माझा एक मित्र कामावरुन परतताना माझ्या घरी आला. नेहमीच्या स्कुटरऐवजी नवीन स्प्लेंडरवरुन तो उतरला. मी विचारले स्कुटर कुठे? स्कुटर विकली व ही नवीन स्प्लेंडर घेतली. मित्राचे अभिनंदन केले व आम्ही घरात आलो. पेट्रोल महागल्यामुळे कदाचीत जास्त अॅवरेज देणारी स्प्लेंडर बाइक मित्राने घेतली असेल असे मला वाटले. मित्राला तसे विचारले तसा तो म्हणाला, नाही नाही तसे अजिबात नाही, त्याने जे काही कारण सांगितले ते ऐकून मी चक्रावूनच गेलो.
मित्राची कंपनी त्याच्या घरापासून अंदाजे तीसएक कि.मी.वर आहे. हायवेने ३०-४० मिनिटात कंपनीत पोहोचतो. नव्या स्प्लेंडरमुळे चक्क २० मि. कंपनीत पोहोचतो असे तो खुशीत येऊन सांगत होता. हायवेवर खड्डेही नव्हते व फ्लायओव्हरमुळे सिग्नल व ट्राफिकचाही अडथळा नव्हता. तरीही बाईक वेगाने चालवू नको असा मी त्याला सल्ला दिला. अरे आपन स्टार्ट टू फिनिश ६० च्या वरती गाडी चालवतच नाही, मग ती स्कुटर असो वा स्प्लेंडर. ६० च्याच वेगाने स्प्लेडर चालवत असशील तर कंपनीत पोहोचण्याच्या वेळेत फरक पडायला नको, मी म्हणालो. असं काय करतोस, वेग जरी सारखा असला तरी स्प्लेंडरचे चाक स्कुटरपेक्षा मोठे असते, म्हणजे एका फेर्यात ते जास्त अंतर कापते, आपण अकरावी सायन्सला जे शिकलो ते चांगले माझ्या लक्षात आहे, नाहीतर स्प्लेंडर घ्यायला मी मुर्ख आहे का ? मित्र म्हणाला.
मी माझे तुटपुंजे तांत्रिक ज्ञान मित्रासमोर मांडले. अरे मित्रा छोटे चाक, मोठे चाक हे अर्धसत्य आहे, छोट्या चाकाचा परिघ २ फूट असेल व मोठ्या चाकाचा परिघ ४ फूट असेल तर एका फेर्यात मोठे चाक छोत्या चाकापेक्षा दुप्पट अंतर कापेल. परंतू, कोणतेही वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी ते जेव्हा एकाच वेगाने उदा. ६० कि.मी./तास धावते तेव्हा ते एक तासाला ६० कि.मी. अंतर कापते, भाले त्यांच्या चाकाचा परिघ लहान असो वा मोठा. हां चाकाच्या आकारमानामुळे इंजिनची जडणघडण्वेगळी असू शकते, गाडिच्या टायरचे आयुष्य कमीजास्त होऊ शकते, गाडीच्या अॅवरेजमध्ये फरक पडू शकतो, परंतू तू म्हणतो त्याप्रमाणे चाकाच्या आकारमानामूळे वेळेची बचत होत नाही. मित्र जरा नाराज वाटला, तो उठला व तडक घराबाहेर आला, बाईक चालू केली व हायवेने धूमटाईप त्याच्या घराकडे निघाला. गाडीने नक्कीच ६० पेक्षा अधीक वेग गाठला होता.
मी मित्राचे समाधान करू शकलो नाही ही खंत मनात आहेच. कृपया मिपाकरांनी हि तांत्रिक माहीती सोप्या शब्दात कशी सांगता येईल ह्याचे मार्गदर्शन करावे
प्रतिक्रिया
31 Jul 2014 - 5:23 pm | कवितानागेश
कोणतेही वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी ते जेव्हा एकाच वेगाने उदा. ६० कि.मी./तास धावते तेव्हा ते एक तासाला ६० कि.मी. अंतर कापते, भाले त्यांच्या चाकाचा परिघ लहान असो वा मोठा. >>
हे बरोबर वाटतय.
