गाभा:
नमस्कार मंडळी,
मिसळ पाव वर लिहिण्याची हि माझी पहिलीच वेळ आहे.
पण रोज न चुकता इथे येऊन नवनवीन लेख, चर्चा वाचण्याचा माझा अगदी नेम झाला आहे,
आणि त्यातूनच मला असा वाटले कि इथले सभासद मला 'प्रपौत्र दर्शन ' सोहळ्याविषयी काही मार्गदर्शन करू शकतील
आम्ही इंग्लंड मध्ये राहतो आणि इथे आमच्या एका स्नेह्यांना त्यांच्या आई आणि नाती साठी हा सोहळा करायचा आहे.
त्यांच्या कुटुंबातील असा पहिलाच सोहळा अहे. बऱ्याच लोकांकडे चौकशी केल्यावर खूपच वेगवेगळी माहिती मिळाली .
त्यात फक्त 'सोन्याची फुले' तेव्हढी सगळ्यांनीच सांगितली .
सोन्याची फुले, सोन्याची पणती यांचे काय महत्व आहे?
आणि त्या वस्तू नक्की कोणी कोणाला द्यायच्या?
कृपया कुणी या विषयी सविस्तर माहिती देऊ शकेल का?
धन्यवाद,
स्वप्नालीसा
प्रतिक्रिया
16 Oct 2014 - 8:38 pm | संजय क्षीरसागर
सोन्याची फुलं आणि पणती मला पाठवा.
16 Oct 2014 - 8:52 pm | विलासराव
जमल्यास मलापण!!!!!!
16 Oct 2014 - 9:31 pm | माम्लेदारचा पन्खा
सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा म्हणतात बहुतेक याला.... तुला पण करायची असते...
16 Oct 2014 - 9:48 pm | अत्रुप्त आत्मा
सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा म्हणतात बहुतेक याला.>>> नाही हो मा.प.
त्यांनी विचारलय तेच बरोबर आहे. :)
==================================================
@स्वप्नालीसा >>> संदेश पाठवला आहे.
16 Oct 2014 - 10:02 pm | माम्लेदारचा पन्खा
नाहीतर आमच्या हातून घोर आणि अक्षम्य अपराध घडले असते....माझा प्रमाद पदरात घ्या......
16 Oct 2014 - 10:04 pm | अत्रुप्त आत्मा
काढलत मा.प. ;)
16 Oct 2014 - 10:13 pm | माम्लेदारचा पन्खा
पण सगळ्यांचंच शंकानिरसन करा की... व्यनि कशास हवा तो?
16 Oct 2014 - 10:19 pm | अत्रुप्त आत्मा
अहो...मी धार्मिकविधी सांगितलेला नाही. तो सांगायचा असता तर इथेच उघड सांगितला असता. मी लौकिकरित्या काय काय (महत्वाचं) करावं. (जे त्यांना सहज जमेल) ते सांगितलय. असं जे सांगायचं,ते व्यक्तिनिष्ठ असतं. म्हणून संदेशातून.
16 Oct 2014 - 10:33 pm | माम्लेदारचा पन्खा
मंग असू द्या....
16 Oct 2014 - 10:04 pm | खेडूत
पहिल्यांदाच ऐकलं पण जरा शोधल्यावर मिळालं ते अस आहे !
अगर ग्रहस्थ आश्रम से मोक्ष मिलता तो........................
