बेधुंद (भाग ६ )

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
27 Apr 2016 - 8:08 pm

पुढच्याच रात्री अजीत नित्याच्या रूम वर आला . आदित्य अन रवी पण बरोबर होते . आतून दरवाजा बंद केल्याने आत काय चाललं आहे हे बाकीच्या विद्यार्थ्यांना कळायला मार्ग नव्हता . तसही भीतीने किंवा 'उगीच लफड्यात का पडायचे !' म्हणून आधीच बाकीचे विद्यार्थी आपापल्या रूममध्ये जाऊन बसले होते .
रूम मध्ये नित्या , सुऱ्या , तात्या , चंद्या अन अक्षा हे सारे होते . अजीत खाली बसला होता अन त्याची मान त्याच्या गुडघ्यामध्ये होती . 'मेस' मध्ये पिसाळलेल्या जनावरासारखा अजित आता एखाद्या लहान मुलासारखा बसला होता . 'करीयर' पण काय भयानक गोष्ठ असतें नाही ! त्याच्या समोर सुऱ्या उभा होता .
'आय एम सॉरी ' अस खाली बघूनच तो सुऱ्या ला बोलला . चंद्या अन तात्या ची मान लाजेने खाली गेली होती . कितीही राग असला तरी , आपल्याच सिनिअरला असे बघितलेले बघवत नव्हते !
'सुऱ्या , बस आत्ता यार ! असं सिनिएर्सना बघन मला जमत नाही , उद्या जाऊन तक्रार मागे घे - तात्या
'ह्यांनी मला मेस मध्ये मारलं , मग माफी पण मेस मध्येच घ्यावी लागेल '- सुऱ्याच्या अंगात लाखो हत्तींच बळ आलं होतं
'बस कर आत्ता , सर ठीकेय उद्या हा तक्रार मागे घेईल' - अक्षा मध्येच सुऱ्या वर ओरडत बोलला
'सोड सुऱ्या ,किस्सा खतम ! अन तू पण वाजवल्या ना ह्याला' - नित्या बोलला
'हवं तर अजून मार ह्याला इथे , तुझं मन भरलं नसेल तर ! '- कधीही न रागवणारा आदित्य रागाने अजित कडे हात दाखवत बोलला .
त्या पाचही जणांना आता लाजल्यासारखे झाले होते .
'ठीकेय ! '- सुऱ्या बोलला

दुसऱ्या सकाळी नित्या अन सुऱ्या रेक्टर कडे जाऊन त्यांनी तक्रार अधिकृतपणे मागे घेतली . रेक्टरच्या नजरेत ते दोघे आता खलनायक झाले होते . त्या दिवसापासून विद्यापीठातील सगळी 'रेग्गींग' कायमची बंद झाली ! प्रथा मोडण्यासाठी कदाचीत अशा धमाक्याची गरज असतेच ! त्या दिवसापासून नित्या अन सुऱ्या बाकींच्या , विशेष करून फर्स्ट एअरच्या नजरेत व्हिलन बनले होते , पण काही मुलींच्या नजरेत हिरो बनले होते . कदाचित मुलींना बेधुंद मुलं आवडत असावीत ! सगळ पुन्हा नेहमीप्रमाणे सुरु झाले . दररोज सकाळी कॉलेज , मेस , मैदान !
दिवसामागून दिवस सरत होते. अन पहिल्या 'मिड- सेमिस्टर' परीक्षेची वेळ आली . नित्याच्या ' नितेश नोट्स " सगळीकडे प्रसिद्ध झाल्या . मागच्या तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिका त्याने सोडवल्या होत्या . कमी वेळात पासिंग ची खात्री होती . अश्विनी ने त्यांना नोट्स देऊन मदत केली . अमीर अन अश्विनी खूप एकत्र जवळ आले होते . सुऱ्या हि आपल्या मैत्रिणीला भेटत होता . 'मिड -सेमिस्टर' चा निकाल लागला , पुन्हा चंद्या टोपर च्या लिस्ट मध्ये होता . अक्षा ला हि चांगले मार्क्स मिळाले , त्याखालोखाल तात्या , नित्या अन सुऱ्या !
