नोकरीबदलासंदर्भात मदत/माहिती हवी आहे
नमस्कार,
एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम केल्यानंतर जे जडत्व येते (त्याला 'कंफर्ट झोन' असे गोंडस नाव आहे इंग्रजीमध्ये) तशा प्रकारचे काहीसे अस्मादिकांचे झाले आहे किंवा होऊ घातले आहे असे सध्या प्रकर्षाने जाणवतेय. शिवाय, सध्याच्या ठिकाणी कामाच्या आणि एकंदरीत काम करण्याच्या पद्धतीच्या बाबतीत आता फारसे काही उत्साहवर्धक वातावरण राहिलेले नाही असे निदर्शनास आले आहे. काही बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत पण ते तितकेसे सोपे नाही हे लक्षात यायला वेळ लागला. :-)