बेधुंद (भाग ५ )

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
24 Apr 2016 - 7:23 pm

बेधुंद (भाग ५ )

'सुऱ्याने' केलेल्या तक्रारीने विद्यापीठाचे सगळे वातावरण तापले .सगळीकडे उदासी पसरली होती . सेनिअर्स जुनिअर्स कडे बघेनासे पण झाले ! ' फर्स्ट एअर ' मधेच तीन प्रकारचे ग्रुप बनले .पहिला - जो सुऱ्या ला तक्रार मागे घ्यायला सांगत होता , दुसरा - जे नित्या अन सुऱ्या च्या बाजूने होते अन तिसरा - जे कोणाच्याच बाजूने नव्हते . रेक्टर ने 'अजीत' ला एका आठवड्याची मुदत दिली होती , की जर सुऱ्या ने तक्रार मागे घेतली नाही तर अजित ला कॉलेज मधून काढलं जाईल ! अन ताकीद दिली कि जर नित्या किंवा सुऱ्या ला कोणी काही केले तर सरळ त्याच दिवशी त्याला काढून टाकले जाईल .
सिनिअर्स ने लगेच सभा बोलावली . सगळ्या फर्स्ट एअर ला वाळीत टाकायचे ! त्यांच्या कडून 'सेकंड एअर' ने दिलेल्या सगळ्या नोटस परत घ्यायच्या अन काहीही संबध ठेवायचा नाही . सिनिअर्स ने फर्स्ट एअर च्या दुखत्या नसेवर बोट ठेवलं होतं . असं केल्याने फर्स्ट एअरच आपापसातच वाजेल अन तक्रार मागे घेतील . कोलेज ने पोलीसात जाण्याचा निर्णय घेतला नव्हता . पोलिस मध्ये जाऊन नावाजलेल्या विद्यापीठाला सगळ्यासमोर आणायचं नव्हत .
त्या दिवशी मेस मध्ये जसं कुणी 'मेलं' आहे अस वातावरण होत . कुणी कुणाशी एक शब्द बोलत नव्हता . रात्रीचं जेवण करून सगळे आपपल्या रूमवर आले .
अक्षा , नित्या , सुऱ्या अन चंद्या - सगळे चंद्या च्या रूम मध्ये बसले होते .
'सुऱ्या जे झाल ते झालं , तक्रार मागे घे , अजून परिस्थिती बिघावण्यात काय पोइण्ट आहे ?' - चंद्या
'म्हणजे , अस कस सोडून देऊ ? यार तु तर वर्ग प्रतिनिधि आहेस ' - नित्या
'हे बघ नित्या , मान्य कि आपण मित्र आहोत , पण एथ आम्ही लफडी करायला नाही आलो , अजून १- २ महिने नाही झाले तर राडा सुरु , मला 'बी . जे '. ला MBBS भेटत असताना अन ह्या चंद्याला 'COEP' भेटत असूनही इकडे आलो कारण 'कलेक्टर' ह्यायचय आम्हाला , अन अस पोलिसात 'केस' गेली तर कस शक्य आहे ? हे बघ घरच्या कडून खूप अपेक्षा आहेत आमच्याकडून , तू पाउल मागे घे , इथून पुढे मी तरी ह्या किस्स्यात तुझ्या बरोबर नाही . - तात्या ने आपली भडास काढली . कितीही मैत्री घट्ट असली तरी जेव्हा भविष्याचा विचार होतो तेव्हा भविष्य भारी पडतं !
'अरे , पण ह्यात आपली काय चूक ? आपण काही चुकीच नाही करत '- अक्षा
'ते मला माहित नाही , पण सुऱ्या ला तरी अक्कल पाहिजे होती ना ! ते बोलले XXX मार हा गेला लगेच ! - चंद्या
'हे बघ चंद्या , मी तक्रार मागे घेणार नाही - काहीही होउदे , अन मलाही ८७ % मार्क्स आहेत बारावीला , आम्ही पण काय कुठे टाकून दिलेले नाहोत - सुऱ्या रागाने बोलला !
'झक मार मग - आईघाल तुझी' - चंद्या वैतागुन बोलला .
रूम मध्ये शांतता , काही वेळाने नित्या अन सुऱ्या आपापल्या रूम मध्ये निघून गेला . अक्षा त्याच्या रूम मध्ये निघून गेला .