31 Jul 2014 - 5:48 pm | बाप्पू
खरच तो अकरावी सायन्स पर्यन्त शिकला आहे का??? *shok*
31 Jul 2014 - 6:27 pm | सह्यमित्र
कोणत्याही वाहनाचा वेग (speedometer वर दाखविलेला ) हा खालील साधा formula वापरून काढतात:
स्पीड = rpm ऑफ wheel * circumference ऑफ wheel
त्यामुळे ६० ह्या स्पीड साठी motarcycle चा rpm कमी आणि circumference जास्त तर स्कूटर चा circumference कमी आणि rpm जास्त.
इतके साधे गणित आहे.
31 Jul 2014 - 8:28 pm | कानडाऊ योगेशु
कंटेट वरुन ठेवलेले धाग्याचे शीर्षक अगदीच चपखल! + १००
बाकी मित्राला तो संताचा जोकही लगे हातो सांगायचा ना.
संताचा मित्र :- पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीचा तुला काहीच फरक कसा काय पडत नाही बुवा!
संता :- मी नेहेमी १०० रूचेच पेट्रोल भरतो मग कसा काय फरक पडेल!
1 Aug 2014 - 1:15 am | अंतु बर्वा
त्या मित्राला हा video दाखवा!!
www.youtube.com/watch?v=Qhm7-LEBznk
1 Aug 2014 - 1:38 am | आयुर्हित
एक किलो कापुस जड हलका असतो कि त्या पेक्षा एक किलो लोखंड जड असते?
1 Aug 2014 - 10:15 am | मुक्त विहारि
अगदी हेच उदाहरण द्यायला आलो होतो..
1 Aug 2014 - 5:01 pm | इरसाल
बाई: बंड्या सांग पाहु १ किलो कापुस जड की १ किलो लोखंड जड
बंड्या: लोखंड
बाई: गाढवा दोघांचे वजन सारखे आहे ना मग, सांग पाहु आता १ किलो कापुस जड की १ किलो लोखंड जड
बंड्या: लोखंड
बाई: तुला काही अक्क्ल, ते कसे सांग आता (बाई चिडलेल्या आहेत)
बंड्या: बाई अस करा तुम्ही मला १ किलो कापुस फेकुन मारा मी तुम्हाला १ किलो लोखंड फेकुन मारतो.
1 Aug 2014 - 6:53 pm | हाडक्या
हॅ हॅ हॅ .. बंड्याला म्हणावे १ किलो लोंखडी ठोकळा असेल ना तेवढा खोका घे आणि कापूस (भिजवून)हवे तर) त्या खोक्यामध्ये भरून दाखव. आणि जर भरलाच ना तर मंग बाई तो कापूस मारतील आणि तू लोखंड मार.
हाकानाका .. *biggrin*
1 Aug 2014 - 6:01 pm | असंका
व्वा!! क्या खूब कही!!!
1 Aug 2014 - 1:46 am | टवाळ कार्टा
वाह ताज ;)
1 Aug 2014 - 9:52 am | देशपांडे विनायक
शर्यत लावा
मित्राच्या बायकोला स्कूटरवर बसू दे
मित्राला त्याच्या मोठ्या चाकाच्या बाईकवर
दोघांनी ताशी ४० किलोमीटर वेगाने १५ मिनिटे प्रवास करावा
आणि स्पीडोमीटर वर किती किलोमीटर प्रवास केला ते पहावे
यावरून मित्राला बोध झाला तर बरे
1 Aug 2014 - 10:23 am | आनन्दा
बाय द वे -
हल्ली गाड्यांना दोन मीटर असतात - स्पीडोमीटर आणि टॅकोमीटर. तो कदाचित ६० चा स्पीद म्हणजे ६००० आरपीएम म्हणत असेल...
1 Aug 2014 - 12:01 pm | योगी९००
कोणतेही वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी ते जेव्हा एकाच वेगाने उदा. ६० कि.मी./तास धावते तेव्हा ते एक तासाला ६० कि.मी. अंतर कापते, भाले त्यांच्या चाकाचा परिघ लहान असो वा मोठा.
हे बरोबरच...
माझ्या एका फेकू मित्राने मला सांगितले होते की त्याची पल्सर आणि एकाची स्कुटी एकदा बरोबर चालली होती, त्याच्या पल्सर वर ३० स्पीड तर स्कुटीवर ६० चा स्पीड दाखवत होता. ( मी फक्त म्हणालो की तू फेकतोय नाहीतर कोणाएकाचा स्पीडोमीटर बिघडला असेल).
