सु.शिं.चे मानसपुत्र
येत्या काही आठवड्यात मी तुम्हाला सु.शिं.च्या मानसपुत्रांच्या काही खास गोष्टी सांगेन.
२ मानसपुत्रांच्या जन्मकथा, आणि ४ मानसपुत्रांची वैशिष्ठ्ये. ( अर्थात सु.शिं.नीच लिहिलेली)
आणि ब्लॅक किंगच्या गॅंगबद्दल पण (माझ्या आवडत्या मंदार कथा)
हे सर्व सु.शिं.नी आधीच सांगितले आहे. मी फक्त तुमच्या आठवणींवरून धूळ झटकायचा प्रयत्न करणार आहे. यात तुमचाही सहभाग अपेक्षीत आहे.
चला तर मग- आजची सुरूवात ’दारा बुलंद’ पासून-
कादंबरीतील नायक दारा ’बुलंद’ हे व्यक्तिमत्त्व वास्तव मुळीच नाही; आणि या नायकाकडून तसं असण्याची अपेक्षाही नाही-! कारण, ’असा माणूस अस्तित्त्वात असतो का?’ यापेक्षा माणूस कसा असावा याचा तो थोडासा अतिरेकी आदर्श आहे.
सत्य, न्याय, चांगुलपणा, शौर्य, बुद्धी, रंग-रूप... असा सर्व सद्गुणांचं उत्कृष्ट प्रतिक म्हणजेच- या कादंबरीतील नायक- दारा ’बुलंद’ -होय-!
जगांत थोड्या थोड्या प्रमाणात का होईना, जे सद्गुण निरनिराळ्या व्यक्तींमध्ये प्रत्ययास येतात, ज्या आदर्शामुळे आजही जगरहाटीचा समतोल साधला जातो,
तेच या प्रतिकात्मक नायकात अभिप्रेत धरले आहेत, इतकेच-!
-लेखक
(सन्नाटा- एकत्रित प्रथमावृत्तीमधून)
दारा बुलंद याची शरीरयष्टी हॉलीवूड नट स्टीव रीव्हज् यावरून बेतली आहे.
गोरा-पान चेहरा, पिंगट-घारे डोळे, सोनेरी केस, रूंद ’व्ही’ शेपमधील बॉडी... ही त्याची रूपवैशिष्ठये,
तगडे शरीर, चपळ हालचाली, शब्दवेधी, कुठल्याही प्रकारच्या लढाईला तयार असणारा, अगदी ’फ्री स्टाईल कुस्ती’ देखील... जैसलमेरच्या दरवेश्याकडून शिकलेल्या माकडाच्या करामती, ज्यात त्याच्या सुप्रसिद्ध ’माकड उड्या’ आहेत. सर्व तरूणींना आपला भाऊ आणि सर्व आयांना आणि बुजुर्ग व्यक्तींना आपला मुलगा असावा तर - दारा सारखा, इतका आदर्शवत तरूण. आपल्या जवानीत चंबळेचे खोरे आपल्या पराक्रमाने हादरवून टाकणार्या रिटायर्ड इन्स्पेक्टर ’हिंमत’चाचा बुलंद यांचा त्यांच्या मुशीतून कोरलेला हा अवघ्या २२-२५ वयाचा कोवळा मुलगा!
आणि त्याची गॅंग
मधुर- थोडासा बायकी दिसणारा, टोळीचा मेंदू म्हणलात तरी चालेल.
शीतल- गँगमध्ये थोडासा धाकटा, पण दाराचे वाक्य न् वाक्य मानणारा
बादल- टोळीचे काळीज, (माझा स्वत:चा सॉफ्ट कॉर्नर आहे बादलसाठी) दाराला देखील उचलून फेकू शकेल असा, दाराला तोडीस तोड, मानी, शूर, मिस्कील असा बाद्ल- (सु.शि. वाचकांच्या माहितीसाठी- दारा कथेत दोन बादल आहेत. शोधा पाहू त्या कथा. माहित असणार्यांसाठी नाहिये हा प्रश्न)
सलोनी- दाराची एकुलती एक बहीण, शूर, स्वाभिमानी, वेळप्रसंगी शत्रूची ४ हात करू शकेल अशी राजपूत तरूणी, तिचा मधुर हा वीक-पॉंईंट
तर सांगा कसा वाटला आजचा हा परिचयाचा कार्यक्रम?


प्रतिक्रिया
मस्त! जरा मोठा भाग टाका मात्र
नक्की.
मस्त!!!
नेमके त्याच कथेचं नाव आठवत
कथेची नावे पुढील भागात देईन मी.
वाह!
बाकी ओळख छान . फक्त
सर्व तरूणींना आपला भाऊ आणि
ब्लाईंड स्पॉट
ठीक आहे भारत हां एक मुक्त देश आहे
ह्यात मी सु.शि. महान ठरवायचा अजिबात प्रयत्न करत नाही.
आंधळि भक्ती म्हणतात ती हिच
वास्तव
जे वर लिहलय
तरी पण सांगा तर खर
अमर विश्वास
ते तर सु.शि. पण कबूल करतात की राव.
एखादे पात्र एखाद्या परदेशी
खिक्क.
खिक्क. खिक्क. खिक्क.
सिरसली
गॉलम गॉलम...
वन ट्रोल एट अ टाईम
नाही, आपला वाद आपणाशीच चालला
नाही हो मिपाने अपडेट करायची सोय दिली नसल्याने
हे असंय ब्वा तुमचं,एकतर
सुशिं चे चाहते असंणे म्हणजे
आधी तुम्ही फॅन फिक्शन कन्सेप्ट आधी डोक्यात फिक्स करून घ्या बुवा
आम्ही हिमेश रेशामिया टाकावु हीरो म्हणतच नाही
हा हा हा.
ते टाकावु लिहित नाहित हो
मिपाचा दर्जा
मी काय करावे काय नाही
सुरवात कोणी केली ते पहा
बाकीच्यांचं मरू दे हो.
मी सुध्दा अजून पूर्ण माहिती मिळवत आहे.
मंदार आणि रमी :)
आवडते लेखक
इन्स्पेक्टर मंदार नसून
माफ करा
सुशि काळाच्या पुढचे लेखक होते
मस्त रे अजिंक्या. (हायला माई
फेअरडील, डॉज, पोंटेक,
डॅमलिन
डॅमलर*
दारा बुलंद आणि सनी बुलंदच्या
सनी पटेल
सनी पटेलच तो.
वा अजिंक्य,वेगळ्या आणि
Sushinchi pankhi :)
Pagination