रात्रीचे १० वाजले होते . फर्स्ट एअर शांत बसलं होत . जे सेनिअर्स च्या बाजूने आहेत ते त्यांच्या होस्टेल वरून परत येत होते . अचानक सेकंड एयर वरती आलं अन त्यांनी प्रत्येकाच्या रूम मधून नोट्स घ्यायला सुरुवात केली . दरवाज्यावर जोरजोराने मारून , दरवाजा उघडा असेल तर आत मध्ये जाऊन त्यांनी जबरदस्तीने त्यांनीच दिलेल्या सगळ्या नोटस , Drawing बोर्ड्स जमा करायला सुरुवात केली . शिव्यांचा सुकाळ झाला होता .
सुऱ्या त्याच्या रूम च्या बाहेर उभा होता . सुऱ्याच्या रूम मध्ये नोट्स जमा करायला सेकंड एअर चा बॉडी बिल्डर' आकाश 'पाठवला होता .आकाश अजित चा मित्र होता .
' आकाश , रूम मध्ये जाशील पण परत बाहेर येशील कि नाही हे मला माहित नाही ' - सुऱ्या दरवाजाबाहेर उभा राहून बोलला . नित्या आत आहे' .
आकाश रूम मध्ये गेला . 'नित्या नोट्स कुठायेत तुला सेकंड एअर ने दिलेल्या ?' - आकाश
'त्या कपाटात , नित्या ने हात दाखवला , पण जर का तू एक पेपर पण बाहेर नेलास ना तर आईशप्पथ तुझा हात कापून टाकेन - नित्या जमेल तेवढ्या रागाने आकाश कडे बघत बोलला .
क्षणातच आकाश काही न बोलता निघून गेला .
खाली सगळ्या नोट्स जमा झाल्यावर त्यांनी त्याचा ढीग केला अन आग लाऊन दिली . लाकडी Drawing बोर्ड्स ही त्यात टाकून दिले . मोठ्याने कॅसेट वर गाणी लाऊन काहीजण त्याभोवती कहिजण नाचू लागले . कधी कधी माणूस 'प्रथेमध्ये' एवढं गुरफुटून जातो की चूक बरोबरीच भान राहत नाही . सेकंड एअर ने त्यांनीच लिहिलेल्या / जमा केलेल्या नोट्स जाळण्यात कसला आनंद ? पण त्यांना थर्ड , फायनल एअर कडून तशी 'ओर्डर' होती ! अन त्यांनी ती ऐकली नसती तर त्यानाही वरून काही मदत नसती झाली बहुतेक ! फर्स्ट एअर वरून बघत होत , नित्या अन सुऱ्या आपापल्या रूम मध्ये होते .
' हे जे काय झालं ना ते सगळ नित्या अन सुऱ्या मुळेच झालं - अस बरंच फर्स्ट एअर बोलत होत . एका महिन्यावर मिड - सेम परीक्षा आहे , अन काय करणार आता ? अजून जास्त वाढवण्यापेक्षा नित्यान अन सुऱ्यान तक्रार मागे घेतली पाहिजे . - असे कितीतरी आवाज फर्स्ट एअर मधून ऐकू येत होते .
फर्स्ट एअर मध्ये चार वर्ग प्रतिनिधी (CR ) होते. ते बारावीच्या मार्क्स मारून झाले होते . 'चंद्या' ही त्या चार मध्ये होता. दुसऱ्या दिवशी चारही CR ची मीटिंग student council बरोबर झाली , अन त्यात ठराव झाला की इथून पुढे रेग्गिंग होणार नाही , सगळ नॉर्मल पण तुम्ही तक्रार मागे घेतली पाहिजे . सेनिअर्स नि CR चा मेंदू हलवुन बदलवून टाकला . त्यात बाकीचे २ - CR सांगली चे होते अन अजित हि सांगलीचा होता . आपल्याच भागातल्या सेनिअर्स च करिअर कशासाठी बरबाद करता ? अन जर तक्रार मागे घेतली तर सांगली भागातील सर्वाना नोट्स परत मिळणार होत्या ! - दुनियादारीचे 'गेम 'कळण्या साठीच कॉलेज ची निर्मिती झाली ! असावी