चाकाचा परिघ मोठा असला की जास्त वेगाने जाताना तितके जास्त इंजीन RPM होत नसल्याने कमी व्हायब्रेशन जाणवतात व गाडी जास्त कंट्रोल मध्ये राहते. वॅगन आर ने ८०+ वेग गाठला की आपल्याला खुपच जास्त वेगात चालवतोय असे वाटते पण डीझायर/होंडा सिटी/एस एक्स फोर आपण सहज ८०/९० पर्यत नेतो.
1 Aug 2014 - 4:44 pm | तुषार काळभोर
एका डझनात प्रत्येकी ३० ग्रॅम वजन असलेली १२ केळी येतात, तर एका डझनात प्रत्येकी ४५ग्रॅम वजन असलेली किती केळी येतील?
1 Aug 2014 - 4:49 pm | बन्डु
ह्याला म्हनत्यात क्वेच्च्न... *ok*
1 Aug 2014 - 5:42 pm | बबन ताम्बे
४५ ग्रॅम वजन असेल तर १२, ३० ग्रॅम वजन असेल तर १३.
का? कारण आमची सौ. नेहमीच्या फळवाल्याकडून " ओ भैया, केले कितने छोटे है? कल चालीस रुपय मे कितने बडे केले दिये थे. एक एक्स्ट्रा डालो ." असे म्हणून १३ केळी आणते.
1 Aug 2014 - 9:26 pm | आनन्दा
भारी!!!
2 Aug 2014 - 9:28 am | तुषार काळभोर
*dash1*
तुमच्या सौ रॉक्स...
फळवाला शॉक्स!!
*crazy*
1 Aug 2014 - 9:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
चाकाचा परीघ जितका मोठा तितकं प्रत्येक फेर्याला कापलेलं अंतर अधिक. पण एक गाडी जिच्या चाकाचा व्यास २०० से.मी. आहे ती ६० कि.मी./प्र.तास असेल आणि ज्या गाडीच्या चाकाचा व्यास ३०० से.मी. असेल आणि वेग ६० कि.मी. प्रतितास असतील त्यांच्या वेगामधे कुठलाही फरक पडणार नाही.
बाकी २ स्ट्रोक आणि ४ स्ट्रोक मधल्या फरकामुळे ईंजिन मायलेज मधे जबरदस्त फरक पडतो.
2 Aug 2014 - 6:22 pm | प्यारे१
बाब्बौ!
२०० आणि ३०० सेमी व्यासाच्या चाकांच्या गाड्या केवड्या मोट्ट्या आस्तील???
1 Aug 2014 - 9:49 pm | कंजूस
मित्र म्हणतो ते शास्त्रिय दृष्टीने खरे आहे .बारके खड्डेवाल्या रस्त्यावर मोठे चाकवाले वाहन जास्ती अंतर कापेल .
छोटे चाक हे छोटे खड्डे 'मोजत' गेल्याने प्रत्यक्षात रस्त्यावरचे अंतर (खड्डा अर्धवर्तुळाकार खोलगट धरल्यास) व्यासाइतके वाहन पुढे सरकले तरी चाकाने मात्र दीडपट चालले असेल .
आपण बसभधून जातांना रस्त्यावर खड्डे असल्यास बस पटापट पुढे जाते आणि कार डकाव डकाव करत मागे पडते हे आपल्याला लगेच जाणवते .
2 Aug 2014 - 6:18 pm | ऋतुराज चित्रे
हायवेवर खड्डेही नव्हते व फ्लायओव्हरमुळे सिग्नल व ट्राफिकचाही अडथळा नव्हता.
2 Aug 2014 - 7:16 pm | कंजूस
मग विवेचन लागू नाही .आवड आपली आपली एवढंच .
1 Aug 2014 - 10:32 pm | अनंत छंदी
कुठेतरी धडपडून हातपाय मोडून घेतलास की अक्कल येईल, असे सांगा त्याला. *lol*
1 Aug 2014 - 10:51 pm | यसवायजी
तुमच्या मित्राला दहावित पास कुणी केलं?
2 Aug 2014 - 12:55 am | भृशुंडी
त्याच्या मोटार मॅकेनिकने