नोकरीबदलासंदर्भात मदत/माहिती हवी आहे

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
17 Jul 2014 - 12:20 pm

नमस्कार,

एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम केल्यानंतर जे जडत्व येते (त्याला 'कंफर्ट झोन' असे गोंडस नाव आहे इंग्रजीमध्ये) तशा प्रकारचे काहीसे अस्मादिकांचे झाले आहे किंवा होऊ घातले आहे असे सध्या प्रकर्षाने जाणवतेय. शिवाय, सध्याच्या ठिकाणी कामाच्या आणि एकंदरीत काम करण्याच्या पद्धतीच्या बाबतीत आता फारसे काही उत्साहवर्धक वातावरण राहिलेले नाही असे निदर्शनास आले आहे. काही बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत पण ते तितकेसे सोपे नाही हे लक्षात यायला वेळ लागला. :-)

मिपा-मंडळी याबाबत काही मदत करू शकली किंवा माहिती पुरवू शकली तर खूप बरे होईल. थोडक्यात माझ्या कामाच्या स्वरूपाविषयी सांगायचे म्हणजे मला १० वर्षांचा कंटेट डेवलपमेंटमधला अनुभव आहे. मुख्यत्वे करून टेक्निकल रायटिंगचा हा अनुभव आहे. आयटीमध्ये लागणारे डॉक्युमेंट्स म्हणजे हेल्प, गाईडस, मॅन्युअल्स, ट्रेनिंग मटेरिअल, सर्टिफिकेशनचे स्टडी मटेरिअल इत्यादीचा अनुभव जास्त आहे. त्यासोबत ह्युरिस्टिक इव्हॅल्युएशन, काँपिटिटीव्ह अ‍ॅनॅलिसिस, प्रीसेल्स, वेबसाईट अ‍ॅनॅलिसिस असा अनुभव देखील आहे. या १० वर्षांआधीचा ४ वर्षांचा अनुभव देखील आहे. तो प्रामुख्याने मेंटेनन्सचा आहे.

मी दूरस्थ पद्धतीने १ वर्षाचा डिप्लोमा इन मार्केटींग मॅनेजमेंट पूर्ण केलेले आहे आणि जून २०१४ मध्ये दिलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्यास २ वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट (दूरस्थ) पूर्ण करेल. हा अभ्यासक्रम मी खूप प्रामाणिक प्रयत्न घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आतापर्यंत यात गुणदेखील बरे मिळाले आहेत. माझ्या लिखाणाच्या अनुभवाचा उपयोग मार्केटिंग कम्युनिकेशन, काँटेट मार्केटिंग, मार्केट अ‍ॅनेलिसिस, ब्रँडींग अ‍ॅनॅलिसिस, कम्युनिकेशन्स डिझाईन, इत्यादी क्षेत्रांमध्ये करून घेऊन त्या क्षेत्रात काम करण्याचा मानस आहे (खरं म्हणजे होता :-)). पण सध्याची परिस्थिती आणि माझा अनुभव बघता हे थोडे अवघड आहे. त्यामुळे कोअर टेक्निकल रायटिंगच्या क्षेत्रात चांगली संधी मिळाली तरी मला चालणार आहे. सध्या बदल महत्वाचा आहे.

अधिक माहिती किंवा रेझ्युमेसाठी मला ईमेल आयडी मिळाला तर मी त्यावर माझा रेझ्युमे पाठवू शकेन आणि त्यायोगे अधिक माहिती पुरवू शकेन.

कृपया आपण कुणी मदत करू शकलात किंवा उपयुक्त माहिती पुरवू शकलात तर बरे होईल. धन्यवाद!

--समीर

नोकरीसल्लामाहितीचौकशीमदत

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

17 Jul 2014 - 12:30 pm | मराठी कथालेखक

तुम्ही पुण्यात जॉब बघत असाल Content Development (/maintenance) च्या संधी PTC , John Deere , Onward Technologies मध्ये मिळू शकतील. अर्थात तुमची Bachelor Degree कोणती आहे यावर पण संधी अवलंबून आहेत.

समीरसूर's picture

17 Jul 2014 - 1:34 pm | समीरसूर

माहितीबद्दल धन्यवाद! अजून काही माहिती मिळाल्यास अवश्य कळवा. माझी बॅचलर्स डीग्री अभियांत्रिकीची आहे (विद्युत).

