तुमच्या स्टाईलच्या व्याख्येप्रमाणे तुम्ही त्याला वापरू शकाल. स्टाईलिंग ही एक आब्स्ट्रॅक्ट आर्ट आहे आणि कला नेहमीच व्यक्तिनिष्ठ असते. मला स्टाइलिंग खूपस पेंटिंग सारख वाटत जिथे मला रंग व पॅटर्नसोबत खेळता येत.

क्लोझेटमधे अगदी थोड्या साहित्यातून निर्माण होणाऱ्या अनेक शक्यता मला ब्लॉगमधून दाखवायच्या आहेत.

ही माझ्या ब्लॉगची लिंक आहे - http://lifestyleandallthatjazz.blogspot.com. तुम्हाला आवडल्यास तुमचे मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुमचा अभिप्राय जाणायला मला निश्चितच आवडेल!

कलाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jan 2016 - 8:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान.

-दिलीप बिरुटे

श्रीरंग_जोशी's picture

12 Jan 2016 - 9:06 pm | श्रीरंग_जोशी

स्टाइल या विषयावर मराठी आंतरजालावर प्रथमच काही वाचायला मिळालं. तुमचा ब्लॉग एकदम नेटका आहे.

एका नव्या विषयावर इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद.

मिपावर स्वागत आहे.

उपाशी बोका's picture

12 Jan 2016 - 9:20 pm | उपाशी बोका

सकाळी उठून कपाटातील कपड्यांकडे 'आज काय घालाव' असा विचार करत तुम्ही बराच वेळ उभे राहिले आहात?

>>> नाही.

काही गोष्टी चढवून न आवडल्याने ३-४ वेळा बदलाबदली केली आहे?

>>> नाही.

प्रामाणिकपणे सांगायच झाल तर प्रत्येक मुलीला कपडे, शूज ह्यात नेहमीच रस असतो!

>>> नक्की?

मी आणलेले कपडे तसेच पडून राहिलेत

>>> अश्या वेळी माणसाने स्टाईलऐवजी लाईफस्टाईलचा विचार केला पाहिजे.

मी काय उपभोगल त्यावर एक ब्लॉग सुरु केला. मी तो डेव्हिल नाही जी प्राडा घालते, लुई व्ह्टोन बाळगून...

>>> हे कपडे ज..रा.. हायएन्ड आहेत. आमच्या बजेटवाले काही आहे का? तसेच इण्डियन स्टाईल वगैरे.

स्टाईलिंग ही एक आब्स्ट्रॅक्ट आर्ट आहे आणि कला नेहमीच व्यक्तिनिष्ठ असते.

>> हे आवडलं.
ब्लॉगबद्दल शुभेच्छा.

पद्मावति's picture

12 Jan 2016 - 10:23 pm | पद्मावति

रसिका खूप छान ब्लॉग आहे. मला खूप आवडला. मागेही एकदा बघितला होता. अतिशय प्रॅक्टिकल आणि अफोर्डेबल फॅशन.फार महागाईचे ब्रॅण्ड्स न वापरताही स्टायलिश कसं राहावं हे शिकण्यासाठी उत्तम ब्लॉग.

पैसा's picture

12 Jan 2016 - 10:35 pm | पैसा

ब्लॉग आवडला. फोटो कुणी काढले आहेत?

काय घालू हा प्रश्न निदान सहा महिने येणार नाही इतके कपडे आहेत. तरी जागा बदलताना कितीतरी दान केले, आठवत पण नाही आता. कपाट उघडले की अंगावर धबाधबा कोसळणार्‍या कपड्यांचं काय करू हा खरा मोठा यक्षप्रश्न आहे. तरी गेल्या आठ दिवसात तीन साड्या ऑनलाईन घेतल्यात. सध्या मी आजारी असल्याने अजून नवर्‍याने शिव्या दिल्या नाहीयेत इतकंच काय ते.

स्टाईल वगैरे बघायला छान वाटते. पण ते बघून सगळ्यांनी एकाच स्टाईलचे कपडे वापरायला सुरुवात केली की ते फारसं छान वाटत नाहीसे होतात.

प्रचेतस's picture

12 Jan 2016 - 10:49 pm | प्रचेतस

सुंदरच आहे ओ ब्लॉग तुमचा.

कविता१९७८'s picture

12 Jan 2016 - 10:52 pm | कविता१९७८

तुम्ही माॅडेलिंग करता का?? कारण बर्‍याच फोटोमधे जागा तीच पण वेगवेगळे कपडे घातलेले दिसतायत.

