पुराणातली वांगी

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in काथ्याकूट
7 Jul 2014 - 2:43 pm
गाभा: 

पुराणातली वांगी असा एक वाक्प्रचार बरेचदा ऐकण्यात आला. मराठीतले बहुतेक वाक्प्रचार अर्थपूर्ण आहेत. खरं तर सगळेच, पण काहींचे अर्थ मलाच माहिती नाहीत. आता पुराणातली वांगी याचा काय बरं अर्थ असेल, असा प्रश्न बरेच दिवस पडला होता. अलीकडेच या प्रश्नाचं उत्तर सापडलं. मूळ वाक्प्रचार पुराणातली वानगी असा आहे म्हणे. म्हणजे आपण म्हणतो ना, वानगीदाखल (उदाहरणार्थ), तसं...
असे आणखी काही वाक्प्रचार अर्थासह समजून घ्यायला आवडतील...

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

7 Jul 2014 - 3:18 pm | मृत्युन्जय

१८ विश्वे दारिद्र्य हाही एक चुकीचा वाक्प्रचार आहे. त्याऐवजी ते १८ विसे दारिद्र्य असे पाहिजे. १८ विसे = ३६० दिवस. म्हणजे १२ महिने दारिद्र्य. थोडक्यात अखंड दारिद्र्य.

एसमाळी's picture

7 Jul 2014 - 3:18 pm | एसमाळी

"भजनाला आठ अन् जेवणाला साठ"

अर्थ समजेलच की

गणपतीच्या आरतीत काही लोकं 'संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे' असे म्हणतात, तर काही 'संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे' असे म्हणतात, नक्की कोणते बरोबर, ते मला आजही माहित नाही.

संकटी पावावे हेच बरोबर आहे, नैतर गंपतीबाप्पा संकष्टी सोडून उरलेल्या दिवशी पावतच नाहीत असे होईल. =))

प्यारे१'s picture

7 Jul 2014 - 3:57 pm | प्यारे१

+ ११११११

त्याच आरतीमध्ये 'रत्नजडीत मुगुट 'शोभतो बरा' अथवा 'शोभे तो बरा' असं म्हणताना नेमकं शोभे 'तोबरा' असं म्हटलं जातं.

'चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करता पडले प्रवाही' च्या बाबतीत पण हेच घडतं. ;)

त्याच आरतीमध्ये 'रत्नजडीत मुगुट 'शोभतो बरा' अथवा 'शोभे तो बरा' असं म्हणताना नेमकं शोभे 'तोबरा' असं म्हटलं जातं.

अगदी अगदी. याला अजूनेक प्यारलल उदा. मिले सुरमध्ये आहे. जेव्हा

'सुर का दरिया बह के सागर में मिले,
बदलां दा रूप लके, बरसने होले होले'

हे तमिळच्या अगोदरचे पंजाबीतले गाणे म्हणतात तेव्हा सगळे 'बदलां दारू' च म्हणतात. मीही म्हणायचो, अजूनही म्हणतो =))

मी, ही आणखी ऐक, 'प्रतिक्रिया चिटकवली' का 'प्रतिक्रिया चिकटवली' ?

चिकटवली हा प्रमाण बोलीतला प्रयोग आहे असे मला वाटते.

आनंदी गोपाळ's picture

9 Jul 2014 - 4:13 pm | आनंदी गोपाळ

चिकट हे विशेषण. डिंक चिकट असतो.
चिटकणे हे सहसा (आज्ञार्थी) क्रीयापद म्हणून वापरले जाते. उदा: जरा प्रयत्न करून एकाद्या नोकरीस चिटक रे बाबा.
त्यातही हिंदी चिपकना च्या अपभ्रंशावरून आले असावे.

चिकट हे रूप मराठी म्हणून जास्त योग्य.

चिटकणे हे हिंदी प्रभावामुळेच आले असेल याबद्दल साशंक आहे-मला ते साधे वर्णविपर्ययाचे उदा. वाटते. बाकी विशेषणाबद्दल इ. सहमत आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jul 2014 - 4:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

मी नै त्यातली अन कडी लावा आतली

दरवाजा उघडा आणि न्हाणीला बोळा

मी बा‌ई संतीण माझ्या मागे दोन तीन

अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज

अंधारात केले पण उजेडात आले

आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.

जिकडे सु‌ई तिकडे दोरा.

धु म्हटले की धुवायचे लोंबतय काय ते नाही विचारायचे

माकड म्हणतं माझीच लाल

हे वाकप्रचार नेहमी कानावर येत असतात. पण काहीकेल्या अर्थबोध होत नाही.

या धाग्या निम्मीत्त जाणकार यावर प्रकाश टाकतील का?

पैजारबुवा,

मिसळपाववर याच आशयावर आधी झालेली समांतर चर्चा ह्या धाग्यावर.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Jul 2014 - 10:28 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चारुदत्त आफळ्यांची किर्तनं ऐका बराचं खुलासा होईल.

@बॅटमॅन
तोबरा आणि संकष्टी का संकटी वर आफळेबुवांचं एक आख्यान आहे. सावरकरचरित्र सांगताना ह्या विषयावर त्यांनी सांगीतल्याचं आठवतय.

(आफळे बुवांचा पंखा) अनिरुद्ध

चारूदत्त आफळे ह्यांचे किर्तन ऐकण्याची संधी अजून गवसली नाही. पण त्यांचे पिताश्री राष्ट्रीय किर्तनकार गोविंदबुवा आफळे ह्यांचे किर्तन ऐकण्याचा एकदा लहानपणी योग आला होता. एका किर्तनातच त्यांचा पंखा झालो. तेच गुण मुलात उतरले असणार असे दिसते आहे.

संचित's picture

13 Jul 2014 - 10:02 pm | संचित

आफळे गुरूजींचे किर्तन तुनळी वर येथे भेटेल. https://www.youtube.com/watch?v=Ra4Dj_S4BQ0

प्यारे१'s picture

13 Jul 2014 - 10:47 pm | प्यारे१

>>> (आफळे बुवांचा पंखा)

'आमच्या' वाईच्या कृष्णाबाई उत्सवाला हमखास असतात. धमाल कीर्तन असतं. त्याबरोबरच जाज्ज्वल्ल्य हिंदूप्रेम नि भरपूर कानपिचक्या सुद्धा.

माधुरी विनायक's picture

10 Jul 2014 - 12:10 pm | माधुरी विनायक

प्रतिसादांबद्दल आभार आणि हो, शिद, आपण दिलेला दुवा उपयुक्त आहे. धन्यवाद.