वोल्क्सवॅगन वेंटो बद्दल मत
नमस्कार मंडळी,
प्रथमच आपली मते जाणून घेण्यासाठी हा धागा टाकतोय. मी माझी सध्याची ह्युंदाई वेरणा पेट्रोल 2008 मॉडेल चेंज करून वोल्क्सवॅगन वेंटो 1.6 हाइलाइन एम टी पेट्रोल घेण्याचा विचार करतोय.
ह्या गाडी बद्दल कुणाला अनुभव आहे का?
एकूणात कशी आहे? कंपेर्ड टू वेरणा कशी? किंवा माइलेज च्या दृष्टीने कशी? पॉवर? ड्राइविंग कंफर्ट? लॉँग रन साठी? किंवा डेली वापर 60 की मी असेल विविध ठिकाणी फिरण्यासाठी तर कंफर्ट च्या दृष्टीने कशी? ए सी बद्दल ?
तसं मी बर्या पैकी अभ्यास व कंपॅरिज़न्स केले आहेत. पण प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या पैकी कुणाची मते कळावी म्हणून प्रयोजन.