मदत

मला माहीत असलेले रामायण

पोटे's picture
पोटे in काथ्याकूट
13 Sep 2014 - 10:42 pm

(इस्पीकचा एक्का यांच्या धाग्यावरील श्री पोटे यांच्या अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा तयार करत आहोत. तसेच तेथील अन्य अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. या विषयावरील चर्चा इथेच करावी. अन्य धाग्यांमधे घुसू नये.)

________________________________________________________

आता रामयणातील लबाड वाक्ये पाहु.

सीता ही भूमीकन्या होती.

________________

वाली मनुष्य नव्हता तर रामाने म्हणजे मनुष्याने त्याच्या वर्तनाचे नियम का ठरवावे ?

विवाह मुहुर्त

भिंगरी's picture
भिंगरी in काथ्याकूट
7 Sep 2014 - 4:45 pm

लग्न ठरले कि लग्नाचा मुहूर्त पाहीला जातो.
तो मुहूर्त मुलगा आणि मुलगी यांच्या नावराशीवरून ठरवला जातो का?
मला यातले काही कळत नाही म्हणून जाणून घ्यायचे आहे कि
मुहूर्त का पहिला जातो?
खूप वेळा ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागत नाहीत,मग त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात काही नुकसान किंवा विपरीत होते का?
(हं आता लग्न लागायला उशीर झाला तर जाणाऱ्या पाहुण्यांची पंचाईत होते हा भाग निराळा.)
साखरपुड्याचा विधी न केल्याने किंवा हळद न लावता लग्न केल्याने काही फरक पडतो का?
(प्रेमविवाहात तर या गोष्टी सहसा होतंच नाहीत.)

माझ्या मुलाला आकुर्डी, पुणे, इथे पेइंग गेस्ट किंवा भाड्याने घर हवे आहे...

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
24 Aug 2014 - 2:51 pm

प्रिय मिपाकरांनो,

मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, माझ्या मुलाला इंजिनियरिंग साठी आकुर्डी इथल्या इंजिनियरिंग कॉलेजला प्रवेश मिळाला.

सध्या तो जागेच्या शोधात आहे.

आपल्या मिपाकरांपैकी कुणाकडे आकुर्डीला भाड्याने जागा उपलब्ध असेल तर फार उत्तम.

बादवे,

जमल्यास आकुर्डीतल्या घरगूती खानावळीची माहिती दिलीत तर फार उत्तम.

आणि

इंजिनीरिंगच्या क्लासेसची माहिती मिळाली तर फार उत्तम.

कळावे लोभ आहेच, तो वाढावा...

मुवि (सध्या मुक्काम पोस्ट यानबू उर्फ यानबिवली.)

समाजजीवनमानमाहितीचौकशीमदत

फेर्‍यात अडकलेला...

ऋतुराज चित्रे's picture
ऋतुराज चित्रे in जनातलं, मनातलं
31 Jul 2014 - 5:17 pm

माझा एक मित्र कामावरुन परतताना माझ्या घरी आला. नेहमीच्या स्कुटरऐवजी नवीन स्प्लेंडरवरुन तो उतरला. मी विचारले स्कुटर कुठे? स्कुटर विकली व ही नवीन स्प्लेंडर घेतली. मित्राचे अभिनंदन केले व आम्ही घरात आलो. पेट्रोल महागल्यामुळे कदाचीत जास्त अ‍ॅवरेज देणारी स्प्लेंडर बाइक मित्राने घेतली असेल असे मला वाटले. मित्राला तसे विचारले तसा तो म्हणाला, नाही नाही तसे अजिबात नाही, त्याने जे काही कारण सांगितले ते ऐकून मी चक्रावूनच गेलो.

तंत्रसल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदत

टेक्निकल रायटींगबद्द्ल माहिती हवी आहे.