अक्षाला जास्त मार्क्स मिळाल्याने तात्याने त्याचा लायब्ररी मधला वेळ वाढवला . अक्षा 'one night show' होता , एकदा वाचाल , समजलं की त्याला पाठ करायची गरज नसे ! काय माहीत कसे काय लायब्ररीत न जाता चांगले मार्क्स त्याला मिळाले होते ! तात्या त्याच्या उलटा होता , पाठ करणे महत्वाचे , समजले नाही तरी चालेल !
त्यांच्यातली मैत्री पुन्हा एकदा घट्ट झाली , अन त्यांनी त्यांच्या ग्रुप ला ' फाईव्ह स्टार्स ' असं नावं दिलं . काहीही झालं तरी सगळ्या कॉलेज मध्ये ' फाईव्ह स्टार्स ' चा दरारा होता, अश्विनी पण त्यांच्या ग्रुप मधली एक 'चांदणी' बनली ! तिलाही बाकीचे घाबरत होते अन सिनिअर्स चा त्रास कमी झाला होता ! मैत्रीत पुन्हा दिवस नाचू लागले .
बघता - बघता पहिल्या 'सेमिस्टर' च्या परीक्षेची वेळ झाली होती . सगळं फर्स्ट एअर लायब्ररीत पडून होत . कुणी रात्री कॉलेज मध्ये अभ्यासाला जात होते . Engineering Drawings अन Maths -१ ने सगळ्यांची झोप उडवली होती . कशीबशी परीक्षा संपली सुट्टी साठी सगळे आपापल्या घरी गेले . फाईव्ह स्टार्स ' एकाच ST मधून घरी जात होते . बस मधून जाताना सगळे सुऱ्या ला शिवेका वरून चिडवत होते . शिवेका पण अमीरसारखी कश्मीर ची होती . नाजूक , सुंदर , गोरी !
अमीर सुऱ्या ची शिवेका बरोबर सेटिंग लावत होता पण शिवेका जास्त भाव देत नसे ! अमीर मजेमध्ये सुऱ्या ला जिजाजी म्हणत असे !

' आयला , हे काश्मीर चे लोक काय खातात काय माहीत , तुझी आयटम एवढी चिकणी कशी काय ? - अक्षा
' अबे , माझी आयटम नाहीये ती , त्या अमीर मुळे जरा थोडं क्लोज आलो आहे - सुऱ्या गालातल्या गालात हसत बोलला
' बघ , तुला पटवायची नसेल तर सांग तस्स ! मी पटवेन तिला - अक्षा
' पटली तर बरंच होईल ' सुऱ्या हसत बोलला .
' समजा महाभारत आपल्या क्लास मध्ये घडले असते तर , आय मीन नित्या तू भीम , चंद्या युधिष्टिर , अक्षा अर्जुन , मी अन सुऱ्या नकुल, सहदेव ! - तात्या ने आपले कसेही कुठेही फिरणारे 'लॉजिक' काढले !
' पण द्रोपदी कोण ? - अक्षा हसत बोलला !
' शिवेका…. सगळे एकदम हसत बोलले !
सुऱ्या अक्षा ला मजेत मारू लागला .

मित्रांच्या गप्पात ४-५ तासांचा प्रवास कसा सहज निघून जातो हे समजत नाही !
१ महिन्याची सुट्टी संपवून पुन्हा ते कॉलेज साठी आले . निकाल लागला, चंद्या पहिल्या तिघात , अन अक्षा , तात्या पहिल्या १० त होते . अक्षा ला तात्या पेक्षा जास्त मार्क्स पुन्हा मिळाले होते . तात्या त्याच्या रूम वर येउन पुन्हा -पुन्हा अक्षा चे 'मार्कशिट' बघत होता ! सुऱ्या 'Maths १' मध्ये नापास झाला होता . नित्या कसाबसा 'ऑल क्लिअर ' झाला होता .
