माहिती हवी - तळपते विक्रम संहारिणी
लहानपणी (जेव्हा लोक सकाळी रेडीओ ऐकत कामे आवरत ) त्याकाळी रेडीओ वर एक गाणे लागायचे . त्याचे शब्द पूर्ण लक्षात नाहीत पण ध्रुवपद "तळपते विक्रम सौदामिनी / संहारिणी" असे काहीसे होते. अभिमन्यूच्या चक्रव्युहातील पराक्रमाचे वर्णन या गाण्यात केले होते. त्यावेळी इतके लहान होतो कि या गाण्याचे गीतकार, गायक लक्षात ठेवण्याचीही अक्कल नव्हती. पण मनाच्या गाभार्यात लुप्त झालेली चाल आणि अस्पष्ट शब्द पुन्हा ओठावर येऊ लागले " द्रोण कृप … …. शल्य जयद्रथ , दुर्योधन …. … कर्ण महारथ, तरी तयाचे कौतुक झळके द्रोणांच्या लोचनी , तळपते विक्रम सौदामिनी"