विरंगुळा

द्रौपदी वस्त्र हरण

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
27 Mar 2016 - 11:14 am

आपल्या सर्वांना हे माहिती आहेच की युधिष्ठीर दुर्योधनाशी द्यूतात द्रौपदी हरला. दुर्योधनाने मग दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला धरून ओढत फरपटत दरबारात घेऊन यावे. तिला तिथे आणल्यावर दुर्योधनाने दुष्यासनाला द्रौपदीला विवस्त्र करायला सांगितले. द्रौपदीने सर्वांकडे मदतीची याचना केली - आपले पती, भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, परंतु कोणीही हा अन्याय, अनर्थ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या क्षणी त्या ठिकाणी कृष्णाने शपथ घेतली की तो तिथे उपस्थित असलेल्या त्या सर्व लोकांचे प्राण घेईल ज्यांनी द्रौपदीच्या या बेअब्रू होण्याचा देखावा पाहिला आणि तिची मदत केली नाही.

संस्कृतीविरंगुळा

हार नही जीत नही जहा प्यार है...

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जनातलं, मनातलं
26 Mar 2016 - 1:39 pm

एका सत्यकथेचा काल्पनिक उत्तरार्ध

वाङ्मयकथाkathaaप्रकटनविरंगुळा

सु.शिं.चे मानसपुत्र

अजिंक्य विश्वास's picture
अजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं
25 Mar 2016 - 8:22 pm

येत्या काही आठवड्यात मी तुम्हाला सु.शिं.च्या मानसपुत्रांच्या काही खास गोष्टी सांगेन.
२ मानसपुत्रांच्या जन्मकथा, आणि ४ मानसपुत्रांची वैशिष्ठ्ये. ( अर्थात सु.शिं.नीच लिहिलेली)
आणि ब्लॅक किंगच्या गॅंगबद्दल पण (माझ्या आवडत्या मंदार कथा)
हे सर्व सु.शिं.नी आधीच सांगितले आहे. मी फक्त तुमच्या आठवणींवरून धूळ झटकायचा प्रयत्न करणार आहे. यात तुमचाही सहभाग अपेक्षीत आहे.

मांडणीवाङ्मयकथासाहित्यिकमौजमजाप्रकटनआस्वादमाहितीसंदर्भविरंगुळा

मिपा विडंबन स्पर्धा २०१६ - मतदानापूर्व चाचणी - (भाग १/९८७६५४३२१०)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जनातलं, मनातलं
22 Mar 2016 - 12:43 pm

मिपावर सध्या विडंबन स्पर्धेसाठी जोरदार मतदान चालु आहे. कधी एक कविता पुढे जाते तर कधी दुसरी. या स्पर्धेवर देशविदेशातल्या बडयाबड्या लोकांचे लक्ष आहे असे मला खुद्द एका साहित्य संपादकाने सांगीतले. परवा तर म्हणे मोदीसाहेबांनी स्वतः फोन करुन या स्पर्धेचा सविस्तर आढावा घेतला. कोणती कविता बाजी मारणार यावर म्हणे मोठा सट्टाही चालला आहे.

इतिहासविडंबनकृष्णमुर्तीशुभेच्छासल्लाविरंगुळा

दहशत - एका नव्या रूपात!

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
21 Mar 2016 - 8:12 pm

त्याने असं काय विचारल तिला की आतापावेतो गप्पांमध्ये सहभागी असणारी ऑफिसातली मंडळी अचानकपणे सुन्न झाली. आमावस्येच्या रात्री गावाबाहेरच्या जुन्या पडक्या देवळामागच्या काळोखात बुडून गेलेल्या झुडूपांमध्ये असते तशी भेदक कळा त्या झगमगत्या फॉल्स सिलींगमधल्या रोषणाईला आली होती. शांततेचा पारा तर उणे शेकड्यात जाऊन गुरफटून बसला. काहींच्या चेह-यावर अस्वस्थता इतकी दाटली की त्या ऑफिसातल प्रत्येक क्युबिकल आयसीयू वार्ड प्रमाणे भासू लागल.