आत्ता वेळ होती दुसऱ्या सेमिस्टरची ! 'सम' सेमिस्टर बरेच वेगवेगळे कार्यक्रम घेऊन येते . काही दिवसाने आन्तर - विद्यापीठ क्रीडा स्पर्धा असल्याने सगळे मैदानवर दिसू लागले .सुऱ्या नापास झालेल्या विषयावर जास्त वेळ देऊ लागला होता चंद्या , तात्या अन नित्या ने खो -खो च्या कॉलेज टीम मध्ये आपली जागा पक्की केली . नित्याची निवड क्रिकेट च्या टीम मध्ये पण झाली होती . पहिल्याच वर्षी कॉलेज च्या टीम मध्ये निवड होणे हे काही 'हिरो'पेक्षा कमी नसे ! . विद्यापीठातल्या टीम मध्ये जागा मिळणे हे खूप प्रतिष्ठेच होत ,अन त्यात 'फर्स्ट एअर 'मध्ये विद्यापीठ संघात निवड होणारी पोर कॉलेजच्या इतिहासात बोटावर मोजण्या एवढी होती कारण त्यांची स्पर्धा सेकंड , थर्ड , अन फायनल च्या विद्यार्थ्याबरोबर असे ! .
'अक्षा' ची निवड वक्तृत्व स्पर्धेच्या कॉलेज च्या टीम मध्ये झाली होती, अन त्याचबरोबर 'शिवेका' ची पण निवड झाली होती .अक्षा मराठीतून तर शिवेका इंग्रजी मधून !
इंटर क्लास स्पर्धेत , अक्षाच्या बरोबर फायनल एअर चा प्रशांत होता पण अक्षा न जागा पटकावली . आत्ता त्याचं पुढंच लक्ष कॉलेज स्पर्धा जिंकून आन्तर - विद्यापीठ - राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत जाण हे होत .
ज्या दिवशी अक्षा ची निवड कॉलेज टीम मध्ये झाली त्याच दिवशी विनय अक्षा च्या रूम वर आला . विनय फायनल एअर चा विद्यार्थी ' होता अन वाद -विवाद अन वक्तृत्व ' संघाचा कर्णधार होता .नित्या अन अक्षा रूम मध्ये होते .
'अक्षय कसा आहेस ? - CAT परीक्षेमध्ये ९९ % पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेला विनय बेड वर बसत बोलला .
'मी मजेत अन तुम्ही ? - अक्षा
' मस्त , ऐक तू तुझं नाव लिस्ट मधून मागे घे अन सरांना सांग कि ह्या वर्षी तुला भाग घ्यायचा नाहीये ' - विनय अक्षा ला ऑर्डर देत बोलला .
'पण का ? प्रशांत तुमच्या भागातला आहे म्हणून ? मी माझ्या क्षमतेवर निवडलो गेलो आहे ' -अक्षा
' तसं नाही रे ! प्रशांत ला संधी दे , तुझ्याकडे अजून ३ वर्ष आहेत , तू होशील च पुढच्या वर्षी सिलेक्ट अजून ! ' क्यालीबर 'आहे तुझ्यात ! प्रशांत च शेवटचं वर्ष आहे अन त्याला MPSC करायची आहे , विद्यापीठ संघात त्याची निवड झाली तर त्याला मुलाखतीत मदत होईल . एक जुनिअरच्या नात्याने तू तुझं नाव मागे घे ' - विनय
' पण सर , ह्याचा काय भरोसा की प्रशांत सर ची निवड विद्यापीठ टीम मध्ये होईल ? स्पर्धा अजून 'टफ' होईल पुढे , नाही का ? अन ह्याचा काय भरोसा कि माझी ही निवड पुढच्या वर्षी होईल ? - अक्षा
' मी जे बोलतोय ते कर ! विनय रागात बोलला !
' हे बघ विनय , तुला जे करायचं ते कर मी माझं नाव मागे घेणार नाही ' - अक्षा आत्ता विनय सर वरून विनय वर आला होता !