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jul 2014 - 1:25 pm | राजेंद्र मेहेंदळे

आणि टेक्निकल रायटींगचे जॉब सिस्को सारख्या ओईएम कंपन्यांमध्ये फार डिमांडमध्ये असतात असे ऐकुन आहे.त्यांची वेबसाईट बघुन मला नेहमीच प्रश्न पडत असे की एव्हढी जडजंबाळ डॉक्युमेंटस कोण लिहित असेल. नंतर कळले की हे सुद्धा एक वेगळे स्पेशलायझेशन आहे.
बाकी वेब डेव्हलपमेंट कंपन्या तर आहेतच.

सर्वात महत्वाचे म्हणजे मार्केटमध्ये तुमचा स्पर्धक कोण कंपनी आहे? त्यांना अ‍ॅप्रोच करा. तिकडे तुम्हाला चांगला ब्रेक मिळेल. :)

समीरसूर's picture

17 Jul 2014 - 1:35 pm | समीरसूर

सर्विस कंपनी मधून प्रॉडक्ट कंपनीमध्ये जाणे थोडे अवघड आहे. प्रयत्न चालू आहेत. धन्यवाद. :-)

समीरसूर's picture

17 Jul 2014 - 1:47 pm | समीरसूर

उल्लेख करावयाचा राहून गेला. मी २००० साली अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली आहे (विद्युत अभियांत्रिकी). त्यानंतर काही ठिकाणी मेंटेंनन्सची कामे केली पण त्यात रमलो नाही. लिखाणाची थोडीफार आवड असल्यामुळे टेक्निकल रायटिंगकडे वळलो. या क्षेत्रात आता १० वर्षांचा अनुभव आहे. वर नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त व्यवस्थापनासंदर्भातली कामे करण्याचा देखील अनुभव आहे. आमच्या क्षेत्रात तसे फारसे व्यवस्थापन करण्याची वेळ येत नाही (सर्विस कंपनीमध्ये तरी). पण मला थोडा-बहुत आहे. याशिवाय बर्‍याच वेबसाईटसचे मार्केटिंग, ब्रँडींग, उपयुक्तता (युजॅबिलिटी), बेन्चमार्कींग (स्पर्धक कंपन्यांसोबत), इत्यादी दृष्टीकोनातून अ‍ॅनॅलिसिस करून त्याचे तपशीलवार रिपोर्ट्स लिहून तयार करण्याचादेखील अनुभव आहे.

धन्यवाद!

Dhananjay Borgaonkar's picture

17 Jul 2014 - 4:17 pm | Dhananjay Borgaonkar

व्यनि केला आहे.

उपास's picture

17 Jul 2014 - 5:00 pm | उपास

नमस्कार समीर, व्यनि केलाय तुम्हाला. शुभेच्छा!

जयंत कुलकर्णी's picture

17 Jul 2014 - 5:51 pm | जयंत कुलकर्णी

समीरने न लाजता हा धागा लिहिला आणि त्याला प्रतिसादही मिळत आहेत या दोन्ही कौतुकाच्या बाबी आहेत असे मी मानतो.....शुभेच्छा...

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2014 - 7:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

समीरसूर's picture

20 Jul 2014 - 1:19 pm | समीरसूर

मी न लाजता हा धागा लिहिला यात काही विशेष नाही. माझ्या कामासाठीच मी हा धागा लिहिला. पण बर्‍याच मिपाकरांनी मला व्यनिद्वारे माहिती पुरवली, माझा रेझ्युमे मागवला, काही संधी असल्यास कळवण्याचे आश्वासन दिले, उपास यांनी तर चांगल्या संधीची माहिती पुरवली. या धाग्यावर देखील बर्‍याच जणांनी महत्वाची आणि आवश्यक माहिती पुरवली. सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. हे सगळं मात्र नक्कीच कौतुकास्पद आणि आनंददायी आहे हे अगदी १००% खरं! मदतीची ही भावना आणि तयारी मी कधीच विसरणार नाही. :-)

सगळ्यांना खरंच मनापासून धन्यवाद! :-) बघू या, कुठे, कसं, आणि कधी जमतंय ते. :-)

