सु.शिं.चे मानसपुत्र

अजिंक्य विश्वास's picture
अजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं
25 Mar 2016 - 8:22 pm

येत्या काही आठवड्यात मी तुम्हाला सु.शिं.च्या मानसपुत्रांच्या काही खास गोष्टी सांगेन.
२ मानसपुत्रांच्या जन्मकथा, आणि ४ मानसपुत्रांची वैशिष्ठ्ये. ( अर्थात सु.शिं.नीच लिहिलेली)
आणि ब्लॅक किंगच्या गॅंगबद्दल पण (माझ्या आवडत्या मंदार कथा)
हे सर्व सु.शिं.नी आधीच सांगितले आहे. मी फक्त तुमच्या आठवणींवरून धूळ झटकायचा प्रयत्न करणार आहे. यात तुमचाही सहभाग अपेक्षीत आहे.

चला तर मग- आजची सुरूवात ’दारा बुलंद’ पासून-
कादंबरीतील नायक दारा ’बुलंद’ हे व्यक्तिमत्त्व वास्तव मुळीच नाही; आणि या नायकाकडून तसं असण्याची अपेक्षाही नाही-! कारण, ’असा माणूस अस्तित्त्वात असतो का?’ यापेक्षा माणूस कसा असावा याचा तो थोडासा अतिरेकी आदर्श आहे.
सत्य, न्याय, चांगुलपणा, शौर्य, बुद्धी, रंग-रूप... असा सर्व सद्‌गुणांचं उत्कृष्ट प्रतिक म्हणजेच- या कादंबरीतील नायक- दारा ’बुलंद’ -होय-!
जगांत थोड्या थोड्या प्रमाणात का होईना, जे सद्‌गुण निरनिराळ्या व्यक्तींमध्ये प्रत्ययास येतात, ज्या आदर्शामुळे आजही जगरहाटीचा समतोल साधला जातो,
तेच या प्रतिकात्मक नायकात अभिप्रेत धरले आहेत, इतकेच-!
-लेखक
(सन्नाटा- एकत्रित प्रथमावृत्तीमधून)
दारा बुलंद याची शरीरयष्टी हॉलीवूड नट स्टीव रीव्हज्‌ यावरून बेतली आहे.
गोरा-पान चेहरा, पिंगट-घारे डोळे, सोनेरी केस, रूंद ’व्ही’ शेपमधील बॉडी... ही त्याची रूपवैशिष्ठये,
तगडे शरीर, चपळ हालचाली, शब्दवेधी, कुठल्याही प्रकारच्या लढाईला तयार असणारा, अगदी ’फ्री स्टाईल कुस्ती’ देखील... जैसलमेरच्या दरवेश्याकडून शिकलेल्या माकडाच्या करामती, ज्यात त्याच्या सुप्रसिद्ध ’माकड उड्या’ आहेत. सर्व तरूणींना आपला भाऊ आणि सर्व आयांना आणि बुजुर्ग व्यक्तींना आपला मुलगा असावा तर - दारा सारखा, इतका आदर्शवत तरूण. आपल्या जवानीत चंबळेचे खोरे आपल्या पराक्रमाने हादरवून टाकणार्‍या रिटायर्ड इन्स्पेक्टर ’हिंमत’चाचा बुलंद यांचा त्यांच्या मुशीतून कोरलेला हा अवघ्या २२-२५ वयाचा कोवळा मुलगा!
आणि त्याची गॅंग
मधुर- थोडासा बायकी दिसणारा, टोळीचा मेंदू म्हणलात तरी चालेल.
शीतल- गँगमध्ये थोडासा धाकटा, पण दाराचे वाक्य न्‌ वाक्य मानणारा
बादल- टोळीचे काळीज, (माझा स्वत:चा सॉफ्ट कॉर्नर आहे बादलसाठी) दाराला देखील उचलून फेकू शकेल असा, दाराला तोडीस तोड, मानी, शूर, मिस्कील असा बाद्ल- (सु.शि. वाचकांच्या माहितीसाठी- दारा कथेत दोन बादल आहेत. शोधा पाहू त्या कथा. माहित असणार्‍यांसाठी नाहिये हा प्रश्न)
सलोनी- दाराची एकुलती एक बहीण, शूर, स्वाभिमानी, वेळप्रसंगी शत्रूची ४ हात करू शकेल अशी राजपूत तरूणी, तिचा मधुर हा वीक-पॉंईंट
तर सांगा कसा वाटला आजचा हा परिचयाचा कार्यक्रम?