' काय ?? विनय …, सेनिएर्सना इज्जत कशी द्यायची कळत नाही का ? , तुम्हाला ना माज आलाय ! १-२ राउंड झाले ना तुमच्यावर मग कळेल !' - विनय रागाने ओरडला .
' ये विन्या चल , बाहेर निघ , अन काय उपटायची ती उपट ' - नित्या उभा राहून दरवाज्याकडे हात दाखवत बोलला
विनय चलबिचल झाला . आज रात्री च सांगतो काय उपटतो ते - अन तो रूम च्या बाहेर गेला .
'राउंड' म्हणजे जर 'फर्स्ट एअर' जास्त मस्ती करत असेल तर सगळ्या 'फर्स्ट एअर' ला सेनिअर्स च्या होस्टेल ला न्यायचं अन TV हॉल मध्ये रांगेत उभं करायचं . मान खाली घालून अन अजून मारहाण अन गुलामगिरीची आठवण करून द्यायची . त्या रात्री नित्या अन अक्षा ठरवून बाहेर गेले अन बकिंच्यावर 'राउंड' झाला राउंड मध्ये जास्त पिसले जायचे ते CR ! कारण फर्स्ट एअर ची जबाबदारी CR ची असे ! , त्यात चंद्या पण आलाच ! एक दोघ जन चक्कर येयून पडल्याशिवाय राउंड बंद होत नसे ! .पण कुणी तक्रार केली नाही . अन कदाचित करून काही उपयोग पण नसता झाला . पुन्हा दुसऱ्या दिवसानंतर ' जैसे थे ' !!!

'खो-खो' चा सराव खूप थकवून सोडायचा ! मुली पण मैदानवर असायच्या त्यामुळे सम सेमिस्टर आवडायला लागली होती , अक्षा अन शिवेका स्पर्धेच्या तयारीच्या निम्मिताने जरा जवळ येऊ लागले होते , त्यांना मैदानवर जायची गरज नसे पण तरीही ते जात असत ! अक्षाला प्रेमात तसा काही रस नव्हता ! त्याच्या मते प्रेम हे 'टाईमपास' चे दुसरे नाव आहे !
तिकडे अश्विनी अन अमीर दिवसभर मोबाईल वर लागून राहिलेले असायचे . सुऱ्या ला हळूहळू अमीर च्या खरेपणाची जाणीव ह्यायला लागली . पुण्यामध्ये त्याची एक गर्लफ्रेंड होती . अश्विनी सहजासहजी अमीर ला पटणारी नव्हती पण त्याच देखन रूप अन त्याचे उच्च प्रतीचे कपडे , मोबाईल सगळंच तिला भारावून सोडणार होत ! अमीरच सगळ सबमिशनही ती करायची ! ती खरंच त्याच्या प्रेमात वेडी झाली होती . ते अधून मधून शिर्डी ला जात असत , आपल्याकडे देवस्थानाच्या जागी रूम मिळणे खूप सोपे आणि सुरक्षित ! पहील चुंबन घेऊन झालं की बेड पर्यंत त्याचं प्रेम एकाच आठवड्यात गेले होते ! सुऱ्या ला त्याची जाणीव होतीच , पण तो अश्विनीला ह्याबद्दल काही बोलत नसे !
हळूहळू अश्विनी ला अमीर बद्दल शंका यायला लागली . अन सारखं सारखं शारीरिक संबंध ठेवायचा तिला किळस वाटू लागला . त्यांच्यात भांडण होऊ लागलं . त्यातच अश्विनीला अमीर च्या मोबाईल मध्ये त्याच्या गर्लफ्रेंड चा फोटो मिळाला अन तिचा प्रेमावरून तिचा विश्वास उडाला . दिवसभर ती रूम मध्ये रडत बसली होती . सुऱ्या च्या मैत्रीने तीला गारवा वाटत होता . हळूहळू अमीर अन सुऱ्या च्या नात्याचं रुपांतर मैत्रीतून , शत्रुत्वा कडे वाहू लागलं होत !