टवाळ कार्टा's picture

20 Jul 2014 - 1:54 pm | टवाळ कार्टा

जमले की कळवा...पुढच्या पक्षी-तीर्थ कट्टा कट्ट्याला तुमची उपस्थीती लाउन सर्वांना अगत्याचे निमंत्रण द्यावे ;)

समीरसूर's picture

1 Sep 2014 - 11:50 am | समीरसूर

अजून काही जमले नाही :-( ही वाट इतकी खडतर असेल असे वाटले नव्हते. पण काम झाले की कट्टा नक्की :-)

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jul 2014 - 7:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

एक राहीलेच
नोकरि.कॉम या पोर्टलवर तुम्ही नाव नोंदविले/रेझ्युमे अपलोड केलाच असेल. त्यांची जॉबमेल सर्विस घेतल्यास साधारण रु.३०००/- लागतात. पण त्या बदल्यत तुमचा रेझ्युमे ६ महीने त्यांच्या वेबसाईटवर टॉपला दिसत राहतो. थोडक्यात तुम्हाला येणार्या कॉल्समध्ये वाढ होते आणि जास्त पर्याय उपलब्ध होतात. मी २ वेळा ही सर्विस घेतली आहे आणि अनुभव चांगला आहे. ईतरही वेबसाईट अशी सर्विस देतात पण त्या भंकस वाटल्या. मॉन्स्टर.कॉम हा एक सन्माननीय अपवाद.

समीरसूर's picture

18 Jul 2014 - 1:32 pm | समीरसूर

सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल आणि व्यनिंबद्दल शतशः धन्यवाद! प्रतिसाद देणे चालू आहे.

मी पुण्यातच नोकरी शोधतो आहे. काही कारणांमुळे पुण्याबाहेर जाणे शक्य होणार नाही. :-) ही अडचण आहे खरी परंतु नाईलाजास्तव ही अट ठेवावी लागतेय.

मी सगळ्यांच्या व्यनिंना उत्तर देतोच आहे.

पुन्हा एकदा धन्यवाद. सविस्तर नंतर लिहितो.

समीर

हर्षद खुस्पे's picture

19 Jul 2014 - 3:34 pm | हर्षद खुस्पे

व्यनि केला आहे.

श्रीगुरुजी's picture

19 Jul 2014 - 9:11 pm | श्रीगुरुजी

पुण्यात कोथरूड भागात "टेक्नोराईट्स" या नावाची टेक्निकल रायटिंग सर्व्हिस देणारी कंपनी आहे. कंपनीचा ओनर मकरंद नावाचा आहे (त्यांचे आडनाव विसरलो). मकरंद आपल्या कंपनीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा एम्प्लॉयमेंट बेसिसवर काम देतात. आंतरजालावर त्यांच्या कंपनीचे डिटेल्स मिळतील. त्यांच्याशी संपर्क करा.

समीरसूर's picture

20 Jul 2014 - 1:13 pm | समीरसूर

हो मी यांना खूप वर्षे (११ वर्षे) आधी भेटलेलो आहे. मकरंद पंडित यांची ती कंपनी आहे. या क्षेत्रात त्यांनी चांगलं नाव कमावलेलं आहे. त्यांचे बहुधा कंत्राटी पद्धतीवरची कामे असतात. कायम स्वरूपाची कामे त्यांच्याकडे खूप कमी असतात. चौकशी करेन. माहितीबद्दल धन्यवाद!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jul 2014 - 9:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

व्य.नि. केलाय.

बबन ताम्बे's picture

21 Jul 2014 - 4:04 pm | बबन ताम्बे

तुम्हाला व्य.नि. केलाय.

इनिगोय's picture

31 Jul 2014 - 2:15 pm | इनिगोय

Content mgmt, technical writing, instructional designing या क्षेत्रांमध्ये मराठी भाषेतही काही वाव आहे का?

मुंबईमध्ये मराठी/इंग्रजी भाषेतल्या काही संधी कोणी सुचवू शकाल का?

कलंत्री's picture

2 Aug 2014 - 10:35 am | कलंत्री

आपण नोकरी मध्ये बदल घडवु इच्छित आहात याबरोबर व्यवसाय / समांतर व्यवसाय इत्यादीचाही विचार करावा.