एस's picture

12 Jan 2016 - 11:15 pm | एस

तुमचा ब्लॉग आवडला!

स्वगत- माझ्याकडे असलेल्या चार शर्ट आणि तीन पँट वापरून किती नीटनेटके राहता येईल असा प्रश्न मलातरी कधीच पडत नाही. ;-) आणि बायको काय म्हणत असते त्याकडे बाय डिफॉल्ट लक्ष जातच नाही! :-)

सुबोध खरे's picture

12 Jan 2016 - 11:32 pm | सुबोध खरे

जाता जाता-- तुम्ही चरितार्थासाठी काय करता?
२३ वर्षे रोज रंगहीन कपडे घातलेला- सुबोध

एक एकटा एकटाच's picture

12 Jan 2016 - 11:39 pm | एक एकटा एकटाच

वेगळ्या विषयावरती मस्त माहीती.

रसिकामहाबळ's picture

13 Jan 2016 - 2:50 am | रसिकामहाबळ

धन्यवाद! पैसा - फोटो टायमर व ट्रायपोड वापरुन काढले आहेत.

श्रीरंग_जोशी's picture

13 Jan 2016 - 3:06 am | श्रीरंग_जोशी

टायमर अन ट्रायपॉड वापरून तुम्ही असे फोटो काढू शकता म्हणजे तुमचे छायाचित्रण कौशल्यही जोरदार आहे.

रेवती's picture

13 Jan 2016 - 3:37 am | रेवती

कपडे खूप छान आहेत. तुमचा ब्लॉग आवडला. ट्युनिक प्रकार तुमचा आवडता आहे का? मला तरी ट्युनिक्स खूप आवडतात. एकच घेतलाय आतापर्यंत. कपडे कोठून घेतले आहेत, कोण्त्या ब्रँडचे आहेत हे एका क्लिकसरशी आम्हाला वाचायला मिळाले म्हणून छान वाटले.

अरे वा, वेगळ्याच विषयावर ओळख करुन दिलीत. ब्लॉग आधी पाहिला नव्हता पण आता पाहते. असे ब्लॉग्ज शोधत मात्र असते.

आनंदी चेहरा कपडे खुलवतो.
ते देणाराही खुश होतो,
विकणारेही खुश होतात.असे गिह्राइक दिसलं दुकानात की आणखी चारजण येतात.

ब्लॅाग आणि फोटोसाठी दिलेल्या पोज(=मराठी?) भारी आहेत.

पोज म्हणजे पवित्रा घेणे छायाचित्रासाठी बहुतेक . ;P

अर्धवटराव's picture

13 Jan 2016 - 5:00 am | अर्धवटराव

आमची सौ पण असलं काय काय करत असते. आमचे आठवड्याचे ऑफीसला घालुन जायचे, सणवार, पार्टी, पर्यटन वगैरे सगळीकडे घालायचे कपडे ठरवायला आम्हि एक एक्सपर्ट हायर केला आहे (फुकट ;) ) त्याची फी इतर मार्गाने वसुल होते म्हणा (हर हफ्ते कि 'किरकोळ' शॉपींग )

छान वेगळाच विषय आहे ब्लाॅगचा.ब्लाॅगही छान आहे.तुमचे फोटो आणि ड्रेसेस सुंदरच.

प्रसाद१९७१'s picture

13 Jan 2016 - 11:45 am | प्रसाद१९७१

जातीच्या सुंदराला काहीही चांगले दिसते. तुम्हाला कुठलेही कपडे चांगले दिसतील असे वाटते, त्यामुळे तुमचा फॅशन सेन्स खरच चांगला आहे का हे नक्की सांगता येणार नाही.

अगदी पहील्यांदी म्हणले तसे कोणी दिसायला अ‍ॅव्हरेज आणि फिगर नी पण अ‍ॅवरेज असेल तर त्याला वेगळी फॅशन करुन कमीत कमी अ‍ॅव्हरेज च्या वर दाखवता आले तर ती खरी सृजनता.

तुमचा ब्लोग चांगला आहे. पण बरीच रीपीटेशन वाटते. कदाचित तुम्ही आठवड्याला एक असा बदल टाकलात तर खरी विविधता वाटेल.

अप्पा जोगळेकर's picture

13 Jan 2016 - 12:06 pm | अप्पा जोगळेकर

बाई, तुम्ही संदर आहात.
ब्लोग पाहिला. शुभेच्छा.
माझ्या बायकोने हा ब्लोग पाहिला तर ईएमाय भरायलाही पैसे उरणार नाहीत.