त्या रात्री अक्षा च्या रूम मध्ये मिटिंग भरवण्यात आली . सगळे शांत होते . सतीश ने बोलायला सुरुवात केली .सतीश सांगली चा होता , जरी तो CR नसला तरी , तो त्यान्च्या २ CR चा 'उजवा हात' होता . ज्यांना प्रतिनिधित्व करायला दिलंय ते मार्क्स नुसार पुढे पण पुढारीपणात मागे ! अन सतीश पुढारीपणात पुढे , त्या २ CR चे निर्णय सतीश च्या मंजुरीशिवाय पास होत नसत !
' हे बघा दोस्तानो, रेग्गिंग तर नॉर्मल आहे , अन सगळ्याच कॉलेज मध्ये हे होतंय , सुऱ्या ने तक्रार मागे घेतली पाहिजे ' - ज्याला ज्याला वाटते सुरेश ने तक्रार मागे घ्यावी त्यांनी आपले हात वर करा ! हा प्रश्न आत्ता पुर्ण वर्षचा आहे, फक्त १-२ लोकान्चा नाही. काल काय झाल माहितेय ना ? सतीश ने बोलायला सुरुवात केली
सतीश ला जवळजवळ ९० % लोकांचा पाठिंबा आला
' अरे आपण सेनिअर्स झालो तरी आपण पण दुसर्यांची रेग्गिंग घेणारच ना' - सतीश पुढे बोलला
';लेकिन , कोई गलती कि नाही तो पिछे क्यू ? - अमीर ने नित्या ची साथ दिली , गोरा -गुमटा , चिकना अमीर जम्मू - कश्मीर चा होता , त्याचे वडील काश्मीर मध्ये MLA होते . पहिल्या दिवसापासूनच तो वादात होता , त्याच्या सिगारेट , दारू पिण्याच्या सवयीने !
' देख अमीर , तू यहा का नाही है , इट्स बेटर की तू बीच में मत बोल - सतीश थोड्या रागाने अमीर कडे बघत ओरडत बोलला
' व्हाटस धीस , ये कॉलेज का तो हु मै - अमीर तेवढ्याच शांततेने बोलला
'सत्या , त्याने मला मारलाय , तुला मारलं असतं तर तू असा बोलला असतास का ? - सुऱ्या मधेच बोलला .
'हो , अन तक्रार जर मागेच घ्यायची असेल , तर सेनिअर्स नी सुऱ्या ची माफी मागितली पाहिजे - अक्षा
चंद्या शांत होता . तात्या शांत होता , पण दोघांनीही सतीश ला पाठींबा दिला नव्हता !
'पण , अक्षा तक्रार मागे घ्यायचा प्रश्नच नाहीये इथं - सुऱ्या तू मागे जाऊ नकोस' - नित्या
'अरे , एका महिन्यावर परीक्षा आल्यात , कशाला अजून हा विषय पुढे वाढवायचा - सतीश , 'नित्या तुला माहितेय का अजित सर ची घराची परिस्थिती ? त्यांना वडील नाहीयेत , गरीब घरातून आलाय तो - त्याच्यावर घराची जबाबदारी आहे , आम्हाला माहितेय , आम्ही तिकडचेच आहोत '- सतीश नाराज होऊन बोलला.
' अन जर , असेच असेल तर मग xxx एवढी मस्ती का ? - नित्या
'पण तुमच्या चुकीची सजा , सगळ्या फर्स्ट एअर ला का ? - एक CR शेवटी बोलला !
'हे बघा , तुम्हाला जे करायचाय ते करा , मला जे करायचाय ते मी करेन ! , त्याने मला का मारले माहितेय का तुम्हाला ? तो आपल्या क्लास मधल्या 'अश्विनी 'वर मरतो , मागे लागलाय तिच्या 'कुत्र्यासारखा' ! , मागच्या आठवड्यात त्याने मला ,ह्या अमीरला अन अश्विनी ला बरोबर बघितलं तेव्हा पासून साला खुन्नस देतोय मला - सुऱ्या अमीर कडे बघत बोलला !
' ते काहीही असो , पण तुला हे मिटवावे लागेल - दुसरा CR
'नित्या , उगीच कशाला xxx मारून घेताय , मिटवा - ! बांगड्या काय आम्ही पण नाहीत घातल्या '- सतीश बसूनच मान थोडीशी वर करत बोलला