समीरसूर's picture

1 Sep 2014 - 12:01 pm | समीरसूर

"रेझ्युमे अपडेट करून फ्लोट करण्याचा अवकाश, चिक्कार संधी मिळतील" हा केवढा मोठा गैरसमज होता हे गेल्या दोन महिन्यात व्यवस्थित कळले. :-( मिपाकरांनी सुचविल्याप्रमाणे अजून प्रयत्न चालू आहेत पण आता अजून नेमके काय करावे हा प्रश्न पडला आहे. जॉब पोर्टल्सवर टाकून झाले; बर्‍याच मित्रमंडळींना, मिपाकरांना सांगून झाले; लिंक्डइनवरच्या काही कनेक्शन्सना साकडे टाकून झाले; माझ्या कार्यालयातून सोडून गेलेल्या बर्‍याच जणांना सांगून पाहिले; काही कंपन्याच्या ईमेल आयडीजवर रेझ्युमे पाठवून झाले...ढिम्म हलत नाहीये काही. :-( सध्याच्या ठिकाणी अगदी नकोसे झाले आहे. बर्‍याच मिपाकरांनी माझा रेझ्युमे मागवून घेतला. उपास, धनंजय डोणगांवकर आदींची मदत प्रशंसनीयच होती. पण काही कारणाने जमले नाही. त्यात आईचे एक मोठे ऑपरेशन पार पडले; त्यात १२-१५ दिवस व्यग्र असल्याने नीट फॉलो-अप नाही ठेवता आला. आई अजूनही हॉस्पीटलमध्ये आहे. १-२ दिवसात डिस्चार्ज मिळेल असे वाटतेय.

ज्यांना ज्यांना मी रेझ्युमे पाठवले होते त्यांच्यासाठी आणि इतर सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र आठवण करून देण्यासाठी हा प्रतिसाद लिहितोय. कृपया अजून एकदा आपापल्या कार्यालयात तपासून बघा ही विनंती.

धन्यवाद!

--समीर

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Sep 2014 - 1:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

परत एकदा ढोसतो एच.आर. ला आज. :)

समीरसूर's picture

1 Sep 2014 - 1:33 pm | समीरसूर

धन्यवाद, कॅजॅस्पॅ. :-)

समीरसूर's picture

1 Sep 2014 - 8:39 pm | समीरसूर

नाव चुकून 'धनंजय डोणगावकर' लिहिले गेले; 'धनंजय बोरगावकर' असे वाचावे. चुकीबद्दल माफी असावी.

दादा कोंडके's picture

1 Sep 2014 - 10:30 pm | दादा कोंडके

"रेझ्युमे अपडेट करून फ्लोट करण्याचा अवकाश, चिक्कार संधी मिळतील" हा केवढा मोठा गैरसमज होता हे गेल्या दोन महिन्यात व्यवस्थित कळले.

हम्म. हा अनुभव आलेले माझ्यासकट अनेक जण आजुबाजूला बघतो. तिशी पार केलेल्यांसाठी इथून पुढं खूप चांगलं मार्केट असणार नाहिये. एक तर भारतात बहुतांश ठिकाणी इंटेलेक्चुअली पाट्या टाकण्याचं काम करतात. त्यामुळे पाच-दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणार्‍यांच्या स्किलसेटची इंडस्ट्रीला गरज नाही. फार-फार तर पंधरा-वीस जणांसाठी एक असा म्यानेजर लागेल. टेक्निकल कंटेंट रेविव आणि मेंटरींग साठी तीस-चाळीस जणात एक असा एखाददुसरा सुद्धा खपून जाइल. पण दहा-बारा वर्षाचा अनुभव असणार्‍यांनी स्वतःला प्रामाणिकपणे विचारलं की आपण असं काय करतो की पाच-सहा वर्षाचा अनुभव असणारी लोकं करू शकणार नाहीत की उत्तर मिळेल. जिथं मुलभूत वैज्ञानिक संशोधन वगैरे होतं तिथं कदाचित परिस्थिती वेगळी असू शकेल. पण मुळात भारतात अशा संस्था खूप असतील असं वाटत नाही.