.

मांडणीवाङ्मयकथासाहित्यिकमौजमजाप्रकटनआस्वादमाहितीसंदर्भविरंगुळा

प्रतिक्रिया

मस्त!
जरा मोठा भाग टाका मात्र

अजिंक्य विश्वास's picture

26 Mar 2016 - 2:48 pm | अजिंक्य विश्वास

नक्की. जरा थोडे फिनिशिंग टचेस द्यायचे बाकी आहेत अजून.

ट्रेड मार्क's picture

25 Mar 2016 - 8:31 pm | ट्रेड मार्क

ओळख मस्त आहे. अजून काही डिटेल्स असल्यास आवडतील.

सु. शि. माझे सर्वात आवडते लेखक आहेत आणि बहुतेक सर्व पुस्तके वाचली आहेत. पण लेखकाची त्यामागची भूमिका, अभ्यास, पात्र कुठून कशी सुचली हे कळणे म्हणजे पर्वणीच.

मंदार, फिरोज आणि अमर यांच्या ओळखीची आतुरतेने वाट बघत आहे. दीक्षित कोणावरून सुचले असतील बरं!

प्रचेतस's picture

25 Mar 2016 - 8:51 pm | प्रचेतस

नेमके त्याच कथेचं नाव आठवत नाही आता पण पहिला बादल बहुधा गोरखच्या टोळीबरोबर झालेल्या युद्धात मरतो का गोरखच्याच टोळीत दाराला दूसरा बादल मिळतो असे काहीसे आठवते आहे.
मधुरचे गावठी बॉम्ब सणाणून आठवतात.

'खजिना' ही सर्वात आवडती बुलंद कथा.
अख्तर सुलतान, फ़िदा कुरेशी, धिल्लन हे आवडते खलनायक.
राजामौलीचा मगधीरा मधील वाळूची दलदल पाहून थेट सामच्या वाळवंटातील वाळूची पोकळी आठवली होती.
शान ए जेसलमेर आमचं पण फेवरिट हाटेल.

अजिंक्य विश्वास's picture

26 Mar 2016 - 10:37 am | अजिंक्य विश्वास

कथेची नावे पुढील भागात देईन मी.
बाकी तुम्हाला सु.शिं.बद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास कधीतरी फेसबुकवरच्या ऑफिशिअल सुहास शिरवळकर ग्रूप/ पेजचा एखादी भेट देऊन पाहा.

अन्नू's picture

25 Mar 2016 - 11:34 pm | अन्नू

आज सुशिंचं नाव काढलं आणि आजच त्यांच्यावरचा लेख आला! याला म्हणतात लक! ;)
बाकी लेख एकदम उत्तम, सुशिंच्या मानसपुत्रांबद्दल बरीच महत्त्वपुर्ण माहिती मिळत आहे. आमच्यासारख्या सुशि वेड्यांना अजुन काय हवं? :)

वीणा३'s picture

25 Mar 2016 - 11:54 pm | वीणा३

"सर्व तरूणींना आपला भाऊ " -> अतिशय असहमत ;)

भाऊंचे भाऊ's picture

26 Mar 2016 - 8:22 am | भाऊंचे भाऊ

सर्व तरूणींना आपला भाऊ आणि सर्व आयांना आणि
बुजुर्ग व्यक्तींना आपला मुलगा असावा तर - दारा सारखा, इतका आदर्शवत

