काही गंभीर सामाजिक्/राजकीय प्रश्न/शंका
संपादक मंडळास विनंती: हा धागा/त्यातील प्रश्न/त्यांची उत्तरे/प्रतिसाद यातील काहीही जर कोणाच्या संवेदना दुखावणारे असेल तर लागलीच उडवून टाकावे.
१. जातीयवादी म्हणजे कोण्/काय?
२. धर्मनिरपेक्ष म्हणजे कोण्/काय?
३. पुरोगामी विचार म्हणजे कसले विचार?
४. प्रतिगामी विचार म्हणजे कसले विचार?
५. समाजवाद म्हणजे काय?
६. 'बहुजन समाज': यामध्ये कोणते सामाजिक घटक येतात? जर 'बहुजन समाज' ही संज्ञा जातिविषयक असेल तर, त्यात कोणत्या जाती येतात?
७. 'अल्पसंख्यांक' म्हणजे किती अल्प? किती टक्के असल्यावर एखादा घटक अल्पसंख्य ठरतो? की सर्वात मोठे सोडून इतर सर्वच अल्पसंख्यांक?
८. 'प्रार्थनास्थळ' म्हणजे काय? वॄत्तपत्रात मंदीर, गुरुद्वारा, सिनेगॉग हे शब्द तर वापरले जातात. मग कोणत्या स्थळाचा उल्लेख प्रार्थनास्थळ म्हणून केला जातो?
या प्रश्नांची उत्तरे बहुतेकांना माहिती असतात. (मला माहिती नाहीत, म्हणून विचारतोय.) तरी लॉर्ड व्होल्डेमॉर्टला he-who-must-not-be-named म्हटल्यासारखं सारखं हे शब्द "कोडवर्ड" म्हणून का वापरले जातात?
अवांतरः आत्ताच एक प्रश्न पडलायः - काल कै गोविंद पानसरे यांची अंत्ययात्रा लाईव्ह दाखवत होते. त्यात काही व्यक्तिंच्या हाती "गोडसेवादी-सावरकरवादी विचारांचा निषेध असो" असे फलक होते. गोडसे-सावरकर या व्यक्तिंचे(केवळ तटस्थता असावी म्हणून असे लिहितो आहे, सावरकरांबद्दल मला पूर्ण आदर आहे) असे कोणते विचार होते, की त्यांनी प्रेरित होऊन कोणीतरी एका कामगार चळवळीतील नेत्याची हत्या करावी?
असो...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
.
मॅच बघा
संपली...
१. जातीयवादी म्हणजे कोण्/काय?
अराउंड द वर्ल्ड इन ४ आवर्स???
+१
तू नळी दुवा
आश्चर्य वाटले नाही
आणखी एक अवांतर
मस्त!
खरे आहे.
हीच दांभिकता सगळीकडेच दिसते...
शिवाय कोंग्रेसचे राजकीय
दोन दिवस चवितचर्वण...
कुणी तरी सांगा की राव!!
हे बघ भाऊ …. आपल्याला जाती