सेकंड सेमिस्टर ची मिड -exam संपल्यानंतर इंटर- कॉलेज स्पर्धेसाठी शिवेका , अक्षा ,विनय अन अजून बाकीचे २ निघायला तयार झाले . स्पर्धा बेंगलोर ला होती . फर्स्ट एअर ची सगळ्यात हॉट मुलगी म्हणून 'शिवेका' प्रसिद्ध होती . ८-९ महिन्याच्या काळातच तीला १४ मुलांनी प्रोपोज केलं होत .
ठरल्याप्रमाणे वक्तृत्व स्पर्धेची 'टीम' बेंगलोर ला निघण्यासाठी निघाली .एवढ्या लांब ट्रेन ने प्रवास करायची पहिलीच वेळ होती अक्षा ची ! स्लीपर क्लास चे तिकेट कॉलेजनेच करून दिले होते . साहजिकच अक्षा अन शिवेका एकमेकांच्या बाजूला बसले , आधीच विनयशी वाजल्याने अक्षा अन विनय एकमेकांशी बोलत नव्हते . तिसऱ्या वर्षाची अनिता पण टीम मध्ये होती .
आपला नेहमीचा कॅम्पस सोडला की कुणाचीच पर्वा राहत नाही . काहीवेळ अक्षा अन शिवेका अमीर बद्दल बोलत होते , मग अश्विनी , मग सगळ्या कॉलेज बद्दल , मग बाकीचे … देशाचे , करियर अन सगळे काही ! बोलणे संपल्यावर त्यांनी गाणी गायला सुरुवात केली , मस्ती मस्तीत 'हम तुम एक कमरे में बंद हो … अशीही गाणी येऊ लागली . ह्या वेड्या गाण्यांनी कदाचित त्यांच्यातील अंतर दूर केलं होत !
५-६ तास संपले होते , संध्याकाळ झाली होती ! जसा जसा प्रवास सुरु होता तसं- तसं शिवेका ला झोप येऊ लागली . दोघांच्या मांड्या एकमेकांना चिटकून आग शरीरात आग भडकवु लागल्या ! कदाचित शिवेका ला अक्षा आवडत असावा ! अक्षाला , शिवेका पहिल्यापासूनच आवडत होती . पण एवढी सुंदर पोरगी आपल्याला पटेल का ? अन तसाही अमीर सुऱ्या साठी शिवेका ची सेटिंग करत होताच ! उगिच मैत्रीत लफडे कशाला म्हणून त्याची हिम्मत झाली नव्हती !
ट्रेन पुढे जात होती अन मनात वादळ उठू लागलं होत ! हळूहळू शिवेका ला झोप आली . अन तिची नाजूक मान अक्षा च्या खांद्यावर पडली . तिचे वाऱ्यावर उडणारे केस अक्षा च्या चेहऱ्यावर येत होते . तिने तिचा एक हात अक्षाचा च्या छातीवर ठेवला अन त्याचा शर्ट पकडला ! अक्षा चा एक हात पाठीमागून तिच्या कमरेवर गेला , तिच्या टी -शर्ट अन पेंट मधल्या अंतरावर फिरू लागला . त्याच हृद्य वाऱ्याच्या वेगाने धावत होत !
काय होतंय हे ? एवढ्या लवकर हे कळायला मार्ग नव्हता ! पण जे होतंय ते सुखद आहे असं त्याला वाटत होते आपण मुलगा आहे अन हिलाच जर काही आक्षेप नसेल तर 'टायमपास' करायला काय हरकत ' ?
नकळत त्याचा हात तिच्या कमरेवरून फिरू लागला . तिच्या कमरेच्या गरम स्पर्शाची आग त्याच्या हातातून मेंदूपर्यंत पोहचली . 'शिवेका खरंच झोपली आहे काय ? की ती हि जागी आहे ? काय आपण तिच्या 'मैत्रीचा 'फायदा उचलत आहे काय ? 'असे लाखो विचार त्याच्या मनात फिरू लागले . समोर बसलेल्या बाकीच्यांचं त्यांना काही घेणदेण नव्हत . त्यात अनिता अन विनय च अफेयर असल्याने आधीच ते एका सीट वर एकमेकांना बिलगून बसले होते . अजून एक फायनल एअर चा मुलगा टीम मध्ये होता पण त्याचा काही फरक पडत नव्हता .