कलाकथाबालकथाभाषाविनोदसाहित्यिकkathaaमौजमजालेखअनुभवप्रतिभाविरंगुळा

फेसबुक – एक वसाहत

उल्का's picture
उल्का in जनातलं, मनातलं
18 Mar 2016 - 4:54 pm

(फेसबुक वर असेच एकदा वेगेवेगळी सेटिंग्स तपासात होते. काही सेटिंग्स बदलून view as करून पण बघत होते. तेव्हा स्वत:चाच प्रोफ़ाइल आपले वेगवेगळे रूप दाखवू लागला. जणू नवीन कपडे आणल्यावर एक एक घालून दाखवावे अगदी तश्शीच fashion parade चालली होती. तेव्हा काल्पनिक, काहीसे विनोदी (फार काही नाही अगदीच थोडे बर्र का) लेखन सुचले ते असे आहे.)

हल्ली वास्तव जगाचा भाग बनलेलं एक आभासी विश्व आहे. आंतरजाल विश्व. ह्या विश्वात रमलात की कधी कधी वास्तवतेचे भानही रहात नाही. ह्या विश्वातील अनेक वसाहतींचा फेरफटका मारता मारता दमछाक होते जणू. तरीही ‘टेढा है पर मेरा है’ म्हणत म्हणत त्यात रमून जायचे असते.

विनोदविरंगुळा

(छटाक)

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
18 Mar 2016 - 9:21 am

"अरे सम्जता कोण तुम्ही स्वतःला ?" असला प्रश्न तू मिपाकर साहित्यीकांना विचारतोस. अरे असें विचारावं कसं वाटल तुला. फार धाडसी रे बुवा तू.अरे मिसा होणे म्हणजे काय गुट़का खायची गोष्ट वाटली काय तुला? उघडली पुडी लावली तोंडाला. आँ म्हणे काय समजता स्वतःला. अरे बच्चमजी फार कष्ट आणि निर्ढावलेपण आल्याखेरीज होता येणार नाही मिसा तूला.

वाङ्मयमुक्तकविडंबनसाहित्यिकमौजमजाआस्वादमाहितीविरंगुळा

राजाराम सीताराम....... भाग १५... सूट्टीसाठी आतूर

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in जनातलं, मनातलं
17 Mar 2016 - 6:48 pm
कथासमाजमौजमजाविचारलेखविरंगुळा

कोषातून बाहेर (Ice-Breaker)

राघवेंद्र's picture
राघवेंद्र in जनातलं, मनातलं
15 Mar 2016 - 12:56 am

मला लोकांसमोर बोलायला आवडते. (No Stage Fear)
मला २-३ तासांच्या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन करता येते. (Host a Meeting)
मला लोकांच्या विचारावर अभिप्राय, टिप्पणी करायला आवडते. (Evaluation)
मी कोणत्याही प्रश्नावर उत्स्फूर्त १-२ मिनिटे मत देऊ शकतो. (Impromptu Speech)

वावरसमाजजीवनमानतंत्रप्रकटनविचारप्रतिसादआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखअनुभवशिफारसमाहितीसंदर्भविरंगुळा

बोट - वादळवारा

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
14 Mar 2016 - 4:38 pm

नोकरीसाठी गेल्यावर सायकोमेट्रिक परीक्षा घेतात त्यात असे प्रश्न असतात – लाल रंगाची वस्तू सांगा म्हटल्यावर तुमच्या मनात खालील चारपैकी कुठली वस्तु आधी येते?
लाल गुलाब, ट्रॅफिक सिग्नल, रक्त, आगीचा बंब.

यात बरोबर/चूक असं उत्तर नसतंच. पण तुमच्या उत्तरावरून तुमच्या विचारधारेची कल्पना येते (असं म्हणतात तरी).

कथाजीवनमानkathaaराहणीप्रवासभूगोलदेशांतरसामुद्रिकलेखअनुभवमाहितीविरंगुळा