खेडूत's picture

13 Jan 2016 - 12:47 pm | खेडूत

छान!
ब्लाॅगही आवडला...

बाप्यांच्या ष्टाईलबद्दल चकार शब्द नाही? छे छे!! किती ती असमानता, आता मीच एक ब्लॉग सुरु करावा म्हणतो.

आदूबाळ's picture

13 Jan 2016 - 7:22 pm | आदूबाळ

"दणकट पायजमा मुलायम बंडी" वाल्या शालगर होजियरी कडून पॉन्सरशिप मिळू शकते!

अगदी!! प्रकाश डाईंग, रमेश डाईंग पण कदाचित!! ;)

बाप्यांच्या ष्टाईल बद्दल चकार शब्द नाही? छे छे, किती ती असमानता. आता मीच एक ब्लॉग सुरु करावा म्हणतो.

रसिकाताई, तुम्हाला एक विनंती आहे. कार्डिगन्स, शर्टस, कॅमीज, पॅन्टस, अ‍ॅक्सेसरीज यांचे साधे प्रकार जे तुमच्या क्लॉजेटमध्ये असावेच व पटापट हापिसला जाण्यासाठी तयार होता येईल अशी कॉम्बिनेशन्स जी आम्ही रात्री झोपण्याअधी तयार ठेवू शकू अशी कळवलीत तर माझ्यासारख्या अत्यंत अरसिक महिलांना फार फायदा होईल. माझ्याकडे दोन शर्टस पडून आहेत, जे आवडले म्हणून घेतलेत व त्यावर कोणत्या पॅन्टस जातील हे कळत नाहीये. हाताशी संगणक असताना कपडे शोधणे हे खरेतर सोपे व्हायला हवे पण फारफार आळस आहे. मी कामाला जाताना दागिने घालत नाही, हॅन्डबॅग्ज बदलत नाही, तसेच हवामानामुळे घ्यावेच लागतात तेवढेच चरणजोड (सँडल्स, चपला, स्निकर्स, स्पोर्ट शूज, बॅले फ्लॅटस) आहेत. जे अत्यंत नावडीमुळे करणारच नाही त्यात मी पडणार नाही पण कामाला जाताना जरा बर्‍या अवस्थेत जाणे भाग आहे. त्यातून थंडीच्या दिवसात लेयर्स असलेला पेहराव जास्त चाम्गला वाटतो पण तसे कपडे करण्याचा कंटाळा येतो (म्हणून धपाधप जाड स्वेटर्स अडकवले जातात). तुम्ही तयार कॉम्बिनेशन्स सांगितलीत तर मला मदत होईल. एक प्रश्नही आहे. एक फिकट आकाशी रंगाचा शर्ट आवडला म्हणून घेतलाय पण त्यावर कोणत्या रंगाची पाटलोण चाम्गली दिसेल हे कृपया कळावा. दुकानाचे नाव कळवा मी घेऊन येईन.
अ‍ॅन टेलर पूर्वी माझे आवडते दुकान होते पण आजकाल त्यांचे कपडे महाग झाल्यासारखे वाटतायत. शिवाय फ्याशनेबल काही आवडत नसल्याने साधेच कपडे सांगा. तुमचे नाव रसिका आहे ते योग्यच आहे. माझे नाव रसिका असते तर आईवडिलांना नंतर वाईट वाटले असते.

सतिश गावडे's picture

13 Jan 2016 - 8:11 pm | सतिश गावडे

=))

आता तुला हसायला काय झालं?

सतिश गावडे's picture

13 Jan 2016 - 9:25 pm | सतिश गावडे

"पर्सनल स्टाईल" च्या धाग्यावर तुमचा हा प्रतिसाद खुपच बाळबोध आणि त्याहीपेक्षा निरागस वाटला. याउपर अधिक काही लिहिणे मी उचित समजत नाही. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Jan 2016 - 12:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

फिकट आकाशी रंगाचा शर्ट आवडला म्हणून घेतलाय पण त्यावर कोणत्या रंगाची पाटलोण चाम्गली दिसेल

फिकट खाकी ते खाकी रंगाची चालून जाईल.

मला फॅशनीतला फसुद्धा समजत नाही. पण एकूण वर्णन वाचून तुलाही फार फरक पडत नाही असं दिसतंय. म्हणजे सल्ला खपून जाईल. पण या प्रतिसादासाठी मी थोडं गूगलिंग केलं. हे चित्र पहा -
https://s-media-cache-ak0.pinimg.com/736x/75/03/d0/7503d00a2ac507a7202d9...