त्यांना समाजाशी काही घेणेदेणे नव्हते अन बर्थ मध्ये सगळेच आपल्याच कॉलेज चे असल्याने बाकीच्या कुणाचं लक्ष जाईल ह्याची शक्यता कमीच होती अन जरी गेलं तरी त्याचा काही फरक पडणार नव्हता ! तो तिच्या सुंदर चेहऱ्याकडे बघत होता .शिवेका च्या घरचे लोक बरेच श्रीमंत होते . तिच्या वडिलांनी दोन लग्न केली होती , त्यामुळे शिवेका ला दोन आया होत्या . २ आईंच प्रेम , वडिलांचं प्रेम अन एकुलती एक मुलगी म्हणून तिचे लाड पहिल्यापासून उतू जात होते . अभ्यासात पण हूषार असल्याने ती फर्स्ट सेमिस्टर च्या निकालानंतर पहिल्या ५ मध्ये होती !
सुऱ्या चा हात तिच्या कमरेवरून फिरत होता . जशी गर्लफ्रेंड असावी त्या सगळ्या प्रकारामध्ये शिवेका एकदम उचित होती .पण हे एकदम , एवढ्या लवकर होत आहे ह्यावर विश्वास अक्षाचा बसत नव्हता ! त्याच्या हाताच्या रक्तवाहिन्याना जसं एक नवीन जीवन मिळालं होत . तो हळूच आपला हात अश्विनी च्या कमरेवर फिरवत होता .
'काय आहे हे ? प्रेम ? मैत्री ? वासना ??? कि अजून दुसंर काही ? कालपर्यंत सुऱ्या ला आपण शिवेका वरून चिडवत होतो , ती शिवेका आज माझ्याबरोबर ? कदाचित ती झोपली नसेल ? कदाचित तिला माहित हि नसेल कि मी काय करत आहे ?' तो तिच्या झाकलेल्या डोळ्याकडे बघत होता . तिचे सरळ , गोरे नाक अन गुलाबी नाजूक ओठ त्याला हरवून टाकत होते .
अचानक शिवेका ने डोळे हळूच डोळे उघडले . सुऱ्या च्या मनात एक धडधड सुरु झाली होती . काय बोलेल शिवेका ?
शिवेका ने त्याच्या डोळ्यात बघितले ? अशी नजर कधीच अक्षाने पहिली नव्हती . कधीकधी शब्दापेक्षा डोळे खूप बोलून जातात . तिच्या डोळ्यात आपलेपणा होता , तिच्या डोळ्यात विश्वास होता , तिच्या डोळ्यात तिला कुणीतरी फसवल्याची वेदना होती . तिचे ओठ हळूच फुलले अन तिने त्याच्या डोळ्यात बघून स्मितहास्य केलं . अजून थोडस जवळ येयून तिने पुन्हा डोळे मिटले . ती प्रवासाने थकलेली दिसत होती !
हळूच त्याचा हात अजुन थोडा खाली गेला अन शिवेका ने डोळे मोठे केले ! त्याने तो हात तिथच थांबवला अन दोघेही तसेच झोपी गेले !

बेंगलोर मध्ये ३-४ दिवस ते बिनधास्त पणे जगले ! कुणाची पर्वा नाही , दिवस रात्र एकत्र हातात हात घालून ! स्पर्धेत विनय सोडला तर कुणीच विजयी झाला नाही , स्तर जितका वरचा , स्पर्धा तितकीच कठीण !
अन पुन्हा परत जायची वेळ आली . नेहमीप्रमाणे त्यांनी वरची बर्थ निवडली . ३-४ दिवसात त्याचं बरंच बोलून झालं होत ! का काय माहित , पण दोघांना हे नात पहिल्यासून आहे अस वाटत होतं . इतक्या लवकर पण प्रेम होऊ शकत ?