हे भगवान.... असो सुशीसोडुन अनेक लेखकांनी अशी पात्रे रंगवलेली वाचली असल्याने विशेषत: पश्चिमेकडिल लेखकांनी रंगवलेली ..... त्यामुळे सुशी कधीच मुळात बेसिकमध्येच व्रिज्नल म्हणून कधीच प्रभावित करू शकले नाहित. त्यांच्या चाहत्यांना हिन्वायचे नाही पण तुमने शुध्द दारु पिच नै असेच ख्रे

अजिंक्य विश्वास's picture

26 Mar 2016 - 10:34 am | अजिंक्य विश्वास

हे मी सगळ्या वाचकांचे मत म्हणून मांडले नाहीये. सु.शिं.च्या बुलंद कथांमधील व्यक्तींचे हे मत आहे.
वाचकांच्या मताबद्दल मी सुहास शिरवळकरांच्या फेसबुकवरच्या ग्रूपमध्ये कालच लिहिले आहे. ते थोड्या दिवसात फिनिशिंग टच्‌ देऊन इथे पोस्ट करेनच.
बाकी एखादा लेखक\लेखिका आवडणे- न आवडणे हे प्रत्येकाच्याच ब्लाईंड स्पॉटवर आधारीत असते. त्यामुळे एखादा लेखक\ लेखिका कशी आहे, हे त्याबद्दल वाचायचा प्रामाणिक प्रयत्न केला तरच समजू शकते.
आपल्यातले बरेच जण सु.शिं.ना रहस्यकथा लेखक म्हणूनच ओळखतात किंवा मानतात. त्यांच्या कविता, कादंबरी, कथा , कविता, सदरलेखन, ललित लेखन, संवाद-पटकथालेखक, कथाकथन ह्या मुद्द्यांकडे कोणाचेच लक्ष आजपर्यंत म्हणावे तितके गेले नाहीये.
लोकांची आवड पाहून बाकीच्या बाजूदेखील लोकांच्या लक्षात आणून द्यायचा हा एक केविलवाणा प्रयत्न माझ्याकडून २००६ पासून ऑरकूट ह्या माध्यमापासून सुरू झाला आहे. तो अजूनपर्यंत चालूच आहे.
बाकी माझ्या नावतले ’विश्वास’ सुध्दा शिरवळकरांचेच देणे आहे.

अन अन्नू मालिक सहस्त्रकातला महान संगीतकार आहे असे ठरवायचा त्याच्या चाहत्यांना पूर्ण हक्क आहे

ह्यात मी सु.शि. महान ठरवायचा अजिबात प्रयत्न करत नाही.
ज्यांना सु.शि. आवडतात, त्यांच्यासाठी हा लेख आहे. त्यांना सु.शिं.च्या लिखाणातील काही अपरिचित किंवा कमी माहिती असणार्‍या गोष्टी मी इथे देण्याचा प्रयत्न करत आहे.
आणि गंमत म्हणजे आपल्याला अन्नू मलिक चोरटा आहे हे मान्य असले तरी इतर संगीतकार मगे ते महान असले तरी काही चाली त्यांनीपण चोरल्या आहेत हे अमान्य / दुर्लक्ष करतो.
आणि अन्नू मलिकच्या चांगल्या चालींकडे लक्ष देत नाही. उदा. विरासत, बॉर्डर.
जाऊ दे. हा लेख भरकटवण्यापलिकडे काही करता आले तर नक्की करा.
बाकी आरोप-प्रत्यारोपांना उत्तर द्यायला मी समर्थ आहेच. वाचून बोललात तर अधिक मजा येईल.
आणि भारत हा मुक्त देश आहेच. कारण कन्टेन्ट समजून न घेता काहीही बोलण्याचा मुक्त अधिकार सर्वांनाच आहे.
धन्यवाद.