शुकदेवजी जब जन्म के कुछ समय बाद वन को जाने लगे तो उनके पिता व्यासजी ने ने उनसे कहा “बेटा कुछ दिन ठहरो मैं तुम्हारे कुछ संस्कार तो कर दू“ |
इस पर शुकदेवजी ने कहा अब तक जन्म जन्मांतरों मे मेरे असंख्य संस्कार हो चुके हैं जिन्होने मुझे भटका रखा हैं इसलिए अब मैं संस्कारो से कोई सरोकार नहीं रखना चाहता
अपने पुत्र की बात सुनकर व्यासजी बोले तुम्हें ब्रह्मचर्य,ग्रहस्थ,वानप्रस्थ और सन्यास इन चारो आश्रमो मे प्रवेश करना ही चाहिए तभी तुम्हें मोक्ष प्राप्त हो सकेगा |
शुकदेव बोले “अगर ब्रह्मचर्य से मोक्ष मिलता तो नपुंसको को वह हमेशा ही प्राप्त रहता,अगर ग्रहस्थाश्रम से मोक्ष मिलता होता तब तो सारी दुनिया को ही मुक्ति मिल गयी होती,अगर वानप्रस्थों को मोक्ष मिलता होता तो सारे पशु पक्षी मुक्त हो गए होते और अगर सन्यास से मोक्ष मिलता हो,तब तो सारे दरिद्रों को वह फौरन मिलना चाहिए” |
व्यासजी ने कहा “ग्रहस्थों के लिए लोक परलोक दोनों सुखद होते हैं“| पुत्रहीन व्यक्ति नरक गमन करता हैं |
अपने पिता की बातों को काटते हुये शुकदेव ने कहा “अगर पुत्र होने से स्वर्ग मिलता तो शूकरो,कुत्तो,और टिड्डिओ को भी व मिलता होगा | व्यासजी “पुत्र के दर्शन से मनुष्य पित्रऋण से मुक्त हो जाता हैं,पौत्र दर्शन से देवऋण से मुक्त हो जाता हैं और प्रपौत्र के दर्शन से उसे स्वर्ग की प्राप्ति होती हैं” |
शुकदेव ने जवाब दिया गिद्दों की आयु बहुत लंबी होती हैं वे अपनी कई पीढ़ियाँ देखते हैं पौत्र प्रपौत्र तो उनके लिए साधारण सी बात हैं पर ना जाने उनमे से कितनों को मोक्ष मिला होगा |
यह सुनकर व्यासजी निरुत्तर हो गए |
16 Oct 2014 - 10:13 pm | अत्रुप्त आत्मा
वाहव्वा..............!!!
मला मिठाई माहित होती.. ;) क्यालरीज आजच कळ्ळ्या!! :D
==================================

पळा आता....
नाय तर मारतय खेडूत काका!!! =))
आणि काही.....असो! =))
16 Oct 2014 - 10:12 pm | पिवळा डांबिस
तुमच्या इंग्लंडाच्या राणीला विचारून बघा, तिला माहिती असेल.
तिने हल्लीच केलं म्हणे प्रपौत्र दर्शन!!!
;)
17 Oct 2014 - 2:48 am | आदूबाळ
एवढी आयटम नातसून असताना काय चिंता आहे?
सध्या दुसर्या प्रपौत्राच्या दर्शनाची तयारी बकिंगममुक्कामी चालू आहे असं ऐकून आहे.
17 Oct 2014 - 2:55 pm | बॅटमॅन
च्यायला =))
16 Oct 2014 - 10:44 pm | गवि
त्या वयापर्यंत 1000 पूर्ण चंद्र खरोखर पाहून झालेले असतात का यावर वाद झालेला आठवतो. तरीही अद्याप गणित नीट केलेले नाही. अधिक महिने वगैरे भानगडींच्या भीतीने.
बाकी नेमके काय करायचे याविषयी आत्मुबुवा असताना काळजीच नको.
17 Oct 2014 - 1:23 pm | श्रीगुरुजी
प्रपौत्रदर्शन म्हणजे सहस्त्रचंद्रदर्शन नसावे.
पणतू किंवा पणतीचा जन्म झाल्यावर पणजोबा व पणजी यांच्या डोक्यावर सोन्याची फुले उधळतात. हा कार्यक्रम म्हणजे प्रपौत्रदर्शन असावा.
17 Oct 2014 - 9:37 pm | सूड
सोन्या फुलं कशी देतो म्हणे??
17 Oct 2014 - 9:38 pm | टवाळ कार्टा
हाताने
17 Oct 2014 - 3:14 pm | अत्रुप्त आत्मा
पणतू >>> नातू >>> मुलगा >>> वडिल
प्रपौत्र >>> पौत्र >>> पुत्र >>> पिता
लहानमूल >>> बाप >>> आजोबा >>> पणजोबा
======================================
बघा बरं कै अंदाज लागतोय का तो! ;)
17 Oct 2014 - 3:30 pm | माम्लेदारचा पन्खा
अंदाज हाणून पाडा आणि पुढच्या पिढीला भारतात खेचून आणा.... भोगू दे त्यांना त्यांच्या पूर्वजन्माची फळे !