शिवेका चा एक बॉयफ्रेंड आहे , अधूनमधून तो तिला भेटायला असे अस अक्षाने ऐकल होत पण त्याला कधी पाहिलं नव्हत .
' ये जो हो रहा है , सही नही है ? - शिवेका उदास दिसत होती , कदाचित तिच्या मनातली दुविधा तिच्या चेहऱ्यावर आली होती .
' पता है ' - अक्षा
'मतलब ? - शिवेका
' तुने कल बताया की तेरा बॉयफ्रेंड भी है , वैसे मुझे पता तो था ही , लेकिन अब 'कन्फर्म' हुआ - अक्षा ची छाती का कुणास ठाऊक धडधडू लागली .
' तेरी भी तो गर्लफ्रेंड थी पहले ' - शिवेका
' लेकिन अब नही है - पर तेरा तो हिरो अब भी है ' क्या है ये ? प्यार ?
' तू बता , क्या है ये ? ' - शिवेका
'मुझे नही पता, लेकिन अब वापीस जाने को मन नही करता ' - अक्षा
' तू तेरे बॉयफ्रेंड से प्यार नही करती ? - अक्षा च्या मनात चलबिचल सुरु होती . एकीकडे 'टायमपास' म्हणता म्हणता तो आता खरंच शिवेकात गुंतत चालला होता .
'ना , नही करती ' - शिवेका ने सहज बघत सरळ उत्तर दिले
'क्या ?' अक्षा चे तोंड उघडेच राहिले .
' वो मुझे पसंद नही है , बचपन से हम साथ पढे , और मै जब ११ वी में थी तो उसने मुझे प्रोपोज किया , मैने , ना बोला तो उसने अपने हात कि नस काट ली , पागल है वो ! अपनी जान से ज्यादा प्यार करता है मुझे ! मेरे घर वाले और उसके घर वाले 'फ्यामिली फ्रेंड्स' है , तो सबने मुझे उसको 'हा' बोलणे को कहा ! वो तो जिद पे अडा था की , अगर मै नही बोलुंगी तो वो और एक बार जान देणे कि कोशिश करेगा ! हमारे पेरेंट्स भी चाहते है की हम एक दुसरे से शादी करे ! लेकिन वो मुझे बिलकुल पसंद नही है , पागल है वो ,लगता है , क्यु मै उस दिन हा बोली ?
मुझे तू पसंद है , मै तुमसे प्यार करती हू अक्षय ! शिवेकाने भरलेल्या डोळ्याने अक्षय कडे पाहिलं अन त्याचा हात अजूनच घट्ट पकडला ! तुम भी करते हो ना प्यार मुझसे ?

अक्षाच मन तिथंच फिरू लागलं . 'काय पोरगी आहे यार , ३-४ दिवस बरोबर आहे अन आता जाताना हे सगळ सांगतेय ! 'टायमपास' ने एवढी लागेल असं त्याला स्वपातही वाटलं नव्हत ! ३-४ दिवस मजा करायची अन परत विद्यापीठात गेलं कि सगळ विसरायचा असा सोपा 'प्ल्यान ' होता त्याचा !
.
अक्षाच्या डोळ्या समोर तिचा सनकी बॉयफ्रेंड हातात ब्लेड घेऊन नस कापताना दिसू लागला !
त्याच्याबरोबरच लग्न कर , अस म्हणणरे तिचे आईबाप दिसू लागले !
मै तुमसे प्यार करती हू , अस म्हणणारी नाजूक शिवेका दिसू लागली !
जोरजोराने हसणारा नित्या अन रागावलेला सुऱ्या त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागले !

(क्रमश : )

बेधुंद - भाग १ : http://www.misalpav.com/node/34768
बेधुंद - भाग २ : http://www.misalpav.com/node/34925
बेधुंद - भाग ३ : http://www.misalpav.com/node/35006
बेधुंद - भाग ४ : http://www.misalpav.com/node/35777
बेधुंद - भाग ५ : http://www.misalpav.com/node/35798

कथाविरंगुळा