एक संघ मैदानातला - भाग ४
एवढे दिवस आमच्यातल्या वीक पाँइण्टचा आप्पांनी अभ्यास करून प्रत्येकाला वेगवेगळे व्यायामप्रकार सांगितले. जेणेकरून शारीरिक क्षमतेत आम्ही कुठे कमी पडायला नको. प्रत्येकाच्या खुबींचा आणि शारीरिक ठेवणीचा विचार करून ते व्यायाम सांगितले कारण त्यांना काहीच्या पोटऱ्याचे स्नायू जास्त ताकदवान हवे होते तर काहींचे मांड्यांचे स्नायू..