बरं इंडस्ट्रीत बूम असताना स्वस्त मनुष्यबळाची विकसित राष्ट्रांना गरज होती म्हणून बक्कळ पगार मिळाले. त्यामुळे लोकं पण सोकावलीत. पण आता ते सोंग किती दिवस टिकणार? सर्विस इंडस्ट्रीचा हिशेब म्यान मंथवर असल्याने रिसोर्सवर कंपनी कमितकमी खर्च करत असेल तरच ती फायद्यात जाइल. दहावर्ष अनुभव असणारा तिप्पट पगार घेणारा, बायका पोरांचा फुकट विमा खाणारा माणुस कंपणिला परवडणारच नाही.

आयटी आणि तत्सम इंडस्ट्रीत असणार्‍यांची ही अवस्था तर एचाअर, ब्यांकींग मधल्या लोकांचे तर लैच हाल आहेत. तिथं सॉफ्ट स्किल्सचं महत्व खूप आहे आणि पुढची पिढी त्यास सरस आहे.

लिहण्यासारखं अजून बरच आहे पण असो. :)

खटपट्या's picture

2 Sep 2014 - 1:46 am | खटपट्या

सहमत !!

समीरसूर's picture

2 Sep 2014 - 9:25 am | समीरसूर

आपल्या शब्दा-शब्दाशी शत प्रतिशत सहमत! भारतात तरी १०-१५ वर्षे अनुभव असणार्‍यांकडे काही विशेष भारी आणि दुर्मिळ कौशल्ये असतात असे सहसा दिसत नाही. मॅनेजरची स्किल्स आपण लगेच आत्मसात करतो. खूप आवेशात (किंचित उद्धटपणे) बोलणे, कुठल्याही दोन ओळींना घेऊन २०-२० पानी पॉवरपॉईंट प्रेजेंटेशन्स बनवणे, खूप रंग असलेल्या किचकट एक्सेल शीटा बनवणे, सतत गुरकावणे, स्टाफींगची कारकुनी कामे पार पाडणे, कसले कसले रिपोर्ट्स जनरेट करणे, वगैरे कामे आपण लीलया करतो पण जेव्हा सॉलीड तांत्रिक कौशल्यांची किंवा क्लिष्ट सोल्युशन्सची बात येते तेव्हा आपण मागे पडतो. तिथे मग मुख्यत्वेकरून ५-७ वर्षे तंत्रज्ञानाचा तगडा अनुभव असणारी माणसे कामात येतात. साहजिकच मॅनेजर्सना मागणी कमी असते. शिवाय १५-२० लोकांसाठी एखादा मॅनेजर पुरेसा पडतो. सुदैवाने माझ्या क्षेत्रात मॅनेजर ही संकल्पना तितकीशी रुळलेली नाहीये. पण माझ्या क्षेत्रात देखील या मर्यादा आहेतच. आयटीमध्ये ही एक मोठी समस्या आहे. माणूस जितका जास्त अनुभवी तितका तो जास्त कुचकामी! :-)

एनीवे, अपेक्षा वास्तवाला धरून असल्या म्हणजे मोठ्या अपेक्षाभंगाच्या टांगत्या तलवारीची धार थोडी बोथट व्हायला मदत होते. :-)

रेवती's picture

3 Sep 2014 - 10:01 pm | रेवती

नाईलाजाने सहमत.

संदीप डांगे's picture

29 Jun 2015 - 5:09 am | संदीप डांगे

उत्तम निरिक्षण...

दहावर्ष अनुभव असणारा तिप्पट पगार घेणारा, बायका पोरांचा फुकट विमा खाणारा माणुस कंपणिला परवडणारच नाही.
>>असंच होत राहिलं तर नजिकच्या भविष्यात तीशी पार केलेल्यांवर नोकरकपातीची तलवार टांगती राहील अशी शक्यता आहे का? किंवा त्यांनी स्वतःहून नोकरी सोडावी म्हणून परिस्थिती निर्माण केली जाईल?

आता २५-३५ वयोगटातली मंडळी उत्तम काम करत आहेत. पण येत्या ५-१० वर्षात जी पीढी येईल(आत्ता १५-२० वयोगटातली) ती करीअर किंवा कामाबद्दल तितकी गंभीर नाही असं माझं निरिक्षण आहे. इतरांची वेगळी मतं असू शकतात. तेव्हा नेमकी कशी परिस्थिती असेल मार्केटमधे?

