अधांतर -2
- परंतू नियतीच्या मनात मात्र एक वेगळाच डाव ठरलेला होता
- परंतू नियतीच्या मनात मात्र एक वेगळाच डाव ठरलेला होता
आज शेजारच्या घरातून सकाळी सकाळी जोर जोरात भांडी वाजल्याचा आवाज आला. आमच्या शेजारी एक सुखवस्तू आणि गोड कुटुंब रहाते. सासू मुलगा सून आणि त्यांची दोन लहान मुले. एकूण च एक मेकांना धरून आणि सांभाळून असतात. म्हणून च मला जर आश्चर्य वाटले. आमची ही आणि ती सून दोघी एकाच ऑफिस मध्ये आहेत - साहजिकच मला संध्याकाळी सगळा रिपोर्ट मिळाला.
आकाशात चंद्र कधीचा डोक्यावर आला होता. घड्याळात १२ चा ठोका वाजूनही गेला होता. ती कधीची हातात फोन घेऊन आकाशाकडे वेड्यागत बघत बसली होती. फोन करावा की न करावा या विचारात! आज त्याचा बर्थ डे!
संध्याकाळी ग्राउंडवर सगळेच जोशात होते. उद्या निघायचं म्हणून आज काही जास्त प्रँक्टिस नव्हती आणि मुख्य म्हणजे आज फायनल ७ ची कव्हर कळणार होती. आप्पा म्हणाल्या प्रमाणे ते काही टूरला येऊ शकत नव्हते त्यामुळे बर्याचश्या गोष्टी आजच ठरणार होत्या. १७ मुलींमधून टूरला जाणाऱ्या १२ जणी...... त्यातून सर्वप्रथम मैदानात उतरणाऱ्या ७ जणी कोण ?
ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश.
राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १.
राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट.
राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर.
राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा.
राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १.
अनाथ आकाशला मराठी अम्मा लहानाचं मोठं करते. डोशाच्या गाडीवर कांदा कापत कापत आकाश बेगमपेठला शिकतो. (इथं अजयच्या आर्त सूरात एक दीनवाणं गाणं, मात्र ठेका तोच) Software Consultant बनून US ला onsite जातो.
इकडे अम्माची झोपडपट्टी redevelop होते पण सुनेने हाकलल्या मुळे अम्मा वृद्धाश्रमात शेवटच्या घटका मोजतेय. तिला भेटायला आकाश हैद्राबादला येतो.
तीची अंतीम ईच्छा म्हणून तीच्या अस्थी तीच्या मूळ गावच्या विहीरीत विसर्जन करायला तो करमाळ्याला येतो. आणी बघतो तर काय? विहिर चक्क कोरडीठक्क पडलीय. वारेमाप ऊस पिकवल्यामुळे सगळ्या जिल्ह्यातच पाण्याची बोंब आहे.
... काय म्हणतील!
आमच्या बायकोचा हा पेटंट डायलॉग. टिम्बटिम्ब च्या जागी कधी आई (माझी आई, तिची सासू. तिला आई म्हणायची कल्पना तिचीच. कारण आई काय म्हणतील!), कधी शेजारी, कधी भाउजी, कधी मैत्रीण असे सगळे आलटून पालटून हजेरी लावत असतात.
मी काय म्हणेन याचं जर का एक शतांश जरी टेंशन माझ्या बायकोला कधी आलं असतं ना तर शपथ हा लेख/मनोगत/मुक्तक/दर्दभरी कहाणी लिहलीचं नसती. पण तेवढे आमचे ग्रह काय मजबूत नाहीत. एका अर्थाने तेही बरंच आहे म्हणा, म्हणजे मी तिच्या रडारवर सहसा नसतो असा मी त्याचा सोयीस्कर अर्थ लावून घेतला आहे.
अचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा तो कधी अनुभवलाय? मी नुकताच अनुभवला...सैराट बघितला तेव्हा!
ब्रेकफास्टला पावभाजी खाण्याची ही काही माझी पहिली वेळ नाही. आदल्या दिवशी घरात काही कार्यक्रम झाला आणि आलेल्या पाहूण्यांसाठी पावभाजीचा मेनु असेल तर पुढचे दोन दिवस सकाळ-दुपार-संध्याकाळ राहिलेली पावभाजी संपवण्याचा अनुभव मला अगदी लहानपणापासूनचा आहे. फक्त माझी आई किंवा बायकोच नाही... तर इतरही काही माता-भगिनींच्या बाबतीत मी हे होताना पाहिलं आहे. एकदा केलेली पावभाजी केलेल्या दिवशी संपली अथवा कमी पडली हे माझ्या तरी ऐकीवात नाही.
सकाळी उशिरा उशिरा म्हणतानासुद्धा ८ ला जाग आली. अजून एवढेचं वाजतायत म्हणजे काकांना निघायला अजून २ तास आहेत. मी परत पांघरुणात डोक खुपसलं. ते आईने पाहिलं आणि मला उठवलं. मी तिला खुणेने गप्प बस सांगायचा प्रयत्न करत असताना बेडरूममध्ये काका शिरले आणि मोठ्या आवाजात मला उठवायला लागले. आता काही इलाजच नव्हता. गपचूप उठून बसले. तोंड धुवून चहा घेईपर्यंत शांतपणे ते पेपर वाचत होते. माझा चहा पिउन झाल्याबरोबर मला हाक मारून मला समोर बसायला लावले. मला वाटलं झालं आता हे लग्नाचा वैगरे विषय काढणार पण त्यांनी तस केल नाही. त्यांनी त्यांच्या कुळाची माहिती द्यायला सुरुवात केली आणि मग हळूहळू गाडी सतीशकडे वळवली.