'xxx नीट बोल सत्या , माहितेय मला कि तू त्याचा चमचा आहेस , - नित्या रागाने बोलला .
अन अचानक मिटिंगच तापमान वाढ्ल . अन CR ने मिटिंग संपली असं सांगितलं ! सगळे बाहेर गेले . रूम मध्ये फक्त नित्या , सुऱ्या , अक्षा अन आमीर होता ! अमीर ने रूम मध्ये 'निर्वाणा ' च ' come as you are - हे गाण बऱ्यापैकी मोठ्या आवाजात लावलं .
अमीर अन अश्विनी चे सूर जुळत आले होते . काय माहित पण महाराष्ट्रीयन पोरींना 'जम्मू काश्मीर ' च्या पोरांचं जरा जास्तच आकर्षण असतं ! एकाच तालुक्यातील असल्याने सुर्‍या अन अश्विनी मध्ये चांगलीच मैत्री झाली होती . अश्विनी ने अमीर ला अजित बद्दल सांगितलं होतं कि तो सारखं फोन करतो अन त्याने तिला प्रोपोज केले होते , पण अश्विनी अजित ला भाव देत नव्हती ! एकाच लॉबी त राहत असल्याने अमीर , नित्या चांगले मित्र झाले होते . अन अश्विनी मुळे सुऱ्या अन अमीर मित्र बनले होते .
रुम मधील शान्तता बघुन अमिर ने बोलायला सुरुवात केली.
' देख यार , बडा पहाड होता है , तो उसमे भी छेद होता है - और फर्स्ट एअर में तो पचास बंदे है , कोई तो छेद देगा हि ! लेकिन तू उस कमीने अजित को मत छोड ! - अमीर ने सिगरेट पेटवली .
'हम्म , चल जाता मै अभी , लxx ज्यादा पिया मत कर ! अस म्हणत नित्या , सुऱ्या अन अक्षा बाहेर गेले .
तिसऱ्या दिवशी मध्यरात्री 'फायनल एअर' चे 'रवि' अन 'आदित्य' नित्या च्या रूम मध्ये आले . रवि अन आदित्य हे क्लास टोपर होते ! रवि ला IIT मध्ये M.Tech साठी प्रवेश मिळाला होता अन आदित्य ने MPSC करण्यासाठी इथंच M.Tech साठी प्रवेश घेणार होता .आदित्य सोलापुर चा होता , गाववाले एकमेकांच ऐकतात म्हणून कदाचित समजूत घालायला आदित्य आला असेल त्यांनी कधी कुणाची रेग्गिंग घेतली नव्हती ! तेवढा वेळच नसे त्यांना ! सकाळी ८ - २ ग्रंथालय , २- ३ दुपारी जेवण , २-९ पुन्हा लायब्ररी , ९-१० रात्रीचे जेवण - जेव्हा रेग्गिंग संपलेली असते , अन १० वाजता झोप !!! MPSC पास करण्यासाठी एवढी रोज घासणे म्हणजे नॉर्मल असते इथे !
'या सर , बसा - सुऱ्या आपल्या बेड वरून उठला अन त्यांना बसायला जागा दिली .
'कसायेस नितेश ? आयला तुम्ही तर सगळं कॉलेज हलवून टाकलं ' - रवि आपला चेष्मा सांभाळत बोलला
'म्हणजे , तुम्हाला म्हणायचंय कि , चूक आमची आहे ?' - नित्या
'तसं , नाही नितेश , तुझा भाऊ 'संतोष' माझा मित्र आहे , पुण्यात आहे ना तो ? MPSC साठी ? तू त्याला काही सांगत नसलास तरी कालच बोललोय मी त्याच्याशी ! एवढा सज्जन भाऊ अन तू असा कसा रे ? अन तुम्ही समजून घ्या कि , आमच्यावर पण खूप प्रेशर आहे , 'डीन' ने सांगितलंय कि काहीही झालं तरी पोलिस केस नाही झाली पाहिजे ! एवढी सगळीकडे आपल्या कॉलेज ची बदनामी झालेली चालेल का तुम्हाला ? अरे महाराष्ट्रात कुठेही जा जवजवळ सगळे अधिकारी आपल्या विद्यापीठातले आहेत ! 