अंजिराचा चिक आणि औषधोपचार
आमच्या आवारात अंजिराचं झाड आहे. ते अगदी फाटकाला लागून आहे. त्याचा वाढायचा वेग आणि पसारा प्रचंड आहे. त्यामुळे आम्हाला ते सारखं छाटत राहावं लागतं. नाहीतर ते फाटकातून यायला जायला अडथळा करू लागतं आणि वर त्या झाडाच्या अगदी डोक्यावर विजेच्या तारा आहेत. त्यामुळे ते सरळही वाढू देऊ शकत नाही आणि आडवंही. त्याला भरपूर पाने येतात आणि कसली तरी पांढरी चिलटं भरमसाठ प्रमाणात पानांच्या खालच्या बाजूला गर्दी करतात. जणू उलट्या बाजूने बर्फवृष्टी झाली असावी सगळ्या झाडावर. ती चिलटं संध्याकाळ झाली की घरात घुसायला बघतात. ती चिलटं खूप बारीक आणि पीठासारखी अंगाला चिकटून बसणारी.