भाऊंचे भाऊ's picture

27 Mar 2016 - 9:37 am | भाऊंचे भाऊ

आपल्या श्रध्दास्थानाबाबत वास्तव ऐकायची तयारी नसणे. अन ते समोर आणनार्या वर वैयक्तिक टीपा सुरु करणे. तेंव्हा आपल्या संवादाचा विषय फक्त सुशी इतकाच मर्यादित ठेउया. बाकी आरोप आहेत कुठे वास्तव अन आरोप यात टॉम अन जेरी इतके अंतर आहे ही मीच आपणास समजवावे की काय ?

अजिंक्य विश्वास's picture

27 Mar 2016 - 10:32 am | अजिंक्य विश्वास

तुम्हाला माहित असणारे वास्तव सांगा तरी एकदा . मग पाहू

भाऊंचे भाऊ's picture

27 Mar 2016 - 10:37 am | भाऊंचे भाऊ

ते सर्व वास्तवच आहे आणखी काय दाखवू ?

स्वगत:- अजूनही सुशी केन्द्रित चर्चा का बरे होत नसावी ?

महासंग्राम's picture

27 Mar 2016 - 12:48 pm | महासंग्राम

तरी पण सांगा तर खर

भाऊंचे भाऊ's picture

27 Mar 2016 - 5:49 pm | भाऊंचे भाऊ

अमर विश्वास = पेरी मेसन

महासंग्राम's picture

28 Mar 2016 - 11:04 am | महासंग्राम

ते तर सु.शि. पण कबूल करतात की राव. तुम्ही वाचत नाही का? एखादे पात्र एखाद्या परदेशी पात्रावरून तयार झाले तर काय? अजून येऊ द्या की. मलाच अशी बरीच उदाहरणे माहित आहेत.
बाकी व्यंकटेश माडगूळकरांबद्दल काय म्हणणे आहे मग तुमचे?

भाऊंचे भाऊ's picture

28 Mar 2016 - 4:42 pm | भाऊंचे भाऊ

एखादे पात्र एखाद्या परदेशी पात्रावरून तयार झाले तर त्याला फैनफिक्शन रायटिंग म्हणतात... ते मुळ कथानकासकट उचलले तर त्याला चौर्य कर्म म्हणतात पण ते टाळुन स्वत:ची कथा त्यावर घुसडुन मुळ स्त्रोता इतका दर्जाही न राखता येने त्याला कधी कधी सुशिंचे लिखान म्हणतात.
बाकी व्यंकटेश माडगूळकरांबद्दल काय म्हणणे आहे मग तुमचे?
सांगतो सांगतो. त्यांचेवर धागा काढा मग माझे मत तेथे अवश्य सांगतो.

प्रचेतस's picture

28 Mar 2016 - 4:44 pm | प्रचेतस

खिक्क.

भाऊंचे भाऊ's picture

28 Mar 2016 - 4:52 pm | भाऊंचे भाऊ

.

भाऊंचे भाऊ's picture

28 Mar 2016 - 4:50 pm | भाऊंचे भाऊ

निव्वळ सुशी वाचुन तुमच्यात आर्ग्युमेंट चा इतका आत्मविश्वास बघून एक मिपाकर म्हणून तीव्र मौज वाटली :(
कमोन किती दिवस दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेउन गोली मारणार ? ते सरही तसेच त्यांचे मुलभुत लिखाणाची भयानक टर उड़ते म्हणून ग्रेस, ग़ालिब वगैरेंचे शब्द उधार घेउन पुन्हा यांचेच तत्वज्ञान त्यात खुपसून लेख पाडणार... मिपाच खालावले की काय शंका यते

प्रचेतस's picture

28 Mar 2016 - 4:53 pm | प्रचेतस

गॉलम गॉलम...

भाऊंचे भाऊ's picture

28 Mar 2016 - 5:00 pm | भाऊंचे भाऊ

जरा बेरिस्टर अजिंक्य विश्वास सोबत चर्चा तर होउदे

नाही, आपला वाद आपणाशीच चालला आहे हे वर दिसले ना.