एकूणच हा विषय इंटरेस्टींग आहे.

श्रीगुरुजी's picture

29 Jun 2015 - 11:37 pm | श्रीगुरुजी

भारत वेगाने काँट्रॅक्टिंगच्या दिशेने जात आहे. यापुढे पर्मनंट जॉब्ज कमी व काँट्रॅक्टिंग जॉब्ज जास्ती अशी इतर देशांसारखीच परिस्थिती असेल.

शिल्पा नाईक's picture

30 Jun 2015 - 11:58 am | शिल्पा नाईक

शब्दा शब्दाशी सहमत. सध्या याच परीस्थितीतुन जातेय. गेली १ वर्ष नोकरी शोधुन दमले.
आता स्वतःचा काहि तरी व्यवसाय सुरु करायचा ठरवला आहे.....

dadadarekar's picture

30 Jun 2015 - 11:12 pm | dadadarekar

पस्तिशी ओलांडली व बायकापोरं असतील तर नोकरीच्या बाबतीत सावधच रहावे.

आहे त्या नोकरीत दीर्घकाळ टिक्युन रहावे.

इन्क्रिमेंटची जास्त अपेक्षा ठेऊ नये.. इतराना जे सरासरी इन्क्रिमेंट मिळते ते मिळाले की आनंद.

हातात वेगळ्या वेगळ्या पगाराच्या दोन तीन संधी असतील तर सर्वात जास्त पगाराचा ऑप्शन आधी बाजूला टाकावा व इतर ऑप्शनमधुन निवड करावी. ( हा माझा अनुभव आहे.)

नवीन मनुष्य व आपण यात फार फरकाची अपेक्षा ठेऊ नये.

कंपनीत इतर कामे अंगावर पडली तर ती न कुरकुरता करावीत.

अद्याप प्रयत्न संपलेले नाहीत. तुमचा अनुभव विशिष्ट प्रकारचा असल्याने काहीसा वेळ लागेल असा संबंधितांचा सूर होता. या दोन आठवड्यांत काहीतरी पुढे जाणे अपेक्षित आहे.

समीरसूर's picture

3 Sep 2014 - 10:27 am | समीरसूर

खेडूतजी,

तसे झाले तर खरेच आनंद वाटेल. :-) धन्यवाद!

श्रीगुरुजी's picture

3 Sep 2014 - 2:05 pm | श्रीगुरुजी

ईन्फोसिस मध्ये रिझ्यूमी पाठवा. इन्फोसिसमध्ये टेक्निकल लेखकांसाठी कायमच ओपनिंग असतात.

श्रीरंग_जोशी's picture

3 Sep 2014 - 7:56 pm | श्रीरंग_जोशी

समीर तिकडेच काम करतात अनेक वर्षांपासून :-).

तुम्हाला जिथे जायचं आहे त्याची वाट नोकरी डॅाटकॅामसारख्या रानातून जात नाही.गुगलवगैरे माइक्रोसॅाफ्टसारख्या मोठ्या कंपन्या सतत नवीन लोकांच्या शोधात असतात आणि म्हणूनच टिकून आहेत.असं काहीतरी प्रॅाडक्ट डेवलप करा की ते पाहून कंपनीवाले स्वत:च तुमचा पत्ता शोधत येतील.उदाहरणार्थ एखादे अॅप लिहा. अॅपच्या सफाइदारपणात लगेच लक्षात येते की यामागे चांगला मनुष्य काम करत आहे.कॅालेजच्या कॅम्पस इंटरव्ह्युत हेच शोधतात.बय्राचवेळा परीक्षेत चांगले गुण मिळवणाय्रांकडे पाट्या टाकून उत्तरे लिहून गुण मिळवण्याची हातोटी असते परंतू कल्पनाशक्तीचा अभाव असतो.

हेमन्त वाघे's picture

30 Jun 2015 - 10:04 pm | हेमन्त वाघे

कच खाऊ नका …

आपली इच्छा असेल तर मी आपला resume -evalute करून मार्गदर्शन करू शकतो . मी ३ वर्षे एका Top M N C Recruitment फर्म मध्ये होतो. तसेच आपण बोलू शकतो . आपण किंवा इतर मला ९८१९७४७७१८ वर संपर्क करू शक ता .