संपादक मंडळास विनंती: हा धागा/त्यातील प्रश्न/त्यांची उत्तरे/प्रतिसाद यातील काहीही जर कोणाच्या संवेदना दुखावणारे असेल तर लागलीच उडवून टाकावे.
१. जातीयवादी म्हणजे कोण्/काय?
२. धर्मनिरपेक्ष म्हणजे कोण्/काय?
३. पुरोगामी विचार म्हणजे कसले विचार?
४. प्रतिगामी विचार म्हणजे कसले विचार?
५. समाजवाद म्हणजे काय?
६. 'बहुजन समाज': यामध्ये कोणते सामाजिक घटक येतात? जर 'बहुजन समाज' ही संज्ञा जातिविषयक असेल तर, त्यात कोणत्या जाती येतात?
७. 'अल्पसंख्यांक' म्हणजे किती अल्प? किती टक्के असल्यावर एखादा घटक अल्पसंख्य ठरतो? की सर्वात मोठे सोडून इतर सर्वच अल्पसंख्यांक?
८. 'प्रार्थनास्थळ' म्हणजे काय? वॄत्तपत्रात मंदीर, गुरुद्वारा, सिनेगॉग हे शब्द तर वापरले जातात. मग कोणत्या स्थळाचा उल्लेख प्रार्थनास्थळ म्हणून केला जातो?
या प्रश्नांची उत्तरे बहुतेकांना माहिती असतात. (मला माहिती नाहीत, म्हणून विचारतोय.) तरी लॉर्ड व्होल्डेमॉर्टला he-who-must-not-be-named म्हटल्यासारखं सारखं हे शब्द "कोडवर्ड" म्हणून का वापरले जातात?
अवांतरः आत्ताच एक प्रश्न पडलायः - काल कै गोविंद पानसरे यांची अंत्ययात्रा लाईव्ह दाखवत होते. त्यात काही व्यक्तिंच्या हाती "गोडसेवादी-सावरकरवादी विचारांचा निषेध असो" असे फलक होते. गोडसे-सावरकर या व्यक्तिंचे(केवळ तटस्थता असावी म्हणून असे लिहितो आहे, सावरकरांबद्दल मला पूर्ण आदर आहे) असे कोणते विचार होते, की त्यांनी प्रेरित होऊन कोणीतरी एका कामगार चळवळीतील नेत्याची हत्या करावी?
असो...
प्रतिक्रिया
22 Feb 2015 - 4:10 pm | सांगलीचा भडंग
नंबर ८ च प्रश्न सोपा वाटतोय :'प्रार्थनास्थळ' म्हणजे जिथे प्रार्थना करतात ती जागा .
मंदीर, गुरुद्वारा, सिनेगॉग या बरोबर इथे परीक्षा हॉल आणि हॉस्पिटल चा पण समावेश झाला पाहिजे
बाकीचे प्रश्न फारच अवघड प्रश्न आहेत .पण ४० मार्क पाडायची सवय असल्याने फार अवघड प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न पण कधी केला नाही .सध्या अवघड प्रश्नांचे उत्तर शोधून काय टेक्स बेनेफिट पण मिळत नाही आणि मनोरंजन पण होत नाही . आणि कुठलेही वाद ( समाज(वाद) ,जातीय(वाद ) ) म्हणजे तर डोक्याला लई ताप असणार हे नक्की .
22 Feb 2015 - 4:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मॅच बघा =))
22 Feb 2015 - 4:55 pm | तुषार काळभोर
आता सांगा!
22 Feb 2015 - 5:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
स्वतःच्या धर्माचं परधर्मापासुन संरक्षण करायचा प्रयत्न करणारे आणि त्यासाठी हवा तो मार्ग स्वीकारणारे. तसचं काही शांतीवादी धर्म बळजबरीनी, फसवणुक करुन वगैरे धर्म प्रसार करतात ते.
हिंदुधर्मावर टिका करणारे...दाढ्यांचे लाड करणारे ई.ई. पण सद्ध्या ही जमात हात चोळत बसलीये सत्तापात झाल्यामुळे.