दोन प्रतिसाद लिहावे लागले अन तुम्ही गैरसमजाचे ब्ळि ठरला, शक्य असल्यास ते एकत्रित करावे अशी विनंती आहे.

प्रचेतस's picture

28 Mar 2016 - 5:20 pm | प्रचेतस

हे असंय ब्वा तुमचं,एकतर चुकायचं पण कबुलायचं नै.

भाऊंचे भाऊ's picture

28 Mar 2016 - 5:23 pm | भाऊंचे भाऊ

सुशिं चे चाहते असंणे म्हणजे काय याचा अनुभव करायला असंच वागावं लागतं

कसं आहे? आधी तुम्ही फॅन फिक्शनची कन्सेप्ट आधी डोक्यात फिक्स करून घ्या बुवा. बाळ गाडगीळांनी चिं.वि. जोशींचे मानसपुत्र चिमणराव-गुंड्याभाऊ पुन:प्रत्ययासाठी लिहिले, त्याला फॅन-फिक्शन म्हणतात. हे झाले मराठीतील उदाहरण.
परदेशी साहित्यांमध्ये असे प्रकार सर्रास घडत असतात आणि घडत होते. परीकथा , अद्‍भुतरम्यकथा (फॅन्टसीज्‌) कॉमिक्स सिरीज, शेरलॉक होम्स्‌, जेम्स बॉन्ड ही त्याची ठळक उदाहरणे. ह्या पात्रांना मध्यवर्ती घेऊन बर्‍याच फॅन्स किंवा लेखकांची स्वत:ची कल्पनाशक्ती वापरत लेखणी चालवली आहे.
आता आपले मराठी रहस्यकथेचे आधुनिक जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते ’श्री. बाबूराव अर्नाळकर’ ह्यांनी परदेशी पात्रांवर भारतीयत्त्वाची किंबहुना महाराष्ट्रातील व्यक्तीचित्रणाची झालर चढवून ती बाजारात नव्याने आणली. त्याआधीही आपल्या साहित्याला हा प्रकार कधीच निषिध्द नव्हता. गो.ना. दातार, हे ठळक उदाहरण. आपल्या पुराणातील शनीची कथाही थोडीफार तशीच. विक्रमादित्यही सॉलोमनपासून वाचला नव्हता.
बाकी फडके, अत्रे, पु.ल., धारप, मतकरी यांची देखील वानगीदाखल उदाहरणे देता येतील.
तर एखादे परदेशी पात्र घेऊन त्यावरून एक भारतीय पात्र बेतणे , ह्यात काही गैर आहे, असे मला तरी आणि बहुसंख्य लोकांना देखील वाटत नाही.
राहता राहिला प्लॉटचा प्रश्न- तो देखील एखाद्या जर्मसारखा वापरणे हे कौशल्याचे काम असते. एखादी परदेशी कथा घेऊन त्यातील प्लॉटचा आपल्या वकुबानुसार वापर करणे, हे येर्‍यागबाळ्याचे काम नसते. (संदर्भासाठी अर्नाळकरांच्या कथा वाचाव्यात. मूळ भाषेप्रमाणे सरळ मराठीतील भीतीदायक अनुवाद , ही त्यांची खूण.)
आणि इतके सगळे होऊन पण स्वत: कबुली देणे , की त्याकाळी गरजेनुसार हा प्लॉट मी वापरला होता, हे महत्त्वाचे.
चोरीचा आरोप करताना त्याकाळची गरज लक्षात घेणे गरजेचे.
याउपरही शिरवळकरांचा अमर अजूनही बहुसंख्य लोकांच्या मनात आणि डोक्यात ताजा-तवाना आहे. हे त्यांच्या दर ३-४ वर्षांनी निघणार्‍या आणि खपणार्‍या आवृत्त्यांवरून सिद्ध होते.
तुम्हाला आवडत नाही, तो तुमचा ब्लाईंड स्पॉट झाला. त्यामुळे ३-४ उदाहरणावरून एखाद्या लेखक/लेखिकेचे लिखाण रद्दी ठरवणे, हे योग्य नसते. प्रत्येक वाचकाचा एक ब्लाईंड स्पॉट असतो. आणि तो गृहित धरूनच वाचक आपली आवड-निवड ठरवत असतो.
तुमच्यासारख्या वाचकांना शिरवळकर आवडत नाहीत म्हणून शिरवळकर टाकावू असे होत नाही. त्यांचे साहित्य व त्याच्या कमीत-कमी निघालेल्या ५ आवृत्त्या त्यांच्या यशाची हमखास ग्वाही द्यायचा सक्षम आहेत.