( जे फारीनला जन्मतात ते कित्ती लक्की नै !)
17 Oct 2014 - 5:41 pm | रेवती
हा हा. अगदी!
एकीनं मला उत्साहानं असच सांगितलं होतं की आमची मुलगी जर्मनीत जलमलीये, तुला म्हायतिय ? मुलगा मात्र भारतात जलमला, काय करणार?
हसू आलं होतं.
20 Oct 2014 - 3:01 pm | मदनबाण
आमची मुलगी जर्मनीत जलमलीये, तुला म्हायतिय ? मुलगा मात्र भारतात जलमला, काय करणार?
अश्या करंट्या लोकांना सांगावे की चुकुन सुद्धा तोंडातुन स्वतःच्या मायभुमीचे नाव काढु नका ! साले स्वतःकुठे जन्माला आले इथेच ना ? मग त्यांनी त्यांच्या पालकां विषयी सुद्धा दु:ख व्यक्त करायला हवे ! नदद्रष्ट कुठले. *DIABLO*
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms
17 Oct 2014 - 8:30 pm | स्वप्नालीसा
अतृप्त आत्मा यांनी मार्गदर्शन केलेले आहे.
त्याबद्दल आभार
18 Oct 2014 - 2:25 pm | माम्लेदारचा पन्खा
वंदे मातरम !
18 Oct 2014 - 7:58 pm | कंजूस
असं धाग्यावर येऊन बोला की राव. प्रपौत्रदर्शन काय व्हाईटहाउसातली अथवा इंग्लंडच्या राजवाड्यातली चर्चा आहे का ?
जेव्हा नातवाला मुलगा होतो {पणजोबा-आजोबा-नातू-पणतू}तेव्हा पणजोबा पणतूचं तोंड पाहण्याचा एक समारंभ करतो आणि एक सोन्याचा दागिना अथवा फुलाचा आकार{ऐपतिप्रमाणे}देतो.
प्रपौत्र मुलीकडूनही होतो परंतू त्याचे प्रमाण हे मुलाकडून होणाऱ्या पणतू पेक्षा अधिक आहे. कारण मुलांची लग्ने तिशित फारवेळा होतात परंतू मुलींची पंचविशिच्या आत.पूर्वी पंधराव्या वर्षी लग्ने होत होती परंतू बालमूत्यूही फार होते.एवंच मुलाकडूनच्या प्रपौत्राचे कवतिक अधिक आहे.
आता धार्मिक कार्य आणि समारंभ म्हणजे काम एकच संस्कृत अथवा ईंग्रजीतून शुभेच्छा देणे, चौघांना दिर्घायुष्य चिंतणे, देवांना आवाहन करणे. माझ्याही शुभेच्छा.
सह०चं० बद्दल नंतर.
18 Oct 2014 - 8:35 pm | कंजूस
सहस्रचंद्रदर्शनाचे ढोबळ गणित:
दरवर्षी बारा पौर्णिमा दहा अकरा दिवस लवकर होतात. तीन वर्षात इंग्रजी ३६ महिने संपतील तेव्हा ३७ पौर्णिमा होतील. आता १०००च्या जवळ जाणारी ३७च्या पटीतली {२७पट}९९९ ही
संख्या येते. ३६च्या २७पट ९७२ महिने होतात याचे ८१वर्षे आले.
आयुष्याची ८१ वर्षे पूर्ण होतात तेव्हा १००० पौर्णिमा दिसतात म्हणजे सहस्रचंद्रदर्शन झाले म्हणायचे. त्यानिमित्ताने केलेला समारंभ.
19 Oct 2014 - 3:28 pm | पुष्करिणी
अतृप्त आत्मांनी सविस्तर उत्तर दिलं आहेच; अजून एक मिपा सभासद 'मेघवेडा' इंग्लंडमधे पौरोहित्य करतात.
19 Oct 2014 - 3:30 pm | पुष्करिणी
कंजूसः पौर्णिमा नव्हे शुध्द प्रतिपदा (न्यू मून ).