रेवती's picture

15 Jan 2016 - 1:41 am | रेवती

हां, हे दोन्ही कपडे आहेत. ट्राय करते.

पांढरी जीन्स किंवा डार्क ब्लु जीन्स पण ट्राय कर. डार्क ब्लु खुप च क्लिशे काँबिनेशन आहे पण फिक्या पेस्टल रंगांवर पांढरी छान दिसते. a

कलर काँबि बघ, फाटकी पँट नाही ;)

हो, छान दिसतिये. ही निळा रंग वेगळाच आहे. माझ्याकडील फिका निळा हा 'याला निळा म्हणा' सांगावे लागण्याइतपत आहे. मी तो शर्ट का घेतला? असा प्रश्न पडलाय. बर्‍याच विचारानंतर धीर एकवटून पाटलोणीच्या शोधकार्याला सुरुवात केलीये. त्या फाटक्या प्यांटा पाहून नक्की काय विचार करावा हे समजत नाही. घेऊन कपडा घ्यायचा तो बर्‍या अवस्थेतला का नाही घ्यायचा? असे वाटते. असो. तो दुष्ट सगा मला हसेल म्हणून विचार आवरते घेते.

स्रुजा's picture

16 Jan 2016 - 1:21 am | स्रुजा

हो ना अजुन २ $ जास्त दिले असते तर न फाटलेली पँट आली असते ;)

कट्टप्पा's picture

13 Jan 2016 - 11:57 pm | कट्टप्पा

एकदम मस्त फोटो ब्लोगवरील. थॅन्क्यु.

अर्बन प्लॅनेट्,सिअर्स,वॉलमार्ट किंवा ब्लुनोट्स मध्ये जेव्ह्ढे कपडे मिळतात (सेल मध्ये, रेग्युलर किंमतीत नाहीच ) तेव्ह्ढेच परवडतात. त्यामुळे धागा बघायलाच छान,फॉलो करणे जमेलसे वाटत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

15 Jan 2016 - 1:10 am | श्रीरंग_जोशी

बाकी दोन दुकानांबाबत ठाऊक नाही पण सिअर्स अन वॉलमार्टसारख्या स्टोर्समध्ये कपडे खरेदी करण्यापेक्षा कोल्स, जे सी पेनी येथे कपड्यांची खरेदी करावी. किमती बहुतेक वेळी वाजवी असतात अन त्यांचे स्टोअर कार्ड घेतल्यास अधून मधून मोठे डिसकाउंट कूपन्स मिळत राहतात.

एखादेवेळेस थोडे अधिक महाग कपडे खरेदी करायचे असल्यास मेसीजचा पर्यायही उत्तम आहे.

धर्मराजमुटके's picture

15 Jan 2016 - 3:13 pm | धर्मराजमुटके

सर्व फोटों फक्त समोरुनच (क्वचित तिरके उभे राहून) असल्यामुळे फोटोंमधे जास्त विविधता वाटत नाहिये. अजून काही पोज देता आल्यास फोटोंच्या वैविध्यात भर पडेल.

शिवाय स्त्रियांच्या शरीराराच एक भाग असलेली गोष्ट म्हणजे पर्स कोठेही दिसत नसल्यामुळे आश्चर्य वाटले.

स्वतःच्या फोटोंचा दुरुपयोग होऊ नये म्हणून वॉटरमार्क किंवा राईट क्लीक करुन फोटो सेव्ह न करता येण्याचा पर्याय हवा होता पण मोफतचे अ‍ॅप्लीकेशन असल्यामुळे त्यावर मर्यादा आहेत हे समजते.

असो. ब्लॉग आवडला हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद.

राईट क्लीक करुन फोटो सेव्ह न करता येण्याचा पर्याय हवा होता

वेबपेज सेव्ह करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन असे फोटोज डाउनलोड करता येतात. जालावर पब्लिकली शेअर केल्यावर फोटो कुणाला डाउनलोड करता येणार नाही अशी व्यवस्था करणे जवळ जवळ अशक्य आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Oct 2019 - 4:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नवीन काही कॉम्बिनेशन्स, काही नव्या स्टाइल वगैरे ? आठवण आली धाग्याची..!

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

3 Oct 2019 - 5:32 pm | प्रचेतस

लेखिका गायब झाल्या कधीच.
तुम्हाला कसं काय मधनंच आठवलं?