उत्तर क्रमांक २
उत्तर क्रमांक ३ + संघाला शिव्या देणं, ब्राम्हणांविषयी अपप्रचार करणं ई.ई.
संपत्ती कमावणं हे पाप मानणारे कुपमंडुक. डोक्यानी आणि कष्टानी मिळवलेल्या पैश्यावर हक्क सांगणारी बांडगुळं. चीन, रशिया वगैरे लोकांवर अंधविश्वास ठेवणारी लाल मंडळी. वेन डायग्राम काढला तर ह्यामधे बरीचं उत्तर क्रमांक २,३ आणि ४ मधली मंडळी सापडतील.
उत्तर माहित असुन देणार नाही.
हे तुम्ही कुठल्या जाती धर्मात मोडता त्याच्याप्रमाणे "समान न्याय कायदा" लावला जाईल. ह्या महान न्यायाप्रमाणे २४% दाढीवाले अल्पसंख्यांक आणि ३.५% वाले मात्र बहुसंख्यांमधे मोडतात.
जिथे सामान्य लोकं मनाला शांती आणि आधार मिळावा म्हणुन जातात अशी जागा. पण हल्ली ह्याचे वेगवेगळे उपयोगही असतात इथे लिहणेबल नाहीत.
गोडसे, सावरकरं वगैरे लोकांना शिव्या दिल्या नसत्या तरं अंत्ययात्रेला ट्यार्पी मिळाला असता काय? ऐकीव माहितीप्रमाणे क्म्युनिस्ट पक्षाचे वृंदा कारत वगैरे नेत्यांनी हजेरी सोडा साधा फोनही केला नाही.
तसही पु.लं. देशपांडेंचं एक सुप्रसिद्ध वाक्यं इथे वापरतो.
"कम्युनिस्ट व्हायला अकलेची नसली तरी चष्म्यासकट वजन ५० किलो असल्यानी बंडु कम्युनिस्ट पक्षात सामिल झाला"...लखु रिसबुड- व्यक्ती आणि वल्ली.
22 Feb 2015 - 8:42 pm | तुषार काळभोर
परत तिथंच??
सगळंच क्रिप्टिक!!
23 Feb 2015 - 12:33 pm | नाखु
गोडसे, सावरकरं वगैरे लोकांना शिव्या दिल्या नसत्या तरं अंत्ययात्रेला ट्यार्पी मिळाला असता काय? ऐकीव माहितीप्रमाणे क्म्युनिस्ट पक्षाचे वृंदा कारत वगैरे नेत्यांनी हजेरी सोडा साधा फोनही केला नाही.
दोन दिवस चवितचर्वण गुर्हाळ आणी व्रुत्तपत्रांमध्ये (पुरस्कृत) या आडून संघ आणी सावरकरांना शिव्या घालून झालेल्या पाहिल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी मटात श्री पानसरेंचे शिवाजी महाराजांवर भाषण आहे लिंक मिळाली की जोडतो त्यातली ५ पैसेही या वाचाळवेरांना माहीती नसेल किंवा "डोक्यात" घुसले नसेल याची खात्री आहे.
24 Feb 2015 - 1:42 am | विकास
मी अजून पूर्ण ऐकलेले नाही पण जे काही उडत उडत ऐकले ते वाचून कुरंदकरांच्या "छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य" पुस्तकातील विश्लेषणाची आठवण झाली. पानसर्यांनी लिहीलेले "शिवाजी कोण होता?" हे पुस्तक वाचले नसल्याने त्याबद्दल लिहू शकत नाही, पण कुरंदकरांचे पुस्तक वाचले आहे. ते जर वाचले नसले तर अवश्य वाचावे असे आहे.
24 Feb 2015 - 1:50 am | विकास
ऐकीव माहितीप्रमाणे क्म्युनिस्ट पक्षाचे वृंदा कारत वगैरे नेत्यांनी हजेरी सोडा साधा फोनही केला नाही.
दुर्दैवाने या वस्तुस्थितीचे आश्चर्य वाटले नाही.
पानसर्यांच्या हत्येनंतर त्याचे राजकारण करण्यात महाराष्ट्रातील तथाकथीत पुरोगामी समाज मग्न आहे. त्यातील कितींना पानसरे आधी माहीत होते हा देखील एक चर्चेचा विषय होऊ शकेल. असो.