'रेग्गिंग ' वाईट नाही हे तुम्हाला नंतर समजेल ! आपल्या एवढी एकता कुणाकडेच नसेल, फक्त इथेच नाही तर तुम्ही 'पासआउट' झाल्यावर कळेल तुम्हाला की सेनिएर - जुनिएर काय नात आहे , आपल्या कॉलेज मधल्या पोरांचं ! ह्या गोष्टी दिसत नाहीत का तुम्हाला ? तुम्ही एवढे चांगले मित्र झालात हे रेग्गिंग मुळेच ! समजतंय का तुम्हाला ? - एक काम करा तुम्ही तक्रार मागे घ्या , कशाला नादी लागताय त्या अमीर च्या , 'बडे बाप का बिगडा बेटा' आहे तो ! - आदित्य एखाद्या कलेक्टर सारखा दिसत होता !
'हो , बरोबर आहे सर , पण त्याने मला मेस मध्ये मारायला नको होत -' सुऱ्या
'अन तू काय केलं ? बर , जे झालं ते झालं , आत्ता पुढे काय ? बऱ समजा तुम्ही त्या अजित ला कोलेज मधून काढून जरी टाकलं तरी अजित तुम्हाला सोडेल का ? तुम्हाला ही शिकायचंय की नाही इथे ' आपल्या आई बापांच्या खूप अपेक्षा असतात रे ! उगीच रागाच्या पोटी का जाळताय स्वप्न एकमेकांची ? अन , त्या अश्विनी ला सांग कि अमीर पासून जर दूर राहा , ड्रग्स घेतो तो , दररोज दारू , काय पोरगा आहे कि काय ? तुझी मैत्रीण आहे अन तुझी गावावली आहे म्हणून सांगतोय ! , ह्याचा अर्थ असा नाही कि मी अजित चांगला आहे अस सांगतोय ! '- रवि सुऱ्याला बोलला .
'ते जाऊदे रवि , तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे - 'विचार करा ह्यावर , अजित माफी मागायला तयार आहे , सर्वासमोर जिथे त्याने तुला मारलं मेस मध्ये - उद्या संपवा सगळ हे ! - आदित्य
नित्या अन सुऱ्या ने मान हलवली .
रवि अन आदित्य बाहेर गेले . अमीर उघडाच चड्डी मध्ये लॉबी तून फिरत होता ते लॉबी तून बाहेर जाताच तो नित्या च्या रूम समोर आला .
' गये क्या वो चुतीया लोग ? - अमीर हसत बोलला , एवढ्या थंडीतही तो उघडा फिरत होता , कदाचित आजही त्याने ड्रग्स घेतले असावे !
नित्या त्याच्याकडे बघत हसला !
' साले , कमीने तू ये बता - अश्विनी के साथ कोई गेम तो नही खेल राहा ना ? वो मेरे बेहन जैसी है , मेरे गाव से है , अगर तुने कुछः गलत किया ना तो याद रख ! , अगर तुने उसका 'दिल तोडा ना तो BC तुझे तोडूंगा मैं , याद रख ! सुऱ्या
' नही रे जिजाजी , सच्चा प्यार है - असं म्हणत अमीर सुऱ्या च्या गळ्यात पडला अन सुर्‍याच्या गालाच चुंबन घेतल !!!!

(क्रमश :)

बेधुंद - भाग १ : http://www.misalpav.com/node/34768
बेधुंद - भाग २ : http://www.misalpav.com/node/34925
बेधुंद - भाग ३ : http://www.misalpav.com/node/35006
बेधुंद - भाग ४ : http://www.misalpav.com/node/35777

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

25 Apr 2016 - 12:44 am | नेत्रेश

> "नही रे जिजाजी , सच्चा प्यार है"
काश्मीर मध्ये बायकोच्या भावाला जिजाजी म्हणतात?

अविनाश लोंढे.'s picture

25 Apr 2016 - 1:11 am | अविनाश लोंढे.

असे का म्हटले पुढील भागात समजेल , धन्यवाद ! :)

वगिश's picture

25 Apr 2016 - 1:41 pm | वगिश

पुभाप्र