अंतरा आनंद's picture
अंतरा आनंद in काथ्याकूट
24 Jul 2014 - 4:11 pm

Technical writing / instructional designing ' या क्षेत्राबद्द्ल माहिती हवी आहे.
(१) या क्षेत्रातले नोकर्‍यांचे तसेच फ्रीलान्सिंग कामाचे स्वरुप, संधी याबद्द्ल माहिती हवीय.
(२) या क्षेत्रात कामासाठी स्वत:ला तयार करायचे असेल तर कोणती कौशल्ये शिकायला हवीत?आणि कशी?
(३) टेक्निकल रायटिंग (नुसतं software Tools नव्हेत तर content generation) चे प्रशिक्षण देणार्‍या चांगल्या संस्था कुठ्ल्या? यातले online courses करायचे असल्यास कोणत्या संस्थेचे करावेत?
आंतरजालावरून शोधलेल्या काही संस्था म्हणजे TECHTOTAL ,TWB , TECHNOWRITES आणि ibruk.

नोकरीबदलासंदर्भात मदत/माहिती हवी आहे

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
17 Jul 2014 - 12:20 pm

नमस्कार,

एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम केल्यानंतर जे जडत्व येते (त्याला 'कंफर्ट झोन' असे गोंडस नाव आहे इंग्रजीमध्ये) तशा प्रकारचे काहीसे अस्मादिकांचे झाले आहे किंवा होऊ घातले आहे असे सध्या प्रकर्षाने जाणवतेय. शिवाय, सध्याच्या ठिकाणी कामाच्या आणि एकंदरीत काम करण्याच्या पद्धतीच्या बाबतीत आता फारसे काही उत्साहवर्धक वातावरण राहिलेले नाही असे निदर्शनास आले आहे. काही बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत पण ते तितकेसे सोपे नाही हे लक्षात यायला वेळ लागला. :-)

नोकरीसल्लामाहितीचौकशीमदत

बिया हव्यात बिया, कोणी बिया देइल का?

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
2 Jul 2014 - 12:43 pm

गुंडेगाव (ता. नगर) येथील राजाराम भापकर गुरूजी (वय ८४). सध्या जलसंधारणाच्या कामाने झपाटले आहेत. ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. त्यामुळे पाणी आणि माती धरून ठेवण्याचे काम होत असे, हा संदर्भ त्यांना सापडला. तेव्हापासून त्यांनी गावातील नदी-नाल्यांच्या काठी जांभळाची लागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी ते दररोज सकाळी आपल्या मोपेडवर गुंडेगावहून नगरला येतात. त्यांच्या दुचाकीला एक प्लास्टीकचा क्रेट बांधलेले असते. मार्केट यार्डमध्ये जाऊन ते जांभळे खरेदी करतात. सध्या जांभूळ सुमारे १०० ते १२० रुपये किलो आहे.

धोरणजीवनमानतंत्रऔषधोपचारप्रवासअर्थकारणशिक्षणमौजमजाप्रतिसादबातमीमाहितीमदतविरंगुळा

पढत मुर्ख व मुर्खाची लक्षणे

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
1 Jul 2014 - 11:09 am

एका पढत मूर्खाची एक गोष्ट आहे.

एक पढत मुर्ख एका गाढवावर बसला होता आणि गाढव पळत होता.

त्याच त्याचं रस्त्यावरून तो बराच वेळ गोल गोल फिरत राहिला.

तेव्हा कुणीतरी त्या सज्जन गृहस्थाला विचारले की,” मी बराच वेळ तुम्हाला इथेच फिरताना बघतो आहे. तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे?

तर तो म्हणतो, “मला माहित नाही. गाढवाला विचारा.”

बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असेच होते. आपण समजून न घेताच काम करत रहातो, अनेक गोष्टी करत रहातो की याचा उद्देश काय आहे? असे करताना निसर्गाने जे उपलब्ध केले आहे त्याचा आनंदही उपभोगत नसतो.

समाजऔषधोपचारशिक्षणप्रकटनअनुभवमदत