त्याचा टुकारपणा पण मनोरंजन करतो म्हणून आवर्जुन त्याचे चित्रपट बघतो... पण काही लोक त्याला कलाकार म्हणून दिलीपकुमार अमिताभ वा गायक म्हणून किशोर असल्याचा जो अविर्भाव आणतात त्याची यथेच्छ टिंगल करतो...
तीच बाब सुशिं बाबत लागू... अरे कचरा टाकला तर चांगल्याचे मुल्यमापन कशावर करणार होय की नॉय ?

अजिंक्य विश्वास's picture

28 Mar 2016 - 8:01 pm | अजिंक्य विश्वास

कचरा ठरवायला नक्की कोणाची मदत घेतलीत? आणि जर तुमच्या दिलेल्या निकषांवर कचरा ठरवायला वाचक बसले, तर भले भले लेखक/लेखिका टिकणार नाहीत.
आणि एखाद्याला मी जर दिलीप कुमार म्हणत नसेल तर तो गेला बाजार आमिर खान तर असू शकतो ना? हिमेश जरा जास्त खाली नाही वाटत का?
आमिर खान म्हणायचे कारण , सतत नाविन्याचा शोध घेणे.
बाय द वे सु.शि. किती आणि कुठल्या साहित्यप्रकारातले वाचले आहेत ते कळवा. आणि सु.शि. समग्र वाचून टिका करत असाल, तर समग्र वाचण्याइतकं टाकावू तर नक्कीच लिहित नसतील ते.

भाऊंचे भाऊ's picture

29 Mar 2016 - 9:21 am | भाऊंचे भाऊ

लोकं टाकावु वाचत असावेत ? काय म्हणता ?

महासंग्राम's picture

29 Mar 2016 - 9:06 am | महासंग्राम

मिपाचा दर्जा खालावला कि नाही याची चिंता करायला मालक समर्थ आहे सबब आपण चिंता करू नये :P

भाऊंचे भाऊ's picture

29 Mar 2016 - 9:14 am | भाऊंचे भाऊ

हे ठरवायला मी समर्थ आहे त्यात तुम्ही नाक खुपसू नये

महासंग्राम's picture

29 Mar 2016 - 12:07 pm | महासंग्राम

नाक खुपसायला सुरवात आपण केली होती तेव्हा आधी आपण बंद कराल आणि मुद्देसूद चर्चा कराल हि रास्त अपेक्षा

बोका-ए-आझम's picture

26 Mar 2016 - 3:33 pm | बोका-ए-आझम

इथे सुशिंचे die hard fan असताना तुम्ही काळजी करु नका. रच्याकने संवाद - पटकथालेखन वाचून थोडी उत्सुकता वाटली. कोणत्या चित्रपटांच्या पटकथा सुशिंनी स्वतः लिहिल्या होत्या?

अजिंक्य विश्वास's picture

26 Mar 2016 - 4:10 pm | अजिंक्य विश्वास

मी सुध्दा अजून पूर्ण माहिती मिळवत आहे. पण १९९४ साली दूरदर्शनवर आलेल्या ’कल्पान्त’ मालिकेचे (मिनी सिरीअल- मिलींद गुणाजी जेव्हा काहीच नव्हता तेव्हा), दुनियादारी सिरीअल, कोवळीक मालिका यांचे पटकथा-संवाद , देवकी सिनेमाची कथा सु.शिं.ची होती आणि त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कथा पुरस्कार मिळाला होता. :)

स्पा's picture

26 Mar 2016 - 10:00 am | स्पा

मंदार आणि रमी :)

जगप्रवासी's picture

26 Mar 2016 - 11:43 am | जगप्रवासी

माझे आवडते लेखक. अमर विश्वास, इन्स्पेक्टर मंदार, बुलंद दारा ही आवडती पात्र.लवकर लिहा वाचतोय

प्रचेतस's picture

26 Mar 2016 - 11:48 am | प्रचेतस

इन्स्पेक्टर मंदार नसून डिटेक्टीव्ह मंदार.

इन्स्पेक्टर्स मध्ये मंदारचा मित्र दिनेश सायगल, फिरोज इराणीचा मित्र इ. ब्रिजेश लाल हे येतेत.

जगप्रवासी's picture

26 Mar 2016 - 12:07 pm | जगप्रवासी

माफ करा घाईत प्रतिसाद देण्याच्या नादात चुकीच टाईप केल. सुशि वाचल की सगळी पात्र डोळ्यासमोर आली त्यामुळे थोडा कन्फ्युज झालो.

सुशि काळाच्या पुढचे लेखक होते हे नक्की

मस्त रे अजिंक्या. (हायला माई कशी आली अचानक)
मस्त लिहिलेय. डिट्टेलात येऊ दे. सुशीच्या लेखनाचे एक कवतिक वाटायचे. ओन्ली पदमिनी अम्बासेडारच्या जमान्यात अल्फा रोमिओ, पोर्शे अन बीमर कुठल्या माहीत असायला मराठी वाचकाला. त्या पण ओळखीच्या करुन दिल्या.

प्रचेतस's picture

26 Mar 2016 - 3:32 pm | प्रचेतस

फेअरडील, डॉज, पोंटेक, स्पीडब्रेक आणि तुफान :)

स्पा's picture

26 Mar 2016 - 4:40 pm | स्पा

डॅमलिन

स्पा's picture

26 Mar 2016 - 4:40 pm | स्पा

डॅमलर*

सतिश गावडे's picture

27 Mar 2016 - 9:56 pm | सतिश गावडे

दारा बुलंद आणि सनी बुलंदच्या सोबतच सलोनीही असायची. कुणाला आठवते का?

सिरुसेरि's picture

28 Mar 2016 - 7:41 am | सिरुसेरि

सनी पटेल म्हणुन कोणी तरी होता.. एका बुक्कीत खांब तोडणारा ..

महासंग्राम's picture

28 Mar 2016 - 11:08 am | महासंग्राम

सनी पटेलच तो. बाकी तो ज्या पुस्तकात आहे, त्याची अजून पर्यंत फक्त एकच एकत्रित प्रथमावृत्ती आली आहे. पुस्तकाचे नाव ’वॉन्टेड’

नूतन सावंत's picture

28 Mar 2016 - 6:42 pm | नूतन सावंत

वा अजिंक्य,वेगळ्या आणि आवडत्या विषयावर लिहिलंय.
@सगा,सलोनी ही दाराची बहीण.

urenamashi's picture

28 Mar 2016 - 11:30 pm | urenamashi

atishay sundar dhaga ....

urenamashi's picture

28 Mar 2016 - 11:31 pm | urenamashi

Lage raho Ajinkya...

दिपुडी's picture

30 Mar 2016 - 10:19 am | दिपुडी

कमिशनर मामा राहिले की

दिपुडी's picture

30 Mar 2016 - 10:20 am | दिपुडी

मंदारचे

आणि तो प्रिन्स नि त्याच्या त्रास देण्याच्या कृप्त्या पण एकदम हटके

lgodbole's picture

8 Apr 2016 - 2:39 pm | lgodbole

छान