24 Feb 2015 - 2:34 am | अर्धवटराव
पानसरेंच्या हत्येबद्दल हमीद दाभोलकरांचा लेख वाचला. त्यात त्यांनी भाजप हा धार्मीक अजेंड्याने निवडुन आला असं सरसकट विधान केलय. शिवाय कोंग्रेसचे राजकीय शिरकाण म्हणजे धर्मनिरपक्षेतेला तिलांजली, आणि कम्युनीस्टांचा शक्तीक्षय म्हणजे अनेक प्रकारच्या विषमतेवर आघात करणार्या सो कॉल्ड आंदोलनाचं पानिपत जणु. आपल्या विरोधी विचारांना विचाराने उत्तर देण्याऐवजी सरळ गोळी घालणारं कम्युनिस्ट तत्वज्ञान जेंव्हा विचाराला विचाराने उत्तर देण्याच्या बाता मारतं तेंव्हा आपण खरच २१व्या शतकात आल्यासारखं वाटतं.
24 Feb 2015 - 2:45 am | विकास
आपल्या विरोधी विचारांना विचाराने उत्तर देण्याऐवजी सरळ गोळी घालणारं कम्युनिस्ट तत्वज्ञान जेंव्हा विचाराला विचाराने उत्तर देण्याच्या बाता मारतं तेंव्हा आपण खरच २१व्या शतकात आल्यासारखं वाटतं.
मस्त!
पानसर्यांची अथवा दाभोलकरांची हत्या होणे हे निषेधार्हच होते आणि आहे. त्यात जर कोणी धार्मिकतेच्या नावाखाली केले असले तरी त्याला कडक शिक्षा होणे महत्वाचेच. पण तसे सिध्द झाले नसताना तसे झाले म्हणणे हे आक्षेपार्ह आहे. त्यातून खरी वृत्ती समजते झालं! पण या पुढे अजून एका गोष्टीची गंमत वाटते, ती म्हणजे हीच माणसे जेंव्हा नक्षलवाद्यांनी आरंभलेल्या हिंसाचाराचे समर्थन करतात तेंव्हा.
24 Feb 2015 - 3:05 am | संदीप डांगे
अजून काहीही धागादोरा हाती लागला नसतांना सूचक किंवा उघड आरोप करणे ह्यातून फक्त राजकारणाचाच वास येतो. म्हणजे हे पण मेलेल्या माणसाचा योग्य तो उपयोग करून आपली पोळी भाजणारेच आहेत हे त्यांच्या अनुयायांना कळत नाही का?
24 Feb 2015 - 2:55 am | संदीप डांगे
.
+१. छान विचार मांडला आहे.
24 Feb 2015 - 8:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
धर्मनिरपेक्षता म्हणजे दाढी कुरवाळणं किंवा अवर गॉड लव्हज ऑल म्हणुन क्रुस नाचवणार्या मंडळींना वाटेल तसा नंगानाच घालायची परवानगी देणं असं मतं असणार्या हमीद दाभोलकरांबद्दल काय बोलावं?
ते कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांनी जेवढं सामान्य लोकांचं नुकसानं केलं ना तेवढं भांडवलवाद्यांनी पण नाही केलं. विषमतेवर आघात करणार्या चळवळींच्या नावाखाली थेट संधीचं हिसकाउन घ्यायला लागले हे लोकं.
आजपर्यंत कम्युनिस्ट पक्षाकडुन झालेल्या हिंसाचाराबद्दल ब्र सुद्धा का काढला जातं नाही?
24 Feb 2015 - 2:37 am | अर्धवटराव
हि सर्व हत्याकांड याच उदात्त हेतुने घडविली जात असल्याचं पुढे आलं तरी फार आश्चर्य वाटणार नाहि.
22 Feb 2015 - 8:43 pm | तुषार काळभोर
कुणी तरी सांगा की राव!!
24 Feb 2015 - 6:11 pm | रक्तपिशाच्च
हे बघ भाऊ …. आपल्याला जाती-पाती